✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

६३ गुणांचा योग +योग

व
विवेकपटाईत यांनी
गुरुवार, 06/23/2016 - 21:47  ·  लेख
लेख
याला योगायोगच म्हणातात ना! नमोजी प्रधान सेवक झाले आणि संपूर्ण जगाने २१ जून रोजी योग दिवस साजरा केला. नमोजींची छाती ५६ इंचां पासून ७२ इंचाची झाली असेल. कदाचित् या पेक्षा जास्ती हि. पण गेल्या ३० वर्षात अस्मादिकांचा छातीचा घेर कमी होत गेला आणि पोटाचा वाढत गेला. नमो सारखे योग करणे अस्मादिकांना तरी शक्य होणार नाही. योग म्हणजे जमा, जोड किंवा अंकांचा खेळ, काही हि म्हणा. असाच एक योगा + योग माझ्या आयष्यात ३० वर्षांपूर्वी आला. ३६ गुणांच्या जाळयात न कळत अडकलो. काय करणार, जूनचा महिना होता बाहेर चक्क ४५% तापलेले होते. अंगाची भयंकर लाही लाही होत होती. आमच्या नावाचे कुंकू कपाळावर लाऊन सौभाग्यवती शीतल पावसाळी वार्या सारखी अस्मादिकांच्या आयुष्यात आली. गृहप्रवेश करताना सौ. एखाद्या महाराणी सारखी शोभत होती. अस्मादिकांना हि आपण कुणी तरी महाराजा आहोत असा भास झाला. त्या वेळी जाणती पुरुष मंडळी गालातल्या गालात का हसत होती, याचे रहस्य त्या घटकेला कळले नाही. कळणार तरी कसे, लग्न जुळविणार्या ब्राम्हणाने चक्क ३६ गुण जुळविले होते. आता अस्मादिकांना काय माहित होते, राणीला राजापेक्षा आज्ञाधारक गुलामच अधिक प्रिय असतात. जिथे सीजर सारख्या जगत्जेत्याला महाराणी क्लिओपात्रा समोर गुलाम बनावे लागले, तिथे आमच्या सारख्याअकिंचन माणसाचा किती वेळ निभाव लागणार होता. बुद्ध आणि नमो प्रमाणे घर त्याग करण्याची हिम्मत हि अस्मादिकात नव्हती. शिवाय आमचे आदर्श मनु महाराजांनी म्हंटलेच आहे,"यस्य पूज्यन्ते नार्यस्तु तत्र रमन्ते देवता:". बहुतेक स्वत:च्या प्रिय पत्नीला प्रसन्न करण्यासाठीच त्यांनी असे म्हंटले असावे. (पहिला जोरू का गुलाम बहुधा मनु महाराज असावे) त्यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवला. यथाशीघ्र ३६ गुणांना ६३ गुणात बदलण्याचा प्रयत्न सुरु केला. सासू-सासरा, साळी-साला सौच्या सर्व माहेरच्या मंडळीना प्रसन्न केले. स्वाभाविकच होते, घरात आनंदाचे वातावरण पसरले. सौ.ची गुलामगिरी करण्यातच संसाराचे खरे सुख दडलेले आहे, हे लवकरच कळले. यथाशीघ्र घरातले सर्व अधिकार राणीसाहेबांच्या हाती सुपूर्द केले आणि चिंतामुक्त झालो. अद्याप हि राणीसाहेब विदेश मंत्रालयापासून ते गृह मंत्रालय, व्यवहार मंत्रालयापासून ते खर्चिक मंत्रालय. सर्व भूमिका आनंदाने पार पाडत आहे. आमचे कार्य फक्त रेवेन्यु मंत्रालय अर्थात पगार सौच्या हातात देणे एवढेच आहे. एक मात्र खरं, एवढ्या वर्षात अस्मादिकांचा मासिक भत्ता अर्थात जेबखर्चीचे काय करतो, कधी विचारले नाही. (तशी ती हिशोबात पक्की आहे, रिक्ष्याचे, मेट्रोचे या शिवाय दोन वेळच्या चहाचे १० रुपये जोडून महिन्याचा खर्च निर्धारित करते). शिवाय अस्मादिकांचे स्वास्थ्य चांगले राहावे याची हि विशेष काळजी घेते. या बाबतीत तरी ती सावित्रीपेक्षा हि दोन पाउले पुढे आहेच. अनेकदा यमराजाच्या पाशापासून आमची सुटका केली आहे. ६३ गुणांचीच कृपा म्हणा. नमोच्या योगाचा देशाला काय फायदा होईल, सांगता येत नाही. पण ६३ गुणांचा योग जुळवून अस्मादिकांनी मात्र आपले आयुष्य सुखी केले आहे. असो. टीप: लेख काल्पनिक आहे. शिवाय आमची सौ. अस्मादिकांचे लेख कधीच वाचत नाही. चिंता नसावी.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कथा
लेखनप्रकार (Writing Type)
लेख

प्रतिक्रिया द्या
2154 वाचन

💬 प्रतिसाद (5)

प्रतिक्रिया

योगायोगाला तुमच्या स्वभावाची

कंजूस
Fri, 06/24/2016 - 07:27 नवीन
योगायोगाला तुमच्या स्वभावाची जोड मिळाल्यावर हे होणारच.उभयतांस असेच भरपूर सौख्य लाभो.
  • Log in or register to post comments

TMC क्लबाचे ग्लोरिफिकेशन =))

टवाळ कार्टा
Fri, 06/24/2016 - 10:36 नवीन
TMC क्लबाचे ग्लोरिफिकेशन =))
  • Log in or register to post comments

TMC बहोत दूर नही टकाजी।

कंजूस
Fri, 06/24/2016 - 12:32 नवीन
TMC बहोत दूर नही टकाजी।
  • Log in or register to post comments

मीपाव वर ६३ गुण वल्यांची

विवेकपटाईत
Sat, 06/25/2016 - 17:03 नवीन
मीपाव वर ६३ गुण वल्यांची संख्या कमी आहे वाटते??/??
  • Log in or register to post comments

यत्र

रमेश आठवले
Sat, 06/25/2016 - 20:15 नवीन
खुसखुशीत लेख "यस्य पूज्यन्ते नार्यस्तु तत्र रमन्ते देवता:" - मी वाचले आहे त्याप्रमाणे यस्य ( ज्याचे) च्या जागेवर यत्र (जेथे ) असे आहे. संस्कृत मध्ये यांच्या विरोधार्थी - न स्त्री स्वातंत्र्यम अर्हति - स्त्रीयांना स्वातंत्र्य असणे योग्य नाही - असे ही वाचले आहे .
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा