Skip to main content

आंब्याची कढी

लेखक सूड यांनी बुधवार, 01/06/2016 19:34 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः पाऊण लिटर ताक, दोन मोठ्या हापूस आंब्यांचा रस, जिरं, मोहरी, कडीपत्ता, हिंग, दोन मिरच्या बारीक चिरून, साखर मीठ आवडीनुसार कृती: ताक , मीठ , साखर आणि आंब्याचा रस एकत्र करायचा. साजूक तुपात मोहरी, जिरं, कडीपत्ता, हिंग, मिरच्यांची फोडणी करून ताक आणि आंब्याच्या मिश्रणात ओतायची. थोडा वेळ झाकण ठेवून द्यायचं. *फेसबुकावर पूर्वप्रकाशित. kadhi

वाचने 20621
प्रतिक्रिया 49

प्रतिक्रिया

In reply to by प्रचेतस

असं वाया घालवणं म्हणजे महापाप.
हा विचार वर घाटावरच येऊ शकतो. कोकणात आंबे मुबलक मिळतात, मग त्याचं काय करु नि काय नको असं होतं. इकडे आंब्यांची कमतरता त्यात कोकणातल्या सुग्रणींपेक्षा घाटावर पाककला अंमळ कमीच, त्यामुळे चालायचंच!! :)

In reply to by सूड

उत्तम स्वयंपाक करता येणाऱ्या पुरुषालाही सुगरण म्हणतात का?

In reply to by सतिश गावडे

ते उत्तम स्वयंपाक करता येणाऱ्या पुरुषाला विचारावं लागेल.

In reply to by सूड

मलये भिल्लपुरंध्री चंदनतरूकाष्ठम् इंधनम् कुरुते। तसंच काहीसं ना?

In reply to by जेपी

हा विचार वर घाटावरच येऊ शकतो. कोकणात आंबे मुबलक मिळतात, मग त्याचं काय करु नि काय नको असं होतं. इकडे आंब्यांची कमतरता त्यात कोकणातल्या सुग्रणींपेक्षा घाटावर पाककला अंमळ कमीच, त्यामुळे चालायचंच!! :)

In reply to by सतिश गावडे

उत्तम स्वयंपाक करता येणाऱ्या पुरुषालाही सुगरण म्हणतात का?

In reply to by प्रचेतस

ते उत्तम स्वयंपाक करता येणाऱ्या पुरुषाला विचारुन सांगतो.

In reply to by प्रचेतस

कोण कोणाचा प्रवक्ता आहे ते अगोदर जाहीर करा बघू :) ;) =))

In reply to by प्रचेतस

वेगळा (आणि खरच मला माहीत नसलेला )पदार्थ अज्मावून बघायला हरकत नाही. मला करता येईल का ते माहीत नाही.धन्याने केल्यास आस्वाद घ्यायला नक्की येईल. ता.क. वल्ली (इतरांसाठी प्रचेतस आम्च्या साठी वल्लीच० नक्की कुणाच्या बाजूने आहीत आंब्याच्या की कढीच्या ?

यालाच कोयाडं / सासव म्हणतात. ही पाककृती गुजराती चानेल कलर्स ( इटिव्हि) वर दाखवलेली परवा.त्याला ते लोक फजितो म्हणतात.

In reply to by कंजूस

धोकलोउंधियोडॉटकॉम वर टाकली गेली असेल ही पाकृ नाई का?

In reply to by कंजूस

सासव निराळं. ओलं खोबरं, सुक्या मिरच्या आणि मोहरी हे असतात सासव बनवताना आणि फोडणी नाही.

In reply to by कंजूस

नै, नै सासव निराळं. त्यासाठी झाडी/ गावठी आंबेच हवेत. त्यांची चवच अलग असते. कोकणातही फारसे मिळत नाहीत :(

ते कुठल्यातरी गावांत श्रीखंडाच्या पाण्याची थंड कढी करतात तुम्ही पण असेच करा.... अरे, कुठे नेवून ठेवली आहे आमची खाद्य-संस्कृती????????????????????////

"का त्या हापूसवरती असा 'सूड' उगवतो आहेस?" असा विचार मनात आल्याखेरीज राहिला नाही.. ;) (आंबा/कढी प्रेमी)रंगा

आंब्याची भजी काय, आंब्याची कढी काय, मला हे सर्व एकमेकांच्या विरुद्ध चवी वाटतात. पण चला पाककृतींची ओळख होते. छान पुपाशु. -दिलीप बिरुटे

पण मला ती आवडत नाही, त्यामुळे त्याची रेसिपी नाही देणार! सूड, मस्त रेसिपी, छान लागते ही कढी.. थोडे नारळाचे दुध मिसळा आणि आंबा थोडा आंबट चवीचा हवा. हापूसचे गोड प्रकार जास्त चांगले होतात. अर्थात हे माझे मत!!!!!!!!!!

In reply to by अनन्न्या

आमच्याकडे सहा जण जेवायला असताना पातेलंभर केलेली ही कढी शेवटी बघायलासुद्धा उरली नाही. कढी पिणार्‍याला सुरुवातीला दोनेक सेकंद कसली कढी आहे ते समजून घेण्यात जातात आणि शेवटी आंब्याची मस्त चव जीभेवर रेंगाळत राहते. मला एकदा निव्वळ नारळाचं दूध घालून करून बघायची आहे. @रेवती: हो, थंडच वापरावी लागते.

ही खरी खरी पाककृती आहे का कुणीतरी सांगा राव. नाहीतर खरच करायला जाईन आणि मग उद्धार होईल ते वेगलच्.

In reply to by सूड

मला माहिती आहे रे खरी आहे ते. तुझ्या सुगरणपणाची माहिती आहे मला. त्यांनी अविश्वास दाखवला तर मी जरा गंम्मत केली.

In reply to by त्रिवेणी

करणार असाल तर नुसती प्यायच्या हिशोबात करा. भातावर घ्यायला वैगरे नको. ताक अमूलचं घेतलत तर बरं!!

धन्यवाद. उद्या दुपारी करते आणि फ़ोटो टाकते इकडे. डाळीच्या पीठाच आलान नाही लावयचे का?

In reply to by त्रिवेणी

नाही नाही, रसाचा घट्टपणा पुरतो. आणि याला उकळी काढायची नाहीये, पीठ लावून कसं चालेल!!

वाह!! कढी छानचं दिसतेय. मी खरंतर कढीप्रेमी नाही पण या पाकृत डाळीचे पीठ न लावल्यामुळे नक्की करुन बघणार: ) वाखु साठवलिये.