मी अकरावीत असताना पहिल्यांदा सिगरेट ओढली,तेव्हा काही कीक वगैरे बसली नाही,मित्रांच्या आग्र्हाखातर मी पहील्यांदा सिगरेट ओढली होती,पुढे सिनिअर कॉलेजला गेल्यावर आठवड्यातून एकदा दोनदा सिगरेट ओढायचो, मग त्या सिगरेटची कीक बसायला लागली व ती हविहविशी वाटू लागली.हे सगळे चालू असतान खिशात पैसे कमी असायचे त्यामुळे आपोआपच व्यसनावर कंट्रोल होता.
पुढे कामाला लागल्यावर हे व्यसन पुन्हा चालू झाले ,घरच्यांना कळु नये म्हणून हॉल्स चघळत घरी जाणे हा प्रकार मी करायचो.घरी असताना तल्लफ आल्यावर माझी हालत पतली व्हायची ,आई वडीलांसमोर सिगरेट ओढने म्हणजे महापाप ,आपला मुलगा वाया गेला याचे त्यांना वाईट वाटूनये म्हणून मी माझी तल्लफ कंट्रोल करायचो.पुढे माझ्या मनाने सिगरेटचे व्यसम सोडायचे ठरवले ,परंतू अनेकदा रिलॅप्स होऊन ते परत परत चालूच राहिले.दरम्यानच्या काळात सरकारने सिगरेटच्या उत्पादनावर टॅक्स वाढवला व सिगरेट महाग झाली, तशी काही फुकाड्यांची पाचावर धारण बसली. माझा पगार बरा असल्याने माझा रोजचा पाच सिगरेटचा कोटा चालूच राहीला,निकोटीनची ठराविक मात्रा एकदा स्टेबल झाल्यानंतर आधि बसणारी कीक बसेनाशी होते व शरिर जास्त निकोटीनची मागणी करु लागते ,माझ्या बाबतीत हा प्रकार सुरु झाला व अडचणीला सुरवात झाली,घरी तल्लफ आल्यावर काय करायचे? ...अश्या वेळी फुकाडे मित्र मदतीला येतात ,त्यापैकीच एकाने मला तंबाखू चघळण्याचा सल्ला दिला.तंबाखु मळणे व नंतर ती चघळणे मला जरी थर्डक्लास लोकांचे व्यसम वाटत होते तरी एकदा ट्राय करुन बघु म्हणून मी तंबाखू खायला सुरवात केली .तंबाखूचे पाकीट व चूना खिशात बाळगता येतो, कधीही कुठेही खाता येते व फारसे कुणाला समजतही नाही,परिणामतः मी घरात देखील राजरोस तंबाखू खाउ लागलो.गेली तीन वर्षे मी तंबाखू खात आहे व कधीतरी सिगारेटही ओढतो.
मागच्या वर्षापासून मला हे व्यसन सोडायचे आहे असे मनाने घेतले आहे ,पण आता ते सुटता सुटत नाही आहे.तंबाखूची प्रत्येक पुडी शेवटची असे मी ठरवतो व यांत्रिक पद्धतीने पुड्या घेत राहतो,मला कँसर झाल्याची स्वप्न देखील पडतात.
मराठी आंतरजालावर अनेक अनुभवी मंडळी आहेत ,पैकी काहींना सिगरेट तंबाखू व्यसन कधीतरी असेलच व त्यांनी ते यशस्वीपणे सोडले असेल .माझे काही प्रश्न आहेत,
१ . तुम्हाला सिगरेट ,तंबाखूचे व्यसन कसे लागले ?
२.हे व्यसन सोडण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले वा करता आहात?
३.पुन्हा व्यसन लागू नये यासाठी काय करता येईल?
४. निकोटीन रिप्लेसमेंट थेरपी कीती प्रमाणात यशस्वी होते?
५. तंबाखुमुक्त आयुष्याचे तुम्हाला झालेले फायदे काय आहेत?
| लेखनविषय: |
|---|
वाचने
41117
प्रतिक्रिया
157
मिसळपाव
प्रतिक्रिया
100
नेमके वरतीच डॉक्टरसाहेब
In reply to 100 by जेपी
ओके. नो प्राब्लेमो..
In reply to नेमके वरतीच डॉक्टरसाहेब by कैलासवासी सोन्याबापु
आपलंबी कायतरी
चौराकाका
In reply to आपलंबी कायतरी by चौकटराजा
व्यसन असल्यास ते सुटण्यासाठी
In reply to चौराकाका by नाखु
व्यसन असल्यास ते सुटण्यासाठी काय करावे.लै सोपे आहे.. तुमचे अविवाहित सुहृद म्हणजे तुमच्यापेक्षा वयाने लै लहान आहेत. पुढच्या वेळी सरळ मोबाईल काढून घ्या आणि तुमच्या खिशात ठेवा आणि कट्टा संपला की परत जाताना हातात ठेवा. ..बाकी चौरा काकाच असे करत असतील तर त्यांना फोटोशॉप, ओपी, त्यांच्या घरातले इंटेरियर किंवा बाग अशा एखाद्या विषयावर छेडा. ते रंगात येवून बोलायला लागतील आणि मोबाईलचा विसर पडेल. :)वयाने लहान असले तरी आकाराने
In reply to व्यसन असल्यास ते सुटण्यासाठी by मोदक
ह्या हे व्यसन काहीच नाही.....
In reply to चौराकाका by नाखु
हे तर काहीच नाही.
In reply to ह्या हे व्यसन काहीच नाही..... by चौकटराजा
१. चार आण्याचं काळीज असल्यास.
'उपभोगाची गंमत' संपून जाते हे
In reply to १. चार आण्याचं काळीज असल्यास. by संदीप डांगे
'उपभोगाची गंमत' संपून जाते हे
In reply to १. चार आण्याचं काळीज असल्यास. by संदीप डांगे
'उपभोगाची गंमत' संपून जाते हे पक्के ध्यानात बसले आहे.जेव्हा तुम्ही सिगरेट/तंबाखू/दारू ची मजा घेणे बंद होते आणि सिगरेट/तंबाखू/दारू (आणि इतर लोक) तुमची मजा घेऊ लागतात तेव्हा बाजू पलटली हे नक्की होते.शंभर टक्के!!!
In reply to 'उपभोगाची गंमत' संपून जाते हे by डॉ सुहास म्हात्रे
गुडाम गरम ओढून पहा
गुडाम गरम मध्ये निकोटीन
हा शोध आपल्याला कुठे लागला ते
In reply to गुडाम गरम मध्ये निकोटीन by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
गुडाम गरम मध्ये ओव्याची चव