Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by स्वामी संकेतानंद on Wed, 05/25/2016 - 16:16
'कविता वृत्तात हवी' 'हओ' 'कवितेला लय हवी' 'हओ 'कवितेत सुयोग्य यमक हवेत' 'हओ 'कविता जगातल्या कुठल्याही वाचकाच्या मनाचा ठाव घेणारी हवी' 'मंजे?' 'म्हणजे कविता ग्लोबल हवी रे' 'अच्छा! हओ!' त गुर्जि बोलले अना मी ग्लोबल कविता कराले बसलो एक कागज दोन कागज सतराशेसाठ कागज फाड़लो पर झाड़ीच्या बाहेरची दुनिया नही पायलेल्या मले ग्लोबल कविता काही जमे नही पर मायातला नव्हाड़ा कवि जल्दी हार माने नही मंग गरीबी ग्लोबल रायते त गरीबाईच्या हालावर एक कविता बनली पर सकारी भरपेट जेवलो अना मूड बदलला अना कविता फाड़लो मंग सिलसिला चालु होऊन गेल्ता कास्तकार, खुला व्यापार प्रेमसिंगार, सांज-सकार समताबंधुतामानवता एकेक कविता करत जाऊ अना टर्कन फाड़त जाऊ होऊन गेल्तो हैरानपरेशान विसय ग्लोबल रायला तरी कविता ग्लोबल बने नही नवा शोध लागून गेल्ता मंग लिवाले बसलो मनमाना मनात आला थेच लिहू मायी दुनिया नवती झाडीबाहेर लिवत गेलो झाडीच्या गोठी नागझिरा-नवेगावबाँध वाघ-हिरन-बन्दर-बद्द्या अंजन-परस-टेंभ्रुन-मोहा वैनगंगा-बाघ-बावनथड़ी धानाचे पऱ्हे, गायबैलगोऱ्हे अना कवितेत बांधलो सायनीमायच्या कायन्या मंग घेऊन गेलो कागजाचा गठ्ठा गुर्जीले दाखवलो त गुर्जी मनले, "अरे ही तर ग्रामीण कविता झाली! शुद्ध देशीवादी! ग्लोबल कुठे आहे ही?" तसाच गेलो धावतधावत माड़गीच्या पुलावर उभा रायलो फेकलो आपले सप्पा कागज़ वैनगंगेच्या पान्यात ग्लोबल कविता आपल्या बसची बात नसे भाऊ! आता पान्यात कागद डुलून रायले होते जसे तऱ्याकाठी हिवरा गवत डुलते जावून रायले होते सामोर सामोर घडीच्या काट्यावानी लगातार.. आता पान्यासंग जात रायतीन पुड़े भेटल चुलबन मंग गाढवी भेटल.. खोब्रागडी कठानी वर्धा पेनगंगा भेटतिन मंग प्रानहिता बनून माया कविता भेटतिन गोदावरीले... मंग गोदावरी भेटन बंगालच्या उपसागराले माये सब्द आता करोडो अरबो लीटर पान्याचा हिस्सा होतीन हा पानी फिरल पूरा जगभर सागरी प्रवाह मन्तत याले अना फिरतीन माह्या कविता बांग्लादेस श्रीलंका मालदिव्स थायलैंड इंडोनेसिया ऑस्ट्रेलिया जातीन प्यासीफिकात अटलांटिकात यूरोप अमेरिकेच्या किनाऱ्यावर मंग बरसतीन आफ्रिकेवर, एमेजॉनवर! जगभर जई जई बरसल पानी मायी कविता बरसल भिजवल सप्पा लोकाइले! आयफेल टावरवरुन माया कवितेचे सब्द टपकतीन ऑपेरा हाउसवर माया कवितेचा टपकटपक आवाज येन हूवर धरनामांगं साचल माहीच कविता मावाल्या कवितेवरुन झगड़तीन इजिप्तसूडानइथियोपिया तीसरा महायुद्ध बी होउ सकते माया कवितेवरुन! बांधीत मायी कविता जंगलात मायी कविता पहाड़ीत मायी कविता मैदानात मायी कविता नदीनाल्याइत मायी कविता तलावबोड्याइत मायी कविता गावात मायी कविता सयरात मायी कविता गुलाबजलात मायी कविता गंद्या नाल्यात मायी कविता! माया कवितेवर लिवतिन जगभरचे कवी कविता! माह्या कवितेवर भासन झाड़तिन बड़ेबड़े ग्यानी लोक तिचे महत्त्व लोकाइले सांगतिन..... सांगा याच्या पैले झाल्ति का कोन्त्या कविची कविता येवड़ी ग्लोबल? -- स्वामी संकेतानंद

Submitted by पैसा on Wed, 05/25/2016 - 16:36

Permalink

अहा!

फँटास्टिक!
  • Log in or register to post comments

Submitted by चांदणे संदीप on Wed, 05/25/2016 - 17:20

In reply to अहा! by पैसा

Permalink

:)

फँटाब्युलस्ली फँटास्टिक! :) आवडलीच! Sandy
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on गुरुवार, 05/26/2016 - 10:22

In reply to :) by चांदणे संदीप

Permalink

+१

+१
  • Log in or register to post comments

Submitted by पिलीयन रायडर on गुरुवार, 05/26/2016 - 23:46

In reply to अहा! by पैसा

Permalink

+१२२२१११११११

+१२२२१११११११
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Wed, 05/25/2016 - 16:57

Permalink

आवडली.

ग्लोबल झाडिबोली कविता पोहोचली. वाचायला मजा आली. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by वेल्लाभट on Wed, 05/25/2016 - 17:17

Permalink

वा वा वा वा मस्तच!

वा वा वा वा मस्तच! बढिया जमून राहिलीय कविता....पुरती ग्लोबल
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Wed, 05/25/2016 - 18:00

Permalink

वाह !! नाव बघून धागा उघडला,

वाह !! नाव बघून धागा उघडला, सार्थक झालं.
  • Log in or register to post comments

Submitted by नाईकांचा बहिर्जी on Wed, 05/25/2016 - 18:12

Permalink

भाषा समजली नाही पुर्ण थोड़ी

भाषा समजली नाही पुर्ण थोड़ी थोड़ी कळली शब्दसंपदा विपुल आहे तुमची. आशय मात्र पोचला ठीक ठीक. शुभेच्छा बहिर्जी
  • Log in or register to post comments

Submitted by ए ए वाघमारे on Wed, 05/25/2016 - 18:12

Permalink

याले म्हनते ग्लोबल कविता !.

याले म्हनते ग्लोबल कविता !..कुटे कुटे घुमून आनली राजेहो तुमी..नाहीतर आमच्या कविता सायच्या मोरीतून निघून ओसरीलोक येइस्तोवर टिकत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by एस on Wed, 05/25/2016 - 19:23

Permalink

अफाट!

अफाट!
  • Log in or register to post comments

Submitted by प्राची अश्विनी on Wed, 05/25/2016 - 19:39

Permalink

क्या बात!

क्या बात!
  • Log in or register to post comments

Submitted by रातराणी on Wed, 05/25/2016 - 19:47

Permalink

अप्रतिम!! _/\_

अप्रतिम!! _/\_
  • Log in or register to post comments

Submitted by विवेकपटाईत on Wed, 05/25/2016 - 19:50

Permalink

खरी ग्लोबल कविता.

खरी ग्लोबल कविता.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रीत-मोहर on Wed, 05/25/2016 - 21:23

Permalink

मस्तच. पुर्वी ऐकल्याने आता

मस्तच. पुर्वी ऐकल्याने आता वाचली नाही ;)
  • Log in or register to post comments

Submitted by तुषार काळभोर on Wed, 05/25/2016 - 22:33

Permalink

स्वामींच्या नावाने कविता उघडली

जे ना देखे रवी याच्या वाटेल आपण कधी जात नाही. पण स्वामीचं नाव पाहून उघडल्याचं सार्थक झालं. तरी पण बेळगाव, कारवार, इंदूर, ग्वाल्हेर, सॅन होजे अन झाडीपट्टी सहित संयुक्त महाराष्ट्र झालाच पाह्यजे
  • Log in or register to post comments

Submitted by तुषार काळभोर on Wed, 05/25/2016 - 22:36

In reply to स्वामींच्या नावाने कविता उघडली by तुषार काळभोर

Permalink

एक राह्यलं

बाप्पूसाहेबांची प्रतिक्रिया आल्याशिवाय ही कविता पूर्ण वाटणार नाही. (स्वामीजी, हा तुमच्या लेखनाचा नव्हे, आमच्या सवयीचा दोष समजा)
  • Log in or register to post comments

Submitted by रमेश भिडे on Wed, 05/25/2016 - 23:47

Permalink

वैश्विक कविता झालेली आहे.

वैश्विक कविता झालेली आहे. त्या आळंदी वाल्या कवीनंतर तुम्हीच स्वामी!
  • Log in or register to post comments

Submitted by स्वामी संकेतानंद on गुरुवार, 05/26/2016 - 13:23

In reply to वैश्विक कविता झालेली आहे. by रमेश भिडे

Permalink

कुठे बाप्पा ते आळंदीवाले आणि

कुठे बाप्पा ते आळंदीवाले आणि कुठे मी!!!
  • Log in or register to post comments

Submitted by नाखु on गुरुवार, 05/26/2016 - 09:11

Permalink

त्रैलोकात

घुमविणारे स्वामी... झाडी बोली मस्त वाटायलीय स्वामीदा.. अभिनंदन. अति अवांतर :घरी परसबाग करण्याचे काम निपाटले काय? नाखु परसबागी
  • Log in or register to post comments

Submitted by स्वामी संकेतानंद on गुरुवार, 05/26/2016 - 13:21

In reply to त्रैलोकात by नाखु

Permalink

काम बंद आहे उन्हामुळे!बाबांची

काम बंद आहे उन्हामुळे!बाबांची तब्येतच बिघडली पावसाळा सुरु झाला की ट्रेक्टर फिरवू आणि माती टाकू नवी.
  • Log in or register to post comments

Submitted by बबन ताम्बे on गुरुवार, 05/26/2016 - 17:33

Permalink

अप्रतिम.

खूप आवडली ग्लोबल कविता.
  • Log in or register to post comments

Submitted by सतिश गावडे on गुरुवार, 05/26/2016 - 21:07

Permalink

वाह... सुंदर...

अफलातून कल्पना !!
  • Log in or register to post comments

Submitted by शिव कन्या on Sat, 05/28/2016 - 11:36

Permalink

आवडेश ! लिहीत रहा!

आवडेश ! लिहीत रहा!
  • Log in or register to post comments

Submitted by पद्मावति on Sat, 05/28/2016 - 15:12

Permalink

मस्तं!

मस्तं!
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 3117 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com