Skip to main content

रहाट

लेखक जव्हेरगंज यांनी रविवार, 03/07/2016 10:11 या दिवशी प्रकाशित केले.
झुंजूमुंजू झालं कोंबडं आरवलं बामनाला जाग आली सडा सारवन पंचारती धडाडून चूल पेटली घुगऱ्या पुरण पोळी पहिला निवद अंबाबाईला मग येडाय रुकड्याय माळावरचा म्हसोबा शेवटून बाभळीखालचा वेताळ खांद्यावर जानवं हातात परात नैवैद्याची रिकामी, उदबत्तीचा धूर सुगंधी केवडा रामप्रहरी, रांगोळीतला मोर आणि हळदीकुंकू उंबरठ्याशी, शेणाचे गोळे ताटलीभर निवद वळचणीला, उनउन लाप्शी प्रसादाला बामन देवळात गेला घंटानाद अखंड दुग्धाभिषेक साडी चोळी खण ओवाळणी बाकी निर्माल्य, कपाळाला अष्टगंध पवित्र, याखेपेस गणपती वाटणीचा? नंदीबैलावर डोळा चिल्लर खुर्दा देवीचा 'वार' जणू दिवाळी दसरा फूलात फूल जास्वंदाचं मोगरा चमेली शोधून सापडेना सिताफळात बियाच बिया पिकलेली केळी अर्धा पेढा बामन झोपला झाडाखाली संध्याकाळी आरती ढोल नगारे, बाजारहाट बामन घरी गेला सांजदिवा पणती समई चुलीत लाकडं केळीचं पान पै न पै शिध्याला बामन झोपला उताणा अगडबंब मिटल्या डोळ्यात पहाटेचा कौल पिंपळपान झुंजूमुंजू झालं कोंबडं आरवलं बामनाला जाग आली
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 1705
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

बामनाच्या आयुक्षातला एक दीस. पैजारबुवा,