मागे एकदा मी माझ्या कोकणातील गावाची काही चित्रे खफ वर डकवली होती. ही चित्रे गावातील पाणी टंचाई बाबत होती. पैसा ताइंनी मला याबद्द्ल लेख लीहीण्यास सुचवले म्हणून हा प्रपंच.
आज काल आपण जलयुक्त शिवार आणि अशाच काही सरकारी योजनांबद्द्ल ऐकतो. नाद खूळा यांची तर लेख मालाच आली होती पाणी नियोजनाबद्दल. अशा योजनांमधे सरकार जीतकी शक्य होइल तेवढी मदत करतच असते. (निदान नवीन सरकार तरी सकारात्मक आहे) बर्याच वेळेला शासकीय यंत्रणा काही कारणास्तव प्रत्येक गावात पोहोचू शकत नाही. पण सरकार काही करत नाही म्हणून बसून रहाण्यापेक्षा आपण जर योजना फक्त समजावून जरी घेतली तरी बरेच फायदे होउ शकतात. आता ते कसे ते पहा.
आमच्या गावातील आमच्या वाडीत घरे १२. बारा घरांसाठी ५ विहीरी. या विहीरी पावसात हाताने पाणी काढता येइल एवढ्या भरलेल्या असतात. पण पावसाचे दीवस संपले की दीवाळी नंतर या विहीरी कोरड्या पडतात. त्यात आजकाल सर्वांनी घरात संडास बांधले आहेत. त्यामुळे मग टाक्या बांधल्या आहेत. एका घरात जेवढ्या चुली तेवढ्या टाक्या. गरज असो नसो सकाळ झाली की पंप लावुन टाक्या भरुन घ्यायच्या. त्यामुळे रात्रभर जे काही पाणी विहीरीमधे जमा झाले असेल त्याचा सकाळी उपसा होतो. यात सर्वात जास्त पाणी लागते ते संडाससाठी. गावात पाण्याचा स्त्रोत एकच - विहीरी. त्यामुळे सर्व कामांसाठी पीण्याचे पाणी वापरले जाते. त्यामुळे गावात गेल्यावर पाण्यासाठी धावपळ करावी लागायची.
पाण्याचे दुर्भिक्ष्य घालवण्यासाठी विचारमंथन चालू झाले. बर्याच लोकांनी बरेच सल्ले दीले. वाडीतुन एक ओढा जातो. हा ओढा पावसाळ्यात दुथडी भरुन वाहतो. पण दीवाळीनंतर कोरडा ठणठणीत. गावातील पाच विहीरी याचा ओढ्याचा आजूबाजूला आहेत. योजना ठरली. या ओढ्यातील गाळ काढायचा पात्र खोल करायचे. थोड्या थोड्या अंतरावर चार ते पाच फुटाचे बांध घालायचे. हे काम श्रमदानाने करता येण्यासारखे होते. पण गावात लोक्स कमी. मग मे महीन्यात जे कोणी गावाला जाणार होते त्यांना ही योजना सांगीतली. योजना ऐकल्यावर एक दोघांनी नाके मुरडली तर काही जणांनी मिळून एक बांध घातला सुद्धा !! पावसाळ्यात पाणी जमा झाले. आजुबाजुच्या विहीरींच्या पाण्याची पातळी वाढली. हे पाहून सर्वांना हुरुप आला. शेवटी आर्थिक परीस्थीती चांगली असणार्या एका काकांनी सरळ बुलडोझर मागवला व ओढ्यातील गाळ काढण्यास सुरवात केली. नुसता गाळ न काढता ओढ्याचे पात्र देखील चार फुटाने खोल केले.
नतीजा आपके सामने है. अजुन काम सुरु आहे. या पावसाळ्यात अजुन पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे.
थोडक्यात - सरकारी मदत मिळेल कींवा बाकी कोणी काहीतरी करेल या आशेवर न रहाता ज्याला ज्याला जे शक्य आहे ते केल्यास पाणी समस्या सुटू शकते
नतीजा आपके सामने है. अजुन काम सुरु आहे. या पावसाळ्यात अजुन पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे.
थोडक्यात - सरकारी मदत मिळेल कींवा बाकी कोणी काहीतरी करेल या आशेवर न रहाता ज्याला ज्याला जे शक्य आहे ते केल्यास पाणी समस्या सुटू शकते
वाचने
37410
प्रतिक्रिया
63
मिसळपाव
प्रतिक्रिया
+१,०००,०००
क्या बात है! मस्त मस्त.......
डॉक आणि रेवाक्का धन्यवाद.
एकदम मस्तच !!!
अरे वा! मस्तच!
अतिशय सुन्दर ..
जोरदार
स्पृहणीय आहे हे.
भारीच की
मस्त काम...
आता फोटो दिसायला लागले...
In reply to मस्त काम... by मुक्त विहारि
एकदमच भारी काम की राव!! शाब्बास!!!
मस्त.
शेवटचा फोटो गेल्या
In reply to मस्त. by शाम भागवत
अरे व्वा व्वा व्वा!
टोपी काढून
चेपूला लॉगइन व्हा. फोटो
In reply to टोपी काढून by नाखु
वाहवा! मस्त! शेवटचा फ़ोटो लै
शेवटचा फोटो गेल्या गणपतीतला
In reply to वाहवा! मस्त! शेवटचा फ़ोटो लै by स्वामी संकेतानंद
एक नंबर काम, नावाप्रमाणेच
शेवटचा फोटो म्हणजे कमाल आहे.
+१
In reply to शेवटचा फोटो म्हणजे कमाल आहे. by जयंत कुलकर्णी
दिगोचि
वा!!! फारच उत्तम कार्य केलेले
फारच छान खटपट्याजी. अभिनंदन!
खूप मस्त
त्यांना हा लेखच दाखवा!
In reply to खूप मस्त by जगप्रवासी
हे भारीच
अतिशय क्रेडिबल काम आहे हे....
+१०००००
In reply to अतिशय क्रेडिबल काम आहे हे.... by वेल्लाभट
खूपच छान
भारत कधीच महासत्ता बनू शकणार
बांधकामादरम्यान शेतकऱ्यांनी
In reply to भारत कधीच महासत्ता बनू शकणार by अभिजित - १
विषण्ण करणारा अनुभव.
In reply to भारत कधीच महासत्ता बनू शकणार by अभिजित - १
सरकारी अधिकार्यांच्या
In reply to भारत कधीच महासत्ता बनू शकणार by अभिजित - १
सर्व प्रतिसादकांचे आभार.
मान्सून कट्टा करा की गावाला
In reply to सर्व प्रतिसादकांचे आभार. by खटपट्या
mr.khatpatya, many many
खटपट्याभाऊ, अभिनंदन!
Abhinandan
छान!
छतावरील पावसाचे पाणी
ओके...
In reply to छतावरील पावसाचे पाणी by रमेश आठवले
प्रत कशी मिळेल
In reply to छतावरील पावसाचे पाणी by रमेश आठवले
येथे पहा
In reply to प्रत कशी मिळेल by कलंत्री
येथे पहा
In reply to प्रत कशी मिळेल by कलंत्री
अवर्षण
भारीच काम कि खटपट्या राव.
सर्व प्रतिसादकांचे आणि
नादखुळा ???
काहीही
In reply to नादखुळा ??? by शाम भागवत
महत्त्वाचं काम
फार विधायक काम केलेत तुम्ही.
अभिनंदन!
वाह...!
सर्व प्रतिसादकांचे परत एकदा
साठलेल्या पाण्यात मस्ती
उत्तम काम केले आहे. छान वाटले
धागा मुद्दाम वर काढत आहे.
खटपट्या शेठ, फोटो दिसतील असे
In reply to धागा मुद्दाम वर काढत आहे. by मोदक
मी फोटो फेसबुकावर अपलोड करुन
In reply to खटपट्या शेठ, फोटो दिसतील असे by मोदक
आता काय
तात्पुरते बंधारे घातले जातात
In reply to आता काय by निनाद