Skip to main content

मन झिम्माड झिम्माड

लेखक प्रचेतस यांनी शनिवार, 14/05/2016 15:34 या दिवशी प्रकाशित केले.
आजच्या उन्हाच्या काहिलीने अस्वस्थ होत असतानाच मागच्या वर्षी केलेल्या एका अशाच अचानक केलेल्या भ्रमंतीची आठवण आली, आंदर मावळच्या फिरस्तीची. मागच्या पावसात तसा दोनच ठिकाणी गेलो. एक माझ्या आवडत्या नाणेघाटात. जूनमध्ये जो पाऊस तुफ्फान बरसला नेमका त्याच वेळी मी नाणेघाटात होतो. त्यानंतर जो पाऊस गेला तो गेलाच. त्यानंतर मग ऑगस्ट मध्येच बाहेर पडलो ते मावळात जाण्यासाठी. आंदर मावळ म्हणजे मावळातल्या आंद्रा नदीच्या खोर्‍याचा भाग. हा भाग वेढलेला आहे तो आंद्रा, शिरोटे, वडिवळे आणि ठोकळवाडी अशा धरणांनी आणि उंच उंच डोंगररांगांनी. ४/५ महिने सोडले तर हा भाग तसा रुक्ष, दुर्गम, राकट असा. पण पावसकाळात मात्र हा हिरवा शालू नेसून नव्या नवरीसारखा सजून जातो. मागच्या वर्षीच्या दुष्काळाचा फटका ह्या भागाला देखील बसला, पाऊस इथेही असा झालाच नाही तरीही एखादी का होईना चुकार सर इथे कोसळून जायचीच. अशा एका ऐन पावसाळ्यातल्या एका पेटत्या दुपारीच आम्ही चिंचवडाहून येथे यायला निघालो. वडगावच्या पुढेच टाकवे बुद्रुकला जायचा फाटा आहे त्या रस्त्याने निघायचं. येथंवर येईतो आभाळात मळभ दाटलं होतं. उन्ह सावलीचा खेळ चालूच होता. टाकवेच्या पुढेच एका धबधब्याचं दर्शन झालो. लहानसाच तरीही वेगवान प्रवाह होता. मनसोक्त भिजलो. a दिसायला जरी लहान असला हा तरी हा एका उंच डोंगरावरुन तीन पायर्‍यांत खाली उतरतो a भाताची रोपं तरारुन अधिक पावसाची वाट पाहात होती. a a मधूनच डोंगरात एखादं कातळकोरीव बौद्धकालीन लेणं दिसत होतं. हे जे लेणं आहे ते टाकवे बुद्रुकच्या थोडं पुढं एका डोंगरात. बहुधा डॉक्युमेन्टेड नसावं. a रदोन्ही बाजूला मस्त हिरवाई आणि मधूनच जाणारा रस्ता a नंतर येतं ते कांब्रे गाव. इथले धबधबा खरोखरचं ग्रॅण्ड म्हणावे असे . इतक्या कमी पावसातही ते प्रचंड उंचीवरुन तुफ्फान कोसळत होते . ह्यांच्याखाली उभं राहणं सर्वथा अशक्य. a ह्याच कांब्र्याच्या डोंगरात लेणी आहेत. कातळपटीच्या इथे जी भलीमोठी आडवी भेग दिसतेय तीच ही लेणी. जाणं अत्यंत कठीण. a a a आपल्याच साईप्रकाश बेलसरेनं मावळातली बरीचशी अनवट आणि दुर्गम लेणी सर केलीत त्यात हीसुद्धा एक अवश्य वाचाच साईची ही भटकंती कांब्र्याच्या पुढे धुव्वाधार पाऊस सुरु झाला. चिंब चिंब झालो. ठोकळवाडीच्या काठावर उतरलो a निर्झर खळाळत होते a a मधूनच एकूटवाणं राऊळ दिसत होतं. a ठोकळवाडीला वळसा मारला की खांडी येतं. ह्याच्या पुढे सह्याद्रीची रांग आणि टाटाच्या भिवपुरी प्रकल्पाला जाणारा रस्ता. हा भागही खूप सुंदर आणि हिरवा. हे ठिकाण अगदी घाटमाथ्यावर असलं तरिही येथे प्रचंड खोल असे तुटलेले, भिववणारे कडे नाहीत. सौम्य असाच उतार आहे. a a a भिवपुरीचा घाट निम्मा उतरुन परत फिरलो. पुन्हा एकदा मुसळधार पाऊस सुरु झाला. मन झिम्माड झिम्माड होऊन गेलं. a

वाचने 19093
प्रतिक्रिया 84

प्रतिक्रिया

हिरवाईने डोळे निवले ! आता लौकरच अशी हिरवाई सगळीकडे दिसूदे. जीव कावला बॉ उन्हानं !

आणि वर्णन पण साजेसे!! ऐन उन्हाच्या काहीलीत गारेगार वाटायला लागले. हे आंदर मावळ म्हणजे हिंजेवाडी फेज-३ कडुन पुढे गेल्यावर लागते तेच का? म्हणजे डावीकडे गेल्यास चांदे/ नांदे वगैरे लागते आणि उजवीकडे वर गेल्यास हे लागेल का?

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

नाही. हे पुण्यावरुन मुंबईच्या वडगाव मावळच्या पुढे उजवीकडच्या फाट्याने वळून टाकवे बुद्रुकच्या पुढे. ट्रेकर्सच्या भाषेत ढाक बहिरीचा मागचा भाग.

In reply to by प्रचेतस

अच्छा!! आता समजले

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

>> हिंजेवाडी फेज-३ कडुन पुढे गेल्यावर लागते तेच का? म्हणजे डावीकडे गेल्यास चांदे/ नांदे वगैरे लागते आणि उजवीकडे वर गेल्यास हे लागेल का? उजवीकडे जाता येते?

सुरेख वर्णन आणि सुंदर फोटो!