✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

चो..पली ३

व
विनायक प्रभू यांनी
Fri, 07/01/2016 - 15:29  ·  लेख
लेख
चो.. पली बोलतोय, जरा त्रास देतोय परत "ओ.के. नावाला जागायला पाहीजे रे परेशान अली" हॅ हॅ हॅ. मला एक सांग ९२% मिळवलेल्या मुलाचे आय.आय.टी चे चान्सेस किती? "पवई कॉम्प चा चान्स ०.००३ टक्के नॉर्मल- भारत भर असलेल्या १७ आयआयटी मधे कुठलीही स्ट्रीम ०.३ टक्के" अग्गायायाया. जे आयला म्हणजे तुला भेटायलाच पाहीजे. " हे सुद्धा 'च' च्या बाराखडीत अडकला नाही तर" .................. तो आत आला. बाबा सुद्धा बरोबर होते. १.५ एकर शेती करणारा बळी राजा. दुष्काळी भागातला. कर्ज बाजारी. आर्थिक अवकळा स्पष्ट दिसत होती. मुख्य शहरापासुन ६० किलोमिटर पत्र्याच्या शाळेतला. मराठी माध्यम,दहावी ९०% गणित ९९ सायन्स ९८ मिटींग ला बसलेल्या सर्वांना उत्सुकता होती. मी सरुवात केली, उभा राहीलो कडक सॅल्युट ठोकला, "सांग बाबा हे तु कसे काय केलेस"? काहीही नाही सर खुप अभ्यास केला आणि घराची परिस्थिती बदलायचीच होती काही ही इलाज नव्हता. त्याने बॅगेतुन रिझल्ट काढला. पहीला कागद-़जे. ई. ई मेन्स- इंडिया रँक २५० दुसरा कागद- जे. ई. ई. अ‍ॅड्वान्स-इंडिया रँक ३५० त्याने ३ रा कागद काढला, मेडीकल सी.ई.टी महाराष्ट्र रँक ३५० (नायर हॉस्पिटल नक्की) ही माहीती होम विझिट मधे कागदावर आलेले नव्हती. "बायॉलॉजी पण घेतले होतेस"? हो सर, वोकेशनल ची फी परवडणार नव्हती आणि क्लास तर शक्यच नव्हते. "How did he manage this" चीफ ट्रस्टी म्हणाले त्याने ४ था कागद काढला एआयपीमटी इंडीया रँक ४५० मी तर खुर्चीतन पडायचा बा़की होतो. सर्व ट्रस्टी हतबुद्ध. चीफ ट्रस्टी चे डोळे पाणावले. No more questions, no questions on financials, whatever he wants is sanctioned.बाळा तुला काय मदत पाहीजे ते सांग. पहील्या सेमिस्टर ला लागणारे ७० हजार सँक्शन झाले, चीफ ट्रस्टींनी माझ्या सारखाच कडक सॅल्युट ठोकला. ........ सहा महीन्याने त्याचा मेल आला. तो सर्व १७ आयआयटी मधे ९२ आला होता. अ‍ॅल्युमनी फंड मधुन त्या चे सर्व शिक्षण मोफत होणार होते, त्याला फाउंडेशन वर अवलंबुन राहण्याची गरज नव्हती. इंग्लीश मधे बोलायला आजही चाचपडणारा मुलगा खरगपुर आय आय टी मधे सर्व प्रोफेसरांचा लाडका झाला होता. ........ मला सतावणारा एक प्रश्न मी त्याला १५ दिवसांनी विचारला त्याने दिलेले उत्तर. सर, धाकटी चे शिक्षण, बाबांचे कर्ज, घराची परिस्थिती बघता मला १० वर्षे थांबायला परवडणार नव्हते म्हणुन आवड असुन सुद्धा मेडीकल केले नाही. कुणीही १०वी च्या मार्कांवर " पवई कॉम्प" म्हटले की मयुर आठवतो आणि कडा ओल्या होतात.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
धोरण
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
5479 वाचन

💬 प्रतिसाद (28)

प्रतिक्रिया

सुंदर!

अनुप ढेरे
Fri, 07/01/2016 - 15:55 नवीन
सुंदर!
  • Log in or register to post comments

रत्न पारखी

नाखु
Fri, 07/01/2016 - 16:10 नवीन
अस्सल हिरे समजणार (आणि नेम्के शोधणार ही) कडक सलाम दोघांनाही (गुरू आणि शिष्य) अस्सल (काच) नाखु
  • Log in or register to post comments

+१ १००% सहमत,

राजाभाउ
Fri, 07/01/2016 - 16:49 नवीन
+१ १००% सहमत,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

+१११

लोथार मथायस
Sat, 07/02/2016 - 08:28 नवीन
सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

सॅल्युट

टवाळ कार्टा
Fri, 07/01/2016 - 16:11 नवीन
सॅल्युट
  • Log in or register to post comments

ग्रेट!

पैसा
Fri, 07/01/2016 - 16:41 नवीन
ग्रेट!
  • Log in or register to post comments

_/\_

अजया
Fri, 07/01/2016 - 16:52 नवीन
मुलाला वाचायला देत आहे!
  • Log in or register to post comments

क्या बात है! ह्या लेकराची ही

यशोधरा
Fri, 07/01/2016 - 17:01 नवीन
क्या बात है! ह्या लेकराची ही खरी जिद्द आणि त़ळमळ परिस्थिती बदलायची. ही आयुष्यभर अशीच राहो ह्या शुभेच्छा. वाचताना अंगावर काटा आला, खरेच.
  • Log in or register to post comments

प्रभूमास्तर हाच प्रश्न गेल्या

अभ्या..
Fri, 07/01/2016 - 17:33 नवीन
प्रभूमास्तर हाच प्रश्न गेल्या भागात ईचारणार होतो. काहीच पैसा नाहीय पण अचाट बुद्धीमत्ता आहे अशांना पुढची शैक्षणिक स्वप्ने शक्य आहेत का सद्यकाळी, उत्तर मिळाले. आनंद झाला मनापासून
  • Log in or register to post comments

जबरदस्त!

आदूबाळ
Fri, 07/01/2016 - 17:36 नवीन
जबरदस्त!
  • Log in or register to post comments

+१००

सुबोध खरे
Sat, 07/02/2016 - 10:04 नवीन
+१००
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

खासच! मास्तरांनी चांगला अनुभव

धनंजय माने
Fri, 07/01/2016 - 17:40 नवीन
खासच! मास्तरांनी चांगला अनुभव लिहिला आहे
  • Log in or register to post comments

अशी मुलं अपवादात्मक असतात.

सतिश गावडे
Fri, 07/01/2016 - 17:41 नवीन
अशी मुलं अपवादात्मक असतात. जन्मतःच बुद्धीमतेचं वरदान मिळालेली.
  • Log in or register to post comments

+१. सर्वसामान्यपणे तीच

संदीप डांगे
Fri, 07/01/2016 - 19:37 नवीन
+१. सर्वसामान्यपणे तीच रोलमॉडेल असतात, दुर्दैवाने. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

१००

विनायक प्रभू
Fri, 07/01/2016 - 17:45 नवीन
पुर्ण महाराष्ट्रात दर वर्षी असे सुमारे १०० मयुर असतात. पण मी एकटा ही माहिती पोचवणार कशी?
  • Log in or register to post comments

+१०००. आपण सगळे मिळून पोचवू..

संदीप डांगे
Fri, 07/01/2016 - 19:38 नवीन
+१०००. आपण सगळे मिळून पोचवू...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

तुमची लेखमाला वाचतेय.

उल्का
Fri, 07/01/2016 - 19:55 नवीन
तुमची लेखमाला वाचतेय. मुलांची दहावी-बारावी ह्यातून हल्लीच गेल्यामुळे खूप जवळचा विषय आहे. अनुभव असल्याने बरंच काही उपयुक्त इथे शेअर करावेसे वाटत होते. इतक्यात तुम्ही व्यापक स्वरूपात ही मालिकाच सुरु केलीत हे खूप चांगले झाले. पालकांना खरच गरज असते. पुलेशु.
  • Log in or register to post comments

जबरदस्त!

बोका-ए-आझम
Sat, 07/02/2016 - 01:03 नवीन
मयूरला शुभेच्छा! वडलांच्या कष्टांची जाणीव असलेला मुलगा योग्य ठिकाणी गेला याचा आनंद आहे.
  • Log in or register to post comments

चांगली लेखमाला सर.

मितभाषी
Sat, 07/02/2016 - 05:20 नवीन
चांगली लेखमाला सर. माझ्या मित्राचा मुलगा (थोड्याफार फरकाने अशीच परिस्थिती) खरगपूरला आयआयटी करतो आहे.
  • Log in or register to post comments

क्या बात है सर !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 07/02/2016 - 08:38 नवीन
मयूरच्या अनुभव वाचतांना हळवा झालो. मास्तर, असं स्वच्छ आणि स्पष्ट लिहित जा. -दिलीप बिरुटे (प्रभु मास्तर भक्त)
  • Log in or register to post comments

+१

मोहन
Tue, 07/05/2016 - 16:41 नवीन
सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शेवटचा ट्विस्ट एकदम भारीच. __

आनन्दा
Sat, 07/02/2016 - 09:19 नवीन
शेवटचा ट्विस्ट एकदम भारीच. __/\__
  • Log in or register to post comments

लेखमाला वाचत आहे....

मुक्त विहारि
Sat, 07/02/2016 - 09:48 नवीन
पुभाप्र.
  • Log in or register to post comments

भारी !!

नीलमोहर
Sat, 07/02/2016 - 09:54 नवीन
भारी !!
  • Log in or register to post comments

प्रेरणादायी ! व्यवसाय शिक्षण

डॉ सुहास म्हात्रे
Sat, 07/02/2016 - 11:13 नवीन
प्रेरणादायी ! व्यवसाय शिक्षण मार्गदर्शन वर्गांतून अश्या मुलांची माहिती दिली पाहिजे.
  • Log in or register to post comments

जबरदस्त!

स्नेहल महेश
Sat, 07/02/2016 - 11:24 नवीन
जबरदस्त!
  • Log in or register to post comments

ग्रेट

तिमा
Sat, 07/02/2016 - 11:28 नवीन
मानलं मयूरच्या जिद्दीला. एक कडक सलाम.
  • Log in or register to post comments

मास्तर! _/\_

बिपिन कार्यकर्ते
Tue, 07/05/2016 - 16:32 नवीन
मास्तर! _/\_
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा