Skip to main content

मोबाईल मोबाईल......

लेखक बाबा योगिराज यांनी मंगळवार, 28/07/2015 17:45 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रान्नो, मोबाईल घ्यायचा ठरवतोय, बजेट २० ते २५ हजार. दोन फोन आवड्ले होते. १) असुस झेनफोन २ (सम्पुर्न महिती इथे मिळेल http://www.gsmarena.com/asus_zenfone_2_ze551ml-6917.php ) किमत :- २३ हजार. परन्तु क्यामेरा व्यवस्थित काम करत नसल्याने बाद केला. २) वन प्लस टू (सम्पुर्न महिती इथे मिळेल http://www.gsmarena.com/oneplus_2-6902.php ) किमत :- २५ हजार (अंदाजे) परन्तु कंजुस भौ नि सायनोजेन ऑपरेटिंग तितकीशी उपयोगी नाही सांगितल्याने बाद केला. दोन्ही फोन किमतीमुळे नव्हे तर त्यांच्या हार्डवेयर (तांत्रिक वैशिष्ठ्या????) मुळे आवडले होते. आता प्रश्न असा पडलाय की काय करू? कुठ्ला मोबाईल घेउ? मोबाईल जरा उच्च हार्डवेयरवाला (तांत्रिक वैशिष्ठ्या) असेल तर अधिक चांगला. (व्याकारण, आणि शुध्लेखन खुप प्रयत्न केलेत तरी तेव्हड़ सुधारलेल नाही. पहिलाच प्रयत्न असल्याने कमी(?) मार पडेल अशी आशा करतो.) सांगा काय करू ते.......

वाचने 43390
प्रतिक्रिया 84

प्रतिक्रिया

In reply to by राजकुमार१२३४५६

धन्यवाद! मोटो एक्स व गुगल नेक्सस हे पण काही पर्याय आहेत. आयफोन ५ हा पण एकाने सुचविला आहे.

संपादक मंडळाने हा धागा कायम स्वरूपी उजव्या बाजुला 'दखल' मध्ये साठवून ठेवावा. म्हणजे दर तीन चार महिन्यांनी नविन मोबाईल साठी नविन धागा येणार नाही.

१३८०० रुपये मोबाईल चांगला आहे. ब्याटरी ब्याकप चांगला. फोटोवर मी तितका खुश नाही. १३ मेगा पिक्सल असला तरी फोटो खास वाटत नाहीत पीपीआय कमी आहे. बाकी वापरायला झकास आहे. -दिलीप बिरुटे

नुकताच मोटो-जी ४जी प्लस हा फोन घेतला. १३४९९ ला मिळाला. अत्यंत उत्कृष्ट कॅमेरा आहे. ४जी मुळे इंटरनेट अतिशय वेगात चालते. बरीच नवीन फीचर्स आहेत. हळूहळू शिकत आहे. व्यवस्थित सुरू आहे. सध्यातरी आवडला आहे.

माझ्याकडे सॅमसंग जीटी एस ७५६२ अ‍ॅन्डॉईड ४,०.४ आहे त्यावर युपीआय चालत नाही. नवीन फोन ला गळ्यात घालायची दोरी येत नाही काय करावे?

In reply to by प्रकाश घाटपांडे

सॅमसंग जीटी एस ७५६२ चे स्पेसिफिकेशन बघितले. मझ्या मते ओएस अपडेट करावी लागेल, आणि सोफ्ट्वेअर अपडेट केल्यावर मोबईल धिमा होण्याची शंका आहे. हे माझ मत झाल. ह्या वर कुणी सोफ्ट्वेअर जानकार व्यक्तिचे मत तपासावे लागेल. दुसरा प्रश्न, मोठी दोरी असलेले मोबाईल पाऊच मिळतात बाजारात. एकदा तपासुन बघा. बाबा योगिराज.

>>नवीन फोन ला गळ्यात घालायची दोरी येत नाही काय करावे?>> यावर कायमचा प्रश्न सोडवला आहे. गळ्यात घालायची अशी माझी गरज नाही पण नवे टच स्क्रिन मोबाइल मोठे असतात त्याने फोटो काढताना तो हातातून सटकेल ही भीती, ट्रेनमधून किंवा उंचिवरचे शिल्पांचे फोटो काढताना उपयोगी असे करायचे होते. ( सेल्फि स्टिक नाही वापरू देत काही ठिकाणी) मोबाइलच्या कवरलाचा दोरी लावलीय ती मनगटात अडकवून सोपे झालेय. फोटो टाकतो नंतर.

माझ्याकडे सॅमसंग जीटी एस ७५६२ अ‍ॅन्डॉईड ४,०.४ आहे त्यावर युपीआय चालत नाही.उबेर अ‍ॅप नाही. फोनला ४ वर्षे होतील आता. बाकी चांगला चालू आहे.दुकानदार रुट करायला तयार नाही. दगड होईल. नवीन घ्या. बजेट १० ह. काय करावे क्वचित उबेर ची गरज पडते पण नेमक वेळेला अ‍ॅप नसेल तर काय उपयोग? मन द्विधा आहे नवीन फोन घेण्याबाबत. काय करावे बरं?

uber अथवा इतर यासारख्या सर्विस देणाय्रांचे कॅालसेंटरही असणारच. कॅाल करून पाहा. दहाहजार घालवण्यापेक्षा दहावीस रुपये घालवणे स्वस्त पडेल. ( शहरांत जिथे टॅाइलेट्स असतात तिथे जवळच हे सर्वच ट्याक्सीवाले पार्किंग करून गाणी ऐकत असतात. फोन बंद पडला तरी हा मार्ग आहेच.)

In reply to by कंजूस

पण बँकिंग अ‍ॅप पण त्या अ‍ॅन्ड्रॉईड व्हर्जन वर चालत नाहीत.माझा मोबाईल बदलायला झाला आहे असे तरुण पिढि सांगते