Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by पिलीयन रायडर on Tue, 06/21/2016 - 09:43
लेखनविषय (Tags)
मौजमजा
माझं नशिबच थोर आहे! अमेरिकेत पाऊल ठेवलं आणि न्युयॉर्क कट्ट्याचा धागा! भारतात मी एकाच कट्ट्याला गेले होते, ते ही ३.५ मिनिटं. अनाहितात सुद्धा ऐनवळेस टांगारुपणा करण्यात मी फेमस आहे. हा कलंक धुवुन काढायची नामी संधी आली होती. जायचं हे नक्की होतंच. ते ही सहकुटुंब सहपरिवार! कट्ट्याच्या दिवशी सकाळी सकाळी नवरा आणि मुलाने भलताच कार्यक्रम काढला आणि फादर्स डे म्हणुन कुठेतरी उंडारायला गेले. टांगारुपणा घरातच आहे. परंपरा राखली बाप लेकांनी!! अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर मी एकदम "पंछी बनु उडती फिरुं मस्त गगनमे.." च झाले! ;) आणि ११ च्या कट्ट्याला १०.४० लाच जाऊन पोहचले. मग लक्षात आलं की आपल्याकडे कुणाचाही नंबर नाही. म्हणुन धाग्यावर प्रतिसाद देऊन ठेवला. पण कुणी तो वाचेल तरी का हा प्रश्नच होता. न्युपोर्ट मॉल mall मी ठरलेल्या ठिकाणी जाऊन जाणार्‍या येणार्‍यांना टक लावुन बघत बसले. कुणी तिथे थांबेचना. जरा कुणी रेंगाळलं की मी त्याच्या मागे मागे जाऊन बघायचे. बरं जाऊन "मिपा का?" असं तरी कसं विचारणार? मला तर सगळ्यांनी एकमेकांना कट्टा कॅन्सल करुन कळवलय आणि आपणंच इथे आलोय असं वाटायला लागलं. काय झालं होतं की "न्युपोर्ट मॉलचा एन्ट्रन्स" असं साधं ठिकाण ठरलं होतं. पण बारिकसा मुद्दा हा होता की मॉलला किमान १५ तरी एन्ट्रन्स आहेत! आणि स्टेशनसमोर म्हणलं तरी तिथे पाथ आणि लाईटरेल असे दोन स्टेशन आहेत. त्यातली पाथ वायली आणि लाईटरेल वायली हे सगळ्यांनाच माहिती नसेल हे कुणाच्या लक्षात नाही आलं. म्हणुन मग आले तर सगळे.. पण कुणीच कुणाला सापडेना! पण म्हणलं ना, माझं नशिबच थोर आहे! मला उत्सवमुर्ती काकाच दिसले! मी त्यांच्या मागे मागे निघाले खरी, पण त्यांना थांबवुन विचारावं कसं हे कळेना. शेवटी धीर एकवटुन "एक्काकाका का?" असं एका दमात विचारुन टाकलं. काकांना अर्थातच काहीच समजलं नाही. मग नीट "तुम्ही डॉ. सुहास म्हात्रे ना?" असं शिस्तीत विचारल्यावर काका हो म्हणाले आणि आपला पोपट झालेला नाही हे कळल्यावर बरं वाटलं! काकांकडे सगळ्यांचे नंबर असल्याने त्यांनी भराभरा फोन लावले आणि दोनच मिनिटात तिथे आम्ही ७-८ जण जमलो! एक्काकाका आपल्या पत्नी आणि मुलासहित न्युयॉर्कहुन तर राघव आपल्या कुटुंबासहित एडिसनहुन आले होते. damn (काय नाव आहे!) सात तास ड्राइव्ह करुन कट्ट्यासाठी आला होता आणि माझ्यासारखाच टेन्शन मध्ये मॉलमध्ये फिरत होता. =)) कट्ट्यासाठी "सात" तास एकट्याने ड्राइव्ह करुन आलेला मिपाच्या इतिहासातला हा एकमेव माणुस असेल. ह्याचा फोटो बॅनर म्हणुन ह्या वृतांताच्या वर लावुन द्यावा अशी कलामंडळाला विनंती!! न्युपोर्ट मॉल जवळच न्युपोर्ट ग्रीन म्हणुन बाग आहे. तिथे जायचे ठरले. एकमेकांशी ओळख करुन घेत, गप्पा मारत बागेत पोहचलो. लगेच मागुन "येडा अण्णा" (हे ही एक धन्य सदस्यनाम!) आणि मिहिर आले. एक्काकाकांच्या मुलाच्या ऑफिसातली एक कलिग तिच्या सर्व परिवारासहित आली. इथे मग तासभर एकमेकांच्या ओळखी, मिपाविषयक गप्पा, लोकसत्ता, अमेरिकेतील मराठी जनता, अमेरिकेतल्या मराठी मुलांची मराठी भाषा वगैरे अनेक विषयांवर भरपुर गप्पा झाल्या. राघव ह्यांनी बरीच वर्ष ह्याच भागात काढलेली असल्याने त्यांच्याकडुन पुष्कळच माहिती मिळाली. १२:३० च्या सुमारास मात्र भुका लागल्याने परत सगळी जनता मॉलमध्ये फुडकोर्ट कडे निघाली. kattaa डावीकडुन :- उभे - समस्त जर्सीमधले खादाडीचे अड्डे माहिती असलेले राघव, उत्सवमुर्ती एक्काकाका, भारतात फारसा न राहुनही उत्तम मराठी बोलणारा एक्काकाकांचा मुलगा सागर, अत्यंत शांत धीरगंभीर व्यक्तिमत्व आणि खोदुन खोदुन विचारल्यावर समजलं की खगोलशास्त्रात डार्क मॅटरवर पीएच्डी करणारा मिहिर, कट्ट्यासाठी सात तास ड्राइव्ह करुन आलेला damn, मिपा म्हणजे काय हे ही माहिती नसलेले पेंडसे काका, सदस्यनामाप्रमाणे अजिबात नसणारे येडा अण्णा बसलेले :- मिपाला सवत मानणार्‍या पण अधुन मधुन मिपा वाचक आणि राघव ह्यांच्या पत्नी- वृषाली, मी, काकांच्या पत्नी म्हात्रे काकु, मिपा वाचक पण सदस्य नसणार्‍या आपटे काकु, मिपा माहिती नसलेल्या पेंडसे काकु, मिपा वाचक पण सदस्य नसणारी-आपटेंची मुलगी-पेंडसेंची सुन-सुपर्णा! सोबत चिल्ले पिल्लेही होते. पण त्यांचे फोटो टाकत नाही. पोरं भलतीच गोड होती, उगा दृष्टावतील! मॉलला जाता जाता शिष्ट पुणेकर हा ज्वलंत विषय damn ने छेडला. लोक पुण्यावर फार जळतात हेच खरं. ;) ही आमची खादाडी!  ह्या इथेच आम्हाला साक्षात्कार झाला की damn हे एक ऋषीतुल्य व्यक्तिमत्व आहेत!! आधी त्यांनी तिखट खाणं आरोग्याला हानिकारक असतं ह्यावर लहानसं प्रवचन दिलं. मग आता मॅक्सिकन पोळी भाजी कशी नीट ग्रिल केलेली नाही ह्यावर नाराजी (१३७व्यांदा) व्यक्त केली. मग आता कोणत्या साईडने खायला सुरवात करावी ह्यावर चिंतन केले. मग एक घास खाऊन पाहिला न पाहिला की बदलापुर मध्ये ऑरगॅनिक भाज्या मिळतील किंवा कसे ह्या विषयावर एक्काकाकांसोबत सपट महाचर्चा सुरु केली. काकांकडुन उत्तर मिळेना तर बाजुला पेंडसे काकांना पकडलं. काकांनी चक्क मदत करु शकतील अशा एकांचा पत्ता दिला. "इतकाच आता ह्याही ग्रुहस्थांच्या मागे लागलास तर ते घरी येऊन तुला भाज्या देऊन जातील रोज!" असंही एक्काकाकांनी त्याला टोलवला! मग तो ही मुद्दा संपला म्हणुन "सदस्यनाम" ह्या विषयावर चर्चा उतरली. तेव्हा महाराजांना लक्षात आलं की damn चा अर्थ damn u असा होतो. तोवर त्यांना ही चार रॅण्डम अक्षरं वाटत होती. मग सदस्यनाम कसे बदलायचे ह्यावर पुन्हा सपट महाचर्चा! मग अचानक त्यांच्या लक्षात आलं की सगळ्यांच जेवुन झालेलं आहे! "अरे हळु जेवा ना" "मागची दहा मिनिटं इतर कुणाचा आवाज येतोय का तुला? कमी बोल आणि खा." मग damn राव जेवायला बसले! तरी जेवता जेवता "उमा जेटली" कोण आहेत हा गहन प्रश्न त्यांना पडला होता! तर लीमाउजेट म्हणजे उमा जेटली नावाची कुणीही बाई नाही हे सांगितल्यावर त्यांना धक्काच बसला. =)) तरी त्यातुन सावरता सावरता "विपश्यना" हा मुद्दा चर्चेला घेतलाच त्यांनी. khane damn ने फायनली संधी दिली म्हणुन मग एक्काकाकांनाही बोलायला चान्स मिळाला ;) काकांनी त्यांच्या कामाबद्दल थोडक्यात पण फार मस्त माहिती दिली. त्यांचे वेगवेगळे अगदी बीजे मेडिकल पासुन ते डिफेन्स मध्ये अधिकारी म्हणुन आलेले अनुभव ऐकुन कट्ट्याला आल्याचं सार्थक झालं असं वाटलं! मिपावरच्या टर उडवणार्‍या प्रतिसादांना घाबरुन न लिहीण्याचा विषय निघाला तेव्हा काकांनी एक फार मस्त गोष्ट सांगितली. काका म्हणाले "मी मॅनेजमेंट्मध्ये काम करताना मला हे माहिती होतं की मी कधीच १००% लोकांना १००% वेळा समाधानी ठेवु शकत नाही. तेव्हा मी तेच करायचो जे मला योग्य वाटायचं. जर तुम्ही करत असलेली गोष्ट अनैतिक, अवैध आणि अस्वच्छ नसेल तर मग इतरांचा विचार करायचा नाही. आपल्याला जे योग्य वाटेल तेच करायचं!" काकांशी गप्पा मारता मारता असा तर कितीही वेळ गेला असता आणि तरीही गप्पा संपल्या नसत्या. पण अखेर जायची वेळ झालीच. एकमेकांचे नंबर घेऊन पुन्हा भेटु म्हणुन निरोप घेतला. कट्ट्याच्या निमित्ताने आपल्या आजुबाजुला किती लोक मिपा वाचत असतात हे जाणवलं! भारी वाटलं! असेच कट्टे होत राहोत! जय हिंद! जय महाराष्ट्र! जय मिपा! (सगळ्यांनी आपल्या जवळचे फोटो आणि आपापले अनुभव नक्की अ‍ॅडवा! टंकाळा आला म्हणुन अजुनही रोमात राहिलात तर जनता माफ नही करेगी!)
  • Log in or register to post comments
  • 36483 views

प्रतिक्रिया

Submitted by मुक्त विहारि on Tue, 06/21/2016 - 09:44

Permalink

कट्ट्याला हजर राहता आले नाही पण.....

प्रतिसाद मात्र आधीच देतो... आता वृत्तांत वाचतो...
  • Log in or register to post comments

Submitted by पिलीयन रायडर on Tue, 06/21/2016 - 09:47

Permalink

खादाडीचा फोटो नाही दिसला तर

खादाडीचा फोटो नाही दिसला तर Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रीत-मोहर on Tue, 06/21/2016 - 09:50

Permalink

वाह मस्त वृ. आता लंटन्करांचा

वाह मस्त वृ. आता लंटन्करांचा वृ वाचला की एकत्र इनो घेते
  • Log in or register to post comments

Submitted by पियुशा on Tue, 06/21/2016 - 10:04

Permalink

भ... ण्णा... ट :)

भ... ण्णा... ट :)
  • Log in or register to post comments

Submitted by गॅरी ट्रुमन on Tue, 06/21/2016 - 10:11

Permalink

मस्तच

छान वृत्तांत. मस्त.
  • Log in or register to post comments

Submitted by सिरुसेरि on Tue, 06/21/2016 - 11:07

In reply to मस्तच by गॅरी ट्रुमन

Permalink

+१ छान वृत्तांत

+१ छान वृत्तांत
  • Log in or register to post comments

Submitted by आदूबाळ on Tue, 06/21/2016 - 10:26

Permalink

जबरदस्त वृत्तांत! उमा जेटली

जबरदस्त वृत्तांत! उमा जेटली वाचून बेकार हसलो. अवांतर: बिजूभाव, व्हेर आर्यू?
  • Log in or register to post comments

Submitted by वेल्लाभट on Tue, 06/21/2016 - 10:40

Permalink

सुरेखच वृत्तांत आणि फटू.

सुरेखच वृत्तांत आणि फटू. अमेरिकेची आठवण येते मात्र.
  • Log in or register to post comments

Submitted by पक्षी on Tue, 06/21/2016 - 10:46

Permalink

छान वृतांत

क्रमश लिहायचं राहील का? अजून येउद्या...
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Tue, 06/21/2016 - 10:50

Permalink

ह्म्म्म!!

ह्म्म्म!!
  • Log in or register to post comments

Submitted by रातराणी on Tue, 06/21/2016 - 10:56

Permalink

मस्त व्रुत्तांत!

मस्त व्रुत्तांत!
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Tue, 06/21/2016 - 10:59

Permalink

मस्त वृत्तांत...

आवडला. आता, पिरा ताईंच्या अमेरिकेच्या प्रवास-वर्णनाच्या अपेक्षेत.
  • Log in or register to post comments

Submitted by सनईचौघडा on Tue, 06/21/2016 - 11:02

Permalink

अरे माझ्या देवा आत्ता मला

अरे माझ्या देवा आत्ता मला कळलं की तु एवढी का धुमसत होतीस ते. आणि माझ्या खवत येवुन तोफची डागलीस ते. आय माय स्वारी बरं का. बाकी छोटेखानी कट्टा होता, पण छान झाला. जे अमेरिकन कट्टेकरी वामा आहेत त्यांनी लिहतं व्हावे . खुप माहितीचा खजिना मिपावर येईल.
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Tue, 06/21/2016 - 11:16

In reply to अरे माझ्या देवा आत्ता मला by सनईचौघडा

Permalink

पिरा दिसायला वरणभात काकूछाप

पिरा दिसायला वरणभात काकूछाप असेल असे वाटले नव्हते =))
  • Log in or register to post comments

Submitted by समीरसूर on Tue, 06/21/2016 - 11:07

Permalink

सुंदर वृत्तांत! अगदी खुसखुशीत! आणि जबरा कट्टा!

सुंदर वृत्तांत! अगदी खुसखुशीत! आणि जबरा कट्टा! डॉ. साहेबांच्या पुढाकाराने बहार आणली म्हणायची. आणि फोटो झकासच! विशेषत: हजर सदस्यांचा फोटो बघून बरे वाटले. कट्टा चांगलाच रंगला. असेच कट्टे रंगत राहू देत आणि सगळ्यांच्या आयुष्यात आनंद फुलवत राहू देत ही सदिच्छा! दुक्की पे दुक्की हो, या सत्ते पे सत्ता गौर से देखा जाये तो है बस कट्टे पे कट्टा, कोई फरक नही अलबत्ता, कोई फरक नही अलबत्ता
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Tue, 06/21/2016 - 11:15

Permalink

जब्राट जळ्जळ झालीये...इनोऐवजी

जब्राट जळ्जळ झालीये...इनोऐवजी इथे कट्टा करायलाच पैजे अता...बाकी वृत्तांत भन्नाअट आहे...लैच आव्डेश
  • Log in or register to post comments

Submitted by अभिजीत अवलिया on Tue, 06/21/2016 - 11:18

Permalink

मस्त ...

मस्त ...
  • Log in or register to post comments

Submitted by सविता००१ on Tue, 06/21/2016 - 11:22

Permalink

पिरा

जबराट वृत्तांत. मस्तच
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Tue, 06/21/2016 - 11:23

Permalink

वृत्तान्त आवडला

जोरदार कट्टा एकदम. अर्थात एक्काकाकांसारखे संयोजक असल्यावर कट्टा रंगणार ह्याची खात्री होतीच. मिहिरला बघून आनंद झाला. त्याच्यासोबत पुस्तकविश्ववर नेहमी चर्चा होत असे. डार्क मॅटर आम्हाला समजेल असा एखादा लेख त्याने लिहावा अशी आग्रहाची विनंती
  • Log in or register to post comments

Submitted by विलासराव on Tue, 06/21/2016 - 12:44

In reply to वृत्तान्त आवडला by प्रचेतस

Permalink

झकास झालेला दिसतोय कट्टा.

झकास झालेला दिसतोय कट्टा. मिहिरना विनंती डार्क मॅटरवर् लिहाच्. विपश्यनेवर चर्चा झाली हा सुखद धक्का.
  • Log in or register to post comments

Submitted by धनंजय माने on Tue, 06/21/2016 - 13:28

In reply to झकास झालेला दिसतोय कट्टा. by विलासराव

Permalink

ओ विलासराव, तुम्ही फारच ब्वा

ओ विलासराव, तुम्ही फारच ब्वा साधे. ते पुन्हा वाचा एकदा!
  • Log in or register to post comments

Submitted by धनंजय माने on Tue, 06/21/2016 - 13:30

In reply to ओ विलासराव, तुम्ही फारच ब्वा by धनंजय माने

Permalink

नाय राव, आमचीच चूक झाली. :((

नाय राव, आमचीच चूक झाली. :(( खरंच चर्चा झालेली आहे. कट्टा बेष्ट झालेला दिसतोय.
  • Log in or register to post comments

Submitted by सनईचौघडा on Tue, 06/21/2016 - 14:08

In reply to नाय राव, आमचीच चूक झाली. :(( by धनंजय माने

Permalink

आप बहोत ही प्यारे हो धनाजीराव

आप बहोत ही प्यारे हो धनाजीराव.
  • Log in or register to post comments

Submitted by पिलीयन रायडर on Tue, 06/21/2016 - 17:33

In reply to झकास झालेला दिसतोय कट्टा. by विलासराव

Permalink

हो आणि मग तुमची आठवण निघालीच!

हो आणि मग तुमची आठवण निघालीच!
  • Log in or register to post comments

Submitted by विलासराव on Tue, 06/21/2016 - 20:41

In reply to हो आणि मग तुमची आठवण निघालीच! by पिलीयन रायडर

Permalink

_/\_

_/\_
  • Log in or register to post comments

Submitted by जिन्गल बेल on Tue, 06/21/2016 - 11:24

Permalink

मस्त वृत्तांत आणि मस्त फोटो

मस्त वृत्तांत आणि मस्त फोटो ... अजून फोटो येउदे..!!
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on Tue, 06/21/2016 - 11:25

Permalink

भारी वृतांत

भारी वृतांत
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Tue, 06/21/2016 - 11:30

Permalink

आरे वा, जोरात कट्टा. आमचा

आरे वा, जोरात कट्टा. आमचा गाववाला राघव दिसतोय भौतेक. खादाड्या हुडकून काढणारच तो. मला फोटोत समोसा आन पावभाजी दिसली चक्क. आमरिकेतच केलाय ना कट्टा?
  • Log in or register to post comments

Submitted by जव्हेरगंज on Tue, 06/21/2016 - 14:45

In reply to आरे वा, जोरात कट्टा. आमचा by अभ्या..

Permalink

आमरिकेतच केलाय ना कट्टा? =))

आमरिकेतच केलाय ना कट्टा? =))
  • Log in or register to post comments

Submitted by पिलीयन रायडर on Tue, 06/21/2016 - 17:38

In reply to आरे वा, जोरात कट्टा. आमचा by अभ्या..

Permalink

उसाचा रस आणी विड्याचं पान

उसाचा रस आणी विड्याचं पान सुद्धा मिळतं, समोसा फारच सोपी गोष्ट आहे हो! काकांनी खाली जो जरनल स्क्वे. चा फोटो टाकलाय ना, त्या रस्त्यावर पानटपरी आहे. तिथे मी रात्री जोरजोरात "दिलके झरोके मे" का "बदनपे सितारे.." गाणं ऐकलय डोसा खाता खाता. समोर किराणामालाचं दुकान आहे पटेल ब्रदर्स नावाचं जिथे आपल्या भारतात जे मिळेल तेच सगळं मिळतं. स ग ळं! राघव ह्यांच्या पत्नीने तर हे ही सांगितलं की एडिसन मध्ये इतके भारतीय आहेत की अमेरिकन दिसला तर "फॉरेनर फॉरेनर" म्हणुन कौतुकाने लोक बघतात! ;)
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Tue, 06/21/2016 - 17:49

In reply to उसाचा रस आणी विड्याचं पान by पिलीयन रायडर

Permalink

सहमत.

सहमत. पूर्वी पानाच्या टपरीपाशी पान खाऊन थुंकणे हेही दिसले होते. आम्ही तो रस्ता शोधत होतो जिथे ही सगळी भारतीय दुकाने आहेत. रस्त्यावर कागदाचे बोळे पाहिले आणि हाच तो रस्ता असणार हे समजले. जर्सी स्वच्छ ठेवताना महापालिकेची त्रेधा उडत असणार. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Tue, 06/21/2016 - 22:14

In reply to उसाचा रस आणी विड्याचं पान by पिलीयन रायडर

Permalink

विश्वास बसत नसला तर हा घ्या

विश्वास बसत नसला तर हा घ्या रविवारी जर्सी सिटीत विकत घेतलेला पुरावा... ;) Image removed.
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Tue, 06/21/2016 - 22:16

In reply to विश्वास बसत नसला तर हा घ्या by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

गाय छाप अलावूड हाय काय

गाय छाप अलावूड हाय काय अम्रिकेत? आणि राजेश चुना? लै दिवस अमेरिकेतील कुणाला तरी ईचारावा म्हणत होतो.
  • Log in or register to post comments

Submitted by राघवेंद्र on Tue, 06/21/2016 - 22:47

In reply to गाय छाप अलावूड हाय काय by अभ्या..

Permalink

मिळेल नक्की मिळेल

जर्सी सिटी व एडिसन मध्ये RMD चे पाकिटे आरामात रस्त्यावर दिसतात. http://www.royalpaan.com/ ही कॅनडा व अमेरिकेत पानाची दुकानाची chain आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by आदूबाळ on Tue, 06/21/2016 - 23:19

In reply to मिळेल नक्की मिळेल by राघवेंद्र

Permalink

दोन डॉलरला नवरतन सादा! ले मॅन

दोन डॉलरला नवरतन सादा! ले मॅन!
  • Log in or register to post comments

Submitted by राघवेंद्र on Tue, 06/21/2016 - 23:48

In reply to दोन डॉलरला नवरतन सादा! ले मॅन by आदूबाळ

Permalink

:)

:)
  • Log in or register to post comments

Submitted by महासंग्राम on Wed, 06/22/2016 - 14:37

In reply to दोन डॉलरला नवरतन सादा! ले मॅन by आदूबाळ

Permalink

दोन डॉलर

बाब्बो 135.09 रुपड्याला नवरत्न लैच चुना लावतेत की उसगावात.
  • Log in or register to post comments

Submitted by जव्हेरगंज on Wed, 06/22/2016 - 23:50

In reply to दोन डॉलर by महासंग्राम

Permalink

आगागा!

आमेरिका कॅन्सल !
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on गुरुवार, 06/23/2016 - 00:13

In reply to आगागा! by जव्हेरगंज

Permalink

म्याबी सोडला नाद अम्रिकेचा.

म्याबी सोडला नाद अम्रिकेचा. परत मागायचे वांदे हो "पाव्हणं जरा चुना घ्या" म्हणून
  • Log in or register to post comments

Submitted by पद्मावति on Wed, 06/22/2016 - 00:54

In reply to उसाचा रस आणी विड्याचं पान by पिलीयन रायडर

Permalink

पिरा न्यू जर्सी ला पोहोचलीस

पिरा न्यू जर्सी ला पोहोचलीस नं, आता बघ तू वरलक्ष्मी हल्दी कुमकुम, कोलू, विष्णू सस्त्रानाम, नवरात्री दांडिया, अष्टमी कन्यापुजन, झालंच तर श्री महालक्ष्मी व्रत, साईबाबा भजन ग्रूप, दिवाली पार्टी अशी सूपर बिझी होणार आहेस.
  • Log in or register to post comments

Submitted by पिलीयन रायडर on Tue, 06/21/2016 - 17:38

In reply to आरे वा, जोरात कट्टा. आमचा by अभ्या..

Permalink

उसाचा रस आणी विड्याचं पान

उसाचा रस आणी विड्याचं पान सुद्धा मिळतं, समोसा फारच सोपी गोष्ट आहे हो! काकांनी खाली जो जरनल स्क्वे. चा फोटो टाकलाय ना, त्या रस्त्यावर पानटपरी आहे. तिथे मी रात्री जोरजोरात "दिलके झरोके मे" का "बदनपे सितारे.." गाणं ऐकलय डोसा खाता खाता. समोर किराणामालाचं दुकान आहे पटेल ब्रदर्स नावाचं जिथे आपल्या भारतात जे मिळेल तेच सगळं मिळतं. स ग ळं! राघव ह्यांच्या पत्नीने तर हे ही सांगितलं की एडिसन मध्ये इतके भारतीय आहेत की अमेरिकन दिसला तर "फॉरेनर फॉरेनर" म्हणुन कौतुकाने लोक बघतात! ;)
  • Log in or register to post comments

Submitted by खालीमुंडी पाताळधुंडी on Tue, 06/21/2016 - 17:55

In reply to उसाचा रस आणी विड्याचं पान by पिलीयन रायडर

Permalink

अवांतर

समोर किराणामालाचं दुकान आहे पटेल ब्रदर्स नावाचं जिथे आपल्या भारतात जे मिळेल तेच सगळं मिळतं. स ग ळं!
तिथे गुजरात्यांवर हल्ले होतात म्हणे!!! फार गर्दी करून टाकलीये अमेरिकेत त्यांनी,
इतके भारतीय आहेत की अमेरिकन दिसला तर "फॉरेनर फॉरेनर" म्हणुन कौतुकाने लोक बघतात!
डोनाल्ड ट्रंप यांचेही हेच म्हणणे आहे, जसे महाराष्ट्रात आपल्याला परप्रांतीयांचा त्रास होतो,तसा तिकडे त्यांनाही होत असेल! रोजगार,नोकर्या इत्यादी गोष्टीमध्ये स्थानिक लोकांच्या हक्कावर गदा येतेय.ट्रंप निवडून आल्यावर भारतीयांचं काय खरं नाय बघा
  • Log in or register to post comments

Submitted by पिलीयन रायडर on Tue, 06/21/2016 - 18:14

In reply to अवांतर by खालीमुंडी पाताळधुंडी

Permalink

पण अमेरिकाच मुळात इमिग्रंट्स

पण अमेरिकाच मुळात इमिग्रंट्स ने बनवलेला देश आहे. आता कसे ओरडणार ते इमिग्रंट्स विरुद्ध? हो अर्थात ह्याही मुद्द्यावर चर्चा झाली की फेसबुकवर "Let's make New Jersey Andhrapradesh" वगैरे कमेंट्स दिसतात, ही किती चुकीची मनोवृत्ती आहे. आपण इथे सर्वांमध्ये मिसळुन रहाणे अपेक्षित आहे. ट्रंप आल्यावर नक्की काय होईल हे बघणे रोचक असेल..
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Tue, 06/21/2016 - 22:16

In reply to अवांतर by खालीमुंडी पाताळधुंडी

Permalink

हे घ्या पटेल ब्रदर्सचे दुकान

हे ते पटेल ब्रदर्सचे दुकान :) Image removed.
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Tue, 06/21/2016 - 22:20

In reply to हे घ्या पटेल ब्रदर्सचे दुकान by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

वरच्या मजल्यावर पटेलिन काकू

वरच्या मजल्यावर पटेलिन काकू ब्युटी पार्लर चालवतात वाटतं. चांगलंय चांगलंय.
  • Log in or register to post comments

Submitted by मिहिर on Tue, 06/21/2016 - 11:35

Permalink

जोरदार

जोरदार वृत्तान्त! डॅमराव महान आहेत. हा धागा आत्ताच पाहिला. माझाही पिलीयन रायडर ह्या काकूच असतील असा समज झाला होता! ह्या जालाप्रमाणेच वास्तवातही युद्धासाठी सदैव तयारच असतात . एक्काकाका, राघव, येडा अण्णा ह्यांना भेटूनही मजा आली.
  • Log in or register to post comments

Submitted by अजया on Tue, 06/21/2016 - 11:39

Permalink

मस्त वृत्तांत. मिपाकर राॅक!

मस्त वृत्तांत. मिपाकर राॅक!
  • Log in or register to post comments

Submitted by शान्तिप्रिय on Tue, 06/21/2016 - 11:58

Permalink

मस्त व्रुत्तांत.

मस्त व्रुत्तांत. पुणेकरांच्या यशावर जळणारी जनता वाढत असलेने, इनोचा व्यापार वाढला आहे. त्यामुळे इनो बनवणारी कंपनी लवकरच पुणेकर मिपांचा सन्मान करेल. तो दिवस दूर नाहि. :):):)
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Tue, 06/21/2016 - 14:11

In reply to मस्त व्रुत्तांत. by शान्तिप्रिय

Permalink

पुणेकरांच्या यशावर जळणारी जनता वाढत असलेने......

पुणेकरांच्या स्वतःच्या यशाबद्दल भलत्याच कल्पना बुवा..... असो, एक साधा कट्टा पुण्यात कट्टा करायचा म्हटले तरी ३-३ धागे निघतात आणि अमेरिकावसी एका धाग्यात काम करतात. ७-७ तास ड्रायव्हिंग करून पण येतात. इथे पुणे-३०ला असलेल्या कट्ट्याला पुणे-२८ वाले येतात पण पुणे-३३ वाले मात्र अजिबात येत नाहीत. असो, पुण्यातल्या कट्ट्याला खूद्द पुणेकरच टांग मारत असतात, ह्यालाच पुणेरी यश, असे समजायचे.
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Tue, 06/21/2016 - 14:24

In reply to पुणेकरांच्या यशावर जळणारी जनता वाढत असलेने...... by मुक्त विहारि

Permalink

कट्ट्याला येणार अश्शी मोठ्ठी

कट्ट्याला येणार अश्शी मोठ्ठी झैरात करून..."जो पर्यंत दुसरे कोणी काँटॅक्ट नंबर मागत नाही तो पर्यंत मी पण दुसर्याचा नंबर मागणार नाही...मग भले कट्ट्याच्या ठिकाणी जाउन कट्टा मिसला तरी चालेल" असा कट्टर पुणेरीपणा करून या ठिकाणी पिरातैंनी "अमेरिका अस्ली म्हणून काय झाले...पुणेकर जीथे जातील तिथे पुण्यात असल्यासारखेच वागतील" हे सोदाहरण दाखवून दिले आहे =))
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com