Skip to main content

तंबाखू व सिगरेटचा विळखा कसा सोडवावा??????

लेखक टर्बोचार्जड फिलॉसॉफर यांनी गुरुवार, 23/06/2016 20:41 या दिवशी प्रकाशित केले.
मी अकरावीत असताना पहिल्यांदा सिगरेट ओढली,तेव्हा काही कीक वगैरे बसली नाही,मित्रांच्या आग्र्हाखातर मी पहील्यांदा सिगरेट ओढली होती,पुढे सिनिअर कॉलेजला गेल्यावर आठवड्यातून एकदा दोनदा सिगरेट ओढायचो, मग त्या सिगरेटची कीक बसायला लागली व ती हविहविशी वाटू लागली.हे सगळे चालू असतान खिशात पैसे कमी असायचे त्यामुळे आपोआपच व्यसनावर कंट्रोल होता. पुढे कामाला लागल्यावर हे व्यसन पुन्हा चालू झाले ,घरच्यांना कळु नये म्हणून हॉल्स चघळत घरी जाणे हा प्रकार मी करायचो.घरी असताना तल्लफ आल्यावर माझी हालत पतली व्हायची ,आई वडीलांसमोर सिगरेट ओढने म्हणजे महापाप ,आपला मुलगा वाया गेला याचे त्यांना वाईट वाटूनये म्हणून मी माझी तल्लफ कंट्रोल करायचो.पुढे माझ्या मनाने सिगरेटचे व्यसम सोडायचे ठरवले ,परंतू अनेकदा रिलॅप्स होऊन ते परत परत चालूच राहिले.दरम्यानच्या काळात सरकारने सिगरेटच्या उत्पादनावर टॅक्स वाढवला व सिगरेट महाग झाली, तशी काही फुकाड्यांची पाचावर धारण बसली. माझा पगार बरा असल्याने माझा रोजचा पाच सिगरेटचा कोटा चालूच राहीला,निकोटीनची ठराविक मात्रा एकदा स्टेबल झाल्यानंतर आधि बसणारी कीक बसेनाशी होते व शरिर जास्त निकोटीनची मागणी करु लागते ,माझ्या बाबतीत हा प्रकार सुरु झाला व अडचणीला सुरवात झाली,घरी तल्लफ आल्यावर काय करायचे? ...अश्या वेळी फुकाडे मित्र मदतीला येतात ,त्यापैकीच एकाने मला तंबाखू चघळण्याचा सल्ला दिला.तंबाखु मळणे व नंतर ती चघळणे मला जरी थर्डक्लास लोकांचे व्यसम वाटत होते तरी एकदा ट्राय करुन बघु म्हणून मी तंबाखू खायला सुरवात केली .तंबाखूचे पाकीट व चूना खिशात बाळगता येतो, कधीही कुठेही खाता येते व फारसे कुणाला समजतही नाही,परिणामतः मी घरात देखील राजरोस तंबाखू खाउ लागलो.गेली तीन वर्षे मी तंबाखू खात आहे व कधीतरी सिगारेटही ओढतो. मागच्या वर्षापासून मला हे व्यसन सोडायचे आहे असे मनाने घेतले आहे ,पण आता ते सुटता सुटत नाही आहे.तंबाखूची प्रत्येक पुडी शेवटची असे मी ठरवतो व यांत्रिक पद्धतीने पुड्या घेत राहतो,मला कँसर झाल्याची स्वप्न देखील पडतात. मराठी आंतरजालावर अनेक अनुभवी मंडळी आहेत ,पैकी काहींना सिगरेट तंबाखू व्यसन कधीतरी असेलच व त्यांनी ते यशस्वीपणे सोडले असेल .माझे काही प्रश्न आहेत, १ . तुम्हाला सिगरेट ,तंबाखूचे व्यसन कसे लागले ? २.हे व्यसन सोडण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले वा करता आहात? ३.पुन्हा व्यसन लागू नये यासाठी काय करता येईल? ४. निकोटीन रिप्लेसमेंट थेरपी कीती प्रमाणात यशस्वी होते? ५. तंबाखुमुक्त आयुष्याचे तुम्हाला झालेले फायदे काय आहेत?
लेखनविषय:

वाचने 41117
प्रतिक्रिया 157

प्रतिक्रिया

शतका निमीत्त सर्वांना एक -एक कप भांग देऊन सत्कार करण्यात येत आहे. -बम भम भोले.!

In reply to by जेपी

नेमके वरतीच डॉक्टरसाहेब काहीतरी जीव लावून सांगत होते राव, चार दोन वेळा पब्लिक हसलं म्हणून उठसुठ कुठल्याही धाग्यावर अस्थानी व्यंग बरे दिसत नाही जेपी भाऊ, किमान धागा विषय तरी पहा राव! लहानतोंडी मोठा घास माफी, पण जे वाटले ते लिहिले स्पष्ट :)

खरे साहेबानी एक वाक्य लाख मोलाचं टाकलं आहे ते मनोनिग्रहा विषयी आहे. खरे तर मन हाच माणसाचा मोठा शत्रू व मित्र आहे. व्यसन लागणे हा प्रथम मानसिक आजार असून नंतर तो शारिरीक परिणाम दाखवू लागतो. खूप खादाडीची सवय असणे हे हे एक व्यसन आहे. उन्हाळात रोज आमरस हाणणे हे ही व्यसनच. मला अलिकडे दुपारीही अर्धा कप चहा प्यायचे व्यसन लागू पहात आहे. ते मला थांबवले पाहिजे असे जो पर्यंत निग्रहाने मला वाटत नाही तो पर्यंत काहीही फायदा नाही.लहानपणापासून मी चहा कॉफी काही घेत नव्हतो पण आता सकाळी आपोपाप एक कप कॉफी तयार करून प्राशन करतो. आता हे दुपारच्या चहाचे प्रकरण. हे असे वाढत जाते. मधुमेह असल्याने भुकेचे "व्यसन" मी बर्यापैकी ताब्यात ठेवून आहे. कोणतीही गोष्ट असो एखाद्या स्त्रीचा चेहरा, गीत, निसर्गातील एखादी जागा, पेय, खाद्यपदार्थ याचा जितका पुनरपि पुनः सहवास आपल्याला घडतो तितके व्यसन तीव्र होत जाते. अतिपरिचयात अवज्ञा ह्या उक्तीची व्याप्ती फार कमी आहे आपल्या जीवनात.

In reply to by चौकटराजा

काकाश्री माझा एक व्यसनासंबधी शंका प्रशन आहे उत्तर तुम्ही किंवा तज्ञ व्यक्तीनी द्यावे. माझे एक सुहृद आहेत त्यांना भेटल्यावर अगदी चार पाच जणांशी वार्तालाप करीत असतील तरी (आपलाच) भ्रमणध्वनी अद्ययावत अवस्था बघण्याची सवय आहे. (अभावितपणे कधी बघतात ते त्यांचे त्यांनाही कळत नाही) याला सवय म्हणावी की व्यसन. व्यसन असल्यास ते सुटण्यासाठी काय करावे. ता.क.ते (सध्या) अविवाहीत असल्याने बायकोने भ्रमणध्वनी फेकुन देण्याची शक्यता आपसूक टळली आहे. सल्ला द्यावा आपलाच नम्र बालक नाखु

In reply to by नाखु

व्यसन असल्यास ते सुटण्यासाठी काय करावे. लै सोपे आहे.. तुमचे अविवाहित सुहृद म्हणजे तुमच्यापेक्षा वयाने लै लहान आहेत. पुढच्या वेळी सरळ मोबाईल काढून घ्या आणि तुमच्या खिशात ठेवा आणि कट्टा संपला की परत जाताना हातात ठेवा. ..बाकी चौरा काकाच असे करत असतील तर त्यांना फोटोशॉप, ओपी, त्यांच्या घरातले इंटेरियर किंवा बाग अशा एखाद्या विषयावर छेडा. ते रंगात येवून बोलायला लागतील आणि मोबाईलचा विसर पडेल. :)

In reply to by नाखु

आमचा एका मित्राला भाजे लेण्याचे व्यसन लागले आहे. ते नसेल तर कार्ला चालेल. तेही नसेल तर बेडसे चालेल. पण वेरूळची ( पहिल्या धारेची ) या चालीवर एक फिक्स मिळाली तर सोनेपे सुहागा ! काय करणार आता म्हने कंपनीला पटवत्यात की मराठवाड्यात एक युनिट काढा म्हूनशान !

In reply to by चौकटराजा

काही जणांना मिपाचे व्यसन लागले आहे म्हणे. अपडेट पाहिले नाही तर बेचैनी येते. दर अर्ध्यातासाने मिपाची ही तल्लफ येते. मुख्य म्हणजे व्यसनमुक्ती केंद्रात यावर उपचारही नाहीयेत. हम्म. :))

१. चार आण्याचं काळीज असल्यास... २. क्षक्ष असो वा जपमाळ, आदत बुरी.... ३. खांब मला सोडतच नाही.... हे तीन विशेष आवडले. अनुभवामृतः रोज ४० सिगरेट्स प्यायचो, एका झटक्यात सोडले धुम्रपान. व्हिस्कीचा अक्खा खंबा रिचवायचो. लक्षात येताच मद्यपान सोडले. आता: कधी-मधी सहा महिन्यातून एखादेवेळेस ३०+६० वोडका आणि कधीतरी एखादी 'गरम'. ह्यापेक्षा जास्त झाल्यास 'उपभोगाची गंमत' संपून जाते हे पक्के ध्यानात बसले आहे.

In reply to by संदीप डांगे

'उपभोगाची गंमत' संपून जाते हे पक्के ध्यानात बसले आहे. ज्जे ब्बात!!!

In reply to by संदीप डांगे

'उपभोगाची गंमत' संपून जाते हे पक्के ध्यानात बसले आहे. जेव्हा तुम्ही सिगरेट/तंबाखू/दारू ची मजा घेणे बंद होते आणि सिगरेट/तंबाखू/दारू (आणि इतर लोक) तुमची मजा घेऊ लागतात तेव्हा बाजू पलटली हे नक्की होते.

मला पुर्वी सिगरेटचे व्यसन होते. व्यक्तिगत आयुष्यातली काही निराशा, काही ताणतणाव यामुळे सिगरेटची सवय लागली. दिवसाला पाच-सहा तरी व्हायच्याच. पुढे ३-४ वर्षांनी अ‍ॅसिडिटीचा त्रास बळावला. अ‍ॅसिडिटी सहन होईना तसे एका होमिओपथी डॉक्टरकडे उपचार सुरु केले (ही माझी मैत्रीणच होती) तिने सिगरेट कमी करायचा सल्ला दिला. तशातच माझ्या जाम आवडीच्या उद्योगाला लागलो (म्हणजे पार्ट टाईम शिक्षण.. ), पुढे व्यक्तिगत आयुष्यातही स्थिरावलो, बिनकामाची भावूकता मागे पडली. हे होवूनही पाच वर्ष झाले. पण तरी अजूनही कधीतरी जाम तल्लफ येते मग मी 'गुडाम गरम' हीच सिगरेट ओढतो ते ही क्वचित. म्हणजे अनेकदा महिनो महिने ओढत नाही. मग मध्येच कधी ओढावी वाटली तरी दिवसाला एक इतकेच प्रमाण. गुडाम गरम मध्ये निकोटीन अत्यंत कमी असते शिवाय सवय जडत नाही.

गुडाम गरम मध्ये निकोटीन अत्यंत कमी असते शिवाय सवय जडत नाही.>>>>>> हा शोध आपल्याला कुठे लागला ते सांगाल का,गुडाम गरम ,क्लासिक माईल्ड्स या जरी हाय एंड सिगरेट असल्या तरी त्यातून तितकेच निकोटीन जाते जितके ,चारमिनार सारख्या फिल्टर नसलेल्या सिगरेटीने

In reply to by टर्बोचार्जड फिलॉसॉफर

हा शोध आपल्याला कुठे लागला ते सांगाल का
टपरीवर ..पुर्वी गोल्ड फ्लेक ओढायचो, आता (क्वचित कधी) गुडाम गरम ओढतो. गुडाम गरम मध्ये ओव्याची चव जास्त जाणवते, तंबाखूची चव फारशी जाणवत नाही बाकी पुरावे, आकडेवारी शोधली नाही.