कथाकथनाचं सगळ्यात प्रभवी माध्यम कोणतं असेल तर नक्किच चित्रपट हेच आहे यात दुमत नाही. मात्र चित्रपटातुन कथाकथन करताना बर्याच गोष्टिंच्या अनुशंगान, त्यांच्या ढंगानं कथेत आणि कथनाच्या पद्धतीत बदल करायचे असतात आणि ते आवश्यकही असतच. म्हणजे चित्रपटात फक्त कथाच उत्तम असुन चालत नाही तर त्याबरोबर पटकथा, संवाद, छायाचित्रण, संगीत, अभिनय, या सगळ्याच व्यवस्थित संकलन आणि या सगळ्याला जोडनारा दुवा म्हणुन दिग्दर्शन.
या सगळ्यांची भट्टी जर एकत्रित जमली तर आणि तरच चित्रपटातुन कथा ही व्यवस्थितरित्या पोचते, परिणामकारक होते.
निश्चितच या सगळ्याचा पाया हा कथा आणि पटकथा हाच आहे, तोच जर धड बांधला नसेल तर पुढच्या इमारतीच काय होतं हे सांगायची गरज नाही. गेल्या आठवड्यात प्रदर्शित झालेल्या बहुचर्चित चित्रपट 'अझहर' च्या बाबतीत नेमक हेच झालाय.
"मै अझहर...सिर्फ तीन बातों के लिये फेमस हूं ....एक खूदा को मानता हूं, दो शादियॉ हुइ है मेरी और अपने पहले तीन मचेस मे सेंचुरी बनानेका रेकोर्ड है.."
चित्रपट सुरु होतो तो मनोजच्या खेळी दाखवत. मग सावकाशपणे चित्रपट आपली पकड बनवण्याचा प्रयत्न करतो. पहिल्या वीस मिनिटांमधे कथानकाची दिशा आणि पद्धत आपल्या लक्षात येते आणि मध्यांतरपर्यंत आपण आरामात जांभया देउ लागतो. रजत अरोरा सारख्या कथाकाराकडुन हे कथानक लिहिलं गेलय याच आश्चर्य वाटत राहतं. खरतर चित्रपटाच्या नामावलीत पटकथाकाराच नाव नमूद नाही पण ति सुद्धा रजत अरोरा यांनीच लिहिली अस वाटत नाही. टॅक्सी नो.९२११ असेल किंवा वन्स अपोन अ टाइम सिरिज असेल, रजतच लेखन नेहमीच उजव राहिलय. चित्रपटाचा हुकुमाचा एक्का राहिलय. पण तेच इथे कुठेतरी हरवलय हे जाणवतं. पटकथेवर खरतर अजुन बरच काम करण्याची गरज होती, रजतसारख्या लेखकाकडुन अस लेखन अपेक्षीत नाही. भूतकालातुन उलगडत जाणारा वर्तमान तोही थेट नायाकाच्याच तोंडातुन..हेच कथेच मुख्य प्रमाण आहे कथा सांगण्याचं, त्यामुळे पटकथा योग्य नसल्यानं कथेचा वेग आणि इप्सित परिणाम दोघांवरही फरक पडतो.कथा कितीही चांगली असेल तरीही जर पटकथा जर नीट नाही झाली चित्रपट कसा फसतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा चित्रपट ठरतो. टोनी डिसुझाच दिग्दर्शन नवखं आहे हे सुद्धा जाणवत राहतं.
हा चित्रपट म्हणजे एका खर्या व्यक्तीच्या संघर्षाची कहानी आहे त्यामुळे चित्रपटात असणारी पात्र रंगवताना घेतली गेलेली मेहनत जाणवते हा जमेचा मुद्दा. इम्रान हाश्मीचा अभिनय 'हमारी अधुरी कहानी' पासुन सुधरत चाललाय अस म्हणायला
हरकत नाही. त्याचा आणि अझहरचा चेहरा थोड्याफार प्रमाणात जुळतो हे अजुन एक. प्राची देसाइचा अभिनय काही उत्तम नसला तरीही नूरीनच्या भूमिकेत ती चपखल बसते. तिचा साधेपणा , अझहरवर असलेलं प्रेम तिच्या डोळ्यात अगदी स्पष्टपणे दिसत. रवीच्या भूमिकेत गौतम गुलटी, सिद्धूच्या भूमिकेत मन्जोत, कपीलच्या वरून बदोला आपापलं काम चोख बजावतात. अॅड. रेड्डिच्या भूमीकेत कुणाल रोय कपूर भाव खाउन जातो. त्याच ते केसांवरुन फनी फिरवणं असेल किंवा बोलण्याची ढब आपल्या बराच वेळ लक्षात राहते. मीराच्या भूमीकेत असलेली लारा दत्ता उगाचच करारा स्वभाव दाखवण्याच्या नादात हातातले सगळी द्रुष्य गमावून बसते. केस संपल्यानंतर जेव्हा अझहरने तिच्यासाठी ठेवलेली चिट्ठी तिला मिळते तो प्रसंग अधिक चांगला होउ शकला असता. सगळ्यात एक मुख्या पात्र दुय्यम स्थानी असुन लक्षात राहत नाही ते म्हणजे संगीता. तिला सोडुन बाकी सगळ्यांच्या निवडीबद्दल दिग्दर्शकाचं कौतुक व्हायला हव पण त्याने संगीता साठी नर्गीसची निवड करवी हे पटत नाही. ति एक उणी बाजु आहे.
चित्रपताच संगीत लक्षात ठेवाव अस जरी नसल तरीही सगळी गाणी योग्य त्या जागी येतात हेही नसे थोडके. कथा-पटकथा, संवाद, दिग्दर्शन या सगळ्याच बाबींवर चित्रपट उत्तम नसला तरीही अगदीच टाकाऊ हि नाही. काही प्रसंग-संवाद सोडले तर चित्रपटातलं काहीही लक्षात राहत नाही हे शेवटी..
थोडक्यात हा चित्रपटसुद्धा वन टाइम वंडर ठरतो.....
वाचने
4959
प्रतिक्रिया
29
मिसळपाव
प्रतिक्रिया
आभार.
मुळात या सिनेमाचा उद्देश
मै अझहर...सिर्फ तीन बातों के लिये फेमस हूं
अजहर
अझरवर सिनेमा?
काढलेला आहेच मुळी
In reply to अझरवर सिनेमा? by पैसा
डी डे! अप्रतिम चित्रपट आहे तो
In reply to काढलेला आहेच मुळी by गामा पैलवान
हरे राम
In reply to काढलेला आहेच मुळी by गामा पैलवान
इतक्यात डोक्याला हात नको पै,
In reply to हरे राम by पैसा
दाऊद तर अलीकडं झाला,
In reply to इतक्यात डोक्याला हात नको पै, by किसन शिंदे
बाकी परीक्षण प्रचंड आवडले.
असह्य
सिंधी लोक्स स्वतःला हिंदू
In reply to असह्य by चलत मुसाफिर
दोष कुणाचा?
In reply to सिंधी लोक्स स्वतःला हिंदू by अभ्या..
100 200 करायचे का?
In reply to दोष कुणाचा? by चलत मुसाफिर
अभ्या....
In reply to 100 200 करायचे का? by अभ्या..
अर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्र,
In reply to अभ्या.... by अनिरुद्ध प्रभू
अर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्र,
In reply to अभ्या.... by अनिरुद्ध प्रभू
कुठे??? थिअटरला.....
In reply to अर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्र, by अभ्या..
आभार...
बघावासा कधीच वाटला नाही,
बाकि काय नाय!!
त्यापेक्षा
In reply to बाकि काय नाय!! by खालीमुंडी पाताळधुंडी
चमु
In reply to त्यापेक्षा by चलत मुसाफिर
ती संबंधित अभिनेत्री व तिच्या
In reply to त्यापेक्षा by चलत मुसाफिर
माई मोड ऑन...
धन्यवाद...
परीक्षण खूप छान केलंय.
धन्यवाद पद्मावतिबाईसाहेब
In reply to परीक्षण खूप छान केलंय. by पद्मावति