बांग्लादेशची सुरक्षास्थिती आणि भारता समोरचे आव्हान
बांग्लादेशात असुरक्षीतता नवीन नसावी, कडवे लोक हिंसेच्या माध्यमातून व्यवस्था हातात घेण्यास आतूर होताना दिसतात. गेल्या दोन दिवसा पुर्वी ढाक्यातील परदेशी दूतावास क्षेत्रातील परदेशी लोकांचा वावर असलेल्या बेकरीवरील दहशतवादी हल्ला, बांग्लादेशातील सुरक्षा व्यवस्थेची समस्या हाताच्या बाहेर जात नाहीए ना अशी साशंकता निर्माण करतो.
सहसा कोणत्याही देशात परदेशी दूतावास असलेला एरीआ सहसा उच्चतम सेक्युरीटी दिलेला असतो आणि तिथे अतीरेक्यांचे यश हि त्या देशाची एकुण सुरक्षा व्यवस्था आतून पोघरली गेली आहे का असा प्रश्न उपस्थित करते. मागील काही वर्षांपासून कट्टरवाद्यांकडून अल्पसंख्यांकावरील आणि उदारमतवाद्यांवरील प्राणघातक हल्ले वाढले, सगळीकडेच कट्टरतावाद वाढताना आणि ज्या देशाची उभारणिच धार्मीक मुलतत्ववादाच्या आधारावर झाली आहे त्यात खूप आश्चर्यकारक काही आहे असे नव्हे पण पोलीसदले इन्व्हेस्टीगेट करू शकत नाहीत /करत नाहीत हे परिस्थितीवरचा अंकुश संपत चालल्याचे लक्षण असू शकते. यात स्थानीक आणि आंतरराष्ट्रीय गुप्तचर संस्थांचे अपयशही लक्षात घेणे जरूरी असावे.
तसे पाहता भारतीय उपखंडातील प्रबोधनाची सुरवात १९ व्या शतकाच्या पुर्वार्धात बंगालातूनच झाली आधी उदारमतवादी आणि नंतर डाव्या मतांचा बोलबाला होऊनही २० व्या शतकाच्या प्रारंभी लॉर्डकर्झनने घातलेल्या फाळणीच्या घावातून बाहेर पडणे बंगालास कठीण जाताना दिसते. असो, किमानपक्षी बांग्लादेश सोबतचे सीमा विषयक प्रश्न कागदोपत्री तरी भारतास निपटता आले, अतीरेक्यांचा शिरकाव भारतात होऊ नये म्हणून सीमे भोवतिच्या कुंपणाचे, फ्लड लायटींगचे काम भारत सरकारने वेगाने पूर्ण करावयास हवे. कारगील-पठाणकोट सारखा अनुभव येऊ नये म्हणून डोंगर शृंखला ते ब्रह्मपुत्रा आणि गंगा अशा भल्या मोठ्या नद्यांची पात्रे घुसखोरी पासून सुरक्षीत ठेवण्यासाठी आधूनीक इलेक्ट्रॉनीक तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर केला जावयास हवा. पुढचा विचार करून चालण्या एवजी चार फटके खाऊन मग वळणावर येणारे भारतीय नेमाने यात हयगय करतील आणि उशीरानेच शहाणे होतील हे सांगण्यास कुणि भविष्यवेत्ता लागेल असे नव्हे ती मोठी भारतीय परंपरा आहे. पण काळाच्या ओघात सीमेची सुरक्षा होऊन जाईल.
तरीही परिस्थिती अधिक बिघडली आणि भारताला नको असलेले कट्टरवादी बांग्लादेशात अधिक प्रबळ झालेच तर भारतासमोर दोन मोठ्या समस्या उभ्या राहू शकतात बांग्लादेश मयन्मार ते थायलंड जमिनी मार्गे व्यापार चालू होण्याच्या स्वप्नांमध्ये अडथळे येऊ शकतात दुसरे परिस्थिती काश्मिर एवढी बिघडली आणि तेथील एखाद कोट अल्पसंख्यांक हिंदूंवर मानववंश संहाराच्या भितीने भारतात यावे लागले तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर निर्वासीतांना अचानक सामावून घेणे अशक्य नाही पण कमालीचे कठीण ठरू शकते.
बांग्लादेश हा एक घनदाट मानवी वस्ती असलेला प्रदेश आहे. जमिन कितीही सुपिक असली तरीही अत्यंत छोट्या प्रदेशात सोळा कोटी जनता सामावून घेऊन राहणे गंमत नसावी. आमेरीका आणि गल्फ देशांच्या कृपेने आताशा कुठे बांग्लादेशाची गाडी रुळावर येत असताना आणि निर्यात वाढत असताना वाढता कट्टरतावाद हे बांग्लादेशियांनाही नकोसे असलेले संकट असेल. बांग्लादेशातील एक प्रश्न सातत्याच्या राजकीय अस्थीरतेचा आहे.- लोकसंख्या वाढूनही छोट्या राज्यांची वगैरे निर्मिती करून स्थानिकांच्या राजकीय आकांक्षांना वाट करून द्यावी हे बांग्लादेशात अद्याप घडले नसावे हे ही राजकीय अस्थीरतेचे कारण असू शकेल काय हा एक वेगळा अभ्यसनीय विषय असावा. बांग्लादेशची निर्मितीत सेंटर लेफ्ट असलेल्या अवामी लीगचा पुढाकार असला आणि डावी चळवळही बांग्लादेशात प्रभाव ठेऊन असली तरी धार्मीक उजवे गटांना शीत युद्धाच्या काळात आमेरीकेकडून तसेच पाकीस्तान आणि चीन मधून पाणि घालून झाले असणार आहे. आमेरीकेतील पाण्याची दिशा बदललेली असली तरी पाकीस्तान आणि चीनच्या पडद्या मागची खुस्पटखोरी एवढ्यातच संपेल अशी शक्यता कमी.
गुप्तचर यंत्रणांचे बांग्लादेशातील सध्याचे अपयश मान्य केले तरीही भारताचे सध्याचे सुरक्षा सल्लागार अजित डोवाल या विषयाचे गांभिर्य समजून असू शकतील हि जमेची बाजू. बांग्लादेशात पाकीस्तान आणि चीनच्या पडद्या मागून खुस्पटखोरी केलीतर कशी मात द्यावयाची हे भारता समोरचे मुख्य आव्हान असेल किंवा कसे.
(लोकसंख्या विषयक आकडेवारी चुभूदेघे)
प्रतिक्रिया
छान
इसिसने आपली पाळेमुळे भारतीय
माझे मत