Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by घाटी फ्लेमिंगो on Tue, 05/10/2016 - 14:39
लेखनविषय (Tags)
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
अनुभव
आज येक वरिस झालं बगता बगता... हिकडं ईवुन... जवा कळालं व्हतं की परदेशात नोकरीधंद्याला जावं लागनार तवा पन इस्वास बसला नव्हता... अन आता पन तशिच गत झालीया... मानूस म्हंजे एक ठिपका हाये असं देवळातलं आन्ना म्हनले व्हते... पन त्याच्या जिवणात जर अशी वर्स ठिपक्यावानी पटा-पटा जाऊ लागली तर कवा म्हातारपन आलं समजनार पन न्हाई...!! येक वर्सात लै नवी लोकं भेटली... नवं मित्र जालं... लै ठिकानी फिरुनशान आलू... लै फोटू काडलं... येकीकडं बायका-पोरास्न सोडून आल्याचं दुख होतं पन नव्या ठिकानी जाऊन आल्याचा आनंद पन व्हता...! ज्या गोर्या लोकास्नी लांबूनच बगत व्हतॊ त्यांच्याच देशात नव्हं... घरात त्यांच्याबरुबर राहन्याचा अनुबव परिस घेतला. भाहेरचा अनुभव येगळा तर कामाच्या ठिकानचा येगळा... ही गोरी लोकं आपल्या बापाची सख्खं नसत्यात येवडच बोललं जातं जगभर... पन तुमच्या जीवाची अन कष्टाची येकझाक्ट किंमत करनं पन ह्यांच्याकडनंच शिकावं...! तु कामाला शाना तर आमी तुझ्याशी शाने... येवड्या साध्या नियमात... सगळ्यांना येकाच पारड्यात तोलनारे...! सायबापासून ते साफसफाई कामगारापर्यंत सर्वांनाच मानुसकीचा अधिकार देनारे... हापिसात असलं की मान मोडून काम करनारे... अन सुट्टीला सायबाच्या बापाला न इचारनारे...! कामाच्या येळी काम... अन चैनीच्या येळी चैन...! कामात चैन अन सुट्टीला बैल असली गत न्हाई...! येरबाळीच कामाला सुरवात करनार अन दिस मावळ्ळा की लगोलग जेवन करुन झोपून जानार...!! रस्त्यावर सगळे नियम पन पाळतात. समोरुन गाडी आली तर तेला आदी जा म्हनत्यात. आधी जानारा कशी जिरवली म्हनुन जात न्हाई तर हात दाखवून... धन्यवाद दिवून जातुया. चालनारा तर लांबून दिसला की मागंच गाडी थांबवत्यात. गाड्या हिरवा दिवा लागल्यादिकून फुडं जात न्हाईत... पिवळ्याला जोर वाढवत न्हाईत... कमी करत्यात...! गुड मार्निंग म्हनायला ओळख लागत न्हाई... की हसून बोलायला पाळख लागत न्हाई...! बायका-पोरी छोटं कापडं घालत्यात म्हनुन संस्कार न्हाईत म्हनावं तर तसल्या कापडांत रात्रिच्या दोन वाजता येकली बाई सुखरुप एकटी घरी येतीया... मग ह्यो पोरा-बाप्यांचा चांगुलपना म्हनावा का...!? विंग्रजीचं भुत आपल्याला आपल्या देशात अन आपल्या लोकांत जेवडं मानेवर बसतया तेवडं हितं शान्यासारकं वागतया... बेशिकली हि आपली भाशा नव्हं हे ते लोक लगीचच समजून घेत्यात... आपनच कार-कुर करत बसतुया...! इतक्या दिवसात डोस्क्यात असलेली बरीच खुळं ह्या मागच्या एका वर्साच्या अनुभवात पार धुतली गेली...! अनुभवाचं आनखी एक गठूडं टकुर्यावर बसल्यागत झालया...! आपल्या गावाला... लोकान्ला... घराला... मागं सोडून आल्याचं दुख कायम असतया पन भाईर पडल्यावर येनार्या अनुभवातुन मनाची होत जानारी मशागत फुडचं आयुष्य समॄद्ध करत जानार येवडं नक्की...!!! घाटी फ्लेमिंगो
  • Log in or register to post comments
  • 16711 views

प्रतिक्रिया

Submitted by प्रीत-मोहर on Tue, 05/10/2016 - 14:47

Permalink

मिपावर स्वागत फ्लेमिंगो :)

मिपावर स्वागत फ्लेमिंगो :) भाषेचा लहेजा आवडला . परदेसातले अजुन अनुभव वाचायला आवडतील :) लिहत रहा.
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Tue, 05/10/2016 - 14:52

Permalink

बायका-पोरी छोटं कापडं

बायका-पोरी छोटं कापडं घालत्यात म्हनुन संस्कार न्हाईत म्हनावं तर तसल्या कापडांत रात्रिच्या दोन वाजता येकली बाई सुखरुप एकटी घरी येतीया
कधी असे इथे बघायला मिळणार
  • Log in or register to post comments

Submitted by सायकलस्वार on Wed, 05/11/2016 - 20:27

In reply to बायका-पोरी छोटं कापडं by टवाळ कार्टा

Permalink

कधी असे इथे बघायला मिळणार

कधी असे इथे बघायला मिळणार
'असे' म्हणजे काय? छोटी कापडं घातलेल्या बायका-पोरी?
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on गुरुवार, 05/12/2016 - 16:34

In reply to कधी असे इथे बघायला मिळणार by सायकलस्वार

Permalink

याला म्हणतात सिलेक्टिव्ह

याला म्हणतात सिलेक्टिव्ह रिडिंग :)
  • Log in or register to post comments

Submitted by पिलीयन रायडर on Tue, 05/10/2016 - 15:51

Permalink

खुपच आवडलं आणि पटलं सुद्धा!

खुपच आवडलं आणि पटलं सुद्धा! शैली एक नंबर आहे तुमची. लिहीत रहा!
  • Log in or register to post comments

Submitted by एस on Tue, 05/10/2016 - 16:13

Permalink

छान मनोगत. मिपावर स्वागत.

छान मनोगत. मिपावर स्वागत.
  • Log in or register to post comments

Submitted by विशाखा राऊत on Tue, 05/10/2016 - 16:31

Permalink

मस्त लिहिलेय

मस्त लिहिलेय
  • Log in or register to post comments
Profile picture for user मराठी कथालेखक

Submitted by मराठी कथालेखक on Tue, 05/10/2016 - 16:31

Permalink

कोणता देश ?

कोणता देश ?
  • Log in or register to post comments

Submitted by घाटी फ्लेमिंगो on Wed, 05/11/2016 - 11:19

In reply to कोणता देश ? by मराठी कथालेखक

Permalink

ह्ये हितंच

गोलाच्या खाल्ल्या अंगाला... हे हितंच.. अंटार्टिकाच्या वरच्या गल्लीत... उजव्या साईटला...!!
  • Log in or register to post comments
Profile picture for user मराठी कथालेखक

Submitted by मराठी कथालेखक on Wed, 05/11/2016 - 14:50

In reply to ह्ये हितंच by घाटी फ्लेमिंगो

Permalink

काही कळालं नाही.

काही कळालं नाही. ऑस्ट्रेलिया का ? बाकी फक्त मलाच हा प्रश्न कसा पडला याचंहि आश्चर्य !!
  • Log in or register to post comments

Submitted by घाटी फ्लेमिंगो on Wed, 05/11/2016 - 19:35

In reply to काही कळालं नाही. by मराठी कथालेखक

Permalink

आक्शी बराबर

वळखलं की तुमी...!!
  • Log in or register to post comments

Submitted by mugdhagode on Tue, 05/10/2016 - 16:55

Permalink

..

छान. छान
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Tue, 05/10/2016 - 17:18

Permalink

मिपावर स्वागत ! भारी एंट्री

मिपावर स्वागत ! भारी एंट्री झाली !! गावरान भाषेत मस्तं शैलीत लिहिलेलं मनोगत खूप आवडलं. लिहित रहा. या प्रस्तावनेनंतर तुमचे एकेक अनुभव तुमच्या शैलीत वाचायला आवडतील. विंग्रजीचं भुत आपल्याला आपल्या देशात अन आपल्या लोकांत जेवडं मानेवर बसतया तेवडं हितं शान्यासारकं वागतया... टाळ्या ! जरा इंग्रजीत बोलता आलं की हवेत तरंगणारे नेहमीच डोक्यात जातात. :)
  • Log in or register to post comments

Submitted by पद्मावति on Wed, 05/11/2016 - 00:07

Permalink

खूप छान लिहिलंय. ही हटके

खूप छान लिहिलंय. ही हटके लेखनशैली खूप आवडली.
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Wed, 05/11/2016 - 00:46

Permalink

छान लिहिलय.

छान लिहिलय.
  • Log in or register to post comments

Submitted by बोका-ए-आझम on Wed, 05/11/2016 - 01:48

Permalink

सर्वात पहिल्यांदा - आयडी मस्त आहे.

दुसरं - लेख मस्त आहे. मिपावर स्वागत.
  • Log in or register to post comments

Submitted by खटपट्या on Wed, 05/11/2016 - 04:42

Permalink

अगदी मनातलं बोललात फ्लेमींगो

अगदी मनातलं बोललात फ्लेमींगो साहेब. जरा नाव बदलून ते घाटी काडून टाका बरे.
  • Log in or register to post comments

Submitted by घाटी फ्लेमिंगो on Wed, 05/11/2016 - 11:16

In reply to अगदी मनातलं बोललात फ्लेमींगो by खटपट्या

Permalink

तुम्ही ते साहेब काढा बरं आधी

घाटावरचे घाटीच की ओ...!! ;)
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Wed, 05/11/2016 - 07:41

Permalink

लिखाण-शैली मस्त

अजून लिहा...
  • Log in or register to post comments

Submitted by नाखु on Wed, 05/11/2016 - 08:42

Permalink

हाण तिच्या मारी...

मिपावर जोरदार ईंन्ट्री.... अजून येऊंदे. गावकुसात्ला नाखु
  • Log in or register to post comments

Submitted by घाटी फ्लेमिंगो on Wed, 05/11/2016 - 11:13

Permalink

धन्यवाद ओ गाववाल्यानू

तुमच्या प्रतिक्रिया बघून अं.ह.झा. असाच प्रेम असून्द्या...!!
  • Log in or register to post comments

Submitted by एस on Wed, 05/11/2016 - 22:27

In reply to धन्यवाद ओ गाववाल्यानू by घाटी फ्लेमिंगो

Permalink

अं. ह. झा. हे लघुरूप मिपावर

अं. ह. झा. हे लघुरूप मिपावर बर्‍याच दिवसांनी वापरले गेल्याचे पाहून अं. ह. झा. :-)
  • Log in or register to post comments

Submitted by स्वीट टॉकर on Wed, 05/11/2016 - 11:13

Permalink

मस्त एन्ट्री !

दमदार सुरवात केली आहेत! मिपावर स्वागत!
  • Log in or register to post comments

Submitted by ए ए वाघमारे on Wed, 05/11/2016 - 13:53

Permalink

सुंदर!

सुंदर!
  • Log in or register to post comments

Submitted by तर्राट जोकर on Wed, 05/11/2016 - 13:57

Permalink

आवड्यास... और आन्दो!!!

आवड्यास... और आन्दो!!!
  • Log in or register to post comments

Submitted by मधुरा देशपांडे on Wed, 05/11/2016 - 14:01

Permalink

आवडलं.

आवडलं.
  • Log in or register to post comments

Submitted by उल्का on Wed, 05/11/2016 - 14:37

Permalink

झ्याक वाटलं. आन्खी लिवा की.

झ्याक वाटलं. आन्खी लिवा की. हे बरुबर लिवलया की चुकलया म्हनायचं माझं? चुकलं आसल तर सांगा बर्र का. :)
  • Log in or register to post comments

Submitted by घाटी फ्लेमिंगो on Wed, 05/11/2016 - 19:38

In reply to झ्याक वाटलं. आन्खी लिवा की. by उल्का

Permalink

येकदमच बराबर

बरुबरै उल्कातै..!!
  • Log in or register to post comments

Submitted by उल्का on Wed, 05/11/2016 - 22:17

In reply to येकदमच बराबर by घाटी फ्लेमिंगो

Permalink

:) :)

:) :)
  • Log in or register to post comments

Submitted by क्रेझी on Wed, 05/11/2016 - 16:04

Permalink

मस्त लेख :) परदेश

मस्त लेख :) परदेश वास्तव्याबद्दलचं अनुभव कथन इतक्या रसाळ भाषेत वाचायला छान वाटलं :) पुढचे भाग ह्याच शैलीत पण जरा लवकर टाका.
  • Log in or register to post comments

Submitted by राजेंद्र मेहेंदळे on Wed, 05/11/2016 - 16:38

Permalink

मस्त एंट्री!!

भाषा आवडली.मिपावर स्वागत
  • Log in or register to post comments

Submitted by सविता००१ on Wed, 05/11/2016 - 16:51

Permalink

फार सुरेख

मस्त लिखाण. मिपावर स्वागत
  • Log in or register to post comments

Submitted by आतिवास on Wed, 05/11/2016 - 17:08

Permalink

सुरेख लिहिलंय, आवडलं. आणखी

सुरेख लिहिलंय, आवडलं. आणखी अनुभव वाचण्यास उत्सुक आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by ईश्वरसर्वसाक्षी on Wed, 05/11/2016 - 20:03

Permalink

मस्त लिहिलय

मस्त लिहिलय तुम्हि दिलेल्या शिर्षका वरुन एक आठवल. शाळेत बहुधा दहाविला एक धडा होता लेखक नाहि आठवत पण शिर्षक होत "गडया आपुला गाव बरा"
  • Log in or register to post comments

Submitted by घाटी फ्लेमिंगो on Wed, 05/11/2016 - 20:05

In reply to मस्त लिहिलय by ईश्वरसर्वसाक्षी

Permalink

बरोबर

त्यालाच अनुसरून आहे शीर्षक
  • Log in or register to post comments

Submitted by वाचक on Wed, 05/11/2016 - 21:07

In reply to मस्त लिहिलय by ईश्वरसर्वसाक्षी

Permalink

सुभाष भेंडे

ह्यांच्या पुस्तकातला उतारा होता धडा म्हणून
  • Log in or register to post comments

Submitted by कॅप्टन जॅक स्पॅरो on Wed, 05/11/2016 - 20:53

Permalink

झक्कास लिहिलयं. मिपावर स्वागत

झक्कास लिहिलयं. मिपावर स्वागत.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Wed, 05/11/2016 - 22:05

Permalink

फ्लेमिंग्या, येकच लंबर बे.

फ्लेमिंग्या, येकच लंबर बे.
  • Log in or register to post comments

Submitted by खटपट्या on Wed, 05/11/2016 - 22:56

In reply to फ्लेमिंग्या, येकच लंबर बे. by बॅटमॅन

Permalink

फ्लेमिंग्या

फ्लेमिंग्या
क्षणभर वाटलं की माईच आल्या तुमच्या अंगात... :)
  • Log in or register to post comments

Submitted by फारएन्ड on गुरुवार, 05/12/2016 - 05:19

Permalink

मस्त

मस्त! आवडले. अजून लिहा.
  • Log in or register to post comments

Submitted by अफ्रिकेचा मुम्बैकर on गुरुवार, 05/12/2016 - 14:21

Permalink

खुप छान

खुप छान
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Sun, 05/15/2016 - 19:45

Permalink

वा!

आवडलं.
  • Log in or register to post comments

Submitted by एक एकटा एकटाच on Sun, 05/15/2016 - 20:11

Permalink

छान लिहिलय

छान लिहिलय
  • Log in or register to post comments

Submitted by रंगासेठ on Sun, 05/15/2016 - 20:28

Permalink

आवडलं गड्या!

छान लिहिलयं!
  • Log in or register to post comments

Submitted by उगा काहितरीच on Sun, 05/15/2016 - 22:06

Permalink

मस्त...

मस्त...
  • Log in or register to post comments

Submitted by पक्षी on Mon, 05/16/2016 - 12:21

Permalink

आव्लड

आव्लड
  • Log in or register to post comments

Submitted by विवेकपटाईत on Wed, 05/18/2016 - 19:37

Permalink

वाचताना मजा आली. बळीराजाच्या

वाचताना मजा आली. बळीराजाच्या पाताळात सुख, समृद्धी आणि लक्ष्मी आहेच.
  • Log in or register to post comments

Submitted by घाटी फ्लेमिंगो on Fri, 05/27/2016 - 12:13

In reply to वाचताना मजा आली. बळीराजाच्या by विवेकपटाईत

Permalink

आवडलं

पाताळात...!!
  • Log in or register to post comments

Submitted by अंतरा आनंद on Wed, 05/18/2016 - 19:40

Permalink

छान आहे.

छान आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by गतीशील on गुरुवार, 05/19/2016 - 23:06

Permalink

फ्लेमिंगो

सगळे फ्लेमिंगो परदेशातून इथे येतात, तुमचा फ्लेमिंगो मात्र इथून परदेशात गेलाय.. बाकी भाषा शैली एकदम हटके..पण प्रतिसाद देताना पण त्याच शैली मध्ये दिले तर ते जर अतिपरिचयात अवज्ञा होईल..आपण सुज्ञ आहात..
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

नवीन सदस्य

  • सदस्य: चिनू१९८५
    नोंदणी: Wed, 03/25/2026 - 09:02
  • सदस्य: साधक भूषण
    नोंदणी: Mon, 03/23/2026 - 19:02
  • सदस्य: दीपक चकवे
    नोंदणी: Mon, 03/23/2026 - 11:07
  • सदस्य: भूषण तळवेलकर
    नोंदणी: Sun, 03/22/2026 - 23:18
  • सदस्य: Jayashree15
    नोंदणी: Sun, 03/22/2026 - 18:55

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • पान 5
  • पान 6
  • पान 7
  • पान 8
  • पान 9
  • …
  • Next page पुढे ›
  • Last page शेवटी »

© 2026 Misalpav.com