Skip to main content

ब्राह्मण समाजाने आता आरक्षणाची मागणी करावी!!!!!

लेखक चंद्रनील मुल्हेरकर यांनी गुरुवार, 19/05/2016 17:29 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या भारतात नवीनच ट्रेंड आला आहे,ज्या जाती ,जातसमूह उच्च समजले जात होते त्यांनी आता आरक्षण मागायला सुरवात केली आहे.एकतर आरक्षण काढा नाहीतर आम्हालाही आरक्षण द्या अशी मागणी जोर धरु लागली आहे.सुदैवाने किंवा दुर्दैवाने आरक्षणाची कमाल मर्यादा ५०℅ आहे.त्यामुळे नवीन जातसमुहांना आरक्षण देणे अशक्य झाले आहे. ज्या जाती आरक्षणाची मागणी करत आहेत त्यात प्रामुख्याने मराठा,जाट,गर्जर,पटेल या जाती येतात ,यांची लोकसंख्या प्रचंड आहे.आरक्षणासाठी आता या जाती हिंसक झाल्या आहेत ,विधिमंडळांमध्ये यांचे प्रतीनिधित्व प्रंचंड असल्याने लवकरच घटनाबदल होऊन आरक्षाणाची कमाल मर्यादा वाढवली जाईल,त्याचा या जातींन फायदा होईल.यामुळे केंद्रीय व राज्य पातंळीवरचे आरक्षण ८० % पर्यंत जाईल. ज्या जाती राहतील त्यांना मात्र सर्वच ठीकाणी संधी नाकरली जाण्याची शक्यता आहे,राअहीलेल्या २०% जागेत महीलांचे ३३℅ आरक्षण येईल व पुरुष उमेदवारांच्या हातात कटोरा येईल ,यात प्रामुख्याने ब्राह्मण जात येते.भारताताचे intellectual asset जर मांडले तर त्यात ब्राह्मणांचे स्थान सर्वात पुढे आहे.या जातीला जर शिक्षणाच्या संधी नाकारल्या तर भारतातला हा बुद्धीवादी वर्ग पिछाडीवर जाण्याची शक्यता आहे.त्यामूळे ईतर जातींबरोबर आता ब्राह्मणांनीही आरक्षणाची जोरकस मागणी करणे गरजेचे आहे.नाहीतर ब्राह्मण वर्गाचे असित्व धोक्यात येण्याची शक्यताआहे.ब्राह्मणांनी आता हे करावे... १.सर्व समाजाने प्रांतभेद ,पोटजात हे भेद विसरुन अखिल भारतीय स्तरावर एकत्र यावे २. आरक्षण म्हणजे कुबड्या हे जरी काही अंशी खरे असले तरी प्रतिनिधीत्व नाकारले जाण्यापेक्षा आरक्षण बरे याचा विचार करावा. ३. मोठ्या प्रमाणात निर्णय प्रक्रीयेत सामिल होऊन आरक्षणाची मागणी राजकीय पक्षांसमोर लावून धरावी. ४. ब्राह्मण समाजाला अल्पसंख्य समाजाचा दर्जा मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत,अल्पसंख्य समाजाचा दर्जा मिळाल्यानंतर खास त्या समाजासाठीच्या शिक्षणसंस्था व इतर संस्था काढता येतात.त्याचा ब्राह्मण समाजाला फायदाच होईल.

वाचने 33554
प्रतिक्रिया 95

प्रतिक्रिया

In reply to by अद्द्या

जरा जुन्या इंग्लीश सिनेमाबद्दल लिहायचं मनावर घे रे बाबा.. बरेच दिवसात व्य्क्तीचित्र नाही आलं एखादं. कोल्हापुर कट्ट्यात प्रगो-अद्याच्या सिनेमा गप्पा ऐकलेला नाखु

In reply to by स्पा

आजच मुलाने बघीतला.... ४ डी मध्ये.... मला म्हणाला , "तुम्ही पण बघा." भेंडी, साडे-चारशे रुपये दिवून सिनेमा बघायची, हिम्मत होत नाही. कुवैत असतांना एकदा ३ के.डी. देवून जेम्स बाँडचा (क्वांटम ऑफ सोलेस) काट-छाट केलेला सिनेमा बघीतला होता. तेंव्हा परवडत होते. शेतकरी माणसाला असली (साडे चारशे रुपयात सिनेमा बघायची) चैन परवडत नाही.

१.सर्व समाजाने प्रांतभेद ,पोटजात हे भेद विसरुन अखिल भारतीय स्तरावर एकत्र यावे हे आणि इतकच जमतंय का बघा करायला! बाकी गेट वेल सून! :)

आमचं आरक्षण कोर्टाने स्थगित केलं हे उत्तमच झालं. बाकि,हा देश सोडावा वाटतो ते या आणि अशा अनेक कारणांसाठी,वैताग आणलाय नुस्ता.

धडाम्म्म्म्म ! धमाकेदार धागा ठरण्यासाठी शुभेच्छा!

मी पान खात नाही. खात असतो तर घरी पिकदाणी ठेवली असती. आणि तिचं नाव आरक्षण ठेवलं असतं. -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

तुम्ही काय कराल हे कोणी विचारले आहे हो साहेब? अन तुम्ही पिकदाणीचं नाव ठेऊन फरक कोणाला पडणार आहे? अर्थात कश्यात काय नाय अन "मी काय केले असते" ची फालतू कॉमेंट टाकून तुम्ही पान न खाताच एक कॉमेंट रूपी पिंक टाकली आहे अन मिपाची पिकदाणी केली आहे बरंका गामाजी ************ धागालेखकाचे मानसिक संतुलन बिघडलेले दिसते! सुसाट फालतू "लेख"(!) लिहित बसले आहेत च मु ! म्हणे ब्राह्मण नसले तर देशाची बौद्धिक पातळी कमी होईल! हाइट आहे राव हसावे का रडावे तेच कळेना!

In reply to by नाईकांचा बहिर्जी

नाईकांचा बहिर्जी, मग मिसळपाव हे नाव बदलून आरक्षण हे नाव ठेवूया म्हणता? नको बुवा. आरक्षण वाईटच असतं. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

ते वाईट(च) असतं वगैरे वैयक्तिक आवेश अन मान्यता रोज आरश्यापुढं उभारून 1000 वेळा स्वतःला स्वतः सांगत बसा हो साहेब! परत पिंक टाकली तुम्ही! आरक्षण तुम्हाला वाईट वाटत असेलही तरीही तुम्हाला कोण तसं विचारतंय? आधीही तेच आता पण तेच तुम्हाला विचारले कोणी म्हणतो मी ? म्हणे पिकदाणी काय वाईटच काय! कश्यात काय नाय तर जालीय जगात स्वतःच्या कट्टरपणाची झैरात करणारे लोकं कैच्याकै असतात राव!

In reply to by नाईकांचा बहिर्जी

नाईकांचा बहिर्जी, अहो, तुम्हाला माहित नाही की मला न विचारता पचकायची सवय आहे ते? स्वत:स बहिर्जी म्हणवून घेता, आणि इतकंही ठाऊक नाही ! कमाल आहे !! धागालेखकाने माझी सवय जाणून खास माझ्यासाठी म्हणून ही धागारूपी पिकदाणी उघडलीये. मग चारदोन पिंका टाकल्या तर काय बिघडलं? आ.न., -गा.पै.


In reply to by _मनश्री_

.

पहली गोष्ट सरकारी नौकर्या आहेत किती. निजी क्षेत्रात नौकरी देणारे आरक्षित वर्गाला नौकरी देण्याचे टाळतात. आरक्षण मिळ्याल्यास मेहनत करणे लोक सोडून देतात. परिणाम अन्य क्षेत्रात नुकसान होते.

In reply to by विवेकपटाईत

आरक्षित वर्गाला तुम्ही ट्रीट करत असाल तसेच खासगी कंपनीही करतात हे ठोकुन दिलेले विधान एकंदरित लैच मजेदार वाटलेले आहे! असो

हे ग्रेटथिंकर साहेबांचे नवे अवतार काड्या सारु पाहतायत लोकहो. शाने व्हा नि दुर्लक्ष करा. (पुरावा : हाच लेख ऐसीवर पण आहे..!!)

मला वाटलं प्रतिक्रीयेत लोक्स काड्या सारतात. इथे धागा काडीबरोबर एकात्म पावला आहे. जय हो !

In reply to by श्री गावसेना प्रमुख

मी एका ब्राह्मण कुटुंबाचा अनुभव सांगितला होता,सर्व ब्राह्मणांना मी त्यात ओढत नाही,आणि ते कुटुंब संघाच्या पठडीतले होते, ज्याच्या मी विरोधात आहे.

In reply to by चंद्रनील मुल्हेरकर

तो ग्रेटथिंकर तुमचा कोण?त्याने तुमचा लेख ढापला ना आता तुम्ही त्याच्या चार पिढ्यांचा उद्धार करावा अशी आमची इच्छा।

ಢೊಢೊಢೊಡೊಒಛೆಛ್ಖೊಟೋಷಥಷೊಪಪೂಟೊಛಥಛೊಡೂಋಜೃಗಾಗಾಛಾಫಾಪಪಾಋಠಫೃಋಠಾಛಛ್ಜ್ಜ್ಅಝ್ಝ್ಅಝಝ್ಘ್ಝ್ಝಝಝೂಋಢೋಡೋಬಬೂಬಫೂಫೂಠ್ಫೊಸಥಸಥಷರಶರವಥನಥನನೊಪೊಪೊಡೊಒಢೋಢೋಢಧಝೌಝೌಘೆಗಗಾಖಾಛಾಛಡೃಠೃಡೂಬಡಢಢಢ್ಆಜೃಡೋಬೋಪದಸಲಷದಸ ರ ಷಯಷರಫಲಬದಡದಢಲಢಧಣೋಞೋಞಙೊಙಝೃಋಓದಫದಫಫಥಲಷಥಸೊಷೋಷೊಫೊಬಬೊಊಡಫದದಬಲಡಬಲವಠವಧಡಂಅಂಅಂಭೌಭೌಢೌಢೌಞೆಙಙೆಙೆಙೆಙಿಙ್ಫಞ್ಞಾಞಾಞೃಞೃಞೌಔಢಮಣಯಹಯಹರಸರಲಸಸವಸಶಸನಬದಬಡಥಢೊಓಝೃಝಗೃಜಾಗೃಗೋಖುಖಖಖಜಡೂಡೊಡುಒಡಜೊಜದಡರಡಥಡಠೋಅಂಟಥಟೈಬೈಢೊಝೋಝೃಝೋಜಧಗಧಗಡೌಬಧಬಧಬಠಂಸಸೇಸೌಸೇಏಸಹೌಬೆಬೆಡೆ असे माझे मत आहे.

भारताताचे intellectual asset जर मांडले तर त्यात ब्राह्मणांचे स्थान सर्वात पुढे आहे.
ह्म्म्म ओके...

In reply to by खटपट्या

मला कधी नव्हे ते कोणीतरी हुष्षार म्हणतय तर तुम्हाला बघवत नाही काय? ;) बरं, मग व्हेगसचे बुकिंग झाले काय?

In reply to by रेवती

मणूश्य स्वभाव ! आणखी काय !! :) व्हेगससाठी हॉटेल बूक झाले, गाडी बूक झाली. आता ऑफिसची कामे संपवतोय. ऊगाच डोक्यात भूणभूण असली तर ट्रीपची मजा जाते...

केवळ अल्पसंख्य आहे या निकषावर ब्राह्मण समाज आरक्षण मागत असेल तर ते योग्य नाही. आरक्षण हे दुर्बलांसाठी असते.मुख्य प्रवाहात सामील होता यावे यासाठी. ब्राह्मण समाजातील काही लोक आर्थिकदृष्ट्या गरीब असतील ही. पण आरक्षण हे सध्या तरी आर्थिक निकषांवर नाही. ओव्हरऑल ब्राह्मण समाज सांस्कृतिक, बौद्धिक, सामाजिक दृष्ट्या दुर्बल तर नाहीच नाही पण संपन्न आहे. सगळेच उठसूठ आरक्षण मागत बसले तर ज्यांच्यासाठी खर्‍या अर्थाने आरक्षण आहे तो समाज दूर राहिल व भलतेच लोक त्याचा लाभ उठवतील. आत्ताही ते होतेच आहे पण अजून मोठ्या प्रमाणात होईल.

In reply to by प्रकाश घाटपांडे

महाराष्ट्राची नवी संस्कृती विविध सणांना बुलेट गाड्या व झेंडे घेऊन रात्र-रात्र जन"जागृती" करण्याची असल्याने, ब्राम्हण समाजास बुलेट गाड्यांच्या खरेदीत आरक्षण व जे नॉन-क्रिमी लेअर वाले आहेत त्यांना बुलेट गाडी खरेदी साठी अनुदान/सूट मिळावी यासाठी जोरदार मागणी आवश्यक आहे. ह.घ्या.

देशभरातील संघाटीत ब्राह्मणांचे प्रमाण - २.४५% सर्वात जास्त संघटीत जात , मराठा = ७१.७३% ( सोर्स : मासिक परशुराम सप्टे २०१५) आंतरजातीय विवाहाबाबत शासकीय आकडेवरी = ब्राह्मण वर अथवा वधु - ५७.४०% / मराठा वर अथवा वधु ४.५३ % या असल्या भाकड गोष्टीतून ब्राह्मण समाज केव्हाच बाहेर पडला आहे !

In reply to by विटेकर

म्हणजे, ब्राह्मणांमध्ये (२.४५*५७.४०% = ) १.४१ आंतरजातीय विवाह होतात. मराठ्यांमध्ये (७१.७३*४.५३% = ) ३.२५ आंतरजातीय विवाह होतात. गणित बरोबर असेल, तर मराठा आंतरजातीय विवाहाचं प्रमाण अधिक आहे असं दिसतंय ;)

In reply to by sagarpdy

मान्य आहे. सर्व जातींच्या १०० लोकांमागे ३.२५ मराठा जातीचे आंतरजातीय विवाह होतात. या अर्थी प्रमाण म्हणत होतो. ------ असो. मुद्दा असा आहे की लहान पॉप्युलेशनमध्ये बदल घडवून आणणं मोठ्या पॉप्युलेशनमध्ये बदल घडवून आणण्यापेक्षा सोपं असतं. (दहा मुलांच्या वर्गाला कंट्रोल करणं दोनशे मुलांच्या वर्गाला कंट्रोल करण्यापेक्षा सोपं असतं तसं.) त्यामुळे, जर पॉप्युलेशन असमान असेल तर टक्केवारी न पाहता अ‍ॅबसोल्यूट संख्या पाहिली पाहिजे.

In reply to by आदूबाळ

मान्य. फक्त कोठे सुधारणेला अधिक वाव आहे हे विसरलं जाऊ नये. आणि गणलेली वा गोंधळ निर्माण करणारी सांख्यिकी आधाराला घेऊन कायपण अनुमानांकडे बोट दाखवले जाऊ नये एवढेच.

In reply to by आदूबाळ

आपण सनदी लेखापाल आहात का हो! "Statistics are deceiving" हे आपण अतिशय भारी आकड़ेमोड़ करुन दाखवले! आवडली ही स्टाइल!!

ब्राह्मणांना ऑलरेडी एक प्रकारचे आर्थिक आरक्षण आहेच ! "ब्राह्मणांची ढ पोरं काय करतात" नावाचा एक अप्रतिम लेख वाचनात आला होता , त्यात मांडलेली मते कितीही कटु वाटली तरी खरी आहेत हे पटायला लागले आहे . सत्यनारायणसारखी , धर्माच्या कोणत्याही ज्ञानकांडांचा , उपनिषदे, वेद , वेदांत, गीता ह्यातील कशाचाही तिळमात्र स्पर्षही नसलेली पुजा ही ढ ब्राह्मणांसाठीची रोजगार हमी योजनाच आहे ! आणि हे एक प्रकारचे आरक्षण आहेच , तेही जवळपास हिंदुधर्माच्या अंत्काळापर्यंत टिकेल असे ! आणि माझ्या मते इतके आरक्षण पुरेसे आहे ब्राह्मण समाजाला!

In reply to by टवाळ कार्टा

टक्या आमच्या घरात एक मृत्यु झाल्यानंतर उदकशांतीनंतर, विनायकशांत, आणखी कसली तरी शांत अशा एकूण तीन-चार शांत्या करायला सांगितल्या होत्या एका गुर्जींनी. २००७ साली या सर्वाचा मिळून साधारण १०००० खर्च सांगितला होता. शेवटी उदकशांत करुन गप बसायला लावलं होतं मी!! तरीही ते गुर्जी कधी कोणत्या कारणाने भेटले की जुनं तुणतुणं वाजवत असत. थोडक्यात काय आपण आपलं डोकं चालवलं नाहीत तर एक प्रकारचा दरोडाच तो!! फक्त चितळ्यांच्या साजूक तुपात घोळून नंतर प्रसाद नामक शिरा हातावर ठेवणारा.

In reply to by सूड

डोकं चालवलं नाही तर सर्विस सेंटरवाला पण प्रत्येक सर्विसिंग ला ओईल चेंज करायला सांगतो, एअर फिल्टर बदलायला लावतो. सायकल वाला पण छोट्या फ्रेम ची, स्प्रिंग असलेली सायकल गळ्यात मारतो. डॉक्टर दर महिन्याला हजार टेस्ट आणि नाही-नाही ती ऑपरेशन करायला लावतो, गोळ्या खाऊ घालतो सर्विस कंपन्या काही अक्कल नसताना प्रोजेक्ट करू अशी हमी देतात (नंतर एस्केलेशन होतात) बऱ्याच लोकांच्या मते चहावाल्याने तर शिरा पण नाही दिला हाती. प्रत्येक माणूस टपलाय गंडवायला. पण दरोडा ? मार्केटिंग म्हणतात याला.

In reply to by प्रसाद गोडबोले

सगळ्यांना नाही जमत हो पूजा सांगायला येत. आणि लोक येतात श्रद्धेने. कोणी मलाच बोलवा म्हणत नाही. बाकी असोच.

In reply to by प्रसाद गोडबोले

फक्त ढ मुलंच पौराहित्य करतात हे कुठे लिहिले आहे? गणपती उत्सवादरम्यान वर्तमानपत्रात अनेक वेळा बातम्या येतात. एरवी वर्षभर गळयाला टाय लाऊन एसी ऑफिसमध्ये चांगल्या ठिकाणी, चांगल्या हुद्दयावर आणि चांगल्या पगाराची नोकरी करणारे सुध्दा गणपती उत्सवादरम्यान मुद्दामुन दहा दिवस सुट्टी घेऊन धोतर आणि झब्बा घालुन केवळ आवड म्हणुन गणपतीची पूजा सांगतात. सत्यनारायणाची किंवा इतर पूजा सांगणे हे कोणालाही सहज जमण्यासारखे काम नक्कीच नाही आहे. इतर काही जमत नाही म्हणुन करा पौराहित्य, इतके ते नक्कीच सोपे नाही आहे. शिवाय फक्त ब्राम्हण समाजानेच पौराहित्य केले पाहिजे असे नाही. आजकाल अनेक देवळांमध्ये अब्राह्मण लोक पुजारी असल्याचे सर्रास बघायला / वाचायला मिळते. आता पौराहित्यामध्ये पुर्वीसारखी ब्राम्हण लोकांची मक्तेदारी राहिली नाही आहे. पौराहित्य म्हणजे ब्राह्मणांसाठीची रोजगार हमी योजना हा उल्लेख खटकणारा आहे. ब्राम्हणांना कधी आरक्षणाच्या कुबड्यांची गरज लागली नाही आणि यापुढेही लागणार नाही.

In reply to by भाते

शत प्रतिशत सहमत ! नेमकी पोट्दुखी काय आहे हे केव्हाच लक्षात आले आहे , आडून आडून लिहिले तरी विखारी द्वेष बाहेर पडतोच पडतो !

In reply to by प्रसाद गोडबोले

ब्राह्मणांची ढ पोरं काय करतात" नावाचा एक अप्रतिम लेख वाचनात आला होता , अनिता पाटलांच्या ब्लॉगवर वाचला होता बहुतेक मी हा लेख.

श्री. चंद्रनील मुल्हेरकर साहेब, आपण इथे आहात? मि आपली वाट "त्या" धाग्यावर बघतोय... (अजुनहि प्रतिक्षेत असलेला) अनिरुद्ध