Skip to main content

मानसिकता

कसलं उकडतंय ना!

लेखक वेल्लाभट यांनी शुक्रवार, 13/05/2016 21:40 या दिवशी प्रकाशित केले.
आज आम्ही चार जण बोलत असताना एक जण अगदी असं कसंनुसं होत घाम पुसत 'कसलं उकडतंय ना!!' असं म्हणाला. तापमान खरंच प्रचंड वाढलंय एकंदर. त्याचे परिणामही दिसतायतच. तेंव्हा विचार आले मनात, की साला उकडतं उकडतं म्हणत आपण सगळेच तक्रार करतोय... हे होतंय आपल्यामुळेच. बरं तेही आपल्याला माहिती आहे, तशी पकपक आपण सोशल मिडियावर करत असतोच की. पण, आपण झाडं लावतो, किंवा ती तोडली जाऊ नयेत म्हणून काही करतो? नाही. आपण पाणी वाचवतो? नाही. आपण एसी वापरणं कमी करतो? नाही. आपण गाड्या वापरणं कमी करतो? नाही. आपल्याला शहरं हवीत? हो. प्रगती हवी? हो. मॉल, टॉवर हवेत? हो. तथाकथित लॅव्हिश लाईफ हवं? हो. जंगलं हवीत?