Skip to main content
लेखक बाबा योगिराज यांनी मंगळवार, 28/07/2015 17:45 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रान्नो, मोबाईल घ्यायचा ठरवतोय, बजेट २० ते २५ हजार. दोन फोन आवड्ले होते. १) असुस झेनफोन २ (सम्पुर्न महिती इथे मिळेल http://www.gsmarena.com/asus_zenfone_2_ze551ml-6917.php ) किमत :- २३ हजार. परन्तु क्यामेरा व्यवस्थित काम करत नसल्याने बाद केला. २) वन प्लस टू (सम्पुर्न महिती इथे मिळेल http://www.gsmarena.com/oneplus_2-6902.php ) किमत :- २५ हजार (अंदाजे) परन्तु कंजुस भौ नि सायनोजेन ऑपरेटिंग तितकीशी उपयोगी नाही सांगितल्याने बाद केला. दोन्ही फोन किमतीमुळे नव्हे तर त्यांच्या हार्डवेयर (तांत्रिक वैशिष्ठ्या????) मुळे आवडले होते. आता प्रश्न असा पडलाय की काय करू? कुठ्ला मोबाईल घेउ? मोबाईल जरा उच्च हार्डवेयरवाला (तांत्रिक वैशिष्ठ्या) असेल तर अधिक चांगला. (व्याकारण, आणि शुध्लेखन खुप प्रयत्न केलेत तरी तेव्हड़ सुधारलेल नाही. पहिलाच प्रयत्न असल्याने कमी(?) मार पडेल अशी आशा करतो.) सांगा काय करू ते.......

वाचने 43767
प्रतिक्रिया 84

प्रतिक्रिया

मोटो जी३ कसा आहे, किंवा त्या रेंज मध्ये कुठले चांगले पर्याय आहेत ?

In reply to by होबासराव

जरा वाचन चालु आहे. थोडा वेळ लगेल. सध्या तरी मोटो जी३ च चांगला वाटतोय. उद्या दुपार पर्यंत सांगतो.

In reply to by होबासराव

हे चारीही फोन एक-मेकास जबरदस्त टक्कर देत आहेत. किंमतीत सुद्धा विशेष काही फरक नाही. लेनोवो आणि शाओमी सर्वात पुढे आहेत. फरक फक्त ईतकाच आहे की शाओमी मध्ये तुम्हि साठवन्याची जागा वाढ्वू शकत नाही. या चारीही फोनची तुलना येथे करता येयील

आठ हजाराखालील फोनमधे विक्री पश्चात सेवा वगेरे मोठा विनोद आहे हो. वर्ष दीड वर्षात फोन खराब होत नाही. त्यानंतर झालाच तर आजूबाजूचाच कोणी तरी बघावा लागतो. मला धरुन कित्येकांनी शाओमी आणि वन प्लस वन घेतले. काही समस्या नाही.

मझ्या जवळच्या मित्रा कडे आहे. सॉफ्टवेर मध्ये भरपूर प्रोब्लेम्स आहेत. २.५ महीने जुना असलेला फोन विकायला गेला तर फ़क्त ५०००/- रु किंमत मिळाली. त्याचा बघुनच वन प्लस वन न घेन्याच ठरवल. मी हे नाही म्हणत की, नविन आलेल्या सगळ्याच फोन कंपनीज ख़राब आहेत किंवा आपल्याला लुटायलाच आलेल्या आहेत. माझ फ़क्त इतकच म्हनन आहे की त्याना नोकिया, सैमसंग सारखा विश्वास कमवायला अजुन तरी भरपूर वेळ लागेल, आणि तो का लागेल त्याची कारण सांगतोय. शेवटी निवड तुमची स्वतःचीच आहे........

माझ्या मते शिओमि चान्गला आहे आनि सद्ध्या ओफ्फेर पन चालु आहे सगाल्यत महत्वाच म्हनजे त्याचि ओस सोपि आहे, सायनोजेन पेक्शा तरि खुप सोपि आनि फोने हर्द्वरे क्वलीती पन छान आहे. सर्विस सेन्तेर तुमच्या जवल्पास आहे का हे बघुन घ्या.

जीपीएस GPS कोणत्या फोनमधे असते. जिथे मोबाईलची रेंजही मिळत नाही तिथे को-ऑर्डिनेट्स मिळाले तरी खूप झाले. (पूर्वी ट्रेकींगवाले लोक वापरत अशी डिव्हायसेस.)

पुन्हा तोच प्रश्न. १५००० पर्यंत बजेट आहे. व्हिडिओ फारसे बघत नाही. गेम्स अजिबात खेळत नाही. इंटरनेट भरपूर वापरतो. बॅटरी लाईफ भरपूर हवे. कॅमेरा देखील बर्‍यापैकी हवा. कोणता फोन घेऊ?

In reply to by श्रीगुरुजी

श्रीगुरुजी, सध्या दोन भ्रमणध्वणी संच सापडलेत. थोड्या वेळाने अजून काही सापडलं तर विस्तृत माहिती देईन. बाबा योगीराज.

In reply to by श्रीगुरुजी

मी स्व:ता lenovo k3 note वापरत आहे ६ महिन्यापासुन.मस्त चालला आहे.

In reply to by बाबा योगिराज

धन्यवाद! याचा रिव्ह्यू बघितला. गोरिला ग्लास नाही व प्लॅस्टिकची बॉडी, यामुळे पडला तर काही खरं नाही. ५ मिनिटानंतर हा गरम व्हायला सुरूवात होते असंही वाचलं.

In reply to by श्रीगुरुजी

मास्तर मोटो टर्बो घेवा, फास्ट चार्जिंग होते http://m.gsmarena.com/motorola_moto_g_turbo_edition। वॉटर, डस्ट रेजिस्टन्स आहे हा।

In reply to by श्रीगुरुजी

श्रीगुरुजी मी तुम्हाला Moto X Play घ्या असे म्हणेन. तुमच्या प्रमुख गरजा तीन आहेत १) कैमेरा २) इंटरनेट सर्फिंग आणि 3) बैतरी बजेट १५००० च्या आसपास आहे. Moto X Play मध्ये १) कैमेरा - २१ मेगा पिक्सल २) इंटरनेट सर्फिंग - साठी डिस्प्ले ५.५ इंच , फुल HD , ४०३ ppi 3) बैतरी - ३६३० mah , पटकन चार्ज होणारी बाकी ३२ जीबी मेमरी अजून वाढवू पण शकता. रैम २ जीबी आहे. ४जी डबल सीम आहे.

In reply to by राजकुमार१२३४५६

धन्यवाद! मोटो एक्स व गुगल नेक्सस हे पण काही पर्याय आहेत. आयफोन ५ हा पण एकाने सुचविला आहे.

In reply to by श्रीगुरुजी

मी सुद्धा मोटो प्ले सुचवणार होतो. विचार करू शकता.

संपादक मंडळाने हा धागा कायम स्वरूपी उजव्या बाजुला 'दखल' मध्ये साठवून ठेवावा. म्हणजे दर तीन चार महिन्यांनी नविन मोबाईल साठी नविन धागा येणार नाही.

१३८०० रुपये मोबाईल चांगला आहे. ब्याटरी ब्याकप चांगला. फोटोवर मी तितका खुश नाही. १३ मेगा पिक्सल असला तरी फोटो खास वाटत नाहीत पीपीआय कमी आहे. बाकी वापरायला झकास आहे. -दिलीप बिरुटे

नुकताच मोटो-जी ४जी प्लस हा फोन घेतला. १३४९९ ला मिळाला. अत्यंत उत्कृष्ट कॅमेरा आहे. ४जी मुळे इंटरनेट अतिशय वेगात चालते. बरीच नवीन फीचर्स आहेत. हळूहळू शिकत आहे. व्यवस्थित सुरू आहे. सध्यातरी आवडला आहे.

माझ्याकडे सॅमसंग जीटी एस ७५६२ अ‍ॅन्डॉईड ४,०.४ आहे त्यावर युपीआय चालत नाही. नवीन फोन ला गळ्यात घालायची दोरी येत नाही काय करावे?

In reply to by प्रकाश घाटपांडे

सॅमसंग जीटी एस ७५६२ चे स्पेसिफिकेशन बघितले. मझ्या मते ओएस अपडेट करावी लागेल, आणि सोफ्ट्वेअर अपडेट केल्यावर मोबईल धिमा होण्याची शंका आहे. हे माझ मत झाल. ह्या वर कुणी सोफ्ट्वेअर जानकार व्यक्तिचे मत तपासावे लागेल. दुसरा प्रश्न, मोठी दोरी असलेले मोबाईल पाऊच मिळतात बाजारात. एकदा तपासुन बघा. बाबा योगिराज.

>>नवीन फोन ला गळ्यात घालायची दोरी येत नाही काय करावे?>> यावर कायमचा प्रश्न सोडवला आहे. गळ्यात घालायची अशी माझी गरज नाही पण नवे टच स्क्रिन मोबाइल मोठे असतात त्याने फोटो काढताना तो हातातून सटकेल ही भीती, ट्रेनमधून किंवा उंचिवरचे शिल्पांचे फोटो काढताना उपयोगी असे करायचे होते. ( सेल्फि स्टिक नाही वापरू देत काही ठिकाणी) मोबाइलच्या कवरलाचा दोरी लावलीय ती मनगटात अडकवून सोपे झालेय. फोटो टाकतो नंतर.

माझ्याकडे सॅमसंग जीटी एस ७५६२ अ‍ॅन्डॉईड ४,०.४ आहे त्यावर युपीआय चालत नाही.उबेर अ‍ॅप नाही. फोनला ४ वर्षे होतील आता. बाकी चांगला चालू आहे.दुकानदार रुट करायला तयार नाही. दगड होईल. नवीन घ्या. बजेट १० ह. काय करावे क्वचित उबेर ची गरज पडते पण नेमक वेळेला अ‍ॅप नसेल तर काय उपयोग? मन द्विधा आहे नवीन फोन घेण्याबाबत. काय करावे बरं?

uber अथवा इतर यासारख्या सर्विस देणाय्रांचे कॅालसेंटरही असणारच. कॅाल करून पाहा. दहाहजार घालवण्यापेक्षा दहावीस रुपये घालवणे स्वस्त पडेल. ( शहरांत जिथे टॅाइलेट्स असतात तिथे जवळच हे सर्वच ट्याक्सीवाले पार्किंग करून गाणी ऐकत असतात. फोन बंद पडला तरी हा मार्ग आहेच.)

In reply to by कंजूस

पण बँकिंग अ‍ॅप पण त्या अ‍ॅन्ड्रॉईड व्हर्जन वर चालत नाहीत.माझा मोबाईल बदलायला झाला आहे असे तरुण पिढि सांगते