आज आम्ही चार जण बोलत असताना एक जण अगदी असं कसंनुसं होत घाम पुसत 'कसलं उकडतंय ना!!' असं म्हणाला. तापमान खरंच प्रचंड वाढलंय एकंदर. त्याचे परिणामही दिसतायतच.
तेंव्हा विचार आले मनात, की साला उकडतं उकडतं म्हणत आपण सगळेच तक्रार करतोय... हे होतंय आपल्यामुळेच.
बरं तेही आपल्याला माहिती आहे, तशी पकपक आपण सोशल मिडियावर करत असतोच की. पण,
आपण झाडं लावतो, किंवा ती तोडली जाऊ नयेत म्हणून काही करतो? नाही.
आपण पाणी वाचवतो? नाही.
आपण एसी वापरणं कमी करतो? नाही.
आपण गाड्या वापरणं कमी करतो? नाही.
आपल्याला शहरं हवीत? हो.
प्रगती हवी? हो.
मॉल, टॉवर हवेत? हो.
तथाकथित लॅव्हिश लाईफ हवं? हो.
जंगलं हवीत? हो; म्हणजे फक्त वाघाचे फोटो काढून गावभर दाखवायला.
दुष्काळाचा मेसेज फॉरवर्ड करायचा, वाटल्यास नाम सारख्या संस्थांना एखादा चेक फाडून माज करायचा आणि मग गाडी धुवायला पाईप सोडायचा; गाडी किती मळते एका दिवसात!
दोन वेळा शॉवर खाली अर्धाअर्धा तास अंघोळ करायची; चिकचिक होते नुसती अंगाची!’
’आमच्याकडे चोव्वीस तास पाणी असतं’, हे सांगताना काय तीर मारल्यासारखं वाटतं लोकांना. काहींना मैलोनमैल चालावं लागतं एका घागरीसाठी, किंवा अनेक शहरातूनही आज एक दिवसाआड पाणी सोडलं जातंय; ... पण आपण काय करणार ना त्याला?
आपल्याला पैसे भरून वॉटर किंगडम परवडतं, टँकर मागवून रेन डान्स चालतो;
पण रेनच नसेल तेंव्हा मग शॅ शॅ म्हणत खिशातून रुमाल काढताना करावा लागणारा डान्स नाही आवडत.
मिळतंय म्हणून माजतोय माणूस. पूर्वी जमिनीवरूनही दिसणारा 'व्ह्यू' मिळण्यासाठी आता किमान १०व्या मजल्यावर जावं लागतं. मग फ्लोअर राईज...तोही द्यायचा. आणि मग सगळ्यांना बोलवून 'व्ह्यू' दाखवायचा 'व्ह्यू'.
'मला मेन म्हणजे उजेड आणि गार वारा हवा होता!' असं सांगायचं अभिमानाने. का?? म्हणजे उजेड, गार वारा तेवढा हवा, आणि ती बिल्डिंग उभी करण्यासाठी तोडलेल्या झाडांचं काहीच नाही? गार वारा येणार कुठून?
फ्रेंच नाही अजून अमेरिकन, अंटार्क्टिकन विंडो जरी केल्या ना तरी वारा यायचा नाही एक दिवस. हो; पण कोण इतका विचार करतंय?
पुढचं पुढे बघायचं. लिव्ह इन द प्रेझेंट. त्यामुळे सगळं चालतं. सोयीचं तेवढं सगळं आपल्याला चालतं.
अन्नाची, पाण्याची, सगळ्याची नासाडी आपल्याला चालते, पण मग टंचाई, महागाई झोंबते.
इलेक्ट्रिसिटी बिलांमुळे डोळ्यासमोर अंधारी आलेली चालते, पण लाईट गेले की नुसती तडफड!
झाडांची सावली दिसली नाही तरी चालते; गॅलरीला सन शेड, गाडीला कव्हर्ड पार्किंग मात्र मस्टच आहे आजकाल;
डेव्हलपमेंट, स्मार्ट सिटीच्या नावाने झाडं तोडलेली चालतात, पण पाऊस पडला नाही, उकाडा वाढला, की.....
कसले नालायक झालोत आपण!
ब्लॉग दुवा
वर्गीकरण
वाचने
4921
प्रतिक्रिया
29
मिसळपाव
प्रतिक्रिया
लेख वास्तववादी असला तरी,
आपण काहीच सकारात्मक करत नाही.
In reply to लेख वास्तववादी असला तरी, by शान्तिप्रिय
लेखात नकारात्मकता ठासून भरली
In reply to लेख वास्तववादी असला तरी, by शान्तिप्रिय
इलाज नाही.
In reply to लेख वास्तववादी असला तरी, by शान्तिप्रिय
मी परखडपणा म्हणेन.
In reply to लेख वास्तववादी असला तरी, by शान्तिप्रिय
भापो.
जावू द्या हो...
सोडा हो ...
लेख पटला
इको-टेररिझम नावाचा एक प्रकार
लेख काळजाला भिडला. अजून येऊ
धन्याशी सहमत! लेख वाचून
In reply to लेख काळजाला भिडला. अजून येऊ by सतिश गावडे
स्फुट आवडलं
अतिरेक
पहिल्या वाक्याशी सहमत.
In reply to अतिरेक by चलत मुसाफिर
साधा सरळ तर्क
In reply to पहिल्या वाक्याशी सहमत. by वेल्लाभट
काय करणार मग ?
त्यांनी लेख लिहिला. आपण
In reply to काय करणार मग ? by उगा काहितरीच
सरळ ठोकलं की लागणारच ना.
फेक दो
फेक दो
पूर्णपणे सहमत !
निसर्ग ओरबाडला की असे होणारच
अगदिच! त्यक्तेन भून्जीतः
In reply to निसर्ग ओरबाडला की असे होणारच by विटेकर
प्रगतीच्या वाटेवर चढ उतार होणार
पटलं
असो यावर्षी इन्फ़र्नो येईल ती
सहमत..
सहमत..