तर मंडळी, "अशा वेळी आपण काय कराल?" या कोंबडी प्रेमींच्या धाग्यावर कट्टर मिपाकर श्री मुवि यांनी प्रतिसादातून संत तुकारामांच्या अभंगवाणीतली एक ओळ टंकली आहे. निमीत्त मुवि असले तरी सर्रास ह्या ओळी चुकीच्या लिहिल्या जातात आणि चुकीच्या शब्दानिशी स्वीकारल्याही जातात! अर्थात अश्लील शब्दांचा वापर व प्रसार टाळण्यासाठी एखादा शब्द बदलून प्रचलित केला तर हरकत नाही पण अभंगातील एकापेक्षा जास्त शब्द बदलून किंवा शब्दक्रमच बदलणे हे चूक आहे. कवीत्वाशी विश्वासघात केल्यासारखेही आहेच! अर्थ जरी एकच असला तरी मूळ शब्दांना टाकून का द्यावे? हा माझा प्रश्न आणि चर्चेचा विषय आहे.
तर मी ज्या अभंगाबद्दल बोलत आहे त्यातल्या प्रसिद्ध ओळी सर्वसाधारणपणे अशा प्रकारे जनमानसात लोकप्रिय आहेत:
"भले तर देऊ कासेची लंगोटी| नाठाळाचे माथी हाणू काठी ||"
आणि मूळ अभंग याप्रमाणे :
"मऊ मेणाहून आम्ही विष्णुदास | कठीण वज्रास भेदूं ऐसे || ध्रु ||
मेले जित असों निजोनिया जागे | जो जो जें जें मागे तें तें देऊं || १ ||
भले तरी देऊं गांडीची लंगोटी | नाठ्याळा चि गांठी देऊं माथां || २ ||
मायबापाहूनि बहु मायावंत | करूं घातपात शत्रूहूनि || ३ ||
अमृत तें काय गोड आम्हांपुढे | विष तें बापुडें कडू किती || ४ ||
तुका म्हणे आम्ही अवघे चि गोड | ज्याचें पुरे कोड त्याचेपरिं || ५ ||"
संदर्भ : अभंग क्रं. ९८७, "श्री तुकारामबावांच्या अभंगांची गाथा" , (संपादक) श्री विष्णु परशुराम शास्त्री पंडित, आवृत्ती प्रकाशनवर्ष इसवीसन १९५५
वर्गीकरण
वाचन संख्या
16030
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
कासेची लंगोटी हा बदल मला
होय
In reply to कासेची लंगोटी हा बदल मला by प्रचेतस
हे अगोदरच माहीत होते!
'गांडीची लंगोटी' यात जो एक
गांठी म्हणजे काठी नव्हे
In reply to 'गांडीची लंगोटी' यात जो एक by चित्रगुप्त
काठी काय काठी?? काहीही
विष्णुशास्त्री चिपळूणकर
मालक/तै
In reply to विष्णुशास्त्री चिपळूणकर by चैतू
नाठ्याळा चि गांठी देऊं माथां
स्वत:च्या
In reply to नाठ्याळा चि गांठी देऊं माथां by चित्रगुप्त