✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

रॉयल राइड... रॉयल एन्फ़िल्ड.... प्रश्नोत्तरी धागा

क
कैलासवासी सोन्याबापु यांनी
गुरुवार, 10/02/2014 - 18:26  ·  लेख
लेख
मिपा परीवारात बरेच रॉयल एन्फ़िल्ड उर्फ़ बुलेट चे चाहते अन मालक आहेत, ह्या धाग्याचा हेतु कुठल्या ही दुसर्या ब्रॅंड च्या बाईक ची खिल्ली उडवणे, किंवा पातळी उतरुन टिका करणे हा मुळीच नाही, फ़क्त स्टॅंड अलोन बायकिंग करण्यापेक्षा , एक ऑर्गनाईझ्ड बायकींग एफ़र्ट म्हणुन हा लेखन प्रपंच, मोदक ह्यांनी प्रथम ह्या धाग्याची कल्पना मांडली... इथे अपेक्षित काय आहे ?? आर .ई. उर्फ़ बुलेट मालक असाल तर आपले अनुभव, कथन, मेंटेनंस टिप्स, इत्यादी आदान प्रदान, नसाल अन रॉयल एन्फ़िल्ड मधे रस असेल तर इथे प्रश्नोत्तराची हक्काची जागा, विकत घेण्यात रस नसेल तर कुठे ह्या बाइक्स उत्तम कंडीशन मधे भाड्याने मिळतील, कुठ्ली एक्स्पिडीशन आर ई वर केली तर मजा , आराम अन ऍडव्हेंचर द्विगुणीत होईल ही चर्चा इथे आपण करुयात. तर श्रीगणेशा स्वरुप, काही योगदान माझे (मोदक ह्यांनी मला, आर ई ची ३५० च का घेतली, एकंदरीत अनुभव काय इत्यादी कथन करण्याची विनंती केली त्याला अनुसरुन) १. मी क्लासिक ३५० का घेतली ?? अ. उत्तम संगम, ३.५ रॉ ताकद अन त्यातल्यात्यात बरे माईलेज (माझ्या पेशात खुप फ़िरावे लागते) ब. जरासा ओल्ड वर्ल्ड चार्म, सदरहु मॉडेल हे रॉयल एन्फ़िल्ड ह्या अगदी सुरुवातीच्या डीझाईन्स वर आधारीत आहे क. रोबस्ट बिल्ड, कमी देखभालीचा खर्च २. क्लासिक ३५० चे फ़ायदे ?? अ. मजबुत तरीही जास्त जड नसणे ब. ट्रेडीशनल कार्ब्युरेटर टेक्नॉलोजी (बायकिंग मधे हे मला महत्वाचे वाटले, ई एफ़ आय मधे फ़्युल पंप वापरले जातात ते ही इलेक्ट्रॉनिक चिप्स ने कंट्रोल्ड, त्यात पेट्रोल ही जास्त जाते, अन आडवळणाला काहीही प्रॉब्लेम आला तर लोकल मेकॅनिक त्यात काहीच करु शकत नाही, ह्या उलट कार्ब्युरेटर असला तर अगदी मेकॅनिक नसला तरी जुजबी माहितीवर आपण स्वतः डॅमेज कंट्रोल करुन परत ती बाईक वर्कशॉप पर्यंन्त आणु शकतो) क. स्पेयर पार्ट्स ची निट अवेलेबिलिटी अन सर्विस सुलभ असणे, ९० मिनिट एक्स्प्रेस सर्विस मधे शोरुम ला हिची व्यवस्थित निगा घेतली जाऊ शकते. ड. उत्तम मायलेज (बायकींग ला हे असणे बरे असते) ई. उत्तम ट्रॅक रेकॉर्ड, शिवाय मायलेज उत्तम असल्याने सायलेंसर चेंज अन इतर अस्थेटीक मॉडीफ़िकेशन्स (हॅंडल बार चेंज, रीम व्हिल्स ) नंतर ही खिशाला काही विषेश चाट बसत नाही ३. क्लासिक ३५० चे तोटे ?? १. जास्तच पॉवर हवी असल्यास ती नाही, "भारताची कल्ट हार्ले सम बाईक" असली तरीही ३५० सी सी आहे. २. ८० किमी/ तास नंतर पुर्ण बाईक कंप पावते ३. कंपनी ने दिलेले टायर भंगार आहेत (बदलल्यावर काही प्रॉब्लेम नाही ड्राय अन वेट दोन्ही ट्रॅक्शन एन्वॉयरमेंट मधे) ४. कंपनी सायलेंसर साधा घेतला तर बरेचदा खड्ड्यातुन काढताना घासतो खालुन, ऑफ़ रोड घ्यावा तर कंपनी पॉलिसी मधे बाय बॅक किंवा एक्स्चेंज बसत नाही, दोन्ही बोकांडि बसतात सायलेंसर्स ५. कंपनी सायलेंसर चा आवाज ’बुले्ट आली बे’ अशी घोषणा करत नाही ६. फ़िटिंग्स अन बोल्ट्स मधे रस्टींग प्रॉब्लेम येतो ३-४ पावसाळ्यां नंतर मला तरी मायलेज हा फ़ायदा इतर तोट्यापेक्षा मोठा वाटला सो मी घेतली, सद्ध्या ३-४ महिनेच झालेत, १५०० किमी झाले आहेत. मोदक भाई, अन इतर , एकंदरीत हे फ़ायदे अन तोटे पाहुन मी क्लासिक ३५० घेतली आहे. :)
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
148734 वाचन

💬 प्रतिसाद (648)

प्रतिक्रिया

म्हणूदे की. कोणती गाडी

मोदक
Mon, 07/04/2016 - 13:19 नवीन
म्हणूदे की. कोणती गाडी रिलायबल असते आणि कोणती नसते याचे प्रत्येकाचे वेगवेगळे अनुभव / आखाडे असतात. तुमचे मत ब्रह्मवाक्य समजून जगातल्या सगळ्यांने तसेच वागावे हा अट्टहास कशासाठी? बाकी तुम्ही बुलेट वापरली आहे का? नसल्यास बुलेट न वापरता बुलेटबद्दल अधिकारवाणीने मत देत आहात याचा अचंबा वाटतो आहे. का ही पण लाल डबा सांडण्याची हौस समजावी..?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

=)) वैयक्तिक प्रतिसाद

टवाळ कार्टा
Mon, 07/04/2016 - 13:26 नवीन
=)) वैयक्तिक प्रतिसाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

बर्र.. वाढदिवसाच्या शुभेच्छा.

मोदक
Mon, 07/04/2016 - 13:33 नवीन
बर्र.. वाढदिवसाच्या शुभेच्छा. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

अधिकारवाणीने मत ?

कपिलमुनी
Mon, 07/04/2016 - 13:30 नवीन
पुलंचा सुप्रसिद्ध वाक्य आठवला! :) मी भरपूर चालवलेल्या गाड्यांमध्ये cd 100, cbz , Thunderbird या आहेत. सर्वात रीलायबल cd 100 होती. (बजाजच्या डिस्कव्हर पेक्षा सुद्धा ) आणि सर्वात आरामदायक Thunderbird आहे. बादवे रॉयल एन्फ़िल्ड च्या धाग्यवर चिरकुटांचा काय काम ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

तुमची डिस्कवर शहरातले रस्ते

मोदक
Mon, 07/04/2016 - 10:45 नवीन
तुमची डिस्कवर शहरातले रस्ते सोडून ऑफरोड किती चालली आहे? एका दिवसात ४०० / ५०० किमी पेक्षा जास्त किती वेळा चालली आहे? लिंकबद्दल धन्यवाद. पण आत्ता या घडीला कोणती गाडी सर्वगुणसंपन्न आणि परीपूर्ण आहे ते सांगा. (रॉयल एन्फिल्डच्याच प्राईजरेंजमध्ये.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

तुमची डिस्कवर शहरातले रस्ते

टवाळ कार्टा
Mon, 07/04/2016 - 11:13 नवीन
तुमची डिस्कवर शहरातले रस्ते सोडून ऑफरोड किती चालली आहे? एका दिवसात ४०० / ५०० किमी पेक्षा जास्त किती वेळा चालली आहे?
वर्षातले किती दिवस एका दिवसात ४००-५०० किमी चालवले जाते?
लिंकबद्दल धन्यवाद. पण आत्ता या घडीला कोणती गाडी सर्वगुणसंपन्न आणि परीपूर्ण आहे ते सांगा. (रॉयल एन्फिल्डच्याच प्राईजरेंजमध्ये.)
बर्याच आहेत...हिरो होंडा करिझ्मा, बजाज पल्सर २२०, बजाज पल्सर २०० RS/AS/NS, होंडा CBR250R...आणि यातल्या बहुतेक एन्फिएल्ड पेक्षा कमी किमतीला आहेत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

बर्र... तुमची इथली मते आणि

मोदक
Mon, 07/04/2016 - 12:40 नवीन
बर्र... तुमची इथली मते आणि इतर ठिकाणची मते (मिपावरची नव्हे) यात जमीन आस्मानाचा फरक आहे असा मलाच भास होतो आहे की माझे काहीतरी चुकते आहे? कॉलिंग कपिलमुनी आणि असलाच तर अनिरूद्ध दातार. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

ती मते इथे देता का? बुलेटच्या

टवाळ कार्टा
Mon, 07/04/2016 - 13:46 नवीन
ती मते इथे देता का? बुलेटच्या तुलनेत वरिलपैकी कोणतीही बाईक जास्तच रिलायेबल आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

म्हणून तुला सगळे जण अभ्यास

मोदक
Mon, 07/04/2016 - 14:07 नवीन
म्हणून तुला सगळे जण अभ्यास वाढवायला आणि मोठे व्हायला सांगतात. तुझ्या मतांबद्दलचा प्रतिसाद सर्वगुणसंपन्न बाईक बद्दलचा आहे आणि तू फक्त रिलायबलिटीला पकडून बसला आहेस. धाग्यातल्या पहिल्या वाक्यातला एक मुद्दा परत हायलाईट करत आहे.. ह्या धाग्याचा हेतु कुठल्या ही दुसर्या ब्रॅंड च्या बाईक ची खिल्ली उडवणे, किंवा पातळी उतरुन टिका करणे हा मुळीच नाही बाकी बापुंनी धाग्यात आणखी काहीतरी खरडले आहे. वाचले नसल्यास आणखी एकदा वाचलेस तरी चालेल. इथे अपेक्षित काय आहे ?? आर .ई. उर्फ़ बुलेट मालक असाल तर आपले अनुभव, कथन, मेंटेनंस टिप्स, इत्यादी आदान प्रदान, नसाल अन रॉयल एन्फ़िल्ड मधे रस असेल तर इथे प्रश्नोत्तराची हक्काची जागा, विकत घेण्यात रस नसेल तर कुठे ह्या बाइक्स उत्तम कंडीशन मधे भाड्याने मिळतील, कुठ्ली एक्स्पिडीशन आर ई वर केली तर मजा , आराम अन ऍडव्हेंचर द्विगुणीत होईल ही चर्चा इथे आपण करुयात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

थोडक्यात पोपट मेला हे राजाला

टवाळ कार्टा
Mon, 07/04/2016 - 14:09 नवीन
थोडक्यात पोपट मेला हे राजाला सांगायचे नाहीये
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

नाही रे..

मोदक
Mon, 07/04/2016 - 14:19 नवीन
नाही रे.. राजाने गरूड पाळला आहे आणि तू चिमणी पाळणे कसे स्वस्त आहे, खाण्यापिण्याचा खर्च येत नाही, पक्षीच पाळायचा आहे तर गरूडापेक्षा चिमणी कशी चांगली असे काहीतरी बोलत आहेस.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

टाईप

कपिलमुनी
Mon, 07/04/2016 - 13:36 नवीन
तुम्ही स्पोर्ट्स बाईक आणी क्रुझर बाईक एका मापात तोलू शकत नाही. बजाजच्या बाईकन जो रीलायबल म्हणएल त्यापेक्षा विनोद नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

तुम्ही स्पोर्ट्स बाईक आणी

टवाळ कार्टा
Mon, 07/04/2016 - 13:46 नवीन
तुम्ही स्पोर्ट्स बाईक आणी क्रुझर बाईक एका मापात तोलू शकत नाही.
मग ही तुल्ना चालते?
बजाजच्या बाईकन जो रीलायबल म्हणएल त्यापेक्षा विनोद नाही
बुलेटच्या तुलनेत जास्तच रिलायेबल आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

एवढा टोकाचा विरोध ????

पी. के.
Mon, 07/04/2016 - 14:08 नवीन
एवढा टोकाचा विरोध ???? आकडे काही वगळचे बोलतायत. http://auto.ndtv.com/news/two-wheelers-sales-for-june-2016-positive-growth-continues-1427147
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

कोण काय म्हणो!

अनिरुद्ध.वैद्य
Tue, 07/05/2016 - 15:37 नवीन
आमच २०० किलोच धुड ७५ किलोच्या माणसास घेउन, निवांत डोंगररस्ते घाट फिरु शकतंय अन शिवाय ह्या स्पेक्स्वर ४०+ चा माय्लेजही देतय (सिटी ट्रफिक हा, भायेर आजुन जास्त) त आपण खुस.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

टका,

अनिरुद्ध.वैद्य
Tue, 07/05/2016 - 15:43 नवीन
अखीलेषचा ब्लॉग मी फॉलो करतो. त्याची अन माझी मतेही परफेक्ट जुळतात. पण काये, एन्फिल्ड एन्फिल्ड है, और प्यार दिलसे होता है, दिमाग से नै ;) ;) तेव्हा उगा काय लॉजीक बिजिक नका हो खपवत जाऊ एन्फिल्डवाल्यांसमोर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

सर्वगुणसंपन्न आणि परीपूर्ण

कपिलमुनी
Mon, 07/04/2016 - 13:32 नवीन
माझा ठाण्याचा मित्र कोनतीही नवी गाडी आली की नावे ठेवतो ! सर्वगुणसंपन्न आणि परीपूर्ण गाडी सापडली की सांग =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

तुमच्या ठाण्याच्याच मित्राने

मोदक
Mon, 07/04/2016 - 13:48 नवीन
तुमच्या ठाण्याच्याच मित्राने लिस्ट दिली आहे की.. हिरो होंडा करिझ्मा, बजाज पल्सर २२०, बजाज पल्सर २०० RS/AS/NS, होंडा CBR250R ( ..आणि टीव्हीएस मोपेड ;) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

हे वाचले नाही का?

टवाळ कार्टा
Mon, 07/04/2016 - 13:52 नवीन
हे वाचले नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

धन्यवाद मोदकदा!

अनिरुद्ध.वैद्य
Tue, 07/05/2016 - 15:28 नवीन
माझी थंडरबर्ड मोस्टली ९०%+ हिंजवडीच्या ट्रॅफिकमधेच चालली असल्याने हे स्प्रॉकेट खराब झाले असावे. बाकी त्याच ट्रॅफिकमुळे हाफ क्लच बर्याचदा असल्याने कदाचित क्लचही जात असावा. आता क्लच केबल बॅकपला घेतलीच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

अनिरुद्धराव जुन्या स्कुटरची

जिन्क्स
Wed, 07/06/2016 - 17:48 नवीन
अनिरुद्धराव जुन्या स्कुटरची क्लच केबल टाकुन बघा. ती थंडरबर्डच्या केबल पेक्षा जाड आहे आणि तीच एक बसते थंडरबर्डला. क्लच लीवरला जिथे क्लचकेबल कनेक्ट होते तो भाग थोडा तासुन घ्या. बर्‍याच वेळेला त्या कारी भागामुळे केबल गतप्राण होते. हा उपाय मला बालाजी ऑटोमोबाइल्स कोथ्रुड याने दिला होता. ५ वर्षे झाली क्लच केबलला नो प्रॉब्लेम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध.वैद्य

बाईकची चेन अतीघट्ट किंवा

मार्मिक गोडसे
Mon, 07/04/2016 - 11:43 नवीन
बाईकची चेन अतीघट्ट किंवा अतीसैल ठेवल्यास चेन व स्प्रॉकेट खराब होऊ शकते. धक्का मारून गाडी गिअरमध्ये टाकून चालू केल्यानेही चेनचे व स्प्रॉकेटचे नुकसान होते. वेळच्यावेळी बाईकची चेन अ‍ॅजस्ट व ऑइलींग केल्याने बाईकची चेन व स्प्रॉकेट खराब होत नाही. माझ्या बाबांच्या २००१ च्या स्प्लेंन्डरचे अजुनपर्यंत एकदाही चेन किंवा स्प्रॉकेट बदललेले नाही. (१लाख कि.मी.पेक्षा अधिक रनींग). क्लच प्लेट व क्लच केबलही अजुनपर्यंत बदललेली नाही. क्लच निट अ‍ॅजस्ट केल्यास व गाडी सिग्नलला न्युट्रलमध्ये ठेवल्यास क्लच प्लेटची झीज टाळता येते.
  • Log in or register to post comments

अग्दी अग्दी....पण इथेतर

टवाळ कार्टा
Mon, 07/04/2016 - 11:57 नवीन
अग्दी अग्दी....पण इथेतर मुद्दलातच खोट आहे =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे

ट का शी सहमत

स्पा
Mon, 07/04/2016 - 12:43 नवीन
माझी यामाहा SZ (१५० सीसी ) ६५०००० किमी चालेलेली आहे , शहरात आणि ओफ्रोड , मजबूत रेम्ताव्लेली आहे फक्त स्पिडोमितर बंद पडलेले , बाकी काही परत बदललेला नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

६५००० वाचावे

स्पा
Mon, 07/04/2016 - 12:43 नवीन
६५००० वाचावे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

कलर

कपिलमुनी
Mon, 07/04/2016 - 15:23 नवीन
तुमच्याच गाडीचा रंग बदलायचा होता का ? ( कंफर्म नाही म्हणून विचारले )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

होय मुनीश्वर

स्पा
Tue, 07/05/2016 - 11:55 नवीन
होय मुनीश्वर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

फ्लोरोसन्ट ग्रीन कर.

अभ्या..
Tue, 07/05/2016 - 12:11 नवीन
फ्लोरोसन्ट ग्रीन कर. परफेक्त हरणटोळ कलर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

खिक्क

स्पा
Tue, 07/05/2016 - 12:12 नवीन
खिक्क
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

क्लच निट अ‍ॅजस्ट केल्यास

मोदक
Mon, 07/04/2016 - 12:45 नवीन
क्लच निट अ‍ॅजस्ट केल्यास म्हणजे नक्की काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे

क्लच निट अ‍ॅजस्ट केल्यास

मार्मिक गोडसे
Mon, 07/04/2016 - 13:40 नवीन
क्लच निट अ‍ॅजस्ट केल्यास म्हणजे नक्की काय?
http://www.motorcyclenews.com/new-rider/choosing-kit/2006/november/aug24-05-how-to-service-your-clutch-/
  • Log in or register to post comments

नमस्कार मित्रांनो.....

भम्पक
Mon, 07/04/2016 - 21:04 नवीन
नमस्कार मित्रांनो..... आम्हीही classic 350 घेतलीय. आपल्या क्लब मध्ये आमचेही स्वागत करा. 2 महिने झाले.....1 नाशिक, 1 भीमाशंकर आणि 1 कोपरगाव ट्रीप हाणली.फक्त आनंद बाकी काही नाही. मनरावांच्या लडाख वृतान्तापासून पेटलो होतो.आता लडाख लाही जाऊन येईन. बाकी बापूंना धन्स . जबर धागा काढून माहिती कक्षा वाढविली.
  • Log in or register to post comments

स्वागत.. स्वागत...

मोदक
Tue, 07/05/2016 - 09:49 नवीन
स्वागत.. स्वागत... अभिनंदन..!!!!! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भम्पक

अभिनंदन हो!

अनिरुद्ध.वैद्य
Tue, 07/05/2016 - 15:28 नवीन
अन वेल्कम टु क्लब!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भम्पक

चांगली चर्चा. पण चर्चा

खटपट्या
Tue, 07/05/2016 - 01:59 नवीन
चांगली चर्चा. पण चर्चा स्प्रॉकेट वरून सुरु झाली आणि मग टीकाउपणाकडे झुकली. माझ्यामते स्प्रॉकेट खराब होणे गाडी चालवण्याच्या शैलीवरही अवलंबून आहे. गर्दीमधे गाडी क्लचचा वापर न करता फक्त अ‍ॅक्सीलेटर पीळून गचके देत चालवली तर स्प्रॉकेट लवकर जाण्याची शक्यता असते. आता हे आपण करताय की नाही हे कसे ओळखणार? मागे बसणारा गर्दीत जर आपणास सतत आपटत असेल तर आपण गचके देत गाडी चालवताय असे समजा. हे सर्व मी माझ्या अनुभवावरूंन सांगतो आहे. दुसर्‍यांना पटेलच अशी आशा नाही.
  • Log in or register to post comments

माझ्यामते स्प्रॉकेट खराब होणे

मार्मिक गोडसे
Tue, 07/05/2016 - 10:59 नवीन
माझ्यामते स्प्रॉकेट खराब होणे गाडी चालवण्याच्या शैलीवरही अवलंबून आहे.
शैलीवरच !!! गाडी चालवण्याची शैली बॅले नृत्यासारखी असावी, ब्रेकडान्ससारखी नसावी.
आता हे आपण करताय की नाही हे कसे ओळखणार?
मागे बसणारा तुमचे खांदे सतत चेपत नसेल तर समजावे आपण गाडी व्यवस्थीत चालवत आहोत. एक सदस्य एका प्रतिसादात ..क्लच केबल खूप जास्त ताणून बसवली असेल तर लवकर तुटू शकते. असे म्हणतो व क्लच निट अ‍ॅजस्ट केल्यास म्हणजे नक्की काय? असा प्रश्नही विचारतो. viva चा प्रकार वाटतोय
  • Log in or register to post comments

सहमत

खटपट्या
Tue, 07/05/2016 - 11:12 नवीन
सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे

मीच तो सदस्य.

मोदक
Tue, 07/05/2016 - 12:02 नवीन
मीच तो सदस्य. तुमच्या मते नक्की काय चुकले आहे माहिती देण्यात आणि प्रश्न विचारण्यात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे

तुमच्या गाडीला आणखी एक क्लच

मार्मिक गोडसे
Tue, 07/05/2016 - 12:23 नवीन
तुमच्या गाडीला आणखी एक क्लच केबल बसवून घ्या. एक वापरातली आणि दुसरी बॅकप. पहिली गेली की फक्त हँडल आणि इंजिन येथे सुरूवातीचे आणि शेवटचे टोक बसवायला लागते. ..क्लच केबल खूप जास्त ताणून बसवली असेल तर लवकर तुटू शकते.
ज्याला बाईकची क्लच केबल जोडता येते, ताणून बसवल्याचे तोटेही माहीत आहे, त्याला क्लच निट अ‍ॅजस्ट कसा करावा हा प्रश्न पडावा ह्याचे आश्चर्य वाटले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

माझ्या माहितीप्रमाणे "क्लच अ

मोदक
Tue, 07/05/2016 - 12:45 नवीन
माझ्या माहितीप्रमाणे "क्लच अ‍ॅडजस्ट करणे" म्हणजे फक्त केबलचा ताण नीट करणे असे नाही. क्लच लिव्हरच्या प्लाय पासून ते क्लचकेबल चोक / जाम होणे पर्यंत अनेक प्रकार असू शकतात म्हणून "क्लच नीट अ‍ॅडजस्ट करणे" म्हणजे नक्की काय करणे असा प्रश्न पडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे

रोजच्या वापरातील बाइकची क्लच

मार्मिक गोडसे
Tue, 07/05/2016 - 13:10 नवीन
रोजच्या वापरातील बाइकची क्लच केबल जाम झालेली मी तरी बघितलेली नाही. तुम्हाला इतकी जास्त तांत्रिक माहीती असतानाही तुम्ही प्रश्न विचारला म्हणून viva चा प्रकार वाटतोय असे म्हटले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

असो. धन्यवाद.

मोदक
Tue, 07/05/2016 - 13:55 नवीन
असो. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे

बुलेट आणि इतर बाईक्स ची तुलना

अद्द्या
Tue, 07/05/2016 - 11:09 नवीन
बुलेट आणि इतर बाईक्स ची तुलना वाचून मजा वाटली , आणि xbhp वर वाचलेलं एक वाक्य आठवलं a motorcycle is a very personal thing, almost like a women. Each of us have our own likes and dislikes so my advice to you is to buy the motorcycle that fits your best idea of what is ideal.
  • Log in or register to post comments

भारीच

स्पा
Tue, 07/05/2016 - 11:56 नवीन
भारीच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अद्द्या

पर्फेक्ट

अनिरुद्ध.वैद्य
Tue, 07/05/2016 - 15:31 नवीन
सुरेख मांडलय लेखकाने.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अद्द्या

मीही घेतली..१जुन ला.

पी. के.
Tue, 07/05/2016 - 11:37 नवीन
Image removed.Image removed.
  • Log in or register to post comments

डेझर्टस्टॉर्मला फक्त सॅल्यूट

कैलासवासी सोन्याबापु
Tue, 07/05/2016 - 12:03 नवीन
Image removed. डेझर्टस्टॉर्मला फक्त सॅल्यूट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पी. के.

+१११

मोदक
Tue, 07/05/2016 - 12:04 नवीन
+१११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

लोकं घेऊन मोकळे झाले

अभ्या..
Tue, 07/05/2016 - 12:13 नवीन
लोकं घेऊन मोकळे झाले अभिजीतराव, तुमचे काय? :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पी. के.

तेजायला काहून थांबला बे ,

स्पा
Tue, 07/05/2016 - 12:21 नवीन
तेजायला काहून थांबला बे , होऊदे खर्च मी फ्लेक्स बनवतो त्याचे टेन्शन नको
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
  • «
  • ‹
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा