Skip to main content

रासबेरी पाय - थोडक्यात ओळख

लेखक प्रसाद गोडबोले यांनी बुधवार, 11/05/2016 16:40 या दिवशी प्रकाशित केले.
प्रस्तावना : गावडे सरांनी ह्या इथे rbp केलेल्या विनंती वजा आज्ञेचा मान राखुन रासबेरी पाय ह्या भन्नाट गोष्टीची माहीती देण्यास हा एक अत्यंत छोटेखानी धागा काढत आहे ! __________________________________________________________

रासबेरी पाय Raspberry Pi

कल्पना करा की तुम्ही तुमचा कॉम्प्युटर खिषात घेवुन फिरु शकलात तर काय मजा येईल ! तसेही लॅपटॉप आपण पाठीवर घेवुन फिरतोच पण समजा आपल्या स्मार्टफोन प्रमाणे तुम्ही खिषात घेवुन फिरुशकलात तर काय मजा येईल नै ! ह्म्म .... नाहीना कल्पना करता येत .... "त्यात काय विशेष ? "असा प्रश्न पडतोय ना ? असु दे . बर्‍याच जणांचे असेच होते. फक्त जे अट्टल 'कोड'गे ( कॉम्प्युटर कोड सोबत 'खेळत खेळत' रात्र रात्र 'जागवणारे') आहेत तेच ही कल्पना व्यवस्थित रंगवु शकतील ! तर .... रासबेरी पाय हा तुमच्या खिषात मावु शकेल इतक्या छोट्या आकाराचा क्रेडीटकार्ड साईझ सिंगल बोर्ड कॉम्पुटर आहे ! 'रासबेरी तद्दन बकवास लागते , रादर मलबेरीच्या पुढे सगळ्याच बेरी भिकार लागतात' असे आमचे वैयक्तिक मत आहे पण ते असो , तात्विक मतभेद असले तरी दीर्घद्वेषीपणा न ठेवता , चांगल्या गुणांची कदर करायची सवय असल्याने असल्याने रासबेरी पाय च्या प्रेमात पडलो आहोत. ही पहा रासबेरी पाय ची मुख्य साईट : https://www.raspberrypi.org/ हा रासबेरी पाय चा लोगो 1 हा रासबेरी पाय ३ चा फोटु 1 आता ह्याचे कॉन्फिगरेशन ऐका : १)ऑपरेटींग सिस्टीम : रासबीयन (डेबीयन ह्या लिनिक्स च्या कर्नल सारखीच खास ह्या रासबेरी साठी बनवलेली१) २)प्रोसेसर : ब्रॅडकॉम २८३५ ३) सीपीयु: 1200 MHz quad-core ARM Cortex-A53 ४) रॅम : 1 ग्ब ५) स्टोरेज ( हार्ड डिक ) : मायक्रो एस डी कार्ड ( नक्की माहीत नाही पण बहुतेक ८ ते १६ ग्ब पर्यंत वापरता येते ) ६) कनेक्टीव्हिटी : इन्बिल्ट ब्लुटूठ , इन्बिल्ट वायफाय , इथर नेट , एच डी एम आय आऊट पुट ! ७) इतर वैशिष्ठे : तब्बल चार यु एस बी पोर्ट ! ऑडियो विडीयो ऑटपुट जॅक , स्टॅट्स एलीडी , कॅमेरा जोडायला जॅक ८) पावर : मायक्रो यु एस बी पिन ( आपल्या मोबाईल चार्ज करायला वापरतो ती ) आपल्या मोबाईल ला लागते तेवढी पावर १.५ म्ह्झ पुरते !! ९) सर्वात महत्वाचे म्हणजे तब्बल ४० जनरल परपज इन्पुट आउटपुट पिन्स ( मेल) ! ह्यांना सतराशे साठ प्रकारचे सेन्सर बसवु शकतो आपण ! ( सर्वांची नावे लिहित बसत नाही हा पहा अ‍ॅमेझॉन वर सापडलेल फोटू ) a अहो पण ह्याचे करायचे काय ? तर काँपुटर वर जे जे करता येते ते ते सारे करता येते ह्याच्यावर !! तरीही कल्पना यावी म्हणुन युटुब वर मिळालेल्या ह्या काही खतरनाक कलाकृत्या : १) मायक्रॉफ्ट : आर्टीफिशीयल इन्टेलीजन्स फॉर ऑल थोडक्यात गरीबांचा जार्विस ! https://www.youtube.com/embed/WsOVvrTItZM २) पाय टॉप https://www.youtube.com/embed/jb6hVe1fRzI ३)पा फोन https://www.youtube.com/embed/8eaiNsFhtI8 ४) ऑटोमेटेड ड्रायव्हिंग https://www.youtube.com/embed/BBwEF6WBUQs ५) अजुन काही प्रोजेक्ट https://www.youtube.com/embed/9YhTOUu06EY हुश्श . आता एक महत्वाची गोष्ट

" ह्याची किंमत काय ? "

फक्त ३५ डॉलरा ! २५०० रुपये बस्स !!

आता कल्पना करा की ह्या इतक्या स्वस्तातल्या कॉम्पुटर वापरुन आपण काय काय करु शकतो ते , होम ऑटोमेशन , रोबोटिक्स , सेक्र्युरीटी मॉनिटरींग , ह्यॅकिंग डिव्हाईसेस , एडुकेशन डिव्हाईसेस अन अजुन काय काय !! आता अजुन एक धक्का देवु का ? हा पहा रासबेरी पाय झीरो : किम्मत फक्त ५ डॉलरा : ३५० रुपये !! 0 हे सारे झाले टेक्निकल पण सर्वात महत्वाचा प्रश्न अजुन राहातो की , लेमॅन लोकांना सर्वसामान्य ह्याचा काय उपेग ? तर ह्यावर जरा गांभीर्याने विचार करु : आपल्या देशात तब्बल १००- ११० कोटी लोकं रहातात , त्यातल्या किती लोकांपर्यंत आज कॉम्पुटर पोहचला आहे ? सोडा , कॉम्पुटर दुरची बात किती गावात व्यवस्थित वीज पोहचली आहे ? किती शाळात मुलांना रीतसर कॉम्प्युटर चे प्रशिक्षण मिळते ? माझ्या अंदाजे २५ ते ५० कोटी पेक्षा जास्त नसावेत , उद्या , भविष्यकाळ कठोर आहे , कॉम्पुटर येत नसेल तर तुम्ही असिक्षित आहात ! कॉम्पुटर व टेक्नॉलोजी चा जर ह्या देशात प्रसार झाला नाही तर गिनि कॉईफिशंट किती वाढेल , सोप्प्या शब्दात , गरीब श्रीमंत , शिक्षित अशिक्षित ही दरी किती वाढेल ? फेसबुक वगैरे सोशल मीडीया अन स्मार्टफोन्स आल्यापासुन ह्या सारा सोशियोएकॉनोमिक बदलांची नांदी आपण पहातोच आहोत , भविष्यासाठी संगणक साक्षरता ही गोरगरीबांपरयंत पोहचवणे अनिवार्य आहे . कल्पना करा की हा ३५० रुपायाचा रासबेरी पाय वापरुन , अन १००० रुपायात बॅटरी अन डिस्प्ले ची सोय करुन फक्त २०००- २५०० मध्ये आपण एक फुल्ल फ्लेजड संगणक तयार करु शकतो जो संपुरण प्रोग्रामिङ साठी वापरता येईल तसेच वीजेच्या उपलब्धतेवर जास्त अवलंबुन नसेल ! किती लोकांपर्यंत पोहचवता येईल संगणक !! समाजसेवेसोबत समाजसेवा अन शिवाय बिजीनेस चा बिजीनेस ही होईल !! हे मनावर घेवुन कोणीतरी करणे गरजेचे आहे. .

आम्हीच केले असते हो , पण आधी म्हणल्याप्रमाणे शाहु फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात कर्वे आगरकर सावरकरांच्या समाजकार्याला शष्प किंमत उरली नाहीये हे कटु सत्य आहे म्हणुन आपण आपले दुसर्‍यास ठेच मागचा शहाणा ह्या नियमाने शहाणे होवुन कोणत्याही प्रकारच्या समाजसेवेपासुन दुरच राहिलेले बरे !

जर संगणक साक्षरता गोरगरीबांपर्यंत नाही पोहचली तर आज जे आम्ही हिंजेवाडीत पहात आहोत की एकीकडे ब्लुरीज चे टॉवर चे टॉवर वाढत चालले आहेत , एक एक दोन दोन करोड रुपायाची घरे आहेत अन दुसरी कडे गेटवरचा वॉचमन ला ३० हजार पण पगार नाय ! पलीकडे झोपड्यात रहाणार्‍यांचा विषयच नको ! ही परीस्थिती सार्वत्रिक दिसेल जे की खुप गंभीर आहे. ह्म्म असोच्च ! आमचे आपले स्वत:चे पॅरानॉईड निरर्थक स्वात्मचिंतन ! सोडा ! तर ही होती रासबेरी पाय ह्या एका भन्नाट गोष्टीची थोडक्यात ओळख !बाकी लोकांनी ह्या माहीतीत जरुर भर घालावी . बाकी लेख संप्वताना हा आम्हाला भावलेला एक क्युटी क्युटी रासबेरी पाय प्रोजेक्ट : टॉकिंग चॅटर पाय फोन q ______________________________________________________ अवांतर : हा रासबेरी पाय अन हॉस्पिटल मध्ये वापरतात ती मेडीकल डिव्हाईसेस चे सेन्सर बनवुन आपण जर पुर्ण ह्युमन लाईफ स्टॅटिस्टिक्स बीपी , शुगर लेव्हल , बॉडी टेम्परेचर, ब्रेन फक्श्न, स्लीप पॅटर्न्स्, ड्रीम पॅटर्न्स , युरीन, स्टूल स्टॅटिस्टिक्स , हार्मोन्स स्टॅटिस्तिक्स वगैरे वगैरे जर रीयल टाईममध्ये ऑनलाईन आणु शकलो तर काय मजा येईल राव ! पुढे मागे असे काही करावे असा आमचा विचार आहे :)

वाचने 20343
प्रतिक्रिया 65

प्रतिक्रिया

भारी आहे! आणि हो, हिंजेवाडी नाही, हिंजवडी.

In reply to by यशोधरा

प्रतिसादाला सहम्ती.. चुकीच्या उच्चाराबद्दल सम्क्ष भेटीत प्रगोला लृलॄ केले जाईल. अता मूळ अवांतर चांगली माहीती आम्हा आडाण्यांना जरा काही शिकावे म्हटले तर

नुराकुस्ती

धागे मध्ये येतात.

चुकुन माय्क्रॉफ्ट ची लिन्क चुकीची दिली गेली आहे : ही पहा करेक्ट लिन्क १) मायक्रॉफ्ट : आर्टीफिशीयल इन्टेलीजन्स फॉर ऑल थोडक्यात गरीबांचा जार्विस ! https://www.youtube.com/watch?v=g1G0yEKuED8

In reply to by मम्बाजी सर्वज्ञ

अर्थात.. आणि जावा देखील टाकू शकतो (विथ लिट्ल एफोर्ट्स). पण पायथन बेस्ट असं मत आहे.

इंटरेस्टिंग माहिती या बद्दल अजुन माहिती वाचायला नक्की आवडेल पैजारबुवा,

@ अवांतर - अति अवांतर - आपण वर्णन केलेला biosensor james bond मुव्हीत पाहिल्याचे स्मरते . बाकी लेख आवडला . @ अति अति अवांतर - पुढील बुद्धीबळ स्पर्धेतील आपल्याशी सामन्याच्या प्रतीक्षेत

:) सध्या या वरच काम चालुये माझ. फार शेअर नाही करता येणार. पण अचाट probabilities आहेत याचा वापर केल्यास... programming खुप सोप आहे. ज्या लोक्स ना 8086 / म्युपी 8051 च programming माहितिये त्यान्च्या साठी एकदम बाए हात का खेल!!

हे आणि कॅमेरा वापरून छायाचित्रणात कायकाय करता येईल याचा विचार करून रोमांचित झालो! :-) विजेचा लखलखाट टिपणे, वादळाचे दृश्य टिपणे, वन्यजीवांचे कॅमेराट्रॅप चित्रण, इ. इ. भारी! फक्त ती संगणकाची भाषा शिकायला पाहिजे.

मागच्याच आठवड्यात पहिलावहिला पाय आणलाय, सध्या बंडल प्रयोग चालू आहेत. पाय कट्टा करावा नवख्या कोड्ग्याना मदत म्हणून हि विनंती.

गेल्या वर्षी ह्या भन्नाट कल्पनेची ओळख झाली आणी एका नव्या विश्वाला भेटल्यागत झाले. ह्या कल्पनेत कंप्युटींग फंडा बदलण्याचे सामर्थ्य आहे. बहुधा ७-८ वर्षांपुर्वी एका कल्पनेतुन सुचलेल्या ह्या कंसेप्टने सध्या जगाला खुळावल्यागत झाले आहे आणी ह्या मुर्ती लहान पण किर्ती महान अश्या गोष्टीने काय काय करता येऊ शकते ते दरदीशी नवीन समोर येते आहे. (सध्या मी ह्या पाय ने घरची जुनी हार्डड्राईव्ह नॅस मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न चालू आहे तसे झाल्यास अत्यंत स्वस्तात नॅस बॉक्स घरी वापरेन :) )

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

नक्कीच. धन्यवाद. रच्याकने. हा धागा तंत्रजगत मध्ये जास्त सुटेबल होता. तिथे हलवायला हवा..

In reply to by स्वच्छंदी_मनोज

हलवला आहे.

In reply to by सस्नेह

धन्यवाद.

रास्प्बेर्र्य पी वर मराठीत पहिलाच लेख बघतोय.
कल्पना करा की हा ३५० रुपायाचा रासबेरी पाय वापरुन , अन १००० रुपायात बॅटरी अन डिस्प्ले ची सोय करुन फक्त २०००- २५०० मध्ये आपण एक फुल्ल फ्लेजड संगणक तयार करु शकतो जो संपुरण प्रोग्रामिङ साठी वापरता येईल तसेच वीजेच्या उपलब्धतेवर जास्त अवलंबुन नसेल ! किती लोकांपर्यंत पोहचवता येईल संगणक !! समाजसेवेसोबत समाजसेवा अन शिवाय बिजीनेस चा बिजीनेस ही होईल !! हे मनावर घेवुन कोणीतरी करणे गरजेचे आहे. .
कल्पना मस्त आहे.
अवांतर : हा रासबेरी पाय अन हॉस्पिटल मध्ये वापरतात ती मेडीकल डिव्हाईसेस चे सेन्सर बनवुन आपण जर पुर्ण ह्युमन लाईफ स्टॅटिस्टिक्स बीपी , शुगर लेव्हल , बॉडी टेम्परेचर, ब्रेन फक्श्न, स्लीप पॅटर्न्स्, ड्रीम पॅटर्न्स , युरीन, स्टूल स्टॅटिस्टिक्स , हार्मोन्स स्टॅटिस्तिक्स वगैरे वगैरे जर रीयल टाईममध्ये ऑनलाईन आणु शकलो तर काय मजा येईल राव ! पुढे मागे असे काही करावे असा आमचा विचार आहे :)
जर हि साधने lithium battary वापरून शरीरात टाकता आली आणि त्यांना zigbee ने सर्व wirelessly जोडले तर काय बहार !!!! एक दोन वर्षे २४*७ शरीराचे मापन करता येईल.

हा जादूचा दिवा कुठे मिळू शकतो? आणि याबद्दल मिडियामध्ये काहीच वाचल्याचं आठवत नाही.

हा जादूचा दिवा कुठे मिळू शकतो? आणि याबद्दल मिडियामध्ये काहीच वाचल्याचं आठवत नाही.

In reply to by बोका-ए-आझम

अ‍ॅमॅझॉनवर आहे. आपल्याला हवे ते मॉडेल निवडावे (पाय २, पाय २), त्यातले पर्याय निवडावे (बी, बी+) आणी घेवून टाकावे.

In reply to by स्वच्छंदी_मनोज

ते आहेच तरी त्यांच्या या साईटवर जाऊन जरा चक्कर टाकून यावी. काय पाहिजे काय नाही हे ठरवायला चांगलेय (तिथूनच विकत पण घेऊ शकतो. :) ).

मला जरा गावठी भाषेत कोणी समजावून सांगेल काय? नॅनो कशी गरीबाची कार होती, आणि कमी पैशात सग्गळं सग्गळं करत होती तसा हा गरीबाचा (कमी पैशात सग्गळं सग्गळं करणारा) कॉम्प्युटर आहे का? म्हणजे तुलना कायम श्रीमंतांच्या कॉम्प्युटरशी होणार का? "...वहीं सफेदी, वहीं झाग...कम दामों में मिले, तो ये क्यों नहीं? मान गये ... आप की पारखी नजर, और निरमा सुपर..." हे व्हॅल्यू प्रपोझिशन आहे का रा० पा० चं?

In reply to by आदूबाळ

नाही.
"...वहीं सफेदी, वहीं झाग...कम दामों में मिले, तो ये क्यों नहीं? मान गये ... आप की पारखी नजर, और निरमा सुपर..." हे व्हॅल्यू प्रपोझिशन आहे का रा० पा० चं?
नाही. ऑब्व्हियसली फुल स्केल डेस्कटॉप संगणकाशी ह्याची तुलना करुन चालणार नाही. पण संगणक शिकणं, ऑटोमेशन चे प्रोग्राम्स वगैरे लिहायला ह्याची शक्ती पुरेशी आहे.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

हम्म. म्हणजे जिथे** संगणकाचा शिरकाव जास्त किमतीमुळे अजून होऊ शकलेला नाही, तिथे रा० पा० उपयोगी आहे. **जिथे म्हणजे फक्त भौगोलिक विस्तार अपेक्षित नाही. फंक्शनल विस्तारही अपेक्षित आहे.

आम्हीच केले असते हो , पण आधी म्हणल्याप्रमाणे शाहु फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात कर्वे आगरकर सावरकरांच्या समाजकार्याला शष्प किंमत उरली नाहीये हे कटु सत्य आहे म्हणुन आपण आपले दुसर्‍यास ठेच मागचा शहाणा ह्या नियमाने शहाणे होवुन कोणत्याही प्रकारच्या समाजसेवेपासुन दुरच राहिलेले बरे !

लेख अतिशय आवडला. वर चर्चा केलेले ओटोमेशनचे प्रकल्प सोडुन इतरही बरेच इनोवेटिव प्रकल्प रासबेरी पाय वापरून केले जात आहेत. तुमचे स्वत:चे मायक्रो सर्वर (वर्कर) बनवणे, रासबेरी पाय टिवीला जोडुन मिडिया सेंटर बनवणे वैगेरे वैगेरे काही सहज करण्यासारखे उपयोग. कैक डझन पाय एकत्र जोडुन खूप शक्तिमान असे डाटा मायनिंग करणारे संगणक बनवने हा पेरलल कंप्युटिंग मधला एक उपयोग. युटामधली पिकोक्लस्टर ही कंपनी असे सर्वर्स विकते. इथे रासबेरी पायच्या प्रकल्पामागचे शिल्पकार कोण आहेत आणि त्यांची त्यामागची प्रेरणा काय होती याबाबत माहिती आहे.

रासबेरी पाय चा एक सोपा उपयोग म्हणजे साध्या एलसीडी टिव्ही ला स्मार्ट बनवणे. जर तुमच्याकडे एचडीएमआय पोर्ट सहित टिव्ही असेल, तर ... रासबेरी पाय वर 'कोडी' लोड करा. रासबेरी पाय टिव्ही ला जोडा (एचडीएमआय पोर्ट). वाय फाय किंवा इथरनेट केबल जोडा. मोबाईल वरुन रिमोट कंट्रोल करा ! (कोडी अऍप) kodi

In reply to by बोका

कोडी (पुर्वाश्रमीचे XBMC) इन्स्टाल करता येईलच पण कोडी पेक्षा प्लेक्स उत्तम पर्याय आहे. आता ऑफीशीयल सपोर्ट मीळाल्यापासून प्लेक्स हा कोडी पेक्षा उत्तम पर्याय आहे पाय साठी. पण मला स्वतःला स्मार्ट टीव्हीसाठी क्रोमकास्ट किंवा तत्सम मिडीया स्ट्रीमींग डिव्हाईस जास्त उपयुक्त वाटतात.

गेले १ वर्ष झाले RnD करतोय पाय वर, भारतात याची किंमत ३००० च्या जवळपास आहे. या छोट्या चकुल्याचे फार फायदे आहेत माझ्या कडच्या पाय चे काही फोटो attach केली आहेत. आमची कंपनी raspberry वर काम करण्यासाठी developer शोधात आहे, कोणाला काम करायचे असेल तर मला contact kara . RPi-2 RPi22

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

01101000 01101001 01110100 01110101 00101110 01110110 01100101 01000000 01100111 01101101 01100001 01101001 01101100 00101110 01100011 01101111 01101101

In reply to by सतिश गावडे

00101110 00110010 00111110 00100000 00101000 00010101 01001011 00101111 00100000 00110000 00111110 00110101 00100000 00111001 01000111 00101110 00100000 00000111 00000010 00011111 01001101

In reply to by प्रचेतस

00001101 00001010 01110011 01100001 01100111 01100001 01101100 01111001 01100001 01100001 01101110 01100001 01100001 00100000 01110011 01100001 01101101 01100001 01101010 01100101 01101100 00100000 01100001 01110011 01101000 01100001 01100001 00100000 01100010 01101000 01100001 01100001 01110011 01101000 01100101 01110100 00100000 01100010 01101111 01101100 01100001 01100001 00100000 01101011 01100101 01100101 00100000 01110010 01100101 00100001 00100001 00100000 00111010 00101001 00001101 00001010 01101101 01100001 01101010 01101010 01100001 01100001 00100000 01100001 01100001 01101000 01100101 00100000 01110000 01100001 01101110 00100000 01101000 01100101 01100101 00100001 00100000 00111101 00101001 00101001

पायचा महिमा ऐकून तोंडात बोट घातले गेल्या आहे !

रास्पबेरी पाय अतिशय चांगल्या दर्जाचे किट आहे. परंतु व्यवस्थित उपयोग करुन घेण्यासाठी फक्त सॉफ्ट्वेअर माहीत असून उपयोगाचे नाही थोडे तरी हार्डवेअरशी खेळता आले पाहिजे. जीपीआयओ (जनरल पर्पज इन्पुट-औटपुट) चा वापर कसा करायचा? बाहेरचे हार्डवेअर कसे जोडायचे? उदा. स्टेपर मोटर ड्रायवर, ऑडिओ अँप्लिफायर, कॅमेरा तसेच इतर सेंसर्स उदा. टेंपरेचर, प्रेशर, इन्फ्ररेड, मॉईश्चर इ. हे नीट समजून घेणे आवश्यक आहे अन्यथा या शक्तिशाली किटचा म्हणावा तसा वापर होत नाही. https://www.raspberrypi.org/blog/official-raspberry-pi-projects-book/ हे पायचे ऑफीशिअल प्रोजेक्ट्स बुक सुद्धा आता बाजारात आले आहे. त्याचा वापर करुन बरेच काही शिकता येईल. -रंगा

मी अजून थोडासा कन्फ्युझड आहे.. दोन प्रश्न आहे. १. हे पारंपारिक आय ओ टी पेक्षा कसे वेगळे आहे? २. रास्प्बेरी पाय आणि अँड्रॉईड फोन यांमध्ये हार्डवेअर आणि सोफ्टवेअर मध्ये नेमका काय फरक पडतो. कृ. हे अँड्रॉईद आहे आणि ते लिनक्स आहे असे फरक सांगू नयेत.

In reply to by आनन्दा

आय ओ टी नाही. तो मुळात एक काँप्यूटर मदरबोर्ड आहे. कीबोर्ड आणी एक डिस्प्ले जोडला की झाले. आकाराने अतिशय छोटा आणि सुटसुटीत असल्यामुळे त्याचे इतरही अनेक उपयोग जनतेने प्रयोग करुन पुढे आणले. ओपनससोर्स सॉफ्टवेअरमुळे त्यात झपाट्याने प्रगती झाली. आय ओ टी मध्ये आंतरजालीय कनेक्टिविटी देणे, वायर्ड किंवा वायरलेस, आणि ते उपकरण किंवा डिवाईस दूरस्थ नियंत्रणाखाली आणणे हा मूळ उद्देश असतो. २ - रास्पबेरी पाय वि अँड्रॉईड फोन - तुम्ही फक्त फीचर्सची तुलना करत असाल तर हल्लीचे स्मार्टफोन्स हे पायच्या तुलनेत कित्येक पटीने सरस आहेत. परंतु फोनचे हार्डवेअर एका मर्यादेबाहेर यूजर अ‍ॅक्सेसिबल नसते. त्याचं डिझाईन हे कमितकमी जागेत जास्तितजास्त फीचर्स कोंबणे हा असतो. त्यावरचा संगणक किंवा २-३ संगणक हे एका चिपमध्ये एंबेड केलेले असल्यामुळे जीपीआयो पिन्स बाहेरुन कंट्रोल करता येत नाहीत. यूएसबी पोर्टद्वारे जोडता येणारी काही मर्यादित हार्डवेअर सोडली तर वापर मुख्यतः त्याच्या ऑपरेटिंग सिस्टिम आणि त्याखाली नियंत्रित असलेले हार्डवेअर इतकाच राहतो. तुलना करायची झाली तर स्मार्टफोन हा एखाद्या हायएन्ड बीएमडब्ल्यू सारखा आहे. फीचर्स भरपूर आहेत परंतु ते गाडीचा एंबॅडेड भाग आहेत त्यात वापरकर्त्याची कल्पनाशक्ती मर्यादित परिघात वापरता येते कारण त्याचा उद्देशच तो नाहीये. आणि पाय हा गाडीची फक्त चासीस दिलेली आहे तुमच्या कल्पनाशक्तीप्रमाणे तुम्ही नॅनो बनवा नाहीतर बीएमडब्ल्यू. तुमच्या गरजेप्रमाणे सोयी करु शकता. आणि हे अतिशय स्वस्तात उपलब्ध करुन दिले आहे. कोणता स्मार्टफोन तुम्हाला $३५ ला मिळेल? -रंगा

In reply to by चतुरंग

ओ़के आता कळले. धन्यवाद. काय झालेय हल्ली बरेच लोक आम्ही हे करतो आणि ते करतो, आणि आमची टेक्नोलॉगी कशी रिव्होलुशनरी आहे म्हणून सांगत असतात. त्यांना आयोटी पेक्षा तुम्ही वेगळे काय करता म्हणले की चूप. म्हणून म्हणले की हे नेमके काय आहे. याला देखील आयोटी वॅल्यी दिसते, पण हे केवळ आयोटी म्हणून बघता येणार नाही. याला कदाचित मायक्रोकंप्युटर म्हणता येईल असे दिसते. बाकी अँड्रोईड शी संबंधित प्रश्न अश्यासाठी विचारला होता की स्मार्टफोन देखील अशी हार्डवेअर आणि त्यांचे इंटरफेसेस उपलब्ध करून देतात, पण अर्थातच एपीआय म्हणून, त्यापेक्षा हे कसे वेगळे आहे ते कळावे म्हणून. त्याचे देखील उत्तर मिळाले, धन्यवाद.

हे रासबेरी जर बोअर वेल च्या स्टार्टर ला जोडल..काही कंमाड कोड टायपल्या तर आपोआप सांगल्या टायमाला बोअर चालु बंद करेल काय ?!

In reply to by जेपी

सेलफोनवरुन चालणारे कितीतरी मोटर स्टार्टर्स मिळतात. नुसते गुगलून बघितलेल्त तरी बरेच सापडतील. उदा. Realtech Systems Mobile starter www.realtech.in.mp4

RPi la sensors connect karun, sensors chya input varun, motor chalu kiva band karu sakata, he ekdam sope ani eka diwasache kaam aahe