आजच्या उन्हाच्या काहिलीने अस्वस्थ होत असतानाच मागच्या वर्षी केलेल्या एका अशाच अचानक केलेल्या भ्रमंतीची आठवण आली, आंदर मावळच्या फिरस्तीची.
मागच्या पावसात तसा दोनच ठिकाणी गेलो. एक माझ्या आवडत्या नाणेघाटात. जूनमध्ये जो पाऊस तुफ्फान बरसला नेमका त्याच वेळी मी नाणेघाटात होतो. त्यानंतर जो पाऊस गेला तो गेलाच. त्यानंतर मग ऑगस्ट मध्येच बाहेर पडलो ते मावळात जाण्यासाठी.
आंदर मावळ म्हणजे मावळातल्या आंद्रा नदीच्या खोर्याचा भाग. हा भाग वेढलेला आहे तो आंद्रा, शिरोटे, वडिवळे आणि ठोकळवाडी अशा धरणांनी आणि उंच उंच डोंगररांगांनी. ४/५ महिने सोडले तर हा भाग तसा रुक्ष, दुर्गम, राकट असा. पण पावसकाळात मात्र हा हिरवा शालू नेसून नव्या नवरीसारखा सजून जातो. मागच्या वर्षीच्या दुष्काळाचा फटका ह्या भागाला देखील बसला, पाऊस इथेही असा झालाच नाही तरीही एखादी का होईना चुकार सर इथे कोसळून जायचीच. अशा एका ऐन पावसाळ्यातल्या एका पेटत्या दुपारीच आम्ही चिंचवडाहून येथे यायला निघालो. वडगावच्या पुढेच टाकवे बुद्रुकला जायचा फाटा आहे त्या रस्त्याने निघायचं. येथंवर येईतो आभाळात मळभ दाटलं होतं. उन्ह सावलीचा खेळ चालूच होता.
टाकवेच्या पुढेच एका धबधब्याचं दर्शन झालो. लहानसाच तरीही वेगवान प्रवाह होता. मनसोक्त भिजलो.
दिसायला जरी लहान असला हा तरी हा एका उंच डोंगरावरुन तीन पायर्यांत खाली उतरतो
भाताची रोपं तरारुन अधिक पावसाची वाट पाहात होती.
मधूनच डोंगरात एखादं कातळकोरीव बौद्धकालीन लेणं दिसत होतं. हे जे लेणं आहे ते टाकवे बुद्रुकच्या थोडं पुढं एका डोंगरात. बहुधा डॉक्युमेन्टेड नसावं.
रदोन्ही बाजूला मस्त हिरवाई आणि मधूनच जाणारा रस्ता
नंतर येतं ते कांब्रे गाव. इथले धबधबा खरोखरचं ग्रॅण्ड म्हणावे असे . इतक्या कमी पावसातही ते प्रचंड उंचीवरुन तुफ्फान कोसळत होते . ह्यांच्याखाली उभं राहणं सर्वथा अशक्य.
ह्याच कांब्र्याच्या डोंगरात लेणी आहेत. कातळपटीच्या इथे जी भलीमोठी आडवी भेग दिसतेय तीच ही लेणी. जाणं अत्यंत कठीण.
आपल्याच साईप्रकाश बेलसरेनं मावळातली बरीचशी अनवट आणि दुर्गम लेणी सर केलीत त्यात हीसुद्धा एक
अवश्य वाचाच साईची ही भटकंती
कांब्र्याच्या पुढे धुव्वाधार पाऊस सुरु झाला. चिंब चिंब झालो. ठोकळवाडीच्या काठावर उतरलो
निर्झर खळाळत होते
मधूनच एकूटवाणं राऊळ दिसत होतं.
ठोकळवाडीला वळसा मारला की खांडी येतं. ह्याच्या पुढे सह्याद्रीची रांग आणि टाटाच्या भिवपुरी प्रकल्पाला जाणारा रस्ता. हा भागही खूप सुंदर आणि हिरवा. हे ठिकाण अगदी घाटमाथ्यावर असलं तरिही येथे प्रचंड खोल असे तुटलेले, भिववणारे कडे नाहीत. सौम्य असाच उतार आहे.
भिवपुरीचा घाट निम्मा उतरुन परत फिरलो. पुन्हा एकदा मुसळधार पाऊस सुरु झाला.
मन झिम्माड झिम्माड होऊन गेलं.
वाचने
19093
प्रतिक्रिया
84
मिसळपाव
प्रतिक्रिया
ती दोन्ही झाडे अगदी जुळी
ती दोन्ही झाडे अगदी जुळी
In reply to ती दोन्ही झाडे अगदी जुळी by किसन शिंदे
आत्ता तुम्हा दोघांमुळे पुन्हा झाडं पाहिलं.
In reply to ती दोन्ही झाडे अगदी जुळी by कानडाऊ योगेशु
तुम्ही या गावविश्वाची "त्या"
In reply to आत्ता तुम्हा दोघांमुळे पुन्हा झाडं पाहिलं. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सॉरी सेठ.
In reply to तुम्ही या गावविश्वाची "त्या" by सतिश गावडे
खिक्क!! सरांची आयड्या आवल्डी.
In reply to सॉरी सेठ. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सर
In reply to खिक्क!! सरांची आयड्या आवल्डी. by किसन शिंदे
मस्त फोटो. डोळे निवले आणि
बहुतेकदा प्रेमात पडणारी/
In reply to मस्त फोटो. डोळे निवले आणि by यशोधरा
अरे वा! अभिनंदन!
In reply to बहुतेकदा प्रेमात पडणारी/ by किसन शिंदे
सह्याद्री आहेच तसा प्रेमात
In reply to बहुतेकदा प्रेमात पडणारी/ by किसन शिंदे
सह्याद्री का? बरं बरं..मी तर
In reply to सह्याद्री आहेच तसा प्रेमात by प्रचेतस
=))
In reply to सह्याद्री का? बरं बरं..मी तर by किसन शिंदे
मोनालिसाचे हास्य :)
In reply to =)) by प्रचेतस
+१
In reply to सह्याद्री आहेच तसा प्रेमात by प्रचेतस
+१
In reply to मस्त फोटो. डोळे निवले आणि by यशोधरा
मस्त!
अ फा ट ! ! ! !
मस्त...
सर्व फोटो दिसल्यामुळे
आम्ही मावळा पण.....
वाह ! डोळे निवले. वर्णनही
+११११११११
In reply to वाह ! डोळे निवले. वर्णनही by स्रुजा
वा वा वा.
___/\___ क्या बात है!
उकाड्याच्या दिवसात हिरवागार
अहाहा
फोटो पाहुनच पावसात भिजल्याचा
छान चित्रे.
आता
In reply to छान चित्रे. by सतिश गावडे
=))
In reply to आता by चौकटराजा
=))
In reply to =)) by किसन शिंदे
त्यासाठीच
In reply to =)) by प्रचेतस
अगायायाया!
In reply to आता by चौकटराजा
=))
In reply to आता by चौकटराजा
भारी.बाकी ते विहार नेहमी
हे विहार म्हणजे अर्धवट सोडून
In reply to भारी.बाकी ते विहार नेहमी by कंजूस
लै भारी!!!
लेख आणि फोटो दोन्ही सुंदर.
वा वा! मस्तच लिखाण आणि चित्रे..
आवडलं
अप्रतिम लेखन बे. फोटो तर
निव्वळ अप्रतिम छायाचित्रे.
सुंदर
धाग्याच्या मथळ्यापासुन ते
धुडगूस
In reply to धाग्याच्या मथळ्यापासुन ते by चौथा कोनाडा
आहा!
मन चिंब झालं..
ज ह ब री
विरह सह्याद्रीचा
उन्हाच्या काहिलीतही थंडगार वाटलं..
अप्रतिम!!
सुंदर फोटो, अप्रतिम लेखन !
आवडलं
गार गार :)
व्वा मस्तच
हा आंदर मावळचा भाग सगळाच
In reply to व्वा मस्तच by स्वच्छंदी_मनोज
हा आंदर मावळचा भाग सगळाच भटकंतीचा राहीलाय.नोंद घेतली आहे. झक्कास फोटो.. नेहमीप्रमाणेच.मस्तं!
झिम्माड वैगरे शब्द आणि
सुंदर!
बस्स्स... हेच्च...
In reply to सुंदर! by पिशी अबोली
फोटो बघूनच थंड थंड वाटतंय :)
खूप छान लेख
मस्त फोटो आणि वर्णन
आवडेश
हा छान आहे धागा...
टिंगल बिन्गल काही नाय हो
In reply to हा छान आहे धागा... by रमेश भिडे
=))
In reply to टिंगल बिन्गल काही नाय हो by चांदणे संदीप
सुरेख लेख. ललित लिहिता येत
अलिकडेच..
In reply to सुरेख लेख. ललित लिहिता येत by मृत्युन्जय