Skip to main content

मदत / सल्ला हवा आहे : ब्रॉड बॅण्ड कनेक्शन विषयी

लेखक शंतनु _०३१ यांनी बुधवार, 06/07/2016 16:12 या दिवशी प्रकाशित केले.
नुकताच 'एक' हट्ट पुरवण्यासाठी घरी लॅपटॉप घेतला आहे . ऑफिस मध्ये मी प वर प्रतिक्रिया देणे / धागे काढणे जमत नाही. मोबाईल वापरावर ऑफिस मध्ये बंधन आहेत . घरी नेट असावे असा ( दुसरा ) हट्ट आहे. मला ब्रॉड बॅण्ड कनेक्शन आणि बिलिंग विषयी माहिती हवी आहे . घरी नेट वापराने ०२ जीव आहे. साधारण संध्याकाळी ८:०० नंतर नेत वापर होईल . वापर जास्त नसेल ( असे आत्ता वाटत आहे ) मी बऱ्याच ब्रॉड बॅंड सर्व्हिस प्रोव्हायडर ची नेट वर माहिती घेतली आहे . पण निर्णय घेणे अवघड जात आहे . ब्रॉड बॅंड ला पर्याय म्हणून डॉन्गल वापराणे कितपत फायदेशीर आहे . सध्या तरी ब्रॉड बॅण्ड हे मनोरंजाना साठीच घ्यायचे आहे . १) ब्रॉड बॅंड चे डेटा लिमिट संपल्यावर अधिक चार्जेस लागतात काय ? २) काँनेक्टिव्हिटी साठी कुठला पर्याय चांगला आहे ? ३) ब्रॉड बँड चे फायदे / तोटे ? ४) BSNL ब्रॉड बँड घेणे फायदेशीर ठरेल का ? ५) खर्चिक / स्वस्त असा पर्याय कोणता असू शकेल ? ( ब्रॉड बॅण्ड Vs डॉन्गल ) सादर धागा माहिती मिळवणे व साधक बाधक चर्चेसाठी आहे . मी पा च्या धोरणात बसत नसल्यास हा धागा उडवला तरी चालेल

वाचने 8178
प्रतिक्रिया 40

प्रतिक्रिया

माझ्या घरी खाजगी केबल नेट आहे.तीनशे रुपयात अमर्याद वापर. व्यवस्थित स्पिड मिळतो.शिवाय बिएसेनलवाल्यासारखे पाय धरुन, सुरु करुन दे रे बाबा करावे लागत नाही. - माजी त्रस्त बिएसेनेल ब्राॅडबँड ग्राहक

सध्या मी ह्याच डिलेमातून जातोय. मी हुडकलेले शॉर्ट लिस्टेड दोन ऑप्शन आहेत १) बीसेनेल बीबी: १३९५ कॉम्बो प्लान. ४ एम्बीपीएस स्पीड. ३० जीबी अनलिमि. नंतर स्पीड १ एम्बीपीएस होणार. कॉल ५००. रात्री फ्री. खर्चः १५०० डिपॉ + इन्स्टॉलेशन, ५०० रु मॉडेम, १५०० अग्रीम भाडे. टोटल ३५००. २) रिलायन्स जिओ: एल्वायेफ चा फ्लेम २ घ्यायचा. भंकस बेसिक डब्बा हॅन्डसेट आहे. पण फोरजी आहे. ४८००. तीन महिने उनलिमिटेड नेट आणि कॉलिंग फ्री. नंतर ९५ ला १० जीबी मिळनारेत म्हणे. खरेखोटे अंबानींना माहीत. पीस ला पीस होइल. हपिसात ठेवीन हॉटस्पॉट ऑन करुन, हपिसचे काम संपले की घरी घेउन जाईन. . काय म्हणता? . बाकी ऑप्शन(हाथवे, टिकोना, एअरटेल) सांगू नयेत. वायर्ड कनेक्शन्स खाजगी आमच्या इथे मिळत नाहीत.

In reply to by कपिलमुनी

केम फायदा नथी कपिलभाय. . . निम्म्या कंपन्या रातोरात गायब झाल्या बिस्तारा गुंडाळून. उरलेल्या टॉवर विकून कसे भांडवल काढायचे हे बघताहेत. सर्व्हिस कुणाचीच नाही. सोलापूर है भावा. केबल टीव्हीच्या वायरीवरुन इथे खून पडतात. फक्त बीएसेनेल टिकून आहे. एक प्रायव्हेट आहे गिगाबाईट नावाची. त्यांनी ऑफिसपर्यंत ओएफसी टाकायचा खर्च माझ्याकडून मागितलाय. २५ हजार फक्त. म्या काय म्हणले असेल ते वेगळे सांगत नाही. ;)

In reply to by अभ्या..

बीएसएनएल माझ्याइथेतरी बेस्ट आहे. अपटाइम चांगला आहे. तसे महागडे जाते स्पीडच्या मानाने. घेतलास तर मोडेम स्वतंत्र विकत घे. बीएसएनएलवाले टुकार देतेत.

In reply to by प्रचेतस

कुणाकडे हाय का मोडेम स्पेअरमध्ये? ;) द्या की राव मला. माझ्याकडे नुसता वायफाय रावटर आहे. ते एडीएसेल आणि डीएसल मधला फरक पण नेटवर्क ईंजिनिअर प्रचेतसरावांनी समजावून सांगितला तर जास्त बरे.

In reply to by अभ्या..

एडीएसेल आणि डीएसल फरक सोप्पंय. एडीएसेलला आरजे४३ कनेक्टर लागतो. म्हणजे तुझ्या landline टेलिफोनला असतो तसा तर डीएसएलला आरजे४५ म्हणजे इथरनेट केबलचा. बीएसएनएल ब्रॉडब्याण्डसाठी ल्याण्डलाइन असणं गरजेचं. ते नसेल तर बीएसएनएल वायरलेस घ्यावं लागेल ते टुकार.

In reply to by प्रचेतस

सध्या बीएसेनेल वायरलेसच आहे, लॅन्डलाइन घ्यायचीय ना पण ते बीफोनला आरजे एलेव्हन येती ना? आणी इथरनेटची आरजे फोर्टीफाइव? मग त्या स्प्लिटरातून आलेली केबल जोडायला मोडेमच लागेल की. तोच तर हवाय. स्वस्तातला सजेस्टणे प्लीज. :) राउटरला इन्पुटला फक्त आरजे४५ चे सॉकेट दिसतेय. ते मोडेमला जोडावे लागेल.

In reply to by कुंदन

रिलायन्स जिओ विषयी फारसे काही ऐकुन नाही, रिलायन्स जिओ ची introductory ऑफर असणार नंतर भरमसाट रेट वाढतील .. ( असा अंदाज )

खर्च रूपये सुमारे ९०० प्रति महिना स्पीड १ एम बी पी एस २० जीबी साठी ५१२ केबीपीएस २० नंतरच्या अनलिमिटेडसाठी आय एस पी - डोकोमो लाईन प्रोव्हायडर - बी एस एन एल डी लिन्कचा वाय फाय फ्री काही त्रास नाही. चार महिन्यात एकदाच ब्येशेनेल ची लाईन बंद झाली होती. हे कॉम्बो आमच्या सारख्या रिटायर म्हातार्‍याला ठीक दिसतेय.

पुण्यात ब्रॉडबँड घ्यायचे झाले तर ५०जीबी आणि चांगल्या स्पीडसाठी कोणती सर्व्हिस घ्यावी ? पैशे किती पडतील ?

In reply to by तिमा

हाथवे फक्त. (असे म्हणतात ब्वा, मी स्पीड पाहून चाट झालेलो) सद्य रेट सायतीवर पहा. मी पाह्यलं तेव्हा 4 हजार 3 महिन्याला कायतरी होते.

In reply to by तिमा

हाथ वे , तिकोना , एरटेल, यु सगळ्यांचे रेट जवळ पास सारखे आहेत ३५०० - ४००० च्या दरम्यान ... पण स्पीड विषयी साशंक आहे ...

In reply to by तिमा

SpectraaneT , VovineT , हे आप्श्न बघा.. सध्या 600 रुपयात 15 MBPS स्पीड आणि 30 GB डाटा देतायेत. बेसिकली सर्वांचे सेटअप सारखेच असल्याने सर्व्हियस मस्त आहे. 10 MBPS तरी आरामात भेटते.

१. प्रायव्हेट सर्व्हिस प्रोव्हायडर नसेल तर, बी,एस.एन.एल. ला पर्याय नाही. २. सध्या मी ६,०००/- रु. प्रतिवर्षी देतो. प्रायव्हेट सर्व्हिस प्रोव्हायडर आहे. टोटली अनलिमिटेड. १ एम.बी.बी.एस.चा स्पीड आहे. हे इंटरनेट आल्या पासून, डिश टी.व्ही. बंद केला.

In reply to by शंतनु _०३१

दोघेही नौकरी करत असाल तर आणि घरी अजून कुणी नसेल तर, शक्यतो प्रायव्हेट कनेक्शन घ्या, असा सल्ला. इंटरनेटचा काही प्रॉब्लेम आला तर, प्रायव्हेट वाले, डोंबिवलीत तरी सकाळी १० ते रात्री १० पर्यंत, सर्व्हिस देतात. अजून एक सल्ला, इंटरनेटचा स्पीड उत्तम असेल (१ एम.बी.पी.एस.) तर मालिकांचे कनेक्शन काढून टाका.

In reply to by शंतनु _०३१

सहवास सोसायटी? मग हॅथवेच घ्या. माझ्याकडे गेली दोन वर्षे तोच आहे. वाय फाय राऊटर जोडला की वेग मंदावतो तरीही १ पासून ६ एमबीपीएस पर्यंत वेग मिळतो. संगणकाला डायरेक्ट जोडला तर हा वेग दुप्पट होऊ शकतो. मला दोन तीन वेळेस ४५-५० एमबीपीएस चा स्पीड पण मिळाला आहे!!!! ३ महिने ६ महिने व एक वर्ष असे प्लॅन्स आहेत. माझा प्लॅन रु.६५०० सहा महिने २५ जीबी फुल स्पीडने व त्यानंतर १ एमबीपीएस असा आहे.

डोंगल हा इंटरनेट कनेक्शनचा भूतकाळ झाला आता. रुंद पट्टा आंतरजाल जोडणी कोणती करावी ते जाणकार सांगतीलच.

मी बीएसेनेल गेल्या ७ ते ८ वर्षापासुन वापरत आहे. आजुन पर्यंत मला तरी काही त्रास झला नाही. ४ एमबीपीएस ८ जीबी पर्यंत , नंतर ५१२ ने अनलिमीटेड. २०० कॉल .

माझ्याकडे http://www.spectranet.in/ चे कनेक्शन आहे . हे सर्व सोसाटी ला सेवा पुरवतात , पण फारच थोड्या ठिकाणी 20 MBPS , संपूर्ण अन लिमिटेड 1350 प्रति महिना संपूर्ण अन लिमिटेड म्हणजे संपूर्ण अन लिमिटेड मी महिन्याला 200 GB आणि कधीकधी 350 GB वापरले आहे ..

माझ्याकडे हॅथवे ची सेवा आहे. स्पीड ५०MBPS, खर्च महिना ₹८५०+ सेवाकर. ३ महिन्यासाठी साधारण ₹२८०० भरावे लागतात. १५GB प्रतिमहिना डाऊनलोडिंग त्यानंतर स्पीड 1MBPS आणि अनलिमिटेड डाऊनलोडिंग.

गल्लीत असलेले केबल नेट घ्या. स्वस्त व मस्त स्पीड... यू ट्युबावर सिनेमे बघतो

In reply to by चंपाबाई

आणि "यू ट्युबावर सिनेमे बघतो." हाय आज मिपाकरांचा हसून हसून मारायचा दिवस दिसतोय. तिकडे एक केसाळ धागा सुरु आहेच.

स्पेक्ट्रानेट ची माहीती "पुणे" साठी चेक करतो. बाकी यु आणि BSNL option ला ठेवला आहे

स्वस्त, मस्त आणि किफायतशीर आहे

इथे डोंबिवलीत मी प्रायव्हेट केबल नेट वापरतोय 1Mbps अनलिमिटेड 400 रु महिना BSNL ची सर्विस महागात पडते तुमच्या इथे जर DVOIS इंटरनेट सर्विस प्रोव्हायडर असेल तर त्यांचे नेट घ्या स्वस्तात मस्त

In reply to by स्वप्क००७

कुठली? मी पण डोंबोलीचाच. आणि मी मात्र त्याच,( 1Mbps अनलिमिटेड,), गोष्टी साठी ६०००/- रु. दरवर्षी भरत आहे.