✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

१६ डिसेंबर ०८

स
स्वाती दिनेश यांनी
Fri, 01/16/2009 - 21:14  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
7469 वाचन

💬 प्रतिसाद (41)

प्रतिक्रिया

व
विनायक पाचलग Fri, 01/16/2009 - 21:19 नवीन

बाबा रे

अरे याला काय म्हणायचे भावस्पर्शी दोन वर्षापुर्वी माझी आजी गेली त्यावेळी काहीशी अशीच अवस्था झाली होती माझी विनायक पाचलग माझ्या भावना येथे उतरतात. आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे छानसे वाचलेले
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Fri, 01/16/2009 - 21:24 नवीन

स्वातीताई,

स्वातीताई, तुझ्या दु:खात सहभागी आहोत. तुझ्या बाबांना सद्गती लाभो ही प्रार्थना ! सरता संचिताचे शेष नाही क्षणाचा अवकाश। ढळते न ढळते निमिष जाणे लागे । -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Fri, 01/16/2009 - 21:26 नवीन

काय बोलू? काय लिहू?

स्वतीताई, भगवंताची करणी अन डोळ्यात पाणी!! दुसर्‍या कोणालाच काय पण त्यांना स्वतःलाही समजलं नसावं कदाचित की त्यांची एक्झिट कधी झाली! विना दैन्येन जीवनम | अनायासेन मरणम! तुझे बाबा भाग्यवान होते एवढंच म्हणेन मी. परमेश्वर त्यांना सद्गती देवो आणि तुम्हाला धैर्य! (हा एवढा हृदयातला अनुभव आमच्याबरोबर वाटून घेण्यातून तुझं मिपाकरांवरचं मनोमन प्रेम दिसलं तुला शतशः धन्यवाद!) चतुरंग
  • Log in or register to post comments
व
विनायक पाचलग Fri, 01/16/2009 - 21:29 नवीन

हेच म्हणतो

मगाशी आठवणीने व्याकुळ झाल्याने काही लिहु शकलो नाही असो परमेश्वर त्यांना सद्गती देवो आणि तुम्हाला धैर्य! माझ्याही याच सदीच्छा आणि हो मिपाला एक कुटुंब मानले जाते हा विश्वास तुम्ही आज द्रुढ केलात आता आम्ही दीवसभर किपावर पडुन असतो याचे सार्थक होइल कारण माणूस कुटुंबातच रमतो आपला (मनातल्या मनात अश्रु ढाळणारा)विनायक................................... विनायक पाचलग माझ्या भावना येथे उतरतात. आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे छानसे वाचलेले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
श
श्रावण मोडक Fri, 01/16/2009 - 21:27 नवीन

सलाम

...ते यमालाही म्हणाले असतील, "तुझ्याबरोबर यायचं म्हणतोस? चल.. आलोच.." सलाम तुमच्या बाबांना. असा मृत्यू येणं भाग्याचंच. 'काळ देहासी आला खाऊ, आम्ही आनंदे, नाचू गाऊ...' वृत्तीची अशी समाधानी माणसे न सांगताच निघून जात असतात. त्यांचं ते जाणं त्यांनाच शोभतं. आपण फक्त त्यांच्या स्मृती अधिक गहिऱ्या करायच्या असतात.
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 01/16/2009 - 21:29 नवीन

स्वातीताई,

स्वातीताई, काय बोलू? ज्याचं दु:ख त्यालाच भोगायला लागतं आणि आपलं जवळचं माणूस जातं तेव्हाच हे समजतं. पण किंचित बरं वाटलं हे वाचून की तुझ्या बाबांना जिवंतपणी मरण भोगण्याची वेळ आली नाही आणि शेवटच्या क्षणालाही फारशा यातना झाल्या नाहीत. माझ्या बाबांचीही अखेर जवळजवळ अशीच झाली. अदिती आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.
  • Log in or register to post comments
म
मिंटी Sat, 01/17/2009 - 11:37 नवीन

स्वाती ताई

स्वाती ताई खरच माझ्या भावनाही आदिती सारख्याच आहेत......ज्याचं दु:ख त्यालाच भोगावं लागतं आणि हे त्याचं त्यालाचं कळतं......त्या परिस्थितीत तुझ्या आईनी दाखवलेला धीर...... शब्दचं नाहीएत बघ बोलायला.................
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
B
baba Fri, 01/16/2009 - 21:36 नवीन

तुझ्या दु:खात सहभागी आहोत..

फार वाईट वाटले पण हा प्रवास कुणालाच चुकला नाही हेच खरे... तुझ्या बाबांच्या आत्म्याला शांती अन सद्गती लाभो हीच प्रार्थना ! ...बाबा
  • Log in or register to post comments
प
प्राजु Fri, 01/16/2009 - 21:52 नवीन

स्वातीताई.

स्वातीताई.. तुझं दु:ख समजू शकते. तुझ्या बाबांच्या पुण्यात्म्याला सद्गती लाभो.. हा अनुभव मिपाकरांबरोबर शेर करून तू आमचा सर्वांचा सन्मान केला आहेस. आम्हाला तुझ्या दु:खात सामिल करून घेऊन आपलेपणा दाखवला आहेस इतकेच म्हणेन. आता मात्र तुला सावरायला हवं. उभं रहायला हवं. आम्ही आहोतच गं तुझ्या पाठीशी. तुला तुझ्या आईला, भावंडांना सांभाळायला हवं. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
श
शाल्मली Fri, 01/16/2009 - 22:04 नवीन

स्वातीताई,

स्वातीताई, तुझ्या दु:खात सहभागी आहे. खरंच एवढ्या लांब असल्याने त्यादिवशी तू किती हतबल झाली असशील.. तुझ्या बाबांना सद्गती लाभो ! --शाल्मली.
  • Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट Fri, 01/16/2009 - 22:16 नवीन

आपल्या

आपल्या दु:खात सहभागी आहे. जवळची व्यक्ती जाण्याचं दु:ख मोठं असतंच, तरीही आमच्यासोबत दु:ख शेअर केल्याने आपलं मन थोडं हलकं झालं असेल अशी आशा. आपल्या बाबांना ईश्वर सद्गती देवो हीच त्याच्या चरणी प्रार्थना.
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव Fri, 01/16/2009 - 22:19 नवीन

भाग्यवंत!

असे मरण फारच थोड्या भाग्यवंतांना मिळतं. माझे आई-वडीलही झोपेतच गेले. चेहेर्‍यावर प्रसन्नतेचे भाव ठेवून. तरी देखिल आपल्या जवळची व्यक्ती गेल्यावर दु:ख हे होतेच. स्वाती तुला हे दु:ख सोसण्याचे सामर्थ्य मिळो अशी प्रार्थना करतो.
  • Log in or register to post comments
व
वेताळ Fri, 01/16/2009 - 23:15 नवीन

जीवन मरण सगळ काही त्याच्या हाती

जे होणार ते टाळता येत नाही. परंतु एक माणुस आपल्यातुन निघुन जाणे किती क्लेशदायक असते ह्याचा अनुभव आहे.तुम्ही लवकरच ह्या दु:खातुन बाहेर पडाल ह्याची खात्री आहे.तुमच्या बाबांना सद्गती लाभो ही प्रार्थना . वेताळ
  • Log in or register to post comments
न
नि३ Fri, 01/16/2009 - 23:20 नवीन

परमेश्वर

परमेश्वर त्यांना सद्गती देवो आणि तुम्हाला धैर्य! ---नि३.
  • Log in or register to post comments
र
रेवती Fri, 01/16/2009 - 23:38 नवीन

स्वातीताई,

स्वातीताई, तुझे सांत्वन करण्यास शब्द नाहीत. परमेश्वर तुझ्या बाबांच्या आत्म्यास शांती देवो. त्यांच्या आठवणींमुळेच सावरशील अशी आशा. रेवती
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sat, 01/17/2009 - 00:11 नवीन

स्वातीताई,

स्वातीताई, :( सावरशील ना स्वतःला? आम्ही आहोतच गं तुझ्यापाठी..
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री Sat, 01/17/2009 - 00:25 नवीन

छ्या वाईट

छ्या वाईट वाटलं वाचून.. असं कसं एखादा माणूस झटकन एक्झिट घेतो मला कळतच नाही.. :( माझी ६ वर्षाची भाची अशी झटकन गेली.. तो धक्का मी महीनोनमहीने विसरले नव्हते.. तुला हा धक्का सहन करायचे बळ मिळो.. :( http://bhagyashreee.blogspot.com/
  • Log in or register to post comments
स
सखी Sat, 01/17/2009 - 00:43 नवीन

स्वाती

स्वाती खरचं काय बोलायचे व काय लिहायचे तेच कळत नव्हतं बराच वेळ. मला वाटतं परगावी वा परदेशी असणा-यांच हे अगदीच दुर्देव असावं. एक मनात असु दे - त्यांच्या आठवणी, त्यांचे आशिर्वाद हे तुमच्या पाठिशी सदैव असतील, ते कोणीही तुमच्यापासुन हिरावुन घेऊ शकत नाही. तुला हे दु:ख सोसण्याचे सामर्थ्य मिळो.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 01/17/2009 - 00:55 नवीन

तात चरण ते

तात चरण ते वंदनीय रे शत तीर्थांचे धाम! तात्या.
  • Log in or register to post comments
न
नंदन Sat, 01/17/2009 - 00:59 नवीन

स्वातीताई,

परमेश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो आणि तुला यातून सावरण्यासाठी बळ देवो, हीच प्रार्थना.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
स
सुवर्णमयी Sat, 01/17/2009 - 01:17 नवीन

हळवा

लेख अतिशय हळवे करून गेला. भारताबाहेर राहणारे- मध्यरात्री आणि पहाटे फोन म्हणजे काय मनाची अवस्था होते ते समजू शकतात. तुझ्या दु:खात सहभागी आहोत. सोनाली
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Sat, 01/17/2009 - 01:24 नवीन

+१

तुमच्या दु:खात सहभागी आहे. तुमच्या वडलांना भेटल्याच्या काही अंधुक स्मृतीही आहेत. त्यामुळे वाटणार्‍या दु:खाचि धार जास्त तीव्र होती.
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Sat, 01/17/2009 - 02:54 नवीन

स्वातीजी,

अशा वेळी स्वतःचं असं काही सांत्वनपर लिहायला शब्द सुचले नाहीत... म्हणून गदिमांच्या पायाशी गेलो.... "जरा मरण यातून सुटला, कोण प्राणिजात? अतर्क्य ना घडले काही, जरी अकस्मात! मरण कल्पनेशी थांबे, तर्क जाणत्यांचा! पराधीन आहे जगती, पुत्र मानवाचा!!!" ईश्वरकृपेने तुझ्या वडिलांच्या आत्म्याला सद्गती लाभो हीच प्रार्थना!!!
  • Log in or register to post comments
म
मीनल Sat, 01/17/2009 - 02:57 नवीन

धूसर शब्द

सर्वच शब्द पाणावलेल्या डोळ्यातून धूसर झाले आहेत. काय लिहू? मीनल.
  • Log in or register to post comments
स
सुनील Sat, 01/17/2009 - 06:13 नवीन

भावपूर्ण

भावपूर्ण लेख. हे दु:ख पचविण्याचे धैर्य तुम्हाला लाभो, ही प्रार्थना! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
र
रामदास Sat, 01/17/2009 - 06:22 नवीन

कल्पवृक्ष कन्येसाठी.

जवळची व्यक्ती नीजधामाला गेल्यावर बरेच दिवस फार त्रास होत राहतो. आठवणीचे कढ न सांगता येत राहतात.त्यातून बाबा आणि मुलगी यांचे नाते तर फार वेगळेच असते.लतादिदींचं कल्पवृक्ष कन्येसाठी हे गाणं जेव्हा पण ऐकतो तेव्हा तेव्हा केवळ कल्पना करून डोळे पाणावतात. पण मरणात जमेची बाजू असते.हॉस्पीटल, औषधोपचार, अंथरुणाला खिळून राहणं हे काही न होता त्यांचा पुढचा प्रवास सुरु झाला.आत्म्याला सद्गती लाभो . लेक धाडली परदेशी बाप घरात उपाशी.
  • Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे Sat, 01/17/2009 - 11:18 नवीन

माझ्या

माझ्या बाबतीत असेच काहीसे घडले होते............. चुचु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास
म
मदनबाण Sat, 01/17/2009 - 06:42 नवीन

स्वातीताई,

स्वातीताई, फार वाईट वाटल... तुझ्या बाबांना सद्गती लाभो ही प्रार्थना !!! मदनबाण..... "Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God." - Indian Armed Forces -
  • Log in or register to post comments
व
वल्लरी Sat, 01/17/2009 - 11:47 नवीन

स्वातीताई,

स्वातीताई, काय बोलू? सुचत नाही.... हा प्रसंग खुप हेलावणारा आहे गं...पण तुला सावरले पाहीजे स्वातीताई.... परमेश्वर त्यांना सद्गती देवो आणि तुला सावरण्याचे धैर्य! ---वल्लरी
  • Log in or register to post comments
M
mamuvinod Sat, 01/17/2009 - 12:45 नवीन

सदगदित

आजोबा गेले त्यावेळि असेच झाले होते माझे. छान झालेय लेखन
  • Log in or register to post comments
स
समिधा Mon, 01/19/2009 - 10:15 नवीन

काही सुचत

काही सुचत नाही लिहायला,मन खुप विचलित झाल. परमेश्वर त्यांना सद्गती देवो आणि तुला ,तुझ्या घरच्याना हे दु:ख पचविण्याचे धैर्य ! बाबा आणि मुलीच नात खरच खुप वेगळ असत.
  • Log in or register to post comments
म
मैत्र Mon, 01/19/2009 - 10:30 नवीन

स्वातीताई,

लेख पाहून भ्रमणमंडळाची नवीन मोहीम असावी असं वाटून उघडला आणि पहिल्या परिच्छेदातच धक्का बसला. तरीही किती संयमाने आणि शांत लिहिलं आहे तुम्ही. अगदी जसे तुमचे बाबा वागले आणि शांतपणे निघून गेले तसंच. भाग्यवान खरंच. इतकं संपन्न आयुष्य जगून वेदना / यातना न होता सहज अचानक जाणं... दु:ख स्वाभाविक आहे आणि तुम्ही लिहिल्या प्रमाणे रेंगाळलेल्या आय सी यु च्या मोठ्या आजारात ती परिस्थिती आणि शंका थोडी मानसिक तयारी करायला मदत करतात. असं चालता बोलता काही घडलं तर ते मनाला पटायला फार वेळ लागतो. अचानकपणे ध्यानी मनी नसताना धक्का बसतो ... तुमचं आभाळाएवढं दु़:ख तुम्ही मिपाकरांसोबत वाटलं हेच आमचं भाग्य... तुमच्या बाबांना सद्गती लाभो ही प्रार्थना . अवांतरः अशा वेळी स्वतःहून विचारून मदत करणार्‍या कस्टम अधिकार्‍याची वागणूक वाचून आश्चर्य वाटलं आणि थोडं बरंही...
  • Log in or register to post comments
ए
एकलव्य Mon, 01/19/2009 - 10:31 नवीन

पोकळी

स्वातीताई - सांभाळून असा... आणखी काय लिहू. का कोणास ठाऊक पण आपली माणसे -- विशेषतः वडिलधारी -- दूर असली की उगाच रुखरुख लागून राहते. त्यातच दहशतवादाने थैमान घातल्यामुळे तर आणखीच काळजी वाढली आहे. गेल्या काही वर्षांत इतकी जवळची माणसे ध्यानीमनी नसताना आम्हाला मागे सोडून देवाघरी गेली आहेत की मन अगदी व्याकूळ होऊन जाते. पोकळी जाणवत राहते.
  • Log in or register to post comments
द
दिपक Mon, 01/19/2009 - 13:33 नवीन

आपण

आपण इथे मन मोकळे केलेत... आम्ही दु:खात सहभागी आहोत. तुझ्या बाबांना सद्गती लाभो ही प्रार्थना !
  • Log in or register to post comments
स
सुधीर कांदळकर Mon, 01/19/2009 - 19:38 नवीन

चालती बोलती उत्साहाने....

भारलेली .. आपण वर्णन केल्याप्रमाणँ ... व्यक्ति गेल्यास असा धक्का बसणारच. आपल्या दु:खांत मी सहभागी आहे. पण असे वेदनामुक्त मरण एखाद्याच भाग्यवंताच्या नशिबी असते. असो. काळ कुणासाठीं थांबणार? सुधीर कांदळकर.
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Tue, 01/20/2009 - 20:04 नवीन

.

१६ जानेवारीला बाबांना जाऊन महिना झाला आणि परत तेच सारे चित्र डोळ्यापुढे येऊ लागले, डोक्यात वादळ सुरु झाले ते कागदावर उतरुन मिपाकर सुह्रदांबरोबर वाटलं तेव्हा मनावरचं ओझं हलकं झालं, धन्यवाद. स्वाती
  • Log in or register to post comments
क
कलंत्री Tue, 01/20/2009 - 20:24 नवीन

त्यांच्या विचारांचे जतन करावे.

मृत्यु तर आपल्या आयुष्यातील अनिवार्य असा भाग आहे. यात वियोगाचे शोक आणि दुखतर होणारच. अशावेळी काही काळानंतर आपल्या आप्त आणि सृजनाच्या आवडीच्या विचाराच्या कामाला चालना देणे हेच त्यांचे खरे स्मरण. माणसाचे शरीर हे त्या आत्माचे वस्त्र आहे. वस्त्र जीर्ण झाल्यावर ते बदलुन तो महान आत्मा परत नविन शरीराकडे जात असतो असे आपण वाचत असतोच, मृतात्माला शांती मिळो आणि त्यांचा आप्तजनास हे दुख स्विकारण्याचे धैर्य मिळो.
  • Log in or register to post comments
श
शितल Wed, 01/21/2009 - 00:32 नवीन

स्वातीताई,

दु:ख दायक घटना ,वाचुन वाईट वाटले. :( बाबांच्या आठवणींनी तुझे मन हळवे होणारच, पण तरीही आठवणींच्या स्वरूपात ते तुझ्या बरोबर सदैव राहतील.
  • Log in or register to post comments
ड
डॉ.प्रसाद दाढे Wed, 01/21/2009 - 17:33 नवीन

माझीही आदरा॑जली

वाचून खूप वाईट वाटले.. तुमचे तीर्थरूप भाग्यवान, त्वरीत व शा॑तपणे मृत्यू आला म्हणून. परमेश्वर तुम्हा॑ला व कुटुम्बिया॑ना ह्या दु:खातून सावरण्याचे बळ देवो.
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर गुरुवार, 01/22/2009 - 00:50 नवीन

१६ डिसेंबर....

स्वाती दिनेश, वाचून धक्का बसला. अशा लेखाची अपेक्षा नव्हती. तुमच्या दु:खात सहभागी आहोत आम्ही सर्वजणं. १६ डिसेंबर... हा दिवस माझ्याही आयुष्यात पितृछत्र हिरावून नेणारा आहे. (१९९६). हॉस्पिटल मधले 'ते' २२ दिवस आठवले. असहाय्यता, हतबलता, नैराश्य आणि जन्मदात्याची, आय्. सी. यू. तली, 'ना ह्या जगात, ना त्या जगात' अशी हृदय पिळवटून टाकणारी अवस्था. शेवटी, 'ह्या जगातून सूटका'. त्या दु:खावेगातून सावरायला फार मोठा काळ जावा लागला. तुम्हाला दु:खातून सावरायला इश्वराची मदत मिळो ही त्याच्या चरणी प्रार्थना.
  • Log in or register to post comments
फ
फटाकडी गुरुवार, 01/22/2009 - 01:16 नवीन

१६ डिसेंबर....

स्वाती, वाचून धक्का बसला. सहासा आपल्या बाबांना काही होयु शकेल असा विचार पण करवत नाही. तुम्हाला दु:खातून सावरायला इश्वराची मदत मिळो हीच प्रार्थाना.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा