✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

ओळख

स
सिरुसेरि यांनी
Sun, 05/29/2016 - 19:48  ·  लेख
लेख
ओळख तिला पिक्चर खुप आवडतात . विशेषकरुन जर प्रेमकथा असेल तर ती अगदी गुंग होउन जाते . हिरो हिरॉईनच्या सुखात हसते , त्यांच्यावर संकट आले तर तिच्या डोळ्यात पाणी येते . असे पिक्चर पार टायटलपासुन ते दि एंड पर्यंत बघायचेच असा तिचा नेम असतो . असे पिक्चर परत परत बघायलाही ती नेहमीच तयार असते . या रविवारचे प्लॅनिंग तिने आधीच मनाशी ठरवले होते . तो खास दिवस त्याच्याबरोबर पिक्चर पाहुन तिला सेलीब्रेट करायचा होता . त्यासाठी आमीरखानच्या "कयामतसे.."चे बुकिंग ती करणार होती . यामधली एकुण एक गाणी तिला पाठ होती . आमिरखान हा तिचा फेव्हरेट हिरो बनला होता . तो अगदी उलट आहे . तो पिक्चर फारसे बघत नाही . प्रेमकथा तर त्याला अजिबात आवडत नाहित . अश्रूभरल्या डोळ्यांची पिटपिट करत हिरॉईन जेव्हा " इस दिलमें तुम्हारे प्यारके अलावा...." असले काही बोलु लागते तेव्हा त्याला झोपच येते . हिरो जेव्हा कातर आवाजात "इस जालिम जमानेको दिखाना है..." असले काहि डायलॉग नाही तर गाणे म्हणतो तेव्हा त्याला चक्कर येते . असे "दिल विल प्यार व्यार" वाले पिक्चर बघणे तो नेहमीच टाळतो . त्याचा भर आहे तो हॉलिवूडच्या अ‍ॅक्शन मुव्हीजवर . ब्रुसली , जॅकी चॅन , अर्नॉल्ड , स्टॅलोन हे त्याचे खास आवडते अ‍ॅक्शनस्टार . यांचे पिक्चर तो कधीच चुकवत नाही . एंटर द ड्रॅगॉन , प्रोजेक्ट ए , कमांडो , रॅम्बो हे पिक्चर त्याने आवडीने पाहिले आहेत . या रविवारी जॅकी चॅनचा पोलीसस्टोरी बघायला जाण्याचा त्याचा बेत होता . आपल्या काहि मित्रांशी त्याचे बोलणेही झाले होते . तेवढ्यात त्याला तिचा फोन आला . ती फोनवर खुप खुश होउन उत्साहाने बोलत होती . "या रविवारच्या खास दिवशी आपण एखादा पिक्चर बघुया . आपण आमीरखानचा "कयामतसे.." बघायला जाउ." त्याला काय बोलावे तेच सुचेना . तो थोडावेळ विचार करुन बोलु लागला . हा थोडावेळ तिला मात्र जास्तच खटकला . " या रविवारी माझा जॅकी चॅनचा पोलीसस्टोरी बघायला जाण्याचा बेत आहे . मी एक दोन मित्रांशी बोललोही आहे." " पण या रविवारी आपण दोघांनी एकत्र पिक्चर बघावा अशी माझी खुप इच्छा आहे . तु पोलीसस्टोरी नंतर कधीतरी बघ ." तिने सुचविले . त्याला प्रेमकथा टाइपचे पिक्चर आवडत नाहित हे ती उत्साहाच्या भरात विसरली होती . तो टाळाटाळ का करत आहे हे आता तिला परत लक्षात येत होते . "पण मला असले रडके ड्रामेबाज पिक्चर आवडत नाहित . तुला ते चांगलं माहित आहे . आणी एकत्रच पिक्चर बघायचा असेल तर तु माझ्याबरोबर पोलीसस्टोरी बघायला ये . मी मित्रांबरोबर जाण्याचे कॅन्सल करतो . आपण दोघे जाउ पोलीसस्टोरी बघायला . कदाचित तुलाही तो पिक्चर आवडेल. " तो सहज म्ह्णुन म्हणाला . " बरं .. ठिक आहे ." अखेर ती थोडा वेळ विचार करुन तयार झाली . "गुड.. मी आजच रविवारच्या शोची तिकिटे बुक करतो . " तो उत्साहाने म्हणाला . रविवारी उगाच नंतर उशीर नको म्ह्णुन शोच्या अर्धा पाउण तास आधीच ती दोघं थिएटरवर पोचले . सिनेमा हॉलमध्ये पोलीसस्टोरीचा आधीचा शो सुरु होता . तेव्हा थिएटर मध्येच इकडे तिकडे फिरणं असा त्यांचा टाइमपास चालु होता . तो आज खुप दिवसांनी थिएटरमध्ये पिक्चर पाहायला आला होता . त्याचे लक्ष सिनेमाहॉलच्या बाहेर भिंतीवर लावलेल्या फोटोंकडे गेले . पिक्चरमधले काही महत्वाचे सीन त्या फोटोंमध्ये होते . तो आवडीने ते फोटो पाहु लागला . पुर्वी शाळा , कॉलेजला असताना मित्रांबरोबर पिक्चरला गेले की असे फोटो पाहायचे आणी त्यावरुन स्टोरीचे अंदाज लावायचे हा त्या सर्वांचाच आवडता कार्यक्रम होता . सर्व मित्रांचे पिक्चरला जायचे ठरले की सर्वजण सुरक्षिततेसाठी आधी थिएटरपासुन थोडं लांब बाहेर कुठेतरी झाडाखाली नाहितर एखाद्या टपरीपाशी जमत असत . मग त्यांच्यातला एकजण पुढे जाउन तिकीटं काढत असे . त्याने इशारा केला की सगळेजण पळत पळत थिएटरमध्ये शिरत असत . या मेथडचा फायदा असा की व्हिजुअलाईज होण्याचा धोका खुप कमी असे. त्यामुळे "तुमच्या राजुला काल आम्ही अमुक तमुक टॉकिजपाशी पाहिलं . त्याच्यावर थोडं लक्ष ठेवा ." असे हितचिंतकांचे निरोप फारसे घरी येत नसत . अशा अ‍ॅक्शन मुव्हीज पाहिल्या की , शाओलीन टेंपलला जाउन मार्शल आर्ट शिकण्याचे बेत रचले जात असत . तर मित्रांबरोबर बरेचदा वाद विवादही होत असत . "निंजा जास्त भारी का सामुराई ?" , " स्नेक स्टाईल जास्त चांगली का ईगल स्टाईल ?" असे त्या वादाचे मुद्दे असत . बरेचदा या स्नेक स्टाईलचे आणी ईगल स्टाईलचे एकमेकांवर अगदी लाथा बुक्क्यांसकट / किक आणी पंचेससकट प्रयोग होत असत . पुढे मग बरेच दिवस सगळ्यांचेच अंग ठणकत असे . आज हे सर्व आठवुन त्याला हसु आले . तो का हसतो आहे हे तिला समजेना . तिला हॉलिवूडच्या अ‍ॅक्शन मुव्हीजची थोडी माहिती असावी म्ह्णुन तो आठवेल तेवढे आपले ज्ञान पाजळु लागला . " तु जर ब्रुसलीचे 'बिग बॉस' , 'फिस्ट ऑफ फ्युरी' आणी कुठलेही पिक्चर बघशील तर तुला लक्षात येइल की तो खुप आक्रमक , अ‍ॅटॅकिंग असतो . कधीच माघार घेत नाही ." " जॅकी चॅन हा तसा डिफेन्सिव्ह आहे . तो वेळ प्रसंगी शत्रुचे चार फटके खातो . आणी वेळ बदलली की दहा फटके देउन परतफेड करतो . " "रोनीन म्ह्णजे मालक नसलेला सामुराई . सामुराईंमध्ये हे खुप अपमानास्पद मानले जाते ." ती सुन्न होउन त्याचे बोलणे ऐकत होती . त्यातली निम्मी अधिक माहिती तिच्या डोक्यावरुन जात होती . आपल्याला पुढे दोन तास काय दंगा बघावा लागणार आहे याची तिला थोडी फार कल्पना येउ लागली होती . पण आता काही उपयोग नव्हता . हि वेळ तिनेच आपण होउन आणली होती . पलिकडच्याच सिनेमा हॉलमध्ये "कयामतसे.."चा शो सुरु होता. त्यामधले गाणे तिला पुसटसे ऐकु येत होते . " अकेले है , तो क्या गम है ....चाहे तो हमारे बसमें क्या नहीं .. बस इक जरा , साथ हो तेरा ...तेरे तो है हम .. कबसे सनम .." हे गाणे ऐकुन तिचे मन त्या सिनेमाहॉलकडेच ओढ घेत होते . पण आज तरी ते शक्य नव्हते . इकडे याचे तिला माहिती सांगणे चालुच होते . तो आपल्याच नादात होता . " अर्नॉल्डचा टर्मिनेटरचा भाग दोन - जजमेंट डे हा पहिल्या भागापेक्षा जास्त क्लासिक आहे ." तेवढ्यात पोलीसस्टोरीचा आधीचा शो संपला . सिनेमा हॉलचे दार पुढच्या शोच्या प्रेक्षकांसाठी उघडले गेले . आत जाण्यासाठी लोकांची दारापाशी बरीच गर्दी झाली . बरेच जण गडबड करु लागले . "थोडी गर्दी कमी होउ दे . मग आपण आत जाउ ." तो तिला म्ह्णाला . तिलाही बरे वाटले . थोड्याच वेळात पलिकडच्या सिनेमा हॉलचेही दार "कयामतसे.." च्या पुढच्या शोच्या प्रेक्षकांसाठी उघडले गेले . प्रेक्षक आत मध्ये जाउ लागले . "चल ..आपण जाउ आता .." तो तिला म्हणाला . दोघे मिळुन सिनेमा हॉलकडे चालु लागले . अचानक तिला जाणवले की तो सरळ न जाता पलिकडच्या सिनेमा हॉलकडे जात आहे . "अरे ,तु या हॉलकडे का जातो आहेस ? इथे तर 'कयामतसे..'चा शो आहे ना ?" तिने त्याला थांबवुन विचारले . "आपल्याला आज 'कयामतसे..'च बघायचा आहे . मी त्याच शोची तिकिटे बुक केली आहेत." तो हसत म्ह्णाला . तिचा अजुनही विश्वास बसत नव्हता . तेव्हा त्याने तिला खिशातुन "कयामतसे.."ची तिकिटे काढुन दाखवली . "आपलं फोनवर बोलणं झालं , तेव्हाच ठरवलं कि तुला जरा सरप्राईज द्यावं .." त्याच्या डोळ्यात खोडसाळ हसु खेळत होतं . "अच्छा .. म्ह्णजे एवढा वेळ जी बडबड चालली होती ती सगळी बनवाबनवी होती तर..." ती रागाने म्हणाली . तिला त्याचा खुपच राग आला होता . त्याला एखादी ब्रुसली सारखी सॉलिड किक मारावी किंवा जोरदार ठोसा मारावा असे तिच्या मनात येत होते . पण त्याचा हेतु चांगला होता .. आणी समोर तिचा आवडता पिक्चर सुरु होण्याच्या बेतात होता . त्यामुळे तिने आपला बेत तात्पुरता पुढे ढकलला . ---------------------- समाप्त ---------------------------------
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
लेख

प्रतिक्रिया द्या
9992 वाचन

💬 प्रतिसाद (26)

प्रतिक्रिया

साधंसुधंच पण सुंदर लेखन.

प्रचेतस
Sun, 05/29/2016 - 20:35 नवीन
साधंसुधंच पण सुंदर लेखन.
  • Log in or register to post comments

+१.

एस
Mon, 05/30/2016 - 18:18 नवीन
+१.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

+२

आतिवास
Tue, 05/31/2016 - 10:06 नवीन
कथा आवडली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

+३

नीलमोहर
Tue, 05/31/2016 - 14:10 नवीन
हलकीफुलकी लवश्टोरी आवडली..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आतिवास

+४

सस्नेह
Tue, 05/31/2016 - 14:45 नवीन
हलकीफुलकी स्टोरी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर

तुम्ही आमच्या मागावर होता की काय?

सुंड्या
Mon, 05/30/2016 - 00:48 नवीन
सरळ, सहज , मस्त
  • Log in or register to post comments

धन्यवाद .

सिरुसेरि
Mon, 05/30/2016 - 10:32 नवीन
आपल्या प्रतिक्रियांबदल मनापासुन धन्यवाद .
  • Log in or register to post comments

मस्त!

यशोधरा
Tue, 05/31/2016 - 07:32 नवीन
मस्त!
  • Log in or register to post comments

खदा करे

नाखु
Tue, 05/31/2016 - 09:30 नवीन
ऐसी कयामत हमेशा आती रहे. सुखद सुरेख झुळुक आवडली. पिटातला नाखु
  • Log in or register to post comments

सुरेख! धन्यवाद!

असंका
Tue, 05/31/2016 - 10:02 नवीन
सुरेख! धन्यवाद!
  • Log in or register to post comments

मस्तच,

अभ्या..
Tue, 05/31/2016 - 10:54 नवीन
मस्तच, दिनबदिन तुमचे लेखन फ्रेश आणि फिनिश होत चाललंय. ग्रेट.
  • Log in or register to post comments

कथा मस्तच आहे.. पण ओळख काय

संजय पाटिल
Tue, 05/31/2016 - 11:54 नवीन
कथा मस्तच आहे.. पण ओळख काय पटली नाय.
  • Log in or register to post comments

आम्हाला पटली बुवा ओळख ...

चौथा कोनाडा
Wed, 04/28/2021 - 17:29 नवीन
आम्हाला पटली बुवा ओळख ... त्याच्यातल्या हळूवार प्रेमभावनेची !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय पाटिल

त्यामुळे तिने आपला बेत

मराठी कथालेखक
Tue, 05/31/2016 - 13:44 नवीन
त्यामुळे तिने आपला बेत तात्पुरता पुढे ढकलला .
अरेरे...म्हणजे इतक्या चांगल्या सरप्राईस नंतर पण त्याला मार पडणारच का ? :)
  • Log in or register to post comments

मस्त ..

वेदांत
Tue, 05/31/2016 - 13:57 नवीन
मस्त ..
  • Log in or register to post comments

:) खूपच मस्तं!

पद्मावति
Tue, 05/31/2016 - 18:13 नवीन
:) खूपच मस्तं!
  • Log in or register to post comments

सैराट आणि सिव्हील वॉर असे बदल

रमेश भिडे
Tue, 05/31/2016 - 19:20 नवीन
सैराट आणि सिव्हील वॉर असे बदल करून वाचलं. नायिकेला सिव्हील वॉर आणि नायकाला सैराट... यावेळी नायक जिंकतो आणि तरी पुढचे चार आठ दिवस रदारडी होते....
  • Log in or register to post comments

सर्वांचे खुप आभार

सिरुसेरि
Wed, 06/01/2016 - 10:00 नवीन
सर्वांचे खुप आभार .
  • Log in or register to post comments

२९ एप्रिल तारखेच्या

सिरुसेरि
Wed, 04/28/2021 - 16:37 नवीन
२९ एप्रिल तारखेच्या निमित्ताने हा लेख आठवला .
  • Log in or register to post comments

बोलेतो एकदम झक्कास!

रंगीला रतन
Wed, 04/28/2021 - 16:47 नवीन
बोलेतो एकदम झक्कास! वाचुन मज्जा आली शेठ
  • Log in or register to post comments

हाऊ रोमॅण्टिक !

चौथा कोनाडा
Wed, 04/28/2021 - 17:28 नवीन
हाऊ रोमॅण्टिक ! त्याचा जॅकी चॅन आणि तिची आमीरवाली कयामत, लव्हली गोष्ट आवडली आपल्याला 💖 सिरुसेरी +१
  • Log in or register to post comments

चौथा कोनाडा यांच्या प्रमाणे

nutanm
गुरुवार, 04/29/2021 - 04:39 नवीन
  • Log in or register to post comments

चौथा कोनाडा यांच्या प्रमाणे

nutanm
गुरुवार, 04/29/2021 - 04:39 नवीन
चौथा कोनाडा यांच्या प्रमाणे माझेही मत, शिवाय ब्रुसली सारखी किक मारावी किंवा ठोसा द्यावा वाचून हसू लोटले आयडिया छान.
  • Log in or register to post comments

ब्रुसली सारखी किक मारावी

nutanm
गुरुवार, 04/29/2021 - 04:46 नवीन
ब्रुसली सारखी किक मारावी किंवा ठोसा द्यावा ही आयडिया छान.
  • Log in or register to post comments

आपणा सर्वांचे

सिरुसेरि
गुरुवार, 04/29/2021 - 10:33 नवीन
आपणा सर्वांचे प्रतिक्रियांबद्दल खुप आभार .
  • Log in or register to post comments

हे यार...

गॉडजिला
Sun, 05/02/2021 - 16:39 नवीन
एकदम वास्तववादी.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा