आज येक वरिस झालं बगता बगता... हिकडं ईवुन... जवा कळालं व्हतं की परदेशात नोकरीधंद्याला जावं लागनार तवा पन इस्वास बसला नव्हता... अन आता पन तशिच गत झालीया... मानूस म्हंजे एक ठिपका हाये असं देवळातलं आन्ना म्हनले व्हते... पन त्याच्या जिवणात जर अशी वर्स ठिपक्यावानी पटा-पटा जाऊ लागली तर कवा म्हातारपन आलं समजनार पन न्हाई...!!
येक वर्सात लै नवी लोकं भेटली... नवं मित्र जालं... लै ठिकानी फिरुनशान आलू... लै फोटू काडलं... येकीकडं बायका-पोरास्न सोडून आल्याचं दुख होतं पन नव्या ठिकानी जाऊन आल्याचा आनंद पन व्हता...! ज्या गोर्या लोकास्नी लांबूनच बगत व्हतॊ त्यांच्याच देशात नव्हं... घरात त्यांच्याबरुबर राहन्याचा अनुबव परिस घेतला. भाहेरचा अनुभव येगळा तर कामाच्या ठिकानचा येगळा... ही गोरी लोकं आपल्या बापाची सख्खं नसत्यात येवडच बोललं जातं जगभर... पन तुमच्या जीवाची अन कष्टाची येकझाक्ट किंमत करनं पन ह्यांच्याकडनंच शिकावं...! तु कामाला शाना तर आमी तुझ्याशी शाने... येवड्या साध्या नियमात... सगळ्यांना येकाच पारड्यात तोलनारे...! सायबापासून ते साफसफाई कामगारापर्यंत सर्वांनाच मानुसकीचा अधिकार देनारे... हापिसात असलं की मान मोडून काम करनारे... अन सुट्टीला सायबाच्या बापाला न इचारनारे...! कामाच्या येळी काम... अन चैनीच्या येळी चैन...! कामात चैन अन सुट्टीला बैल असली गत न्हाई...! येरबाळीच कामाला सुरवात करनार अन दिस मावळ्ळा की लगोलग जेवन करुन झोपून जानार...!!
रस्त्यावर सगळे नियम पन पाळतात. समोरुन गाडी आली तर तेला आदी जा म्हनत्यात. आधी जानारा कशी जिरवली म्हनुन जात न्हाई तर हात दाखवून... धन्यवाद दिवून जातुया. चालनारा तर लांबून दिसला की मागंच गाडी थांबवत्यात. गाड्या हिरवा दिवा लागल्यादिकून फुडं जात न्हाईत... पिवळ्याला जोर वाढवत न्हाईत... कमी करत्यात...! गुड मार्निंग म्हनायला ओळख लागत न्हाई... की हसून बोलायला पाळख लागत न्हाई...! बायका-पोरी छोटं कापडं घालत्यात म्हनुन संस्कार न्हाईत म्हनावं तर तसल्या कापडांत रात्रिच्या दोन वाजता येकली बाई सुखरुप एकटी घरी येतीया... मग ह्यो पोरा-बाप्यांचा चांगुलपना म्हनावा का...!?
विंग्रजीचं भुत आपल्याला आपल्या देशात अन आपल्या लोकांत जेवडं मानेवर बसतया तेवडं हितं शान्यासारकं वागतया... बेशिकली हि आपली भाशा नव्हं हे ते लोक लगीचच समजून घेत्यात... आपनच कार-कुर करत बसतुया...! इतक्या दिवसात डोस्क्यात असलेली बरीच खुळं ह्या मागच्या एका वर्साच्या अनुभवात पार धुतली गेली...! अनुभवाचं आनखी एक गठूडं टकुर्यावर बसल्यागत झालया...! आपल्या गावाला... लोकान्ला... घराला... मागं सोडून आल्याचं दुख कायम असतया पन भाईर पडल्यावर येनार्या अनुभवातुन मनाची होत जानारी मशागत फुडचं आयुष्य समॄद्ध करत जानार येवडं नक्की...!!!
घाटी फ्लेमिंगो
वाचने
16850
प्रतिक्रिया
57
मिसळपाव
प्रतिक्रिया
मिपावर स्वागत फ्लेमिंगो :)
बायका-पोरी छोटं कापडं
कधी असे इथे बघायला मिळणार
In reply to बायका-पोरी छोटं कापडं by टवाळ कार्टा
याला म्हणतात सिलेक्टिव्ह
In reply to कधी असे इथे बघायला मिळणार by सायकलस्वार
खुपच आवडलं आणि पटलं सुद्धा!
छान मनोगत. मिपावर स्वागत.
मस्त लिहिलेय
कोणता देश ?
ह्ये हितंच
In reply to कोणता देश ? by मराठी कथालेखक
काही कळालं नाही.
In reply to ह्ये हितंच by घाटी फ्लेमिंगो
आक्शी बराबर
In reply to काही कळालं नाही. by मराठी कथालेखक
..
मिपावर स्वागत ! भारी एंट्री
विंग्रजीचं भुत आपल्याला आपल्या देशात अन आपल्या लोकांत जेवडं मानेवर बसतया तेवडं हितं शान्यासारकं वागतया...टाळ्या ! जरा इंग्रजीत बोलता आलं की हवेत तरंगणारे नेहमीच डोक्यात जातात. :)खूप छान लिहिलंय. ही हटके
छान लिहिलय.
सर्वात पहिल्यांदा - आयडी मस्त आहे.
अगदी मनातलं बोललात फ्लेमींगो
तुम्ही ते साहेब काढा बरं आधी
In reply to अगदी मनातलं बोललात फ्लेमींगो by खटपट्या
लिखाण-शैली मस्त
हाण तिच्या मारी...
धन्यवाद ओ गाववाल्यानू
अं. ह. झा. हे लघुरूप मिपावर
In reply to धन्यवाद ओ गाववाल्यानू by घाटी फ्लेमिंगो
मस्त एन्ट्री !
सुंदर!
आवड्यास... और आन्दो!!!
आवडलं.
झ्याक वाटलं. आन्खी लिवा की.
येकदमच बराबर
In reply to झ्याक वाटलं. आन्खी लिवा की. by उल्का
:) :)
In reply to येकदमच बराबर by घाटी फ्लेमिंगो
मस्त लेख :) परदेश
मस्त एंट्री!!
फार सुरेख
सुरेख लिहिलंय, आवडलं. आणखी
मस्त लिहिलय
बरोबर
In reply to मस्त लिहिलय by ईश्वरसर्वसाक्षी
सुभाष भेंडे
In reply to मस्त लिहिलय by ईश्वरसर्वसाक्षी
झक्कास लिहिलयं. मिपावर स्वागत
फ्लेमिंग्या, येकच लंबर बे.
फ्लेमिंग्या
In reply to फ्लेमिंग्या, येकच लंबर बे. by बॅटमॅन
मस्त
खुप छान
वा!
छान लिहिलय
आवडलं गड्या!
मस्त...
आव्लड
वाचताना मजा आली. बळीराजाच्या
आवडलं
In reply to वाचताना मजा आली. बळीराजाच्या by विवेकपटाईत
छान आहे.
फ्लेमिंगो
खुप छान लिहिले आहे!
हेच सगळ लिहावेसे वाटत होते
येऊंदे की मग
In reply to हेच सगळ लिहावेसे वाटत होते by देशपांडे विनायक
झ्याक लिवलंय, लिवा आनि कायबाय
ह्यो मनुक्ष वळखीचा वाटून
दादा...!!
In reply to ह्यो मनुक्ष वळखीचा वाटून by Anand More
तुझिये निढळी कोटी चंद्रप्रकाश
In reply to दादा...!! by घाटी फ्लेमिंगो