✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

माझी खाद्यशैली योग्य आहे का?

म
मुक्त विहारि यांनी
Wed, 05/11/2016 - 14:26  ·  लेख
लेख
माझे वय पन्नास.अद्याप तरी किडनी, हृदय, रक्तदाब, मधूमेह नाही. रक्तातील आणि लघवीतील साखरेचे प्रमाण योग्य आहे.हिमोग्लोबिन साधारणपणे १२.० च्या आसपास (प्लस-मायनस १) घोटाळत असते. दर ६ महिन्यातून एकदा मधूमेहाची तपासणी करतो.बाहेरच्या देशांत काम करत असतांना किडनी, हृदय आणि रक्तदाब ह्यांचे निदान कंपनीच्या खर्चाने होत होते. सध्याची माझी जीवनशैली आणि खाद्यशैली देत आहे.काही कारणांमुळे ती अधुन-मधून बदलत असते.पण डोंबिवलीला आलो की परत नेहमीच्या मार्गावर येते. उठ्णे ==> झोप पुर्ण झाली की, पण जास्तीत जास्त ७:०० वाजता.कधी-कधी पहाटे ५:००ला पण जाग येते.पण मग न झोपता वाचन करत बसतो किंवा फिरायला जातो किंवा एखादा हलका-फुलका सिनेमा बघत बसतो. नाश्त्यापुर्वी अर्धा ते पाऊण तास फिरणे. सकाळचा नाश्ता ===> ८:०० ते ८:१० पर्यंत नाश्ता कारायला बसतो. नेहमीच्या खाण्यातील नाश्त्यातील पदार्थ ===> १. थालीतीठ+लोणी*दही+लोणचे २. इडली+सांभार+चटणी ३. बटाटे-पोहे ४. उपमा ५. मेतकूट+तूप्+भात ६. आमलेट पोळी किंवा आमलेट्+ब्रेड ७. डोसे+सांभार+चटणी ८. उत्तप्पा+सांभार+चटणी. नाश्ता झाला की वाचनालयात पुस्तक बदलायला जाणे आणि भाजी बाजार. जेवणाची वेळ आणि खाद्यपदार्थ जेवणाची वेळ ===> १२:०० ते १२:१५ च्या दरम्यान जेवायला बसतो. खाद्यपदार्थ =====> वरण्+भात+तूप+लिंबू जवळपस रोज. २ भाकर्‍या , ज्वारीच्या किंवा तांदूळाच्या.कधी-कधी पोळ्या.पण पोळ्या मात्र आठवड्यातून एक ते दोन वेळाच. एक वाटी कोशिंबीर, काकडी किंवा बीट किंवा कोबी. कोशिंबीर कुठलेही असो, बीट मात्र जेवणात असतेच असते. १ उकडलेले अंडे. सकाळी आमलेटचा नाश्ता झाला असेल तर अंडे कटाप. एक ते दोन वाटी पालेभाजी ===> मेथी,पालक,करडई,पातीचा कांदा,चुका,चाकवत,अळू किंवा माठ. एक वाटी उसळ ===> चवळी,मटकी,वाटाणे,हरभरा. (कधी-कधी मटकी-तोंडली, वांगी-हरबरे किंवा पडवळ-वाल अशी उसळ+फळभाजी करतो.अशावेळी मग अजून एखादी उसळ किंवा फळभाजी करत नाही.) एक ते दोन वाटी फळभाजी ===> बटाटा, सुरण, फ्लॉवर, कोबी, ढेमसे, वांगी,दुधी भोपळा, लाल भोपळा (लाल भोपळा महिन्यातून एकदा.लाल भोपळा आणि कोहळा सांभारात जास्त वापरतो.) एक ग्लास ताक. जेवण झाले की एखादी खोबर्‍याची वडी, सोनपापडी किंवा गुळाचा खडा. दुपारी जेवण झाले की घरात थोडी शत-पावली आणि वाचन. दुपारी २ ते ३:३० झोप. (ह्याला वामकुक्षी काय म्हणणार्?मस्त झोरत पडलेला असतो.) ४:०० ते ५:०० वाचन ५:०० ते ५:३० नाश्ता. जास्त करून पोहे किंवा उपमा,दुपारची उसळ उरली असेल तर मिसळ-पाव, कधी-कधी सुरळीच्या वड्या, मेदूवडे-सांभार, बटाटे-वडे (वड्यांच्या बरोबर लसूण चटणी हवीच.) ६:०० ते ८:०० फिरणे किंवा कामानिमित्ताने इतरांकडे जाणे. ८:०० ते ८:३० पर्यंत जेवण. सध्या रात्रीचे जेवण जरा हलकेच घेतो.खिचडी-कढी, आमटी-भात किंवा बटाट्याचे परोठे किंवा पिठले-भाकरी. महिन्यातून एकदा, घरी केलेली आणि फक्त बटर मध्ये बनवलेली पाव-भाजी. (साधारण १५० ग्रॅम बटर लागते आणि ६-७ जणांना पुरते.) ९:०० ते १०:०० वाचन आणि जास्तीत जास्त १०:३० पर्यंत झोपायला जाणे. आठवड्यातून एकदा, जास्त करून रविवारी २ बियर आणि चिकन-बिर्याणी किंवा अंडा-करी+भाकरी किंवा खिमा+भाकरी. ========================================== आता माझे प्रश्र्न.... १. मी सकाळ आणि संध्याकाळ शांत वातावरणात फिरण्याशिवाय इतर कुठलाही व्यायाम करत नाही किंवा योगासने पण करत नाही.वजन अद्याप तरी आटोक्यात आहे. उंची १५५ सेमी आणि वजन ६० किलो (अधिक-उणे २ किलो.) २, सध्या मी दर ६ महिन्यांनी रक्तदाब आणि मधूमेह व हिमोग्लोबिन ह्याची तपासणी एकाच डॉ,कडून आणि एकाच ठिकाणी करून घेतो. ह्या व्यतिरिक्त अजून काही तपासण्या आवश्यक आहेत का? आणि असल्यास किती महिन्यांनी? ३. जीवनसत्वांची तपासणी करणे आवश्यक आहे का? आणि असल्यास किती महिन्यांनी? ४. स्ट्रेस टेस्ट ऑगस्ट-२०१५ मध्ये करून घेतली होती.ती नॉर्मल आली.आता परत दुसरी टेस्ट करणे आवश्यक आहे का? ५. माझ्या खाण्यात जास्त प्रमाणात तेल किंवा तूप किंवा लोणी आहे का? ६. ६० नंतर माझ्या खाण्यात कुठले पदार्थ कमी करू आणि कुठले वाढवू? देव=दयेने अद्याप तरी, हृदयाचे किंवा किडनीचे दुखणे नाही.ते पुढेही होऊ नये ही देवाचरणी प्रार्थना आणि मिपावरील डॉ.ना नम्र विनंती, की कृपया मला मार्गदर्शन करावे.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
जीवनमान
तंत्र
राहणी
लेखनप्रकार (Writing Type)
सल्ला
माहिती
मदत

प्रतिक्रिया द्या
28331 वाचन

💬 प्रतिसाद (70)

प्रतिक्रिया

आपले वजन ५२ ते ६७ किलो या

सुबोध खरे
गुरुवार, 05/12/2016 - 11:57 नवीन
आपले वजन ५२ ते ६७ किलो या मध्ये असायला पाहिजे. BMI १९.१ ते २४. ९ हे व्यवस्थित असल्याचे लक्षण आहे https://www.rush.edu/health-wellness/quick-guides/what-is-a-healthy-weight
  • Log in or register to post comments

५२ ते ६७

मुक्त विहारि
गुरुवार, 05/12/2016 - 13:05 नवीन
ह्याची सरासरी म्हणजे (५२+६७)/२ = ११९/२ =५९.५ म्हणजे वजन एकदम प्रमाणबद्ध आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

साधारण साठ किलो हे आदर्श

सुबोध खरे
गुरुवार, 05/12/2016 - 13:30 नवीन
साधारण साठ किलो हे आदर्श (IDEAL) वजन आहे. (आजकाल हा शब्द वापरायची भीती वाटते). यात १० % अधिक उणे (+/-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

नुसते वजन प्रमाणात असून उपेग

स्पा
गुरुवार, 05/12/2016 - 14:16 नवीन
नुसते वजन प्रमाणात असून उपेग नाही त्यात चरबी आणि मांस किती प्रमाणात आहे हेही महत्वाचे आहे . साठ किलो पैकी बहुतांश भाग चरबीचा असेल तर मग ते ऑड आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

माझी खाद्यशैली योग्य आहे का?

बेकार तरुण
गुरुवार, 05/12/2016 - 14:09 नवीन
माझी खाद्यशैली योग्य आहे का? >>> योग्य का अयोग्य माहित नाही, पण कोणालाहि हेवा वाटेल अशी नक्कीच आहे !!
  • Log in or register to post comments

जाम सुखी माणुस!! आहे ते

मोहनराव
गुरुवार, 05/12/2016 - 14:18 नवीन
जाम सुखी माणुस!! आहे ते चांगलं चाललय! आहार परिपुर्ण वाटतोय..
  • Log in or register to post comments

मु वी

सुबोध खरे
गुरुवार, 05/12/2016 - 19:41 नवीन
मु वी तुमची जीवन शैली व्यवस्थित आहे. त्यात काहीही करायची गरज नाही. आठवड्याला दोन बियर प्यायल्यामुळे फारसे नुकसान होत नाही असे आतापर्यंतच्या ज्ञानाने मी सांगू इच्छितो. केवळ एखादे वर्ष अधिक जगाल "कदाचित" पण तेवढे एक वर्ष तुमच्या ८० किंवा ८५ किंवा ९० वर्षाच्या आयुष्यात "अधिक" करण्यासाठी बियर सोडणे तुम्हाला आवडेल का? हा प्रश्न तुमचा वैयक्तिक आहे. ( मी टी टोटलर आहे तरीही हेच सांगतो) बाकी जे तुम्ही अर्धा पाउण तास फिरायला जाता ते फक्त जलदगतीने चाला एवढाच बदल मी सुचवेन. बाकी तुमच्या अजून चाचण्या करायचीही गरज नाही आणी जीवन शिलीतही बदल करायची आवश्यकता नाही असे मला वाटते.
  • Log in or register to post comments

वाह.. किती आदर्श.. असं म्हणत

गवि
गुरुवार, 05/12/2016 - 21:06 नवीन
वाह.. किती आदर्श.. असं म्हणत म्हणत लेख वाचत गेलो. मग .. आठवड्याला एकदाच आणि फक्त दोनच आणि फक्त बियरच हे वाचून मात्र बाकीच्या एकूण संपूर्ण माहितीविषयीच्या सत्यतेविषयीच शंका उत्पन्न झाली. मुविशेट ह.घ्या हो.. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

IT IS NOT ONLY IMPORTANT TO

सुबोध खरे
गुरुवार, 05/12/2016 - 19:42 नवीन
IT IS NOT ONLY IMPORTANT TO ADD "YEARS" TO LIFE BUT IT IS EQUALLY IMPORTANT TO ADD "LIFE" TO YEARS
  • Log in or register to post comments

हाफशेंच्युरी निमीत्त सर्वांना

जेपी
गुरुवार, 05/12/2016 - 21:36 नवीन
हाफशेंच्युरी निमीत्त सर्वांना 'माझी खाद्य शैली' या मुवि लिखीत पुस्तकाची एक एक प्रत देऊन सत्कार करण्यात येत आहे.. - शुभेच्छुक-जेपी आणी तमाम जळलेले कार्यकर्ते..
  • Log in or register to post comments

सहीये!

रातराणी
Fri, 05/13/2016 - 00:15 नवीन
सहीये!
  • Log in or register to post comments

आजच मधूमेह आहे की नाही हे तपासायला साखरेची पातळी तपासून घेतली.

मुक्त विहारि
Fri, 05/13/2016 - 21:55 नवीन
अनोशा पोटी ===> ८२ मि.ग्रॅ. जेवण झाल्या नंतर ===> १२१ मि.ग्रॅ. लघवीतल्या साखरेचे प्रमाण ===> Absent
  • Log in or register to post comments

तुमची जेवणातील महाराष्ट्रीयन

हेमंत लाटकर
Fri, 05/13/2016 - 23:14 नवीन
तुमची जेवणातील महाराष्ट्रीयन थाली आवडली.
  • Log in or register to post comments

पंन्नाशीला रीटायरमेंट....हे स्त्रीयांसाठी स्वप्नच

नेत्रेश
Sat, 05/14/2016 - 03:02 नवीन
काही अपवाद वगळता पंन्नाशीला रीटायर झालेला पुरुष म्हणजे घरातील स्त्रीच्या कामात वाढ. पंन्नाशीला रीटायरमेंट हे स्त्रीयांसाठी स्वप्नच असणार............
  • Log in or register to post comments

मुविशेट,

डॉ सुहास म्हात्रे
Sat, 05/14/2016 - 08:28 नवीन
मुविशेट, व्यक्ती तितक्या प्रकृती असतात. या "प्रकृती"त माणसाची मातापित्यांकडून मिळालेली जनुके, जनुकांचे शारिरीक वाढ होताना झालेल्या अभिव्यक्ती (एक्सप्रेशन्स) आणि त्याचबरोबर आजूबाजूची परिस्थिती (एनव्हिरॉनमेंट), खाणेपिणे, शारिरीक व्यायाम, व्यसने, इ इ इ अनेक घटक असतात. त्यामुळेच, एका माणसात काही एक बरेवाईट झाले ते दुसर्‍यात होईलच असे नाही. तुमचा ५० वर्षांचा इतिहास हेच सांगत आहे की तुमची खाद्य- आणि जीवन-शैली तुम्ही बरोबर घेऊन आलेल्या शरिराच्या मॉडेलला उत्तम आहे, हे तुमची आत्ताची शारिरीक मोजमापे आणि आतापर्यंतच्या तपासण्यांच्या निकालांवरून स्पष्ट आहे... अगदी मांसाहार आणि बियरसकट". केवळ शास्त्रिय वाटणारा आग्रह म्हणुन त्यात बदल करून जीवनातला आनंद कमी करणे योग्य होणार नाही... हे मत पण शास्त्रिय म्हणायला हरकत नाही ;) :) तेव्हा... "ऐकावे जनाचे करावे मनाचे" ही विचारपद्धती आचरून सुखाने खा, प्या आणि मजेत रहा.दरवर्षी वैद्यकीय चाचण्या करा आणि वैद्यकीय सल्ला असेल तरच जीवनशैलीत बदल करा. उगा कोणताही विचार करून अथवा सल्ला ऐकून, न आवडणारी जीवनशैली स्विकारून आपला आनंद कमी करू नका. तुम्हाला आणि सर्व कुटुंबाला दीर्घ आयुरारोग्यासाठी अनेकानेक शुभेच्छा !
  • Log in or register to post comments

+ १

सुबोध खरे
Sat, 05/14/2016 - 09:58 नवीन
+ १
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

एक्का काका, त्यांनी उगा इतर

यशोधरा
Sat, 05/14/2016 - 16:29 नवीन
एक्का काका, त्यांनी उगा इतर मिपाकरांना जळवायला लेख टाकलाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

शमत हाय

नाखु
Tue, 05/17/2016 - 08:36 नवीन
एक्का काका, त्यांनी उगा इतर मिपाकरांना जळवायला लेख टाकलाय.
किंचीत दुरुस्ती एक्का काका, त्यांनी उगा इतर मिपाकरांना (जळवा) लावायला लेख टाकलाय. (जळवा)=पक्षी वजन कमी करने,पथ्य पाणी,व्यायाम्,गोड खाऊ नये ई
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

दिवसाला एक अवॅकाडो खात जा !!

खटपट्या
Tue, 05/17/2016 - 08:48 नवीन
दिवसाला एक अवॅकाडो खात जा !! बरा असतो म्हणतात तब्येतीला !!!
  • Log in or register to post comments

माठ , करडी , चुका नि काय काय

सप्तरंगी
Tue, 05/17/2016 - 16:47 नवीन
माठ , करडी , चुका नि काय काय ..अहाहा काय सुखी आहात, तुमची जेवणाची जीवनशैली मस्त आहे. कोण बनवते हे सगळे… तुमची बायको. lucky आहात.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा