चो..पली ३
चो.. पली बोलतोय, जरा त्रास देतोय परत
"ओ.के. नावाला जागायला पाहीजे रे परेशान अली"
हॅ हॅ हॅ. मला एक सांग ९२% मिळवलेल्या मुलाचे आय.आय.टी चे चान्सेस किती?
"पवई कॉम्प चा चान्स ०.००३ टक्के नॉर्मल- भारत भर असलेल्या १७ आयआयटी मधे कुठलीही स्ट्रीम ०.३ टक्के"
अग्गायायाया. जे आयला म्हणजे तुला भेटायलाच पाहीजे.
" हे सुद्धा 'च' च्या बाराखडीत अडकला नाही तर"
..................
तो आत आला.
बाबा सुद्धा बरोबर होते.
१.५ एकर शेती करणारा बळी राजा.
दुष्काळी भागातला.
कर्ज बाजारी. आर्थिक अवकळा स्पष्ट दिसत होती.
मुख्य शहरापासुन ६० किलोमिटर पत्र्याच्या शाळेतला.
मराठी माध्यम,दहावी ९०%
गणित ९९ सायन्स ९८
मिटींग ला बसलेल्या सर्वांना उत्सुकता होती.
मी सरुवात केली, उभा राहीलो कडक सॅल्युट ठोकला,
"सांग बाबा हे तु कसे काय केलेस"?
काहीही नाही सर खुप अभ्यास केला आणि घराची परिस्थिती बदलायचीच होती काही ही इलाज नव्हता.
त्याने बॅगेतुन रिझल्ट काढला.
पहीला कागद-़जे. ई. ई मेन्स- इंडिया रँक २५०
दुसरा कागद- जे. ई. ई. अॅड्वान्स-इंडिया रँक ३५०
त्याने ३ रा कागद काढला, मेडीकल सी.ई.टी महाराष्ट्र रँक ३५० (नायर हॉस्पिटल नक्की)
ही माहीती होम विझिट मधे कागदावर आलेले नव्हती.
"बायॉलॉजी पण घेतले होतेस"?
हो सर, वोकेशनल ची फी परवडणार नव्हती आणि क्लास तर शक्यच नव्हते.
"How did he manage this" चीफ ट्रस्टी म्हणाले
त्याने ४ था कागद काढला एआयपीमटी इंडीया रँक ४५०
मी तर खुर्चीतन पडायचा बा़की होतो.
सर्व ट्रस्टी हतबुद्ध.
चीफ ट्रस्टी चे डोळे पाणावले.
No more questions, no questions on financials, whatever he wants is sanctioned.बाळा तुला काय मदत पाहीजे ते सांग.
पहील्या सेमिस्टर ला लागणारे ७० हजार सँक्शन झाले,
चीफ ट्रस्टींनी माझ्या सारखाच कडक सॅल्युट ठोकला.
........
सहा महीन्याने त्याचा मेल आला. तो सर्व १७ आयआयटी मधे ९२ आला होता. अॅल्युमनी फंड मधुन त्या चे सर्व शिक्षण मोफत होणार होते, त्याला फाउंडेशन वर अवलंबुन राहण्याची गरज नव्हती. इंग्लीश मधे बोलायला आजही चाचपडणारा मुलगा खरगपुर आय आय टी मधे सर्व प्रोफेसरांचा लाडका झाला होता.
........
मला सतावणारा एक प्रश्न मी त्याला १५ दिवसांनी विचारला
त्याने दिलेले उत्तर.
सर, धाकटी चे शिक्षण, बाबांचे कर्ज, घराची परिस्थिती बघता मला १० वर्षे थांबायला परवडणार नव्हते म्हणुन आवड असुन सुद्धा मेडीकल केले नाही.
कुणीही १०वी च्या मार्कांवर " पवई कॉम्प" म्हटले की मयुर आठवतो आणि कडा ओल्या होतात.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
सुंदर!
रत्न पारखी
+१ १००% सहमत,
+१११
सॅल्युट
ग्रेट!
_/\_
क्या बात है! ह्या लेकराची ही
प्रभूमास्तर हाच प्रश्न गेल्या
जबरदस्त!
+१००
खासच! मास्तरांनी चांगला अनुभव
अशी मुलं अपवादात्मक असतात.
+१. सर्वसामान्यपणे तीच
१००
+१०००. आपण सगळे मिळून पोचवू..
तुमची लेखमाला वाचतेय.
जबरदस्त!
चांगली लेखमाला सर.
क्या बात है सर !
+१
शेवटचा ट्विस्ट एकदम भारीच. __
लेखमाला वाचत आहे....
भारी !!
प्रेरणादायी ! व्यवसाय शिक्षण
जबरदस्त!
ग्रेट
मास्तर! _/\_