✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

नेताजी सुभाषचंद्र बोस-एक असामान्य व्यक्तिमत्व

च
चिन्या१९८५ यांनी
Sat, 01/24/2009 - 07:12  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
13963 वाचन

💬 प्रतिसाद (51)

प्रतिक्रिया

स
सखाराम_गटणे™ Sat, 01/24/2009 - 09:05 नवीन

छान लेख

छान लेख आहे, नंतर येथेच प्रतिक्रीया देतो
  • Log in or register to post comments
स
सहज Sat, 01/24/2009 - 09:11 नवीन

देशभक्त नेताजीबाबुंना प्रणाम

नेताजी बाबुंच्या देशभक्तीला सलाम. आझाद हिंद सेनेचा वापर ब्रिटिशांविरुद्ध करुन भारतातुन इंग्रजी सैन्याचा पाडाव करण्याच्या साहसी मोहीमेला सलाम. दुसर्‍या महायुद्धात भारतीय वंशाच्या सर्व नाही तरी हजारो युद्धबंदी सैनिकांचे प्राण फायरिंग स्क्वाडच्या तोंडातुन वाचल्याबद्दल आदर. बाकी बहुत सारा मसाला, दैवतीकरण इ इ ... चालू द्या... भारतातील सुधारक लोकांनी अनेक दशकांपासुन चालवलेली देशी स्वातंत्र चळवळीला, जपान, जर्मनीच्या आश्रयातुन जन्मास आलेली व जवळजवळ त्यांच्याच पुर्णता मदतीवर अवलंबुन असलेली, दुसर्‍या महायुद्धाच्या ब्रिटिशांना काहीश्या प्रतिकुल पार्श्वभुमीवर आझाद हिंद सेना भारताला स्वतंत्र करुन समर्थ नेतृत्व देण्यास पर्याय हे जरा "फार फेच्ड" नाही वाटत? कृपया यात नेताजींच्या देशभक्तीवर शंका घेत नाही की अहिंसेशी संबधीत एका नेत्याशी व नेताजींची जुगलबंदी लावुन देण्याचा विचार नाही. ह्या प्रतिसादावर चर्चा नेहमीच्या हे विरुद्ध ते मार्गाने कृपया नेउ नका. जरासे अजुन पुढे जाउन, इंग्रजांना भारतातुन बाहेर काढणे हे जरी एक समान कार्य [आ. हिं.से व काँग्रेसप्रणीत चळवळ दोन्हीत] धरले तरी लोकशाही मार्गाने समाजरचना, देशातील विविध संस्थाने एकत्रीकरण, सर्व भारतीयांना घटनात्मक अधिकार इ इ गोष्टी ह्या लोकशाही मार्गाने जाणार्‍या चळवळीत व साम्यवाद/एकाधिकाशाही/फॅसिझम यावर विश्वास असलेल्या [व दुसर्‍या महायुद्धानंतर त्वरीत सुरु झालेल्या आंतराष्ट्रीय शीतयुद्धाच्या पार्श्वभुमीवर] लष्करी नेतृत्वाखालील राजवटीत सामान्य माणसाचे अधिकार कसे जपले गेले असते याबद्दल [गेल्या ६० वर्षाच्या जागतीक इतिहासाच्या उपलब्ध माहीतीवर] जरा साशंक. दुसरे महायुद्ध व आझाद हिंद सेनेच्या नेत्यांचे परदेशातील कार्य ज्या काळात झाले आहे ते वाचा, मग त्यावेळी जे निर्णय झाले, ज्या आघाड्यांवर विजय/ पराभव झाले त्यावेळी मुख्य महायुद्धाची स्थीती काय याची त्या कालानुरुप सांगड घाला. स्व:तापुरता इतिहासाचा तटस्थ मागोवा घ्या. मागणं लई नाही लई नाही.
  • Log in or register to post comments
क
कोलबेर Sat, 01/24/2009 - 09:36 नवीन

+१

माहितीपूर्ण लेख.
त्यांची राजकीय विचारसरणी ही फॅसिझम आणि कम्युनिझम यांचे मिश्रणाची होती.ज्यास त्यांनी 'साम्यवाद' हे नाव दिले होते.भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर काही वर्षे तरी authoritarian rule असला पाहिजे असे त्यांचे म्हणने होते.
हे वाचल्यावर मत सहजरावांसारखेच! फरक इतकाच की, सामान्य माणसाचे अधिकार कसे जपले गेले असते, याबद्दल मी जरा साशंक नसून बराच साशंक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
स
सर्वसाक्षी Sat, 01/24/2009 - 09:43 नवीन

सामान्य माणुस

तो तसाही दुर्लक्षितच राहीला की! आणि हुकुमशाही तर प्रस्थापितांचीही होतीच . निदान नेताजींनी आपले प्रामाणिक मत स्पष्ट मांडायचे धैर्य दाखविले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोलबेर
क
कोलबेर Sat, 01/24/2009 - 09:57 नवीन

तो तसाही

तो तसाही दुर्लक्षितच राहीला की!
नाही. असे मला तरी वाटत नाही. सामान्य माणसांच्या हक्कांबाबत बोलत असाल तर चीनकडे पाहिले असता असे मला अजीबात वाटत नाही. (सामान्य माणूस) कोलबेर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्वसाक्षी
L
llपुण्याचे पेशवेll Sun, 01/25/2009 - 01:27 नवीन

सहमत

>>आणि हुकुमशाही तर प्रस्थापितांचीही होतीच . निदान नेताजींनी आपले प्रामाणिक मत स्पष्ट मांडायचे धैर्य दाखविले. अगदी सहमत. त्यामुळेच तर नंतर 'उषःकाल होता होता' म्हणायची वेळ आली. फक्त ते देखील लोकशाहीच्या नावावर सारे चेपवले गेले. आणि सामान्य माणसाचे अधिकार जपण्याबाबत आजही जी परिस्थिती दिसते ती काही फार आशादायक नाही. त्यामुळे शेवटी सगळे शेवटी पॉईंट ऑफ व्ह्यू वर अवलंबून असते हेच खरे. पुण्याचे पेशवे Since 1984
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्वसाक्षी
च
चिन्या१९८५ Sun, 01/25/2009 - 18:32 नवीन

मला

मला नेताजींचा मुद्दा त्यांच्या जागेवर बरोबर वाटतो.ब्रिटन हे लोकशाहीचे राष्ट्र होते पण त्यांनीही भारतीयांवर अन्याय केलाच ना???मग नेताजींनी साहजिकच इतर विचारसरण्ञांचा अभ्यास करुन स्वतःचा मुद्दा मांडल्यास काय चुकले. बघा- http://gandharvablog.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
न
नितिन थत्ते Sat, 01/24/2009 - 11:02 नवीन

सहमत

नेताजींच्या देशभक्ती बाबत कुणालाच संशय नाही. नेताजी सापडल्यास त्यांना वॉर क्रिमिनल म्हणून ब्रिटिशांच्या ताब्यात देऊ असे भारत सरकारने ५० च्या दशकात मान्य केले असेल हे संभवत नाही (ब्रिटिशांनी ५० च्या दशकात अशी मागणी केली असणेही संभवत नाही). हिटलरने नेताजींचे कौतुक केले असेल पण तो हे कौतुक का करत आहे हे न समजण्याइतके नेताजी दुधखुळे असतील असे मला वाटत नाही. शत्रूचा शत्रू म्हणून मदत करणे वेगळे आणि भारत स्वतंत्र व्हावा असे खरेच वाटणे वेगळे. मुख्य म्हणजे जपान-जर्मनीच्या मदतीने ब्रिटिशांचा पराभव झाला असता हे जरी मान्य केले तरी भारत स्वतंत्र झाला असता की नाही हा प्रश्नच आहे. म्हणजे जपानने महायुद्धात फिलिपाइन्स वगैरे जिंकल्यावर त्यांना स्वातंत्र्य दिले नव्हते. ही गोष्ट सोडली तर नेताजींचे असामान्यत्व मान्यच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
च
चिन्या१९८५ Sat, 01/24/2009 - 19:00 नवीन

खराटा , तशी

खराटा , तशी मागणी करण्याची गरजच नव्हती. नेताजी देशात येउ नयेत हे नेहरुंचे मत होते.आणि अशी मागणी न करताही आम्ही त्यांना वॉर क्रिमिनल म्हणुन ब्रिटनला सोपवु असे भारताच्या तत्कालिन गृहमंत्री गोविंदवल्लभ पंत यांनी स्पष्ट केले होते.तेच इंदिरा गांधींनि १९६६ साली पुन्हा स्पष्ट केले हिटलरने नेताजींचे कौतुक केले असेल पण तो हे कौतुक का करत आहे हे न समजण्याइतके नेताजी दुधखुळे असतील असे मला वाटत नाही. नेताजींच्या फॅसिझमची विचारधारणा मुसोलिनीशी मिळतीजुळती होती,हिटलरशी नाही.दुसर म्हणजे जर्मनी वास्तव्यात नेताजींनी हिटलरच्या वंशवादावर आणि आक्रमकतेवर टिका केली होती. बघा- http://gandharvablog.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
ब
बगाराम Sun, 01/25/2009 - 07:20 नवीन

सहमत आहे.

सहमत आहे. जपान आणि हिटलर असले साप पाळून नेताजी चूकच करत होते असे मलाही वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
च
चिन्या१९८५ Sun, 01/25/2009 - 18:34 नवीन

मला नाही

मला नाही तसे वाटत्.शत्रुचा शत्रु तो मित्र असे मानुन नेताजी बरोबरच करत होते बघा- http://gandharvablog.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बगाराम
प
पुण्याचे वटवाघूळ Wed, 01/30/2013 - 13:37 नवीन

काय विचारता राव

मुख्य म्हणजे जपान-जर्मनीच्या मदतीने ब्रिटिशांचा पराभव झाला असता हे जरी मान्य केले तरी भारत स्वतंत्र झाला असता की नाही हा प्रश्नच आहे.
छे हो असले प्रश्न विचारायचे नसतात.जपानी इंग्रजांविरूध्द लढताना आझाद हिंद सेनेची मदत घेत होते (म्हणजे परस्पर मरायला भारतीय आहेत--आपले नुकसान कमी), त्यांनी जरी ब्रिटिशांना हरवले असते तरी भारताला स्वांतंत्र्य दिले असते का असे काही म्हणजे काही विचारायचे नाही.कारण नेताजी अहिंसेने लढणारे थोडीच होते?
ही गोष्ट सोडली तर नेताजींचे असामान्यत्व मान्यच आहे.
अगदी असेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
च
चिन्या१९८५ Sat, 01/24/2009 - 18:51 नवीन

गटणे,सहज्,क

गटणे,सहज्,कोलबेल,सर्वसाक्षी प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!!! दुसर्‍या महायुद्धाच्या ब्रिटिशांना काहीश्या प्रतिकुल पार्श्वभुमीवर आझाद हिंद सेना भारताला स्वतंत्र करुन समर्थ नेतृत्व देण्यास पर्याय हे जरा "फार फेच्ड" नाही वाटत? मला असे वाटते की माझ्या लेखामध्ये याला उत्तर दिलेले आहे शेवटच्या परीच्छेदात्.आझाद हिंद सेनेच्या पराक्रमाने ब्रिटीश इंडीयन आर्मीमध्ये ब्रिटीशांविरुध्द भावना जाग्रुत झाली व त्यामुळे पुढे काय होउ शकते याचा विचार करुन ब्रिटीशांनी भारताला स्वातंत्र्य दिले.ब्रिटनचे पंतप्रधान ऍटली हे मान्य करतात तर मग अजुन ठोस असा काय पुरावा देणार?? लष्करी नेतृत्वाखालील राजवटीत सामान्य माणसाचे अधिकार कसे जपले गेले असते याबद्दल साशंक हा मुद्दाच वेगळा आहे.त्याच्यावर चर्चा होउ शकते पण ऑथॉरीटेरीअन रुलचे अनेक फायदे आहेत्.श्गिवाय सुभाषबाबुंनी तो रुल फक्त काही वर्षांसाठी असावा असे सांगितले.देशाची सामाजिक घडी व्यवस्थित बसली की लोकशाही स्विकारली जावी असे त्यांचे म्हणने होते.आझाद हिंद सेनेच्या कार्यातही त्यांचे वर्तन लोकशाहीस विरुध्द नव्हते तर उलट लोकशाहीवादी होते. दुसरे महायुद्ध व आझाद हिंद सेनेच्या नेत्यांचे परदेशातील कार्य ज्या काळात झाले आहे ते वाचा, मग त्यावेळी जे निर्णय झाले, ज्या आघाड्यांवर विजय/ पराभव झाले त्यावेळी मुख्य महायुद्धाची स्थीती काय याची त्या कालानुरुप सांगड घाला. असा अभ्यास माझा नाही असे तुम्हाला का वाटते??? बघा- http://gandharvablog.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
स
सर्वसाक्षी Sat, 01/24/2009 - 09:26 नवीन

असमान्य व्यक्तिमत्व

चिन्मय, एका चांगल्या लेखासाठी अभिनंदन. या व्यक्तिमत्वावर कितीही लिहिले तरी ते संक्षिप्तच वाटते. कितीही वाचले तरी ते अपुरेच वाटते. मागे आझाद हिंद सेना ही लेखमाला लिहिताना मी कहाणी नेताजींची, सुभाचंद्र बोस, सुभाषकथा, महानायक ही व अन्य काही भारतीय तसेच तात्सो हादियस या जपानी समकालिनाचे सुभाषचंद्र, रुडॉल्फ वुर्टॉग या नेताजींच्या जर्मन वास्तव्यातील सहकार्‍याचे 'साईन ऑफ टायगर' तसेच अमेरिकेच्या कॅलिफोर्निया विद्यापिठाचे संशोधक पिटर होवर्ड फे यांचे 'दि फरगॉटन आर्मी' ही पुस्तके वाचली होती. बान ताकेझुमिची योरोझुप, मणीपूर सरकार, हिंदुस्थान टाईम्स (नेताजी प्रभाग), नेताजी रिसर्च ब्युरो यांची संकेतस्थळे तसेच जालावर असलेले कॅप्टन शाहनवाझ खान, गुरुबक्षसिंग धिल्लन, कॅप्टन लक्ष्मी, प्रेम सेहगल यांचे लेख वाचताना हे व्यक्तिमत्व केवळ किती महान व अनन्यसाधारण आहे ते लक्षात आले. केवळ आपले आवडते म्हणुन नसते गुण त्यांना चिकटवुन त्यांचा उदोउदो न करता त्याम्चे जिवनकार्य समजावुन घेण्यासाठी व अनेकाअनेक देश व देशवासीयांची त्यांच्याविषयीची भावना समजावुन घेण्यासाठी या वाचनाची मदत झाली व असामान्यत्वाचा साक्षात्कार घडत गेला. (१३ भगानंतर ही मालिका पूर्ण करु शकलो नाही याची लाज व खंत वाटते. मात्र इतक्या असामान्य व्यक्तिच्या असामान्य संग्रामाचा शोकांत लिहायला मन करत नाही हेही खरे आहे) जो या देशाचा अधिकृत नेता नव्हता किंबहुना उपेक्षित व प्रस्थापितांकडुन अव्हेरला गेला होता त्याला जगातील अनेक देश राष्ट्रप्रमुखाचा सन्मान देतात, त्याच्या प्राणाची जबाबदारी घेतात, त्याच्या शब्दाखातर बासनात बांधलेली युद्धमोहिम नव्याने उभारतात, ज्याच्या शद्बाखातर हजारो हिंदुस्थानी 'करो सब निछावर, बनो सब फकिर' असे गात आपले सर्वस्व सोडुन दिल्लीकडे चाल करुन जातात व जो नेता परराष्ट्राची मदत घेताना देखिल ताठ मानेने सांगु शकतो की "माझ्या देशाला तुमची मदत हवी आहे, तुमचे सैन्य नको; प्रत्येक युद्धात सांडलेला पहिला रक्ताचा थेंब हिम्दुस्थानी असेल. मला तीन लक्ष सैन्य आणि तिनशे कोटी रुपये हवे आहेत आणि ते पैसे मी कर्ज म्हणून मागत आहे; स्वातंत्र्यानंतर माझा देश ते सव्याज फेडेल. मी जर स्वतंत्र हिंदुस्थानचा राष्ट्रप्रमुख झालो नाही तर मी दरोदार भीक मागुन ते पैसे जमा करीन व परतफेड करेन" - अशा महान व्यक्तिमत्वला प्रस्थापितांनी राष्ट्रद्रोही ठरविले हे भीषण सत्य आहे. ज्याने स्वातंत्र्यप्राप्तीमध्ये सिंहाचा वाटा उचलला त्या महानायकाला मिळालेली उपेक्षा ही अत्यंत क्लेशदायक आहे. कसलीही आशा-अभिलाषा न बाळगता राष्ट्रासाठी सर्वस्व समर्पण करणार्या नेताजींना सादर प्रणाम.
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Sat, 01/24/2009 - 10:46 नवीन

असहमत

नेताजींची उपेक्षा आणि अवहेलना झाली हे मान्य नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्वसाक्षी
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Mon, 01/26/2009 - 15:19 नवीन

मान्य नाही ?

नेताजींची अवहेलना झाली, हे सर्वसाक्षींनी स्पष्ट केले आहे (अमेरिकेच्या कॅलिफोर्निया विदापीठाच्या वाचनाचा दाखला देऊन), तरीही मान्य नाही ? हा हंत हंत. मला पूर्णपणे मान्य आहे की नेताजींची अवहेलना झाली. (का कोण जाणे, माझ्या मनात सध्या "जय हो" ! असेच येते आहे. नेताजी, जय हो !) -- सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
च
चिन्या१९८५ Mon, 01/26/2009 - 17:10 नवीन

सुभाषजी,सु

सुभाषजी,सुभाषजी वो जान्-ए-हिंद आ गये| है नाझ जिसपे हिंदको वो शान्-ए-हिंद आ गये| बघा- http://gandharvablog.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट
च
चिन्या१९८५ Sat, 01/24/2009 - 19:06 नवीन

सर्वसाक्ष

सर्वसाक्षी, आपल्या लेखांची लिंक देता का????तुम्हाला माझा लेख कसा वाटला,त्याच्याबद्दल प्रतिक्रिया वाचायला आवडेल कारण तुम्हाला भरपुर माहीती आहे या विषयावरची. खराटा,नेताजींची नक्कीच उपेक्षा झाली.विमान अपघातात त्यांचा मृत्यु झाला नव्हता हे तर आता मुखर्जी कमिशनने स्पष्ट केलेय्.मग पुढचे आयुष्य त्यांनी कुठे घालवले याचा शोध घेतल्यास भगवानजीच नेताजी होते असे अनेक मान्यवरांना वाटते.मग इतक्या महत्वाच्या नेत्याला आपल्या आयुष्यातील शेवटचे अनेक वर्ष स्वतःची ओळख लपवुन रहावे लागले ही त्यांची उपेक्षा नाही का??? बघा- http://gandharvablog.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्वसाक्षी
ब
बगाराम Sun, 01/25/2009 - 07:23 नवीन

>सर्वसाक्ष

>सर्वसाक्षी, आपल्या लेखांची लिंक देता का??? आमचा अनुभव सांगतो की सर्वसाक्षी तुम्हाला कसलीही लिंक देणार नाहीत. आपल्या लिखाणाचा कसलाही माग लागू द्यायचा नाही ही त्यांची खासीयत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिन्या१९८५
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Mon, 01/26/2009 - 15:26 नवीन

तुझ्या आधी मी

चिन्या, तुझ्या सर्वसाक्षींकडून पुरावे मागण्याच्या लायनीत मी आधी आहे. मागे एकदा (मिसळपावावरील एका निषिद्ध संकेतस्थळावर) भगतसिंगाच्या फाशीसाठी मो. क. गांधी जबाबदार होते (इंग्रज सरकार नाही) असे विधान त्यांनी केले होते. त्याचा पुरावा मी अजूनही मागतो आहे. त्यामुळे तुला काहीही पुरावे हवे असल्यास, तू लायनीत माझ्या मागे यावे, ही नम्र विनंती. (आज प्रजासत्ताक दिनानिमित्त एवढातरी सिविक सेन्स आपल्यात हवा राव ! विरुद्ध पार्टीक्डून बघू की किती सिविक सेन्स दिसतो ते! ) -- सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिन्या१९८५
च
चिन्या१९८५ Mon, 01/26/2009 - 16:58 नवीन

सर्वसाक्ष

सर्वसाक्षींनी मला त्यांच्या लेखांच्या लिंक्स दिलेल्या आहेत्.छान लेखमालिका आहे त्यांची. बघा- http://gandharvablog.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट
न
नितिन थत्ते Mon, 01/26/2009 - 15:34 नवीन

त्यांचा

त्यांचा मृत्यु झाला नव्हता हे तर आता मुखर्जी कमिशनने स्पष्ट केलेय्. त्याच कमिशन ने भगवानजी हे नेताजी नव्हते असेही म्हटले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिन्या१९८५
च
चिन्या१९८५ Mon, 01/26/2009 - 17:01 नवीन

त्याच

त्याच कमिशन ने भगवानजी हे नेताजी नव्हते असेही म्हटले आहे. मान्य आहे.मी पण म्हणत नाही की तेच नेताजी होते.पण तसे म्हणायलाही बराच स्कोप आहे. बघा- http://gandharvablog.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
अ
अनिल हटेला Sat, 01/24/2009 - 09:39 नवीन

ज्याने

ज्याने स्वातंत्र्यप्राप्तीमध्ये सिंहाचा वाटा उचलला त्या महानायकाला मिळालेली उपेक्षा ही अत्यंत क्लेशदायक आहे. कसलीही आशा-अभिलाषा न बाळगता राष्ट्रासाठी सर्वस्व समर्पण करणार्या नेताजींना सादर प्रणाम. अगदी असेच म्हणतो !!!! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
द
दशानन Sat, 01/24/2009 - 10:34 नवीन

नेताजी

नेताजी विषयी वाचलं की जीव तीळ तीळ तुटू लागतो.... च्यामायला एका निडर छातीच्या... देशभक्ताबरोबर जे काही त्या गांघी व त्याच्या मानसपुत्राने केलं... वाचलं की सुन्न होतो... ! ज्याने स्वातंत्र्यप्राप्तीमध्ये सिंहाचा वाटा उचलला त्या महानायकाला मिळालेली उपेक्षा ही अत्यंत क्लेशदायक आहे. कसलीही आशा-अभिलाषा न बाळगता राष्ट्रासाठी सर्वस्व समर्पण करणार्या नेताजींना सादर प्रणाम. हेच म्हणतो...
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sat, 01/24/2009 - 10:39 नवीन

तुम मुझे खून दो मै तुम्हे आझादी दूंगा !!!

चिन्या फारच सुंदर लेख !!! नेताजी हे Forgotten Hero ठरले ... ज्याने स्वातंत्र्यप्राप्तीमध्ये सिंहाचा वाटा उचलला त्या महानायकाला मिळालेली उपेक्षा ही अत्यंत क्लेशदायक आहे. कसलीही आशा-अभिलाषा न बाळगता राष्ट्रासाठी सर्वस्व समर्पण करणार्या नेताजींना सादर प्रणाम. असेच म्हणतो.. मदनबाण..... Freedom is not given - it is taken. Subhas Chandra Bose.
  • Log in or register to post comments
च
चिन्या१९८५ Sat, 01/24/2009 - 19:10 नवीन

अनिल हटेला

अनिल हटेला ,जैनाचं कार्ट तुमच बरोबर आहे धन्यवाद मदनबाण !!! mamuvinod ,नेताजींचा मृत्यु कधी आणि कुठे झाला हेच माहीत नाही त्यामुळे खरी पुण्यतिथी माहीत नाही. बघा- http://gandharvablog.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
M
mamuvinod Sat, 01/24/2009 - 11:16 नवीन

कि पुण्यतिथि ?????????

काल म्हणजे २३ जानेवारीला नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती होती . कि पुण्यतिथि ????????? बाकि लेख छान आहे. लाख लाख सलाम
  • Log in or register to post comments
स
सुचेल तसं Sat, 01/24/2009 - 12:24 नवीन

२३ जानेवारीला

नेताजींची जयंतीच आहे. त्यांची पुण्यतिथी १८ ओगस्ट ला आहे असं मानलं जातं. Finally I will be so matured that I will react to nothing. अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mamuvinod
द
दिपक Sat, 01/24/2009 - 12:39 नवीन

लेख

लेख आवडला. नेताजींविषयी नेहमीच काहीतरी गुढ राहिले होते माझ्या मनात ह्या लेखाने ते उलगडण्यास मदत झाली. अत्यंत माहितीपुर्ण लेख. इथे दिल्याबद्दल खुप धन्यवाद.
  • Log in or register to post comments
च
चिन्या१९८५ Sat, 01/24/2009 - 19:13 नवीन

प्रतिक्रि

प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद दिपक बघा- http://gandharvablog.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपक
न
नितिन थत्ते Sat, 01/24/2009 - 18:13 नवीन

आंतरजालावर थोडे शोधले

आंतरजालावर नेताजींच्या मृत्यूसंबंधाने शोध घेतला. पूर्वी एक शाह नवाझ आयोग नेहरूंनी नेमला होता. नंतर खोसला आयोग इंदिरा गांधींनी नेमला होता. रालोआ सरकारने नंतर १९९९ मध्ये मुखर्जी आयोग नेमला. मुखर्जी आयोगाने नेताजींचा मृत्यू १९४५ ला विमान अपघातात झाल्याचे नाकारले. कारण त्या सुमारास कोणताही विमान अपघात झालाच नसल्याचे तैवान सरकारने सांगितले. परंतु भगवानदास नावाने अयोध्येत १९८५ पर्यंत राहणारी व्यक्ती नेताजी आहेत हे पुरेशा/सबळ (क्लिंचिंग) पुराव्याअभावी आयोगाने नाकारले. (भगवानदास व नेताजी यांचे अक्षर जुळत असल्याचा निर्वाळा फोरेन्सिक तज्ञानी देवूनही). तसेच नेताजी आता जिवंत असल्याचेही या आयोगाने नाकारले. भारत सरकारने चौकशीत सहकार्य केले नाही असे आयोगाने नमूद केले आहे. तसेच जपान, रशिया व ब्रिटन या सरकारांनीही सहकार्य केले नाही. एक प्रश्न पडला. आयोगाच्या स्थापनेपासून २००४ च्या मे पर्यंत रालोआचे सरकार असूनही भारत सरकारचे सहकार्य का मिळाले नसेल? इतर देशांचे सहकार्य का मिळाले नसेल? शिळ्या कढीला पुनःपुन्हा ऊत आणून वायफळ चर्चा चालली आहे असे त्यांना वाटले असेल का?
  • Log in or register to post comments
द
दशानन Sat, 01/24/2009 - 18:19 नवीन

परंतु

परंतु भगवानदास नावाने अयोध्येत १९८५ पर्यंत राहणारी व्यक्ती नेताजी आहेत हे पुरेशा/सबळ (क्लिंचिंग) पुराव्याअभावी आयोगाने नाकारले. (भगवानदास व नेताजी यांचे अक्षर जुळत असल्याचा निर्वाळा फोरेन्सिक तज्ञानी देवूनही). तसेच नेताजी आता जिवंत असल्याचेही या आयोगाने नाकारले. भारत सरकारने चौकशीत सहकार्य केले नाही असे आयोगाने नमूद केले आहे. तसेच जपान, रशिया व ब्रिटन या सरकारांनीही सहकार्य केले नाही. एक प्रश्न पडला. बाप रे ! धक्कादायक आहे हे सगळे ! ******* सध्या आम्ही ... ह्यावर नाचतो आहोत !!! अफलातून गाणं आहे... ए.आर. रहमान जबरदस्त !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
च
चिन्या१९८५ Sat, 01/24/2009 - 19:16 नवीन

आयोगाच्या

आयोगाच्या स्थापनेपासून २००४ च्या मे पर्यंत रालोआचे सरकार असूनही भारत सरकारचे सहकार्य का मिळाले नसेल? इतर देशांचे सहकार्य का मिळाले नसेल? शिळ्या कढीला पुनःपुन्हा ऊत आणून वायफळ चर्चा चालली आहे असे त्यांना वाटले असेल का? शिळ्या कढीला उत आणन्याचा प्रश्न नाहीये तर सत्य खुप भयानक असु शकते त्यामुळे या सरकारांना काँट्रोव्हर्सीजमध्ये पडायचे नसेल. नेहरू या सगळ्यात मोठे व्हिलन असु शकतात असे बोसवाद्यांना वाटते बघा- http://gandharvablog.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन
द
दशानन Sat, 01/24/2009 - 19:18 नवीन

नेहरुच्या

नेहरुच्या इमेज पायी एका देशभक्ताला वाळीत टाकायचं :? ******* सध्या आम्ही ... ह्यावर नाचतो आहोत !!! अफलातून गाणं आहे... ए.आर. रहमान जबरदस्त !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिन्या१९८५
न
नितिन थत्ते Sat, 01/24/2009 - 20:09 नवीन

असे की तसे?

आयोगाच्या स्थापनेपासून २००४ च्या मे पर्यंत रालोआचे सरकार असूनही भारत सरकारचे सहकार्य का मिळाले नसेल? इतर देशांचे सहकार्य का मिळाले नसेल? शिळ्या कढीला पुनःपुन्हा ऊत आणून वायफळ चर्चा चालली आहे असे त्यांना वाटले असेल का? शिळ्या कढीला उत आणन्याचा प्रश्न नाहीये तर सत्य खुप भयानक असु शकते त्यामुळे या सरकारांना काँट्रोव्हर्सीजमध्ये पडायचे नसेल. की हा मुद्दा काँग्रेसला हाणायला कायमचा मिळत रहावा म्हणून मुद्द्याचा निकाल लागूच नये असा उद्देश असेल? नेहरू या सगळ्यात मोठे व्हिलन असु शकतात असे बोसवाद्यांना वाटते असे आहे ? की गांधी नेहरूंना ठोकण्यासाठी लोक बोसवादी, पटेलवादी किंवा सावरकरवादी असतात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिन्या१९८५
च
चिन्या१९८५ Sun, 01/25/2009 - 18:38 नवीन

असे आहे ? की

असे आहे ? की गांधी नेहरूंना ठोकण्यासाठी लोक बोसवादी, पटेलवादी किंवा सावरकरवादी असतात? नाही असे आहे की नेहरुंचे आंधळे समर्थक इतरांना नेहमीच कमी लेखतात्.आणि कारण नसताना नेहरुंना जरुरीपेक्षा मोठे करतात बघा- http://gandharvablog.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
श
शंकरराव Mon, 01/26/2009 - 15:06 नवीन

सहमत

सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिन्या१९८५
क
कलंत्री Sat, 01/24/2009 - 20:25 नवीन

चिरंजीव.

भारताच्या संस्कृतीत चिरंजिव ही कल्पना आहे. ( अश्वथामा, बली, व्यास, हनुमान, बिभीषन, कृपाचार्य आणि परशुराम) हे सात चिरंजिव मानले गेले आहे. त्याचप्रमाणे नेताजी हेही आजही जिवंत असावेत असा बर्‍याच भारतीयांना वाटत असतेच. त्यांना आधुनिक चिरंजिव आपण समजु शकतो. भारताच्या उभारणीत नेताजींचा मोठा हिस्सा असु शकला असता असे मला निर्विवाद पणे वाटते. नेताजी हे व्यक्तिमत्व सर्व सामान्य आणि सर्वधर्मीयांना मान्य असेल असेच होते. दुर्देवाने गांधी आणि नेताजी यांचा मतभेद-वाद आणि त्यातून नेताजींनी केलेला कॉग्रेस त्याग हा भारताचा न भरुन येणारा असे नुकसान होते. नेताजी जर आझाद हिंद सेनेच्या भानगडीत न पडते तर नेहरु -जीना या दोघांनाही ते एक समर्थ पर्याय ठरु शकले असते. कल्पनाविलासच करत आहे असे मी मान्य करत आहे आणि या आधारे असे सांगु इच्छितो की भारताची फाळणीही टाळण्याचे सामर्थ्य असणारे असे एकमेव व्यक्तिमत्व नेताजीच होते. भारताच्या स्वातंत्र्यानंतरही नेताजी चांगली भूमिका उमठवु शकले असते. चिन्मय यांनी अतिशय मूद्देसुद आणि संयत असा लेख लिहिला आहे.
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Sat, 01/24/2009 - 20:37 नवीन

अंशतः सहमत

नेताजी जर आझाद हिंद सेनेच्या भानगडीत न पडते तर नेहरु -जीना या दोघांनाही ते एक समर्थ पर्याय ठरु शकले असते. आझाद हिंद सेनेचा मुद्दा सोडला तर आम्हाला नेताजी मान्यच. समर्थ पर्याय तर ठरलेच असते. सर्वधर्मीयांना मान्य होणे किंवा फाळणी टाळण्याची क्षमता वगैरे जर-तर च्या गोष्टी आहेत. पण त्याही शक्यतेतील धरता येतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कलंत्री
च
चिन्या१९८५ Sun, 01/25/2009 - 19:02 नवीन

जरी नेताजी

जरी नेताजी सर्वधर्मियांमध्ये प्रसिध्द होते तरीही त्यांना मुस्लिमांनी जिन्नांच्या वरचे स्थान दिले असते असे वाटत नाही.फाळणीच्या काळात नेताजी असते तर सिव्हिल वॉरसारखी परीस्थिती उद्भवु शकली असती. नेताजींनी काँग्रेस सोडली हे बरोबरच केले.गांधीजींनी नेताजींना वर येउ दिले नसते कारण नेताजींचा अहिंसेवर इतका विश्वास नव्हता.'चर्चेच्या टेबलवर कुठलाही प्रश्न सुटलेला नाहीये' असे त्यांचे मत होते.शिवाय तडजोड करण्यासही त्यांचा साफ विरोध होता.कॉंग्रेसमध्ये असताना नेताजींच्या नेतृत्वगुणांना फार कमी वाव मिळत होता.सावरकरांच्या शब्दात 'हालवेल वगैरे ब्रिटीशांचे पुतळे उखडण्यासारख्या क्षुल्लक चळवळीत नेताजी आपले सामर्थ्य आणि वेळ वाया घालवत होते.' आझाद हिंद सेना हे तर नेताजींचे यश होते.भारतासाठी लढणार्‍या ४५,००० सैनिकांची फौज त्यांनी उभी केली. नेताजी वजा आझाद हिंद सेना म्हणजे साखर वजा गोडपणा आहे असे मला वाटते. बघा- http://gandharvablog.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कलंत्री
क
कलंत्री Sun, 01/25/2009 - 22:41 नवीन

अभ्यासाची आवश्यकता.

भारताचा स्वातंत्र्य लढा हे जगातील इतिहासातील आगळे वेगळे असे प्रकरण आहे. आपण जितके समझता तितके सोपे आणि सरळ असे नाही. यात अनेक व्यक्तिमत्त्वे आहेत, स्नेह आणि संघर्ष आहेत, आदर्श आणि देशप्रेमाची चढाओढ आहे, त्याग आणि तपश्चर्याची प्रत्येकाची अजोड असे कार्य आहे, आणि तुलनाच करावयाची असल्यास थोडेफार महाभारतातील कथानकाशी करता येईल. आपण जीना, नेहरु, सुभाषचंद्र बोस आणि गांधी यांचा समग्र अभ्यास केला तर आपणास थोडीफार उकल होण्यास मदत होईल. तुर्त इतकेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिन्या१९८५
च
चिन्या१९८५ Mon, 01/26/2009 - 04:02 नवीन

बरोबर

बरोबर आहे.पण नेताजींनी आझाद हिंद सेना स्थापन केली नसती तर तेही फारस काही करु शकले असते असे वाटत नाही. बघा- http://gandharvablog.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कलंत्री
व
विसोबा खेचर Sun, 01/25/2009 - 00:05 नवीन

सुंदर

सुंदर लेख..! (नतमस्तक) तात्या.
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Mon, 01/26/2009 - 15:29 नवीन

च्यायला, तात्या

तात्या, तुझे बरे चालले आहे. अनुश्का असो, की नेताजी, तू नेहमी नतमस्तक ! ही प्वालिसी बरी आहे. अंगिकारावी म्हणतो ! -- सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
प
प्रियाली Sun, 01/25/2009 - 01:33 नवीन

लेख चांगला आहे

बाकी दोन्हीकडचे वाद नेहमीसारखेच. :)
  • Log in or register to post comments
च
चिन्या१९८५ Sun, 01/25/2009 - 19:04 नवीन

धन्यवाद

धन्यवाद तात्या आणि प्रियालि बघा- http://gandharvablog.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
A
Anjali patil Mon, 01/26/2009 - 11:54 नवीन

नेताजी

नेताजी प्रमाणे आक्रमक प्रत्येकाला असण आज काळाची गरज आहे.आपण नेताजी बाबत दिलेली माहिती फारच अमुल्य आहें. नेताजी प्रमाणे लडावु व्रुत्ती जवळ आज प्रत्येक तरुणामध्ये असणे गरजेचे आहे.जेणि करून आपण २६/११/२००८ च्या परिस्थीतीला धार्याने तोंड देण्याचे धाड्स निर्माण करू शकतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिन्या१९८५
च
चिन्या१९८५ Mon, 01/26/2009 - 17:16 नवीन

प्रतिक्रि

प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद अंजली पाटील्.तुमचे म्हणने १००% पटले. बघा- http://gandharvablog.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Anjali patil
च
चिन्या१९८५ Tue, 01/27/2009 - 06:06 नवीन

नेटवर ही

नेटवर ही माहीतीही मिळाली Bhagwanji had confided in many, who came in his close contact, that he was not afraid of punishment he could get under the international law , but he hated the low level of politics prevailing in India and the turn India has taken after independence. He also felt that the new world order would have sought action against him, which Indians would have never allowed. Thus his appearance would create havoc to his country and sufferings to the people. बघा- http://gandharvablog.blogspot.com/
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा