इंग्लिश विन्ग्लीश !
मी इंग्रजी सिनेमे पाहण्याचे जवळजवळ थांबवल्यापासून माझ्याकडे तुच्छतेने पाहणाऱ्या नजरा वाढल्या आहेत. खरं म्हणजे माझ्या पाहण्या न पाहण्यामुळे या सिनेमांच्या लोकप्रियतेत किंवा अर्थकारणात काहीही फरक पडत नाही. फरक केंव्हा पडतो तर जेंव्हा चार लोकांत मी अमुक अमुक सिनेमा पहिला नाही असे कबूल करतो तेंव्हा.
"नाही...मी नाही पहिला अवतार"
"काय? तू अवतार नाही पाहिलास?", खुर्चीवरून उसळत माझा कलीग मला विचारतो.
"नाही"
"मूर्ख आहेस का तू ? तुला कळत नाहीये तू काय गमावलं आहेस!!!"
हे प्रातिनिधिक संभाषण नेहमी,"तुझे पता हैं तुने किसका कॅच छोडा हैं?" या आवेशात सुरु होतं. आणि शेवटी "गाढवाला गुळाची चव काय" यावर संपतं. आता मी इंग्रजी सिनेमे सहसा पाहत नाही यामागे हिंदी/मराठी सिनेमावर असलेले प्रेम, गोऱ्या लोकांचा राग, भारतीय संस्कृतीरक्षणाचा घेतलेला वसा असे कुठलेही कारण नसून, ' बा...आपल्याला कळत नाही" एवढे एकमेव कारण आहे. मला मान्य आहे की मी गाढव असेल,मला गुळाची चव नसेल वगैरे वगैरे. पण माझा गाढवपणा स्वत: पुरता मर्यादित ठेऊन जर मी इतर गाढवांना 'गुळाचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम' यावर व्याख्यान देत नसेल तर काय प्रॉब्लेम आहे? अरे बाबांनो..नाही ना झेपत आम्हाला !
"असं कसं झेपत नाही रे तुला ? इंग्लिश समजत नाही म्हणून? शिकला असशीलच ना?"
"इंग्लिश समजते! इंग्लिश सिनेमे नाही समजत !!"
"पण का ? ते फालतू हिंदी सिनेमे बरे समजतात.....इर्रीटेटिंग...इल्लॉजिकल ..होपलेस मुवीज !!"
"हे बघ बरेचसे हिंदी सिनेमे सुद्धा समजण्यापलीकडे असतात...इल्लॉजिकल असतात हे मान्य .पण सिनेमा फालतू होता असे म्हणण्याची मुभा असते तिथे. इंग्लिशचं तसं नाही...तो आवडावाचं लागतो."
"असं काही नाहीये"
" बरं...मग आजपर्यन्त तुला न आवडलेल्या एक तरी इंग्लिश सिनेमाचं नाव सांग."
"..............................................................................." (पंधरा सेकंदाचा पॉझ )
"आठवला?"
"अरे पण कितीतरी चांगले इंग्लिश सिनेमे आहेत त्याच काय?"
"हजारोनी असतील....पण त्यातला एकही इर्रीटेटिंग नव्हता? प्रत्येक सिनेमाच लॉजीक १०० टक्के कळलं तुला?"
"प्रत्येक सिनेमा १०० टक्के कळलाच पाहिजे असं काही नियम आहे का ?"
"नाहीये ना...पण मला कळला नाही असही म्हणता येत नाही! प्रत्येक इंग्लिश सिनेमावर ठरलेल्या कॉमेण्ट्स द्याव्या लागतात. त्या नाही दिल्या तर आपल्याला सिनेमा बघण्याची अक्कल नाही असे सांगितले जाते."
"कोणत्या ठरलेल्या कॉमेण्ट्स."
"सांगतो ना...ऑस्सम मुव्ही यार क्या कन्सेप्ट है (सिनेमा जितका आवडला तितका ऑस्समचा 'स्स' लांबवत न्यायचा) किंवा काय इफ़्फ़ेक्ट आहेत यार खूपच आवडले मला किंवा पेहले पार्ट से भी अच्छा बनाया इस बार किंवा धीस इज दी बेस्ट जेम्स बॉण्ड मुव्ही एव्हर!"
" मग त्यात काय चुकीच आहे ?"
"थांब ना जरा..सिनेमा आवडला किंवा कळला नसेल तर ह्याच कॉमेण्ट्स कश्या असतात बघ....अच्छी मुव्ही थी यार, कन्सेप्ट सबके समज मी नही आयेगा लेकीन (म्हणजे ह्याला कळलेला नाही!!) किंवा स्टोरी जाऊदे रे इफ्फेकट्स कसले आहेत बघ ना (म्हणजे स्टोरीत दम नाही!) किंवा मस्त बनाया इसबार..पेह्लेवाले पार्टसे ज्यादा कनेक्क्शन नही है ये अच्छा किया (अरे मग कशाला बनवला?) किंवा मुव्ही छोड रे...ग्यॅझेट्स देखे क्या बॉण्ड के !!( (आता हेच राहिलंय..बाजारातसुद्धा रिमोटवाल्या कार मिळतात आजकाल...एलइडी वाले घड्याळसुद्धा मिळतात)
“........................................ (पाच सेकंद पॉझ) म्हणजे काहीतरी बघण्यासारखं असतंच रे त्या सिनेमांमध्ये."
"पण ते जर मला नसेल बघायचं तर?"
"हे बघ त्याच त्याच घीस्यापीट्या स्टोऱ्या बघण्यापेक्षा हे बघणं केंव्हाही चांगलं"
"ज्युरासिक पार्क बघितला असशील ना?"
"तुला तो सुद्धा आवडत नाही? हद्द झाली आता!"
"मला खूप आवडतो तो सिनेमा..पण पहिल्या आणि दुसऱ्या सिनेमाच्या स्टोरीत काय फरक होता? तोच डायनासोर आणि तीच धावणारी माणसं...बरं एक- दोन वेळा कौतुक...तिसऱ्या सिनेमात काय वेगळं होतं? तीच घीसीपीटी स्टोरी."
"अरे पण शेवटी ज्युरासिक पार्क आहे तो...स्पीलबर्ग यार !!!"
"चल ठीक आहे...स्पीलबर्गच्या सन्मानार्थ सगळं मान्य...पण दुसरा डायरेक्टर डायनासोरच्या जागी गॉडझीला आणतो. स्टोरी बदलली ? तिसरा डायरेक्टर डायनासोर आणि किंगकॉँग यांच्यात भांडणं लावतो. चौथा किंगकॉँगला पोरीच्या प्रेमात पाडतो. सगळं किती लॉजीकल चाललंय नाही!!!"
"ते प्राण्यांचे सिनेमे सोड रे. त्याच्यासाठी तू सगळ्या इंग्लिश सिनेमांना नावं ठेवशील का?"
"मग कोणत्या सिनेमांविषयी बोलू? सिनेमांच्या कथेचे साचे ठरलेले आहेत. प्राण्यांच्या कथा,अंतराळातील कथा, समुद्री कथा, जगबुडीच्या कथा, अतार्किक संकटाच्या कथा, चोरीच्या सुरस कथा आणि महामानवाच्या कथा !! प्रत्येकवेळी तेच असते. फक्त कथेचं आवरण बदलते आणि उरते केवळ तंत्रज्ञान ! मी नावं ठेवत नाहीये. सुंदर सिनेमा हा कुठल्याही भाषेत बनू शकतो. त्याला इंग्लिशच्या कोंदणाची गरज नाही."
" तरी पण इंग्लिश सिनेमांचा फील वेगळाच असतो रे."
" आता या फीलगुड फॅक्टरवर काय बोलायचं? आता या फीलगुड फॅक्टरवर काय बोलायचं. एक शास्त्रज्ञ उगाचच एखादं आभासी जग तयार करतो. तिथं जाऊन मुळात अस्तित्वात नसलेल्या शत्रूंना मारतो. कश्याचा कशाला पत्ता नाही. कोण? कुठे ? कधी? कश्यासाठी? असे प्रश्न आपल्याला पडत नाहीत, पडले तर विचारायचे नाहीत. फक्त गुडी गुडी वाटून घ्यायचं.
"तुझ्याशी बोलण्यात काही अर्थ नाही."
तर अश्या प्रकारे फील गुड फॅक्टरवर येउन आमची चर्चा संपली. नंतर मी विचार करत होतो की आपण आजकाल बघत नाही वगैरे ठीक आहे पण जसा बऱ्याच लोकांना हिंदी/मराठी सिनेमे न बघण्याचा अभिमान असतो तसा मला इंग्लिशच्या बाबतीत आहे का?.......नाही ! आजही टीव्हीवर "Speed" किंवा "Independance Day" लागला की मी भक्तीभावाने पाहायला बसतो का?.....हो! फरक एवढाच आहे की त्याच भक्तीभावाने मी आजही "दिवार" बघतो आणि त्याच हक्काने "सुर्यवंशम" लाथाडतो. इंग्लिश सिनेमांच्याबाबतीत हे घडताना दिसत नाही. कारण एकंच....
"इंग्लिश सिनेमांचा फील वेगळाच असतो रे!!!!”
--चिनार
http://chinarsjoshi.blogspot.in/
वर्गीकरण
प्रतिक्रिया
छान लेख
हम्म..
न्यूनगंड ! बरोबर
सहमत आहे. मी पण सहजी समजेल
मला तर भारतातील इंग्रजीही नीट
पण तरीसुद्धा इंग्रजीमध्ये
मस्त लेख
टर्बोचार्जड फिलॉसॉफर
वेगळी मातृभाषा असणाार्य्
बुर्झ्वांचा चिरफाळ्या उडवणारा लेख !
धन्यवाद !!
मस्त लिहीलाय.....
मला इंग्लिश नीट समजते तरीही
अहो भर महाभारतीय युद्धाच्या
हॉलीवुड मधील एका अतार्किक
एक प्रेमाने ओथांबलेला मुका
जस्ट अ मोमेंट प्लीज......
मुवी काका,
चिनारकाका,
घीवूच रे एखांद्या क्वाटरवेळी.
कोणाला रे?
काय रे? काय झाले?
कुणाला साइडला घ्यायचं
आक्षेप आहे तो, "इंग्लिश आहे म्हणून तो बेस्ट्च आहे.....
यूटूबवर हाईत काय?
ओ ते परवा जीओटी जीओटी कुठे
हॉस्टेल मध्ये एकाच आशेने
आम्ही पण हेच करायचो..
मस्त.. नेहमीप्रमाणेच भारी
unstoppable
इंग्रजी बेस्टच……
तंतोतंत माझेच विचार. आपली रास
एक गोष्ट कळत नाही
त्यांना लय घाई असते ट्रुमन
इतर कृतीही
त्यांचे चित्रपट अडीच-तीन
मला आजवर एक गोष्ट कळू शकली
=))
उत्तम लेख! आवडला.
धन्यवाद समीर भाऊ !
हा खास खमंग भज्याचा घाणा लाजवाब......
चिनार, अगदी माझ्या मनातले
धन्यवाद
लेख आअवडला
अगदी अगदी..बरोबर
द कंजुरिंग
डॅन ब्रोउन च्या कादंबरीवरचे....
:D
मझी फिल्ल्म्बाजी मध्ये