✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

पाणी अडवा पाणी जिरवा - एक सफल प्रयोग.

ख
खटपट्या यांनी
गुरुवार, 05/26/2016 - 23:56  ·  लेख
लेख
मागे एकदा मी माझ्या कोकणातील गावाची काही चित्रे खफ वर डकवली होती. ही चित्रे गावातील पाणी टंचाई बाबत होती. पैसा ताइंनी मला याबद्द्ल लेख लीहीण्यास सुचवले म्हणून हा प्रपंच. आज काल आपण जलयुक्त शिवार आणि अशाच काही सरकारी योजनांबद्द्ल ऐकतो. नाद खूळा यांची तर लेख मालाच आली होती पाणी नियोजनाबद्दल. अशा योजनांमधे सरकार जीतकी शक्य होइल तेवढी मदत करतच असते. (निदान नवीन सरकार तरी सकारात्मक आहे) बर्याच वेळेला शासकीय यंत्रणा काही कारणास्तव प्रत्येक गावात पोहोचू शकत नाही. पण सरकार काही करत नाही म्हणून बसून रहाण्यापेक्षा आपण जर योजना फक्त समजावून जरी घेतली तरी बरेच फायदे होउ शकतात. आता ते कसे ते पहा. आमच्या गावातील आमच्या वाडीत घरे १२. बारा घरांसाठी ५ विहीरी. या विहीरी पावसात हाताने पाणी काढता येइल एवढ्या भरलेल्या असतात. पण पावसाचे दीवस संपले की दीवाळी नंतर या विहीरी कोरड्या पडतात. त्यात आजकाल सर्वांनी घरात संडास बांधले आहेत. त्यामुळे मग टाक्या बांधल्या आहेत. एका घरात जेवढ्या चुली तेवढ्या टाक्या. गरज असो नसो सकाळ झाली की पंप लावुन टाक्या भरुन घ्यायच्या. त्यामुळे रात्रभर जे काही पाणी विहीरीमधे जमा झाले असेल त्याचा सकाळी उपसा होतो. यात सर्वात जास्त पाणी लागते ते संडाससाठी. गावात पाण्याचा स्त्रोत एकच - विहीरी. त्यामुळे सर्व कामांसाठी पीण्याचे पाणी वापरले जाते. त्यामुळे गावात गेल्यावर पाण्यासाठी धावपळ करावी लागायची. पाण्याचे दुर्भिक्ष्य घालवण्यासाठी विचारमंथन चालू झाले. बर्याच लोकांनी बरेच सल्ले दीले. वाडीतुन एक ओढा जातो. हा ओढा पावसाळ्यात दुथडी भरुन वाहतो. पण दीवाळीनंतर कोरडा ठणठणीत. गावातील पाच विहीरी याचा ओढ्याचा आजूबाजूला आहेत. योजना ठरली. या ओढ्यातील गाळ काढायचा पात्र खोल करायचे. थोड्या थोड्या अंतरावर चार ते पाच फुटाचे बांध घालायचे. हे काम श्रमदानाने करता येण्यासारखे होते. पण गावात लोक्स कमी. मग मे महीन्यात जे कोणी गावाला जाणार होते त्यांना ही योजना सांगीतली. योजना ऐकल्यावर एक दोघांनी नाके मुरडली तर काही जणांनी मिळून एक बांध घातला सुद्धा !! पावसाळ्यात पाणी जमा झाले. आजुबाजुच्या विहीरींच्या पाण्याची पातळी वाढली. हे पाहून सर्वांना हुरुप आला. शेवटी आर्थिक परीस्थीती चांगली असणार्या एका काकांनी सरळ बुलडोझर मागवला व ओढ्यातील गाळ काढण्यास सुरवात केली. नुसता गाळ न काढता ओढ्याचे पात्र देखील चार फुटाने खोल केले. abcd abcd abcd abcd abcd abcd abcd नतीजा आपके सामने है. अजुन काम सुरु आहे. या पावसाळ्यात अजुन पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे. abcd थोडक्यात - सरकारी मदत मिळेल कींवा बाकी कोणी काहीतरी करेल या आशेवर न रहाता ज्याला ज्याला जे शक्य आहे ते केल्यास पाणी समस्या सुटू शकते abcd abcd abcd
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
37351 वाचन

💬 प्रतिसाद (63)

प्रतिक्रिया

+१,०००,०००

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 05/27/2016 - 00:17 नवीन
+१,०००,००० दहा लाखाची बात ! तुम्ही आणि तुमच्या सहकारी गावकर्‍यांचे मनःपूर्वक अभिनंदन !!! जो दुसर्‍यावरी (यात सरकारही आले) विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला. किंबहुना जर राजकारण्यांना असे वाटू लागले की जनतेला त्यांची गरजच नाही, तर त्यांच्या पाचावर धारण बसून ते जनतेच्या मागे मागे लागून "तुम्हाला काय हवे ते सांगा ?" अशी मनधरणी करू लागतील !
  • Log in or register to post comments

क्या बात है! मस्त मस्त.......

रेवती
Fri, 05/27/2016 - 00:23 नवीन
क्या बात है! मस्त मस्त.........
  • Log in or register to post comments

डॉक आणि रेवाक्का धन्यवाद.

खटपट्या
Fri, 05/27/2016 - 00:45 नवीन
डॉक आणि रेवाक्का धन्यवाद.
  • Log in or register to post comments

एकदम मस्तच !!!

राघवेंद्र
Fri, 05/27/2016 - 01:16 नवीन
एकदम मस्तच !!!
  • Log in or register to post comments

अरे वा! मस्तच!

रुपी
Fri, 05/27/2016 - 01:48 नवीन
अरे वा! मस्तच!
  • Log in or register to post comments

अतिशय सुन्दर ..

ओसु
Fri, 05/27/2016 - 02:29 नवीन
आत्ता पर्यन्त बरयाच योजना वाचल्या पण हे तर पुराव्यानिशि शाबित करुन दाखविले. ज्यानि ह्यात भाग घेतला त्या सर्वान्चे अभिनंदन
  • Log in or register to post comments

जोरदार

चाणक्य
Fri, 05/27/2016 - 06:33 नवीन
भारी काम केलंय.
  • Log in or register to post comments

स्पृहणीय आहे हे.

प्रचेतस
Fri, 05/27/2016 - 06:38 नवीन
स्पृहणीय आहे हे. छान काम केलंत.
  • Log in or register to post comments

भारीच की

प्रीत-मोहर
Fri, 05/27/2016 - 06:57 नवीन
भारीच की
  • Log in or register to post comments

मस्त काम...

मुक्त विहारि
Fri, 05/27/2016 - 07:00 नवीन
पण फोटो दिसत नाहीत. माझा गणेशा झाला.
  • Log in or register to post comments

आता फोटो दिसायला लागले...

मुक्त विहारि
Fri, 05/27/2016 - 22:09 नवीन
धन्यवाद...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

एकदमच भारी काम की राव!! शाब्बास!!!

चतुरंग
Fri, 05/27/2016 - 07:33 नवीन
आपली पाणी समस्या ही बहुतांश पडणारे पाणी वाहून जाते यामुळे आलेली आहे. योग्य साठवणूक आणि जमिनीतले पाणी पुन्हा भरणे या दोनच गोष्टींनी सुटण्यासारखी आहे. तुम्ही प्रत्यक्ष प्रयोगाने पुरावाच दिलाय. वाडीतले सगळेच खूष असतील! त्या डुंबणार्‍या मुलाचा चेहराच सगळं बोलतोय! :)
  • Log in or register to post comments

मस्त.

शाम भागवत
Fri, 05/27/2016 - 08:08 नवीन
मस्त. अस काही वाचल की छान वाटते. हे वाचून आणखी काही लोकांना स्फूर्ती मिळो. काकांना शुभेच्छा. त्यांचे पर्यंत त्या जरूर पोहोचवा. अवांतर शेवटचा फोटो कुठल्या महिन्यातला आहे ?
  • Log in or register to post comments

शेवटचा फोटो गेल्या

खटपट्या
Fri, 05/27/2016 - 22:22 नवीन
शेवटचा फोटो गेल्या पावसाळ्यातला आहे. या पावसाळ्यातील रीजल्टस अजून छान असतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत

अरे व्वा व्वा व्वा!

अत्रुप्त आत्मा
Fri, 05/27/2016 - 08:26 नवीन
अरे व्वा व्वा व्वा! अनुकरणीय .
  • Log in or register to post comments

टोपी काढून

नाखु
Fri, 05/27/2016 - 08:32 नवीन
लवून मानाचा मुजरा सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे. आनंदी मिपाकर नाखु अवांतर मलाच छायाचित्रे का दिसेनात ती?
  • Log in or register to post comments

चेपूला लॉगइन व्हा. फोटो

खटपट्या
Fri, 05/27/2016 - 22:23 नवीन
चेपूला लॉगइन व्हा. फोटो दीसतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

वाहवा! मस्त! शेवटचा फ़ोटो लै

स्वामी संकेतानंद
Fri, 05/27/2016 - 08:44 नवीन
वाहवा! मस्त! शेवटचा फ़ोटो लै आवडला.. कुठल्या महिन्यात घेतला होता?
  • Log in or register to post comments

शेवटचा फोटो गेल्या गणपतीतला

खटपट्या
Fri, 05/27/2016 - 22:23 नवीन
शेवटचा फोटो गेल्या गणपतीतला आहे. अजुन फोटो येतील त्याप्रमाणे डकवतो..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वामी संकेतानंद

एक नंबर काम, नावाप्रमाणेच

स्पा
Fri, 05/27/2016 - 08:48 नवीन
एक नंबर काम, नावाप्रमाणेच खटपट्या आहात
  • Log in or register to post comments

शेवटचा फोटो म्हणजे कमाल आहे.

जयंत कुलकर्णी
Fri, 05/27/2016 - 08:53 नवीन
शेवटचा फोटो म्हणजे कमाल आहे. गंगाच अवतरली जणू स्वर्गातून !....
  • Log in or register to post comments

+१

सस्नेह
Fri, 05/27/2016 - 11:07 नवीन
शेवटच्या फोटोवरून सगळी मेहनत भरून पावली हे समजलं. स्तुत्य उद्योग !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

दिगोचि

दिगोचि
Fri, 05/27/2016 - 09:00 नवीन
लेखकाचे कोणावरहि अवलम्बुन न राहता स्वतःची पाण्याची समस्या स्वतःच कष्ट करून सोडवल्याबद्दल अभिनन्दन. प्रत्येक नागरीकाला वाटते की सरकारने त्यान्च्याच गरजाकडे प्रथम लक्ष द्यावे. परन्तु देशभरत अशा व याही पेक्षा गम्भीर समस्या आहेत. त्यामुळे स्वावलम्बन हा एक उत्तम उपाय आहे. हेच जर जेथे पाण्याची टन्चाई आहे त्या गावकर्यानी केले तर हा प्रश्न सहज सुटण्यासारखा आहे हे लेखकाने सिद्ध केले आहे. ही त्यान्ची मोठी समाजसेवा आहे.
  • Log in or register to post comments

वा!!! फारच उत्तम कार्य केलेले

नाईकांचा बहिर्जी
Fri, 05/27/2016 - 09:10 नवीन
वा!!! फारच उत्तम कार्य केलेले ग्रामस्थांनी !! शेवटचा फोटो त्या मेहनतीचं चीज़ करणारा म्हणून बघितला गेला, कसले मस्त मस्ती करतायत ते छोटे
  • Log in or register to post comments

फारच छान खटपट्याजी. अभिनंदन!

एस
Fri, 05/27/2016 - 09:22 नवीन
फारच छान खटपट्याजी. अभिनंदन!
  • Log in or register to post comments

खूप मस्त

जगप्रवासी
Fri, 05/27/2016 - 10:28 नवीन
खूप मस्त, शेवटचा फोटो तर एखाद्या रिसोर्ट मधील "लेझी रिवर" चा वाटावा इतका छान आहे. चांगल काम केलात, आमच्या गावात बारमाही पाणी वाहणारा ओढा आहे पण गावकरी त्यावर बांध घालून अडवू देत नाहीत. कितीतरी वेळा बोललोय गावकऱ्यांशी, एकदा तर आम्ही मित्रांनी बांध घातला होता पण गावकऱ्यांनी तोडून टाकला म्हणतात देवाचं पाणी आहे त्याला अडवलं म्हणजे देवाला अडवल्या सारख आहे. बघू तुमच्या सारख आमच्या गावातल्यांना कधी कळणार ते, तोपर्यंत त्यांच्या मागे लागलेलोच आहे बांध घालण्यासाठी.
  • Log in or register to post comments

त्यांना हा लेखच दाखवा!

चतुरंग
Fri, 05/27/2016 - 10:39 नवीन
वाचून चित्रं बघूदेत प्रत्यक्ष घडलेले दिसले की कदाचित बदल होईल...:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जगप्रवासी

हे भारीच

इरसाल
Fri, 05/27/2016 - 10:36 नवीन
खटपट केलीय हं ! छान आणी आवडले.
  • Log in or register to post comments

अतिशय क्रेडिबल काम आहे हे....

वेल्लाभट
Fri, 05/27/2016 - 10:49 नवीन
अतिशय क्रेडिबल काम आहे हे.... प्रचंड स्तुत्य ! ! ! ! ! ! ! जबरदस्त आहात तुम्ही खरंच. आणि याला योगदान देणारे सगळेच. इच्छाशक्तीचा विजय आहे हा.
  • Log in or register to post comments

+१०००००

अजया
Tue, 06/07/2016 - 07:50 नवीन
+१००००० अभिनंदन आणि सलाम खटपट्याभाऊ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

खूपच छान

बापू नारू
Fri, 05/27/2016 - 11:21 नवीन
भारी काम , अभिनंदन .
  • Log in or register to post comments

भारत कधीच महासत्ता बनू शकणार

अभिजित - १
Fri, 05/27/2016 - 11:26 नवीन
भारत कधीच महासत्ता बनू शकणार नाही. इथले बहुसंख्य लोक ( ७० टक्के / ८० टक्के ?? ) हे हरामखोर आणि नालायक आहेत. त्यांना काहीही चांगले बघवत नाही. आता हा शेतकरी स्वताच्या खिशातून काहीतरी करू बघतोय तर त्याला सरकार ने कसा त्रास दिला ते बघा .. http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/nagpur/nagpur-sanjay-tidke-construct-dam/articleshow/52456618.cms मूर्तिजापूर तालुक्यातील सांगवी येथील शेतकरी संजय तिडके यांची वाघजवी शिवारात ४० एकर शेती होती. या शेतातून नाला वाहत होता. त्यामुळे पाच एकराचे सतत नुकसान व्हायचे. २०१३मध्ये या नाल्यावर त्यांनी मातीचा बांध टाकला. नाला वळता केला. त्याचा फायदा झाला. पुढच्या वर्षी पावसाने मातीचा बंधारा वाहून गेला. अखेरीस गेल्या वर्षी त्यांनी या नाल्याचा कायमचा बंदोबस्त करायचा निर्णय घेतला. शिरपुरी बंधारा बांधण्याची कल्पना त्यांच्या डोक्यात आली. यासाठी १५ लाखांचा खर्च अपेक्षित होता. बंधारा झाल्यास दोनशे ते अडीचशे एकराला लाभ होणार होता. त्यामुळे त्यांनी या कल्पनेत आजूबाजूच्या शेतकऱ्यांना सामील केले. साथ मिळाली. कामही सुरू झाले. मंडळ अधिकाऱ्यांना हे काम दिसले. बांधकामासाठीच्या रेतीच्या रॉयल्टीचा मुद्दा उपस्थित करीत मंडळ अधिकाऱ्यांकडून त्रास सुरू झाला. प्रकरण तहसीलदारांपर्यंत गेले. तहसीलदारांनी काम सुरू ठेवण्यास परवानगी दिली. दरम्यान, नव्या तहसीलदार रुजू झाल्या. त्यांनी रॉयल्टीपोटी १ लाख दहा हजार रुपयांची नोटीस बजावली. सरकारी नोटीस येताच सोबत आलेल्या शेतकऱ्यांनी साथ सोडली. त्यांनी माघार न घेण्याचा निर्णय घेतला. दहा एकर शेत विकले. अर्ध्या रकमेतून पाच एकर जमीन घेतली तर अर्धे पैसे बंधाऱ्याला लावले. एका महिन्यात २०७ फूट रुंद व १८ फूट उंच सिमेंट कॉन्क्रिटची भिंत उभी केली. बांधकामादरम्यान शेतकऱ्यांनी माघार घेतली. मात्र, तिडके यांनी त्या शेतकऱ्यांची साथ सोडली नाही. पाण्यावर संपूर्ण गावाचा हक्क आहे, या भूमिकेवर ते ठाम राहिले. आता पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी त्यांच्या कामाची दखल घेतली आहे.
  • Log in or register to post comments

बांधकामादरम्यान शेतकऱ्यांनी

शाम भागवत
Fri, 05/27/2016 - 11:39 नवीन
बांधकामादरम्यान शेतकऱ्यांनी माघार घेतली. मात्र, तिडके यांनी त्या शेतकऱ्यांची साथ सोडली नाही. पाण्यावर संपूर्ण गावाचा हक्क आहे, या भूमिकेवर ते ठाम राहिले.
हे तर विरळाच. _/\_ अशा प्रकारचे अनुभव वारंवार जरी वाचायला मिळाले तरी सर्वांची नकारात्मक भूमिका सकारात्मक होऊ शकेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजित - १

विषण्ण करणारा अनुभव.

कलंत्री
Fri, 05/27/2016 - 14:07 नवीन
सरकारचा रॉयल्टीचा मुद्दा योग्य असला तरी शेत विकावे लागणे हे मात्र योग्य नव्हे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजित - १

सरकारी अधिकार्‍यांच्या

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 06/03/2016 - 08:42 नवीन
सरकारी अधिकार्‍यांच्या असमंजसपणाचा उत्तम नमुना ! "यात माझा काय फायदा ?" अशी अधिकार्‍याची भावना असण्याचा संभव आहे, कारण कायद्याबाहेरील काम असते तर अगोदरच्या अधिकार्‍याने ते त्याच्या अधिकारात मान्य केले नसते. या बाबतीत नुसती दखल घेणे पुरेसे नाही. या प्रकरणाची मंत्रीपातळीवर चौकशी होऊन चुकार अधिकार्‍याला योग्य ते शासन झाले तरच हे नवीन सरकार योग्य दिशेने काम करत आहे असे होईल. शिवाय, जमीन विकावी लागल्याने शेतकर्‍याच्या झालेल्या नुकसानाची सरकारतर्फे भरपाई करणे जरूरीचे आहे आणि त्याची तोशीस काही प्रमाणात तरी चुकार अधिकार्‍याला उचलायला लावली पाहिजे. तरच असा अधिकारांचा बेजबाबदार उपयोग करण्याला आळा बसण्यास मदत होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजित - १

सर्व प्रतिसादकांचे आभार.

खटपट्या
Fri, 05/27/2016 - 11:57 नवीन
सर्व प्रतिसादकांचे आभार. शेवटचा फोटो गेल्या पावसाळ्यातला आहे. पहीला बान्ध बांधला तेव्हाचा आहे. या पावसाळ्यातले टाकतो.
  • Log in or register to post comments

मान्सून कट्टा करा की गावाला

रुस्तम
Fri, 05/27/2016 - 18:51 नवीन
मान्सून कट्टा करा की गावाला. मज्जा येईल ओढ्यात डुंबायला...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

mr.khatpatya, many many

mahesh d
Fri, 05/27/2016 - 13:44 नवीन
mr.khatpatya, many many congratulations on the project done by yourself, what the world needs is people like you to make the world more liveable.
  • Log in or register to post comments

खटपट्याभाऊ, अभिनंदन!

यशोधरा
Fri, 05/27/2016 - 14:13 नवीन
खटपट्याभाऊ, अभिनंदन!
  • Log in or register to post comments

Abhinandan

नि३सोलपुरकर
Fri, 05/27/2016 - 14:16 नवीन
अभिनंदन भाऊ ....
  • Log in or register to post comments

छान!

अनुप ढेरे
Fri, 05/27/2016 - 14:16 नवीन
छान!
  • Log in or register to post comments

छतावरील पावसाचे पाणी

रमेश आठवले
Fri, 05/27/2016 - 19:22 नवीन
गावात ५ विहरी आहेत . त्यांच्या जवळील घरांच्या छतावर येत्या पावसात पडणारे पाणी जर पाइप ने विहिरीत नेउन सोडले तर विहिरीतून वर्षभर पाणी मिळू श्केल. या उपायाला Roof Water Harvesting असे नाव आहे. मी पाण्याचे दुर्भिक्ष्य टाळण्यासाठीच्या या आणि इतर उपायांवर एक पुस्तक लिहिले आहे. त्याची माहिती खाली देत आहे. "Water Harvesting and Sustainable supply of water" by R.N.Athavale. published by Centre for Environment Education and Rawat publications,2003. ISBN No. 81-7033-752-6
  • Log in or register to post comments

ओके...

खटपट्या
Fri, 05/27/2016 - 21:25 नवीन
ओके...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमेश आठवले

प्रत कशी मिळेल

कलंत्री
Fri, 06/03/2016 - 15:05 नवीन
कृपया कळवावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमेश आठवले

येथे पहा

रमेश आठवले
Fri, 06/03/2016 - 20:18 नवीन
http://www.amazon.com/Harvesting-Sustainable-Supply-Environment-Development/dp/8170337526 http://rawatbooks.com/book_more_detail.aspx?id=531
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कलंत्री

येथे पहा

रमेश आठवले
Fri, 06/03/2016 - 20:18 नवीन
http://www.amazon.com/Harvesting-Sustainable-Supply-Environment-Development/dp/8170337526 http://rawatbooks.com/book_more_detail.aspx?id=531
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कलंत्री

अवर्षण

नमकिन
Fri, 05/27/2016 - 20:24 नवीन
उल्लेखनीय योगदान व कामगिरी. जिथे पाऊस पडत नाहीं तिथे सरकार शिवाय पर्याय नाहीं.
  • Log in or register to post comments

भारीच काम कि खटपट्या राव.

अभ्या..
Fri, 05/27/2016 - 21:12 नवीन
भारीच काम कि खटपट्या राव. मेहनत रंग लाई बरंका.
  • Log in or register to post comments

सर्व प्रतिसादकांचे आणि

खटपट्या
Fri, 05/27/2016 - 22:26 नवीन
सर्व प्रतिसादकांचे आणि वाचकांचे पुन्हा एकदा आभार.
  • Log in or register to post comments

नादखुळा ???

शाम भागवत
Sat, 05/28/2016 - 00:12 नवीन
ट्रॅक्टरवर नाद खुळा असे लिहिले आहे. नवरात्र जल जागर धागाकर्ते "नादखुळा" यांचा तो ट्रॅक्टर आहे का? :-))
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा