Skip to main content

रॉयल राइड... रॉयल एन्फ़िल्ड.... प्रश्नोत्तरी धागा

लेखक कैलासवासी सोन्याबापु यांनी गुरुवार, 02/10/2014 18:26 या दिवशी प्रकाशित केले.
मिपा परीवारात बरेच रॉयल एन्फ़िल्ड उर्फ़ बुलेट चे चाहते अन मालक आहेत, ह्या धाग्याचा हेतु कुठल्या ही दुसर्या ब्रॅंड च्या बाईक ची खिल्ली उडवणे, किंवा पातळी उतरुन टिका करणे हा मुळीच नाही, फ़क्त स्टॅंड अलोन बायकिंग करण्यापेक्षा , एक ऑर्गनाईझ्ड बायकींग एफ़र्ट म्हणुन हा लेखन प्रपंच, मोदक ह्यांनी प्रथम ह्या धाग्याची कल्पना मांडली... इथे अपेक्षित काय आहे ?? आर .ई. उर्फ़ बुलेट मालक असाल तर आपले अनुभव, कथन, मेंटेनंस टिप्स, इत्यादी आदान प्रदान, नसाल अन रॉयल एन्फ़िल्ड मधे रस असेल तर इथे प्रश्नोत्तराची हक्काची जागा, विकत घेण्यात रस नसेल तर कुठे ह्या बाइक्स उत्तम कंडीशन मधे भाड्याने मिळतील, कुठ्ली एक्स्पिडीशन आर ई वर केली तर मजा , आराम अन ऍडव्हेंचर द्विगुणीत होईल ही चर्चा इथे आपण करुयात. तर श्रीगणेशा स्वरुप, काही योगदान माझे (मोदक ह्यांनी मला, आर ई ची ३५० च का घेतली, एकंदरीत अनुभव काय इत्यादी कथन करण्याची विनंती केली त्याला अनुसरुन) १. मी क्लासिक ३५० का घेतली ?? अ. उत्तम संगम, ३.५ रॉ ताकद अन त्यातल्यात्यात बरे माईलेज (माझ्या पेशात खुप फ़िरावे लागते) ब. जरासा ओल्ड वर्ल्ड चार्म, सदरहु मॉडेल हे रॉयल एन्फ़िल्ड ह्या अगदी सुरुवातीच्या डीझाईन्स वर आधारीत आहे क. रोबस्ट बिल्ड, कमी देखभालीचा खर्च २. क्लासिक ३५० चे फ़ायदे ?? अ. मजबुत तरीही जास्त जड नसणे ब. ट्रेडीशनल कार्ब्युरेटर टेक्नॉलोजी (बायकिंग मधे हे मला महत्वाचे वाटले, ई एफ़ आय मधे फ़्युल पंप वापरले जातात ते ही इलेक्ट्रॉनिक चिप्स ने कंट्रोल्ड, त्यात पेट्रोल ही जास्त जाते, अन आडवळणाला काहीही प्रॉब्लेम आला तर लोकल मेकॅनिक त्यात काहीच करु शकत नाही, ह्या उलट कार्ब्युरेटर असला तर अगदी मेकॅनिक नसला तरी जुजबी माहितीवर आपण स्वतः डॅमेज कंट्रोल करुन परत ती बाईक वर्कशॉप पर्यंन्त आणु शकतो) क. स्पेयर पार्ट्स ची निट अवेलेबिलिटी अन सर्विस सुलभ असणे, ९० मिनिट एक्स्प्रेस सर्विस मधे शोरुम ला हिची व्यवस्थित निगा घेतली जाऊ शकते. ड. उत्तम मायलेज (बायकींग ला हे असणे बरे असते) ई. उत्तम ट्रॅक रेकॉर्ड, शिवाय मायलेज उत्तम असल्याने सायलेंसर चेंज अन इतर अस्थेटीक मॉडीफ़िकेशन्स (हॅंडल बार चेंज, रीम व्हिल्स ) नंतर ही खिशाला काही विषेश चाट बसत नाही ३. क्लासिक ३५० चे तोटे ?? १. जास्तच पॉवर हवी असल्यास ती नाही, "भारताची कल्ट हार्ले सम बाईक" असली तरीही ३५० सी सी आहे. २. ८० किमी/ तास नंतर पुर्ण बाईक कंप पावते ३. कंपनी ने दिलेले टायर भंगार आहेत (बदलल्यावर काही प्रॉब्लेम नाही ड्राय अन वेट दोन्ही ट्रॅक्शन एन्वॉयरमेंट मधे) ४. कंपनी सायलेंसर साधा घेतला तर बरेचदा खड्ड्यातुन काढताना घासतो खालुन, ऑफ़ रोड घ्यावा तर कंपनी पॉलिसी मधे बाय बॅक किंवा एक्स्चेंज बसत नाही, दोन्ही बोकांडि बसतात सायलेंसर्स ५. कंपनी सायलेंसर चा आवाज ’बुले्ट आली बे’ अशी घोषणा करत नाही ६. फ़िटिंग्स अन बोल्ट्स मधे रस्टींग प्रॉब्लेम येतो ३-४ पावसाळ्यां नंतर मला तरी मायलेज हा फ़ायदा इतर तोट्यापेक्षा मोठा वाटला सो मी घेतली, सद्ध्या ३-४ महिनेच झालेत, १५०० किमी झाले आहेत. मोदक भाई, अन इतर , एकंदरीत हे फ़ायदे अन तोटे पाहुन मी क्लासिक ३५० घेतली आहे. :)

वाचने 150746
प्रतिक्रिया 648

प्रतिक्रिया

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

मग दुरच रहा मोदकराव! हे अलॉय काही खर नाही. न पेक्षा येमारेफचे दणकट टायर्स आहेत ते टाकुन घेत जा.

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

एमारेफ ट्यूबलेस जरा हार्ड आहेत, घासले जातात लवकर. ग्रीप चान्गलीय. सीबीजीला मी नॉर्मल काढून त्याच रीमला ट्यूबलेस टाकला. 100/90/18. अपोलो चा. जरा नरम वाटला.ग्रीप सुपिरिअर आहे. फ्रिक्षण कमी वाटतेय. 19 ईंचीत पिरेल्ली आहे का बघा. 18 आलेत मार्केटला. त्याचे जबरदस्त रिझल्ट आहेत. रीमात 16 प्राड़ो चांगले आहे. बरेच नवे आर इ ओनर टाकायलेत. माज्यामते स्पोकस बेस्ट ओलताईम. ते वन टाईप सस्पेन्शनच असते.

In reply to by अभ्या..

बापु, वैद्यसाहेब, अभ्याजी.. प्रतिसादाबद्दल धन्यवाद. त्याचे असे झाले की माझ्या दुसर्‍या गाडीचे काम करताना तेथे एका बुलेटला मी वर फटू दिला तसली रिम बसवायचे काम सुरू होते. रिमची किंमतही ठीकठाक वाटली व ट्युबलेस करता येईल म्हणून मी त्या दिशेने माहिती काढण्यास सुरूवात केली. (येथे धागा काढला - आणखी एक दोन शिनीयर लोकांना विचारले.) ज्यांच्या बुलेटवर हे रिम बदलण्याचे काम सुरू होते त्यांचा मोबाईल नंबर घेतला होताच. त्यांना नंतर दोन तीन दिवसांनी विचारले तर कळाले की ते रिम त्यांच्या बुलेटला बसले नाहीतच आणि त्या ठोकाठोकीत बेअरींग गेले. ते वाढवलेले काम ऑथोराईज्ड वर्कशॉपमधून करून घ्यावे लागले. त्यामुळे ट्युबलेसची आयड्या डोक्यातून काढून टाकली आहे.

. तर मोदक भाऊ, वरील प्रमाणे कुटाणे असतात ट्यूबलेस टायरचं puncture काढायचे, प्रथम खिळा ओढून काढायचा असतो मग एक 'टी' आकाराचे टूल असते त्याला अगदी गिळगिळीत अशी एक रबरची नळी गुंडाळून भोकात कुचकतात अन बाहेर आलेली नळी तासून घेतात, झाले पंक्चर काढून! ह्यात एक स्टेप नाहीये, बाहेर आलेली रबर नळी कापून घेतली की त्याठिकाणी मी उल्लेख केलेले इपोक्सी सोल्युशन लावले जाते थोडे, ह्याचा वास रंग वगैरे आपण सायकलचे पंक्चर काढायला जे रालको वगैरे चे लालसर सोल्युशन वापरतो तसेच असते बघा

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

इमर्जन्सीला हे आपणही करु शकतो. टायरवाले माणूस बघून कीतीही सांगतात.

सदर धाग्याचे Practical Outcome: बऱ्याच दिवसांच्या सर्वे, माहिती, सल्लामसलत, आंजा शोध, काथ्याकूट... इ नंतर शेवटी मी रॉयल एनफिल्ड बुलेट इलेक्ट्रा ३५० चा मालक झालोय. खरंच खूप मस्त वाटतेय. जुनं शहर ते हायटेक सिटी या १८ किमीच्या प्रवासात मजा येतीय. पुढच्या महिन्यात श्रीशैलमला जाण्याचा विचार करतोय. RE

In reply to by वामन देशमुख

खूप खूप अभिनंदन वामनपंडित आपले !! राईड मेटल राईड स्ट्रॉंग अँड वेलकम टू द फॅमिली :)

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

इतक्या उशिरा प्रतिसाद देतोय, क्षमस्व.
>>इलेक्ट्रा मस्त दिसतेय!
धन्यवाद! यासाठीच केला होता हा अट्टाहास!
>>सीट बदलुन घेतलीय का?
नाही. ओरिजिनलच सीट आहे.

धन्यवाद, सोन्याबापू! बुलेटची सर्व्हिसिंग शोरूम मध्ये न करता बाहेर करावी, असे इथल्या बऱ्याचजणांचे म्हणणे दिसतेय. हैद्राबादमध्ये चांगली सर्व्हिस देणारे मेकॅनिक कुणी असतील तर सांगा.

In reply to by वामन देशमुख

वेल्कम टू द क्लब..!!! सुरूवातीचे सगळे सर्विसींग न चुकता ऑथोराईज्ड ठिकाणी करून घ्या. नंतर मेकॅनिककडे करा.

In reply to by मोदक

मी पुढे जाऊन म्हणेन की सुरूवातीच्या फ्री सर्व्हिस ऑथोराईज्ड सर्व्हिस सेंटर ला करून परत एकदा बाहेर पण करून घ्या. कंपनीचे सर्व्हिस सेंटर दळभद्री आहेत. माझा कुठलाही प्रॉब्लेम सर्व्हिस सेंटर ला व्यवस्थित दुरुस्त करून मिळालेला नाहीये. गाडीची डिलिव्हरी मिळाली की पहिले बॅटरी आणि ऑईल लेवल चेक करून घ्या, माझ्या गाडीत पुरते 1 लिटर सुद्धा ऑईल नव्हते. आत्ताच्या सर्व्हिसिंग ला तिथल्या सुपरवायजर ला बोललो की दे नुसता शिक्का मारून सर्व्हिस बुक वर, कारण तसेही तू काही करणार तर नाहीचेस. उत्तरा दाखल नुसताच हसला हरामखोर.

In reply to by गणामास्तर

मास्तुरे.. पिंपरीच्या पूना स्कूटर्स ला सर्विसींग करून देतात का विचार. ओरिजिनल पार्ट्स, ताबडतोब सेवा आणि भयंकर स्वस्त रेट आहेत. माझ्या पॅशनचे चेन सॉकेट बदलले त्याला पुण्यातील खर्चाच्या तुलनेत निव्वळ ५०% खर्च आला. मी काही चुकते आहे का ते चार चार वेळा चेकवले पण ओरिजिनल स्पेअर्स आहेत.

मला माझ्या बुलेटचे सीट बदलायचे आहे. पुण्यात कोणी बुलेट स्पेशालिस्ट माहित आहे का? मला एक मुंबईचा पत्ता मिळाला आहे पण आता तेवढ्यासाठी मुंबईत कोण जाईल. त्याचा मोबाइल न्ंबर पण मिळाला पण तो चुकीचा निघाला.

In reply to by मोदक

क्लासिक 500 मला नवीन सीट टाकायचे आहे. आधीचे सीट खराब झालय आणि त्याला स्प्रिंग आहेत. मला बिना स्प्रिंगच सीट हवय. माझ्या मित्राने त्याच्या बुलेटला बसवलय पण त्याने ते मुंबईवरुन आणलय.

In reply to by Dhananjay Borgaonkar

मी सुचवेन स्प्रिंगवाले सीट असूद्या. साध्या सीटपेक्षा कितीतरी जास्ती पटीने आरामदायक आहे. नाना पेठे मध्ये बकेट सीट बसवून मिळेल, आनंदरावांचा मित्रच आहे. त्याच्याकडे चौकशी करा. कॉलींग आनंदराव..

In reply to by मोदक

स्प्रिन्गवाले सीट चांगलेच पण तरीही बदलायचेच असेल आणि ठाण्याला आलात तर आराधना टॉकीजच्या समोर सीट स्पेशालीस्ट आहे. तुमच्या समोर तुमचे समाधान होइपर्यंत हवे तसे बदल करुन देइल. स्प्रींगवाल्या सीटमधे तीघे बसताना मधल्याचे वांधे होतात.

In reply to by खटपट्या

नका हो.. बुलेटवर (किंवा कोणत्याही दुचाकीवर) तिघे बसणे हा त्या वाहनाचा अपमान आहे.

नुकतंच चेन सारखी आवाज करते ढीली झालिये म्हणून वर्कशॉपमध्ये गेलो होतो. तर तिथे सांगण्यात आले की चेन व्यवस्थित आहे, तर स्प्रॉकेट गेले आहे. साधारण २०००० किमि गाडी चालली आहे. मला एक प्रश्न पडतोय की ईतक्या लवकर स्प्रॉकेट खराब होउ शकते का? कारण जुन्या पल्सारचे स्प्रॉकेट चान्गली ६०००० किमी चालली तरी गेले नाही. शिवाय क्लच केबला वेगळाच इश्यु, १.५ वर्षात दोनदा तुटलीय :(

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

चेन स्प्रॉकेटचे मागचे जे चाक दिसते त्याचे दात नीट चेक करा, त्या दातांची उंची झिजल्यामुळे कमी जास्त झाली असेल तर बदलावेच लागेल. हे चेन स्प्रॉकेटचे मागचे व्हील आहे. (अंतर्जालावरून घेतलेला फोटो आहे - माझी गाडी इतकी घाण नसते ;) ) . माझ्या गाडीचे २०,००० किमी पूर्ण झाले असतानाच मागच्या चाकाचे पांच सहा दात तुटले / झिजले. त्यामुळे कट् कट् आवाज येत होता. २३०० रूपयांना संपूर्ण किट (मागचे चेन व्हील, पुढचे चेन व्हील आणि चेन) असे बदलून घेतले. (ऑथोराईज्ड शोरूम मध्ये.) माझ्या पॅशन प्लसचे पहिले स्प्रॉकेट ४०,००० किमी ला बदलावे लागले. तेंव्हा गाडी फक्त आणि फक्त हायवेला चालली होती. १०% सुद्धा ट्रॅफिकमध्ये चालली नसेल. नंतर फक्त ट्रॅफिकला चालायला लागली तेंव्हा पॅशनचे सुद्धा २०,००० किमी मध्ये गेले, या किट बदलामध्ये बहुदा ओरिजिनल कीट वापरले नसावे अशी शंका आहे म्हणून इतके लवकर गेले. पण त्या अनुभवावरून आता मागच्या आठवड्यात पुन्हा हिरो चे ओरिजिनल कीट बसवले आहे. तुमच्या गाडीला आणखी एक क्लच केबल बसवून घ्या. एक वापरातली आणि दुसरी बॅकप. पहिली गेली की फक्त हँडल आणि इंजिन येथे सुरूवातीचे आणि शेवटचे टोक बसवायला लागते. ..क्लच केबल खूप जास्त ताणून बसवली असेल तर लवकर तुटू शकते. याबाबत अधिक माहिती तज्ञ लोक्स देतीलच.

In reply to by मोदक

माझी बजाज डिस्कव्हर ७ वर्षे आणी जवळपास ८००००+ किमी चालली आहे...अज्जून एकदाही क्लच केबल तुटणे, चेन स्प्रॉकेट तुटणे, क्लच प्लेट झिजणे असे काहीही प्रॉब्लेम्स आलेले नाहियेत...टचवूड्ड...असो....जरा खालची लिंक पहा http://riderzone.in/never-buy-royal-enfield/ माझी आणि त्या लेखकाची मते परफेक्ट जुळतात

In reply to by टवाळ कार्टा

आणि माझी बाईक ९०% वेळा शहरातच चालवलेली आहे

In reply to by टवाळ कार्टा

मी शाळेत असताना एक छत्री घेतली होती. ती जर ऊन-पाऊस-वार्‍यात वापरलीच नसती तर अजून टिकली असती आणि म्हातारपणी माझ्या नातवंडांना "खानदानकी निशानी" म्हणून देता आली असती.

In reply to by मोदक

उदाहरण समजले नाही...१.५ लाखाची बाईक जर ५००००+ किमी कोणताही पार्ट खराब न होता फक्त शहरात नाही चालू शकत तर काय उपयोग...आणि हेच काम अगदी सगळ्यात स्वस्तात मिळणारी बजाज CT100 आरामात करते

In reply to by टवाळ कार्टा

Reliability हा एकमेव निकश असणार्यांनी रॉयल एन्फिल्डच्या वाटे जाऊ नाही. २०००० किमी पर्मोच्च रायडिंग सुख देणार्या गाडीवर थोडेफार खर्च करायला मी कधीही तयार असेल. अखेर पसंद अपनी अपनी.

In reply to by जिन्क्स

बुलेट ना घेण्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे बेभरवशीपणा. खर्च हा मुद्दा अलाहिदा आहे. त्याची होणारी कटकट नकोशी आहे. विश्वसनीयता हा गुण बुलेट मध्ये कधीच नव्हता. क्लच केबल तुटणे, सुटे भाग गंजणे काहीतरी कुरबुरी सतत चालू असणे अशा अनेक तक्रारी पासून बुलेट मालकांची कधीच सुटका होत नाही. शिवाय कंपनीची कार्यशाळा(workshop) किंवा सेवा केंद्रे अत्यंत बेफिकीर आहेत. कंपनी कडे तक्रार केली असता त्या बद्दल कंपनी काहीही करीत नाही. केवळ गाड्या विकल्या जातात याबद्दल कंपनीची "बेफिकिरी" आहे या कारणास्तव बुलेट कधीच घेणार नाही. याउलट होंडाच्या मोटारसायकली मी आणि माझा भाऊ मिळून ४ मोटार सायंकाळी आणि ४ स्कुटर्स वापरल्या( वापरत आहोत). चार पैकी तीन मोटार सायकल एक लाख पेक्षा जास्त किमी चालवल्या आहेत. चौथी युनिकॉर्न ५०००० च्या वर किमी असून अजून चालवत आहे डबल सीट घेऊन मुंबई गोवा, मुरुड चा समुद्रकिनारा फिरून आल्या आहेत. मुंबई पुणे ट्रीप तर कितीतरी. पर्वतीच्या टेकडीवर मागच्या बाजूने सुद्धा चढवली. वाटेल तेथे आणि वाटेल तशी चालवून त्याचे सुटे भाग कधी गंजत नाहीत तुटत नाहीत की स्प्रॉकेट कधी बदलायला लागले आहे. सायलेन्सर तुटला किंवा अशा तत्सम तक्रारी कधीच येत नाहीत. हे सर्व दोन वर्षात फक्त एकदा सर्व्हिसिंग करून. तेंव्हा बुलेट आणि जपानी मोटार साकारली यांच्या गुणवत्तेत तुलना अजिबात होत नाही. बुलेट चालवणारे हे केवळ हृदयाच्या विचाराने चालतात. आणि त्यांनी तसेच चालावे. गुणवत्तेबाबत तुलनेच्या फंदात पडू नये.

In reply to by सुबोध खरे

बुलेट चालवणारे हे केवळ हृदयाच्या विचाराने चालतात. आणि त्यांनी तसेच चालावे. गुणवत्तेबाबत तुलनेच्या फंदात पडू नये. +११११ टका तू शाळेत असतास तर तुझ्याकडून १०० वेळा लिहून घेतले असते. :)

In reply to by टवाळ कार्टा

या लॉजिकने डिस्कवर करते ती सगळी कामे टीव्हीस मोपेड पण करते.

In reply to by मोदक

करते की...मग टिव्हिएस मोपेडसुध्धा एनफिल्डपेक्षा जास्त रिलाएबल आहे =))

In reply to by टवाळ कार्टा

बर्र.. मग तुम्ही मोपेड घ्या आणि आम्ही एन्फिल्ड घेतो. आंम्ही आमच्या आवडीची गाडी घेवून त्याबद्दल चर्चा करत असताना तुम्ही "ती गाडी बेकार आहे" असे तुमचे मत एकदा नोंदवले हे ठीक. तुमच्या मताचे तुणतुणे वाजवणे या धाग्यावर अस्थानी आहे असे वाटत नाही का..?

In reply to by मोदक

चालतेय की...पण बुलेटवाले "बुलेटसारखी दुसरी गाडी नाही...कुठेही बिंधास न्या" असे म्हणतात त्याचे काय :P

In reply to by टवाळ कार्टा

म्हणूदे की. कोणती गाडी रिलायबल असते आणि कोणती नसते याचे प्रत्येकाचे वेगवेगळे अनुभव / आखाडे असतात. तुमचे मत ब्रह्मवाक्य समजून जगातल्या सगळ्यांने तसेच वागावे हा अट्टहास कशासाठी? बाकी तुम्ही बुलेट वापरली आहे का? नसल्यास बुलेट न वापरता बुलेटबद्दल अधिकारवाणीने मत देत आहात याचा अचंबा वाटतो आहे. का ही पण लाल डबा सांडण्याची हौस समजावी..?

In reply to by मोदक

पुलंचा सुप्रसिद्ध वाक्य आठवला! :) मी भरपूर चालवलेल्या गाड्यांमध्ये cd 100, cbz , Thunderbird या आहेत. सर्वात रीलायबल cd 100 होती. (बजाजच्या डिस्कव्हर पेक्षा सुद्धा ) आणि सर्वात आरामदायक Thunderbird आहे. बादवे रॉयल एन्फ़िल्ड च्या धाग्यवर चिरकुटांचा काय काम ?

In reply to by टवाळ कार्टा

तुमची डिस्कवर शहरातले रस्ते सोडून ऑफरोड किती चालली आहे? एका दिवसात ४०० / ५०० किमी पेक्षा जास्त किती वेळा चालली आहे? लिंकबद्दल धन्यवाद. पण आत्ता या घडीला कोणती गाडी सर्वगुणसंपन्न आणि परीपूर्ण आहे ते सांगा. (रॉयल एन्फिल्डच्याच प्राईजरेंजमध्ये.)

In reply to by मोदक

तुमची डिस्कवर शहरातले रस्ते सोडून ऑफरोड किती चालली आहे? एका दिवसात ४०० / ५०० किमी पेक्षा जास्त किती वेळा चालली आहे?
वर्षातले किती दिवस एका दिवसात ४००-५०० किमी चालवले जाते?
लिंकबद्दल धन्यवाद. पण आत्ता या घडीला कोणती गाडी सर्वगुणसंपन्न आणि परीपूर्ण आहे ते सांगा. (रॉयल एन्फिल्डच्याच प्राईजरेंजमध्ये.)
बर्याच आहेत...हिरो होंडा करिझ्मा, बजाज पल्सर २२०, बजाज पल्सर २०० RS/AS/NS, होंडा CBR250R...आणि यातल्या बहुतेक एन्फिएल्ड पेक्षा कमी किमतीला आहेत

In reply to by टवाळ कार्टा

बर्र... तुमची इथली मते आणि इतर ठिकाणची मते (मिपावरची नव्हे) यात जमीन आस्मानाचा फरक आहे असा मलाच भास होतो आहे की माझे काहीतरी चुकते आहे? कॉलिंग कपिलमुनी आणि असलाच तर अनिरूद्ध दातार. :)

In reply to by मोदक

ती मते इथे देता का? बुलेटच्या तुलनेत वरिलपैकी कोणतीही बाईक जास्तच रिलायेबल आहे

In reply to by टवाळ कार्टा

म्हणून तुला सगळे जण अभ्यास वाढवायला आणि मोठे व्हायला सांगतात. तुझ्या मतांबद्दलचा प्रतिसाद सर्वगुणसंपन्न बाईक बद्दलचा आहे आणि तू फक्त रिलायबलिटीला पकडून बसला आहेस. धाग्यातल्या पहिल्या वाक्यातला एक मुद्दा परत हायलाईट करत आहे..

ह्या धाग्याचा हेतु कुठल्या ही दुसर्या ब्रॅंड च्या बाईक ची खिल्ली उडवणे, किंवा पातळी उतरुन टिका करणे हा मुळीच नाही

बाकी बापुंनी धाग्यात आणखी काहीतरी खरडले आहे. वाचले नसल्यास आणखी एकदा वाचलेस तरी चालेल. इथे अपेक्षित काय आहे ?? आर .ई. उर्फ़ बुलेट मालक असाल तर आपले अनुभव, कथन, मेंटेनंस टिप्स, इत्यादी आदान प्रदान, नसाल अन रॉयल एन्फ़िल्ड मधे रस असेल तर इथे प्रश्नोत्तराची हक्काची जागा, विकत घेण्यात रस नसेल तर कुठे ह्या बाइक्स उत्तम कंडीशन मधे भाड्याने मिळतील, कुठ्ली एक्स्पिडीशन आर ई वर केली तर मजा , आराम अन ऍडव्हेंचर द्विगुणीत होईल ही चर्चा इथे आपण करुयात.

In reply to by टवाळ कार्टा

नाही रे.. राजाने गरूड पाळला आहे आणि तू चिमणी पाळणे कसे स्वस्त आहे, खाण्यापिण्याचा खर्च येत नाही, पक्षीच पाळायचा आहे तर गरूडापेक्षा चिमणी कशी चांगली असे काहीतरी बोलत आहेस.

In reply to by टवाळ कार्टा

तुम्ही स्पोर्ट्स बाईक आणी क्रुझर बाईक एका मापात तोलू शकत नाही. बजाजच्या बाईकन जो रीलायबल म्हणएल त्यापेक्षा विनोद नाही

In reply to by कपिलमुनी

तुम्ही स्पोर्ट्स बाईक आणी क्रुझर बाईक एका मापात तोलू शकत नाही.
मग ही तुल्ना चालते?
बजाजच्या बाईकन जो रीलायबल म्हणएल त्यापेक्षा विनोद नाही
बुलेटच्या तुलनेत जास्तच रिलायेबल आहे

In reply to by टवाळ कार्टा

एवढा टोकाचा विरोध ???? आकडे काही वगळचे बोलतायत. http://auto.ndtv.com/news/two-wheelers-sales-for-june-2016-positive-gro…

In reply to by टवाळ कार्टा

आमच २०० किलोच धुड ७५ किलोच्या माणसास घेउन, निवांत डोंगररस्ते घाट फिरु शकतंय अन शिवाय ह्या स्पेक्स्वर ४०+ चा माय्लेजही देतय (सिटी ट्रफिक हा, भायेर आजुन जास्त) त आपण खुस.

In reply to by टवाळ कार्टा

अखीलेषचा ब्लॉग मी फॉलो करतो. त्याची अन माझी मतेही परफेक्ट जुळतात. पण काये, एन्फिल्ड एन्फिल्ड है, और प्यार दिलसे होता है, दिमाग से नै ;) ;) तेव्हा उगा काय लॉजीक बिजिक नका हो खपवत जाऊ एन्फिल्डवाल्यांसमोर.

In reply to by मोदक

माझा ठाण्याचा मित्र कोनतीही नवी गाडी आली की नावे ठेवतो ! सर्वगुणसंपन्न आणि परीपूर्ण गाडी सापडली की सांग =))

In reply to by कपिलमुनी

तुमच्या ठाण्याच्याच मित्राने लिस्ट दिली आहे की.. हिरो होंडा करिझ्मा, बजाज पल्सर २२०, बजाज पल्सर २०० RS/AS/NS, होंडा CBR250R ( ..आणि टीव्हीएस मोपेड ;) )

In reply to by मोदक

माझी थंडरबर्ड मोस्टली ९०%+ हिंजवडीच्या ट्रॅफिकमधेच चालली असल्याने हे स्प्रॉकेट खराब झाले असावे. बाकी त्याच ट्रॅफिकमुळे हाफ क्लच बर्याचदा असल्याने कदाचित क्लचही जात असावा. आता क्लच केबल बॅकपला घेतलीच आहे.

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

अनिरुद्धराव जुन्या स्कुटरची क्लच केबल टाकुन बघा. ती थंडरबर्डच्या केबल पेक्षा जाड आहे आणि तीच एक बसते थंडरबर्डला. क्लच लीवरला जिथे क्लचकेबल कनेक्ट होते तो भाग थोडा तासुन घ्या. बर्‍याच वेळेला त्या कारी भागामुळे केबल गतप्राण होते. हा उपाय मला बालाजी ऑटोमोबाइल्स कोथ्रुड याने दिला होता. ५ वर्षे झाली क्लच केबलला नो प्रॉब्लेम.

बाईकची चेन अतीघट्ट किंवा अतीसैल ठेवल्यास चेन व स्प्रॉकेट खराब होऊ शकते. धक्का मारून गाडी गिअरमध्ये टाकून चालू केल्यानेही चेनचे व स्प्रॉकेटचे नुकसान होते. वेळच्यावेळी बाईकची चेन अ‍ॅजस्ट व ऑइलींग केल्याने बाईकची चेन व स्प्रॉकेट खराब होत नाही. माझ्या बाबांच्या २००१ च्या स्प्लेंन्डरचे अजुनपर्यंत एकदाही चेन किंवा स्प्रॉकेट बदललेले नाही. (१लाख कि.मी.पेक्षा अधिक रनींग). क्लच प्लेट व क्लच केबलही अजुनपर्यंत बदललेली नाही. क्लच निट अ‍ॅजस्ट केल्यास व गाडी सिग्नलला न्युट्रलमध्ये ठेवल्यास क्लच प्लेटची झीज टाळता येते.

In reply to by टवाळ कार्टा

माझी यामाहा SZ (१५० सीसी ) ६५०००० किमी चालेलेली आहे , शहरात आणि ओफ्रोड , मजबूत रेम्ताव्लेली आहे फक्त स्पिडोमितर बंद पडलेले , बाकी काही परत बदललेला नाही