Skip to main content

ही तशी माझीच आहे गोष्ट पण...

लेखक घाटावरचे भट यांनी सोमवार, 26/01/2009 06:12 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा अनिरुद्ध अभ्यंकरांची 'ही तुझी माझीच आहे गोष्ट पण....' ही ग़झल. आज मी सारे खरे ते सांगतो मी अताशा नवकवींना टाळतो ते गळी पडणार अंती जाणतो पण तरी मी पूर्ण फिल्डींग लावतो संकटे साहीन मी अन वादळे नवकवी पण धैर्य माझे भेदतो तो पहा मी चाललो वाटेवरी शत्रू माझा वाट माझी रोखतो ऐकताना काव्य त्याचे का मला काळ पुढती जाईनासा वाटतो जांभया देऊनही मी एवढ्या काव्य साला तेच आहे वाचतो सूड म्हणुनि गोष्ट माझी ही कधी मुक्तछंदी मी कुणाला सांगतो टाळती का लोक पण मज ना कळे कालचा मी नवकवी ना आज तो - भटोबा
लेखनविषय:

वाचने 2983
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

प्रेरणेकडे डोळेझाक केली तर स्वतंत्र काव्य (की नवकाव्य?) म्हणूनही कविता (गजल?) चांगली आहे. निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!

आज मी सारे खरे ते सांगतो मी अताशा नवकवींना टाळतो ते गळी पडणार अंती जाणतो पण तरी मी पूर्ण फिल्डींग लावतो वा वा ! क्या बात है ! *** काल रात्री कोठे तरी गुप्त जागी नवकवींची मिटींग झाली त्यांनी तुमच्यावरच फिल्डींग लावण्याचा प्लान केला आहे.. जपुन राहा =)) ******* सध्या आम्ही ... ह्यावर नाचतो आहोत !!! अफलातून गाणं आहे... ए.आर. रहमान जबरदस्त !

In reply to by दशानन

मला नाव सांगा त्यांची.. भटोबा, घाबरू नका मी तुमच्या बरोबर आहे ( कोण म्हणाले रे पाठीशी आहे) बाकी चांगल चालू आहे...चालू दे.. केशवसुमार

मस्त विरोधाभास...! कवितेतून (कवीने) केलेली कवितेची (कवींची) टिंगल...! -झेल्या मी लिहिलेलं.. (वाचा आणि कळवा आणि इतरांना वाचवा (वाचायला सांगा..)! )

In reply to by आनंदयात्री

आवडले भटोबा अजुन लिहा हो. बराच वेळ घेता दोन कवितांमधे :-)

In reply to by सहज

आळस हा माणसाचा शत्रू आहे. आणि मी माझ्या शत्रूकडून पराभूत झालो आहे. ;)

In reply to by घाटावरचे भट

आळस हा माणसाचा सर्वात जवळचा मित्र आहे. इतर सर्व मित्र साथ सोडून जातील पण आळस हा कधीच साथ सोडत नाही. :) पुण्याचे पेशवे Since 1984

In reply to by घाटावरचे भट

प्रतिसाद देणार्‍या व न देणार्‍या सर्वांचा आभारी आहे. धन्यवाद. असं लिहून आम्हाला हिणवल्याबद्दल तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा. अवांतरः कविता मस्तच आहे, कुठे "भेटली"? अदिती आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.

उत्तम विडंबन! किंबहुना आधी केसुंचं आणि मग तुमचं विडंबन बघूनच मला इजा, बिजा, तिजा ह्या न्यायानं आणखी एक विडंबन करण्याची इच्छा अनावर झाली! ;) (खुद के साथ बातां : रंगा, विडंबनातल्या व्यावसायिक प्रतिस्पर्ध्यांना वेळेवर प्रोत्साहनाचे प्रतिसाद द्यावेत येवढी साधी गोष्ट तुला जमू नये? एवढी आढ्यता बरी नव्हे! :| ) चतुरंग