Skip to main content

ब्राह्मण समाजाने आता आरक्षणाची मागणी करावी!!!!!

लेखक चंद्रनील मुल्हेरकर यांनी गुरुवार, 19/05/2016 17:29 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या भारतात नवीनच ट्रेंड आला आहे,ज्या जाती ,जातसमूह उच्च समजले जात होते त्यांनी आता आरक्षण मागायला सुरवात केली आहे.एकतर आरक्षण काढा नाहीतर आम्हालाही आरक्षण द्या अशी मागणी जोर धरु लागली आहे.सुदैवाने किंवा दुर्दैवाने आरक्षणाची कमाल मर्यादा ५०℅ आहे.त्यामुळे नवीन जातसमुहांना आरक्षण देणे अशक्य झाले आहे. ज्या जाती आरक्षणाची मागणी करत आहेत त्यात प्रामुख्याने मराठा,जाट,गर्जर,पटेल या जाती येतात ,यांची लोकसंख्या प्रचंड आहे.आरक्षणासाठी आता या जाती हिंसक झाल्या आहेत ,विधिमंडळांमध्ये यांचे प्रतीनिधित्व प्रंचंड असल्याने लवकरच घटनाबदल होऊन आरक्षाणाची कमाल मर्यादा वाढवली जाईल,त्याचा या जातींन फायदा होईल.यामुळे केंद्रीय व राज्य पातंळीवरचे आरक्षण ८० % पर्यंत जाईल. ज्या जाती राहतील त्यांना मात्र सर्वच ठीकाणी संधी नाकरली जाण्याची शक्यता आहे,राअहीलेल्या २०% जागेत महीलांचे ३३℅ आरक्षण येईल व पुरुष उमेदवारांच्या हातात कटोरा येईल ,यात प्रामुख्याने ब्राह्मण जात येते.भारताताचे intellectual asset जर मांडले तर त्यात ब्राह्मणांचे स्थान सर्वात पुढे आहे.या जातीला जर शिक्षणाच्या संधी नाकारल्या तर भारतातला हा बुद्धीवादी वर्ग पिछाडीवर जाण्याची शक्यता आहे.त्यामूळे ईतर जातींबरोबर आता ब्राह्मणांनीही आरक्षणाची जोरकस मागणी करणे गरजेचे आहे.नाहीतर ब्राह्मण वर्गाचे असित्व धोक्यात येण्याची शक्यताआहे.ब्राह्मणांनी आता हे करावे... १.सर्व समाजाने प्रांतभेद ,पोटजात हे भेद विसरुन अखिल भारतीय स्तरावर एकत्र यावे २. आरक्षण म्हणजे कुबड्या हे जरी काही अंशी खरे असले तरी प्रतिनिधीत्व नाकारले जाण्यापेक्षा आरक्षण बरे याचा विचार करावा. ३. मोठ्या प्रमाणात निर्णय प्रक्रीयेत सामिल होऊन आरक्षणाची मागणी राजकीय पक्षांसमोर लावून धरावी. ४. ब्राह्मण समाजाला अल्पसंख्य समाजाचा दर्जा मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत,अल्पसंख्य समाजाचा दर्जा मिळाल्यानंतर खास त्या समाजासाठीच्या शिक्षणसंस्था व इतर संस्था काढता येतात.त्याचा ब्राह्मण समाजाला फायदाच होईल.

वाचने 33786
प्रतिक्रिया 95

प्रतिक्रिया

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कारवाई झाली, यावेळेला "पाठींबा+वरदहस्त" कमी पडला असावा. असो अजून इतर अवतार असतील्च, वरतीच एक दोन जणांनी प्रमाण दिले आहे. आणि ते खरे(पक्षी वास्तव) असेल त्यांचा हेतु उघड आहे विद्वेषाचे वातावरण तयार करणे, धाग्यात ओढून ताणून ब्राह्मण आणणे आणि मग नेहमीचीच मंडळी गोळा करून दुस्र्याच्या दु:खद आणि जीव्घेण्या प्रसंगालाही कल्पनाविलास असे हिणवणे. एकच शेवटचा प्रश्न मिपा अस्सल विचारवंताना आणि उच्चाभ्रूंनाही (आणि त्या दिवशी खफवर असणार्या धुरीणांनाही)

"तेव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म"

रोख ठोक आणि तरी मिपावर मनापासून प्रेम असलेला नाखु. ता.क. आम्ही मिपा सोडून इतर कोठेही नाहीत आणि नसूही.

In reply to by नाखु

इंग्रजीत एक म्हण आहे, "बेटर लेट दॅन नेव्हर." (मिपावर मनापासून प्रेम असलेला) मुवि.

चांगला प्रयत्न. आधीच मेलेल्याला अजून किती मारणार? आम्ही म्हणतो फेडू देत पुर्वजांची पापे आम्हाला. संशई मन--- भडकवण्यचा प्रयत्न की काय? जपून रे बाबा सगलेजण एक गरीब ब्राम्हन स्त्री

In reply to by ईश्वरसर्वसाक्षी

सुखीबाईमानूस असे नाव असायला पाहीजे :)

In reply to by खटपट्या

सुखी बाईमाणुस हे गुलबकवालीचं फूल किंवा नागमण्याइतकं मिथकीय अन दुर्लभ दृश्य आहे इतके म्हणतो. बाकी चालु देत

तुमचं सगळ्यांच झाल असेल तर कोणी मला सांगेल का की, "सैराट" रिलीज झाला का ? ;)

In reply to by इरसाल

कारण, एक ४-५ धागे येवून गेले. पण असे कितीही सैराट आले तरी, माणूस आपापले धोतर आणि साडीच सांभाळत बसणार.

चला नवे विधेयक मांडा आता संसदेत. जात्यांतर हक्क विधेयक. धर्मांतर करायचा हक्क आहे पण जात्यांतर नाही. हा काय चावटपणा आहे? अहो हल्ली तर म्हणे लिंग देखील बदलता येते. चला पटापट जाती बदलून घ्या. जात न मानणार्‍यांची पण एक अजात करुन टाका. त्यात पण प्रवेश घेता आला पाहिजे.

In reply to by प्रकाश घाटपांडे

शेवटच्या दोन वाक्यांबद्दल : बर्‍याच वर्षांपूर्वी एक लेख वाचनात आला होता. एका कुठल्याशा गावातले सर्व लोक एकत्र आले आणि त्यांनी स्वतःच्या जातीचा त्याग केला. तर पुढे स्वातंत्र्य मिळाल्यावर सरकारी यंत्रणेने या सगळ्यांना 'अजात' नावाच्या एका नवीन जातीत ढकलून दिले. आता काय करावे अशांना?

टनाटनी धर्माच्या कपट काव्यामुऴे विशिष्ट हक्क उपभोगलेल्यालेल्या आपणांना आ'रक्षण मिऴणार नाही!

आरक्षणाची आंदोलना करून वेळ घालवण्या पेक्षा कष्ट करून कोरडी भाकरी चटणी मिळाली तरी चालेल....कष्ट आणि क्षमता यात वाढ करण्या पेक्षा दुर्दैवाने आपण राजकीय लाभ मागत बसलो आहोत....जग कुठे चाललंय, आपण काय मागणी करतोय...त्याही पेक्षा ब्राह्मण समाजाने घरातील संस्कार न विसरता खाली मान घालून काम केले तर कसल्याही आरक्षणाची, चाटूगिरीची गरज नाही...आरक्षण घेतले कि वोट बँक तयार होते आणि कोणाला तरी मिंधे होऊन टोळी युद्धात सामील व्हावे लागते...चुलीत गेल आरक्षण...हे म्हणजे स्वस्थ माणसाने उगीच अपंगाची गाडी वापरण्या सारखे आहे...सरळ मर्सिडीज घ्यावी आणि सुटावे ना भररर ....आणि ब्राह्मण समाज पिछाडीवर जाईल वगेरे शक्यता नाही....जगात एवढ्या संधी असताना जर आपण त्याचा उपयोग नाही करू शकलो तर पिछाडीला जाणारच...आरक्षण असो व नसो...आज गुजराती, मारवाडी अथवा पंजाबी हे संपूर्ण लोक संख्येच्या ३-४ टक्के आहेत...त्यांना अशी भीती वाटत नसावी...कोणी संधी नाकारल्याने कोणी संपत नसते...

नयनी झणझणीत अंजन घातल्याबद्दल धन्यवाद!!! हमेरीकेसाठी लगोलग ब्यागा भरावयास घेतल्या आहेत. तिथे पुढील २००-५०० वर्षे तरी काळजी नसावी. २००-५०० वर्षानंतर मग तिथेही केवळ आम्हीच पुढे कसे काय? असा प्रश्न आला तर मग मात्र मंगळ किंवा बुधावरच वस्तीस जावे लागेल. असो!! तेव्हाही तुमचे असे कळकळीचे मार्गदर्शनपर सल्ले येतील हि मनातून खात्री आहेच.

बोलघेवडा, वाचतांना 'बुधवारच वस्तीस' असे वाचले. बुध आणि बुधवारवस्ती दोन्ही पराकोटीच्या उष्ण आहेत असे ऐकिवात आहे. त्यामुळे गोंधळ झाला असावा. ;-) आ.न., -गा.पै.