समीकरणाच्या एका बाजूला
कधी कधी दुसरी बाजूच सापडत नाही
ते असंच लटकत राहतं मग तिज्यायला
म्हणजे कसं ना,
की (a+b)^2 ला पत्ताच नसतो
(a^2 + 2ab + b^2) चा
आणि याचा त्याला पत्ता नसतो
कुणीतरी सांगतं मग
की बाबा (a+b)^2= (ab)^2
किंवा असच काहितरी
आणि 'यालाच जीवन म्हणायचं' वगैरे
मग सुरू होते एक फरफट...
कधीमधी त्याला जाणवतंही
की काहीतरी चुकतंय
पण हाकत राहतो तो गाडी
कारण,
त्याला नीटसं समजत नसतं
समीकरणच चुकतंय की आपण
कधी भास होत राहतात त्याला
समीकरण सुटल्याचे
तर कधी स्वीकारली जाते
ती असमानता
कधी निद्रिस्त ज्वालामुखीसारखी
खदखदत राहते ती आत.
मला रविवारी सुट्टी असते
.
.
.
मला रविवारी दिसतात आरश्यात
माझी काही लटकलेली समीकरणं.
------------------------
(टीप:- मिकाने कवितेत सुचवलेल्या सुधारणांबद्दल त्याचे आभार)
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1782
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान कल्पना! आवडली.
भारीये.
तसाच विचार केला तर असतं
गमती
In reply to तसाच विचार केला तर असतं by धनंजय माने
बच्चन साहेबांनी एक्स्ट्रा
In reply to गमती by मिसळलेला काव्यप्रेमी
अत्यंत
दोन्ही समीकरणं, आपलं कविता
क्या बात !!!!