✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

रासबेरी पाय - थोडक्यात ओळख

प
प्रसाद गोडबोले यांनी
Wed, 05/11/2016 - 16:40  ·  लेख
लेख
प्रस्तावना : गावडे सरांनी ह्या इथे rbp केलेल्या विनंती वजा आज्ञेचा मान राखुन रासबेरी पाय ह्या भन्नाट गोष्टीची माहीती देण्यास हा एक अत्यंत छोटेखानी धागा काढत आहे ! __________________________________________________________

रासबेरी पाय Raspberry Pi

कल्पना करा की तुम्ही तुमचा कॉम्प्युटर खिषात घेवुन फिरु शकलात तर काय मजा येईल ! तसेही लॅपटॉप आपण पाठीवर घेवुन फिरतोच पण समजा आपल्या स्मार्टफोन प्रमाणे तुम्ही खिषात घेवुन फिरुशकलात तर काय मजा येईल नै ! ह्म्म .... नाहीना कल्पना करता येत .... "त्यात काय विशेष ? "असा प्रश्न पडतोय ना ? असु दे . बर्‍याच जणांचे असेच होते. फक्त जे अट्टल 'कोड'गे ( कॉम्प्युटर कोड सोबत 'खेळत खेळत' रात्र रात्र 'जागवणारे') आहेत तेच ही कल्पना व्यवस्थित रंगवु शकतील ! तर .... रासबेरी पाय हा तुमच्या खिषात मावु शकेल इतक्या छोट्या आकाराचा क्रेडीटकार्ड साईझ सिंगल बोर्ड कॉम्पुटर आहे ! 'रासबेरी तद्दन बकवास लागते , रादर मलबेरीच्या पुढे सगळ्याच बेरी भिकार लागतात' असे आमचे वैयक्तिक मत आहे पण ते असो , तात्विक मतभेद असले तरी दीर्घद्वेषीपणा न ठेवता , चांगल्या गुणांची कदर करायची सवय असल्याने असल्याने रासबेरी पाय च्या प्रेमात पडलो आहोत. ही पहा रासबेरी पाय ची मुख्य साईट : https://www.raspberrypi.org/ हा रासबेरी पाय चा लोगो 1 हा रासबेरी पाय ३ चा फोटु 1 आता ह्याचे कॉन्फिगरेशन ऐका : १)ऑपरेटींग सिस्टीम : रासबीयन (डेबीयन ह्या लिनिक्स च्या कर्नल सारखीच खास ह्या रासबेरी साठी बनवलेली१) २)प्रोसेसर : ब्रॅडकॉम २८३५ ३) सीपीयु: 1200 MHz quad-core ARM Cortex-A53 ४) रॅम : 1 ग्ब ५) स्टोरेज ( हार्ड डिक ) : मायक्रो एस डी कार्ड ( नक्की माहीत नाही पण बहुतेक ८ ते १६ ग्ब पर्यंत वापरता येते ) ६) कनेक्टीव्हिटी : इन्बिल्ट ब्लुटूठ , इन्बिल्ट वायफाय , इथर नेट , एच डी एम आय आऊट पुट ! ७) इतर वैशिष्ठे : तब्बल चार यु एस बी पोर्ट ! ऑडियो विडीयो ऑटपुट जॅक , स्टॅट्स एलीडी , कॅमेरा जोडायला जॅक ८) पावर : मायक्रो यु एस बी पिन ( आपल्या मोबाईल चार्ज करायला वापरतो ती ) आपल्या मोबाईल ला लागते तेवढी पावर १.५ म्ह्झ पुरते !! ९) सर्वात महत्वाचे म्हणजे तब्बल ४० जनरल परपज इन्पुट आउटपुट पिन्स ( मेल) ! ह्यांना सतराशे साठ प्रकारचे सेन्सर बसवु शकतो आपण ! ( सर्वांची नावे लिहित बसत नाही हा पहा अ‍ॅमेझॉन वर सापडलेल फोटू ) a अहो पण ह्याचे करायचे काय ? तर काँपुटर वर जे जे करता येते ते ते सारे करता येते ह्याच्यावर !! तरीही कल्पना यावी म्हणुन युटुब वर मिळालेल्या ह्या काही खतरनाक कलाकृत्या : १) मायक्रॉफ्ट : आर्टीफिशीयल इन्टेलीजन्स फॉर ऑल थोडक्यात गरीबांचा जार्विस ! https://www.youtube.com/embed/WsOVvrTItZM २) पाय टॉप https://www.youtube.com/embed/jb6hVe1fRzI ३)पा फोन https://www.youtube.com/embed/8eaiNsFhtI8 ४) ऑटोमेटेड ड्रायव्हिंग https://www.youtube.com/embed/BBwEF6WBUQs ५) अजुन काही प्रोजेक्ट https://www.youtube.com/embed/9YhTOUu06EY हुश्श . आता एक महत्वाची गोष्ट

" ह्याची किंमत काय ? "

फक्त ३५ डॉलरा ! २५०० रुपये बस्स !!

आता कल्पना करा की ह्या इतक्या स्वस्तातल्या कॉम्पुटर वापरुन आपण काय काय करु शकतो ते , होम ऑटोमेशन , रोबोटिक्स , सेक्र्युरीटी मॉनिटरींग , ह्यॅकिंग डिव्हाईसेस , एडुकेशन डिव्हाईसेस अन अजुन काय काय !! आता अजुन एक धक्का देवु का ? हा पहा रासबेरी पाय झीरो : किम्मत फक्त ५ डॉलरा : ३५० रुपये !! 0 हे सारे झाले टेक्निकल पण सर्वात महत्वाचा प्रश्न अजुन राहातो की , लेमॅन लोकांना सर्वसामान्य ह्याचा काय उपेग ? तर ह्यावर जरा गांभीर्याने विचार करु : आपल्या देशात तब्बल १००- ११० कोटी लोकं रहातात , त्यातल्या किती लोकांपर्यंत आज कॉम्पुटर पोहचला आहे ? सोडा , कॉम्पुटर दुरची बात किती गावात व्यवस्थित वीज पोहचली आहे ? किती शाळात मुलांना रीतसर कॉम्प्युटर चे प्रशिक्षण मिळते ? माझ्या अंदाजे २५ ते ५० कोटी पेक्षा जास्त नसावेत , उद्या , भविष्यकाळ कठोर आहे , कॉम्पुटर येत नसेल तर तुम्ही असिक्षित आहात ! कॉम्पुटर व टेक्नॉलोजी चा जर ह्या देशात प्रसार झाला नाही तर गिनि कॉईफिशंट किती वाढेल , सोप्प्या शब्दात , गरीब श्रीमंत , शिक्षित अशिक्षित ही दरी किती वाढेल ? फेसबुक वगैरे सोशल मीडीया अन स्मार्टफोन्स आल्यापासुन ह्या सारा सोशियोएकॉनोमिक बदलांची नांदी आपण पहातोच आहोत , भविष्यासाठी संगणक साक्षरता ही गोरगरीबांपरयंत पोहचवणे अनिवार्य आहे . कल्पना करा की हा ३५० रुपायाचा रासबेरी पाय वापरुन , अन १००० रुपायात बॅटरी अन डिस्प्ले ची सोय करुन फक्त २०००- २५०० मध्ये आपण एक फुल्ल फ्लेजड संगणक तयार करु शकतो जो संपुरण प्रोग्रामिङ साठी वापरता येईल तसेच वीजेच्या उपलब्धतेवर जास्त अवलंबुन नसेल ! किती लोकांपर्यंत पोहचवता येईल संगणक !! समाजसेवेसोबत समाजसेवा अन शिवाय बिजीनेस चा बिजीनेस ही होईल !! हे मनावर घेवुन कोणीतरी करणे गरजेचे आहे. .

आम्हीच केले असते हो , पण आधी म्हणल्याप्रमाणे शाहु फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात कर्वे आगरकर सावरकरांच्या समाजकार्याला शष्प किंमत उरली नाहीये हे कटु सत्य आहे म्हणुन आपण आपले दुसर्‍यास ठेच मागचा शहाणा ह्या नियमाने शहाणे होवुन कोणत्याही प्रकारच्या समाजसेवेपासुन दुरच राहिलेले बरे !

जर संगणक साक्षरता गोरगरीबांपर्यंत नाही पोहचली तर आज जे आम्ही हिंजेवाडीत पहात आहोत की एकीकडे ब्लुरीज चे टॉवर चे टॉवर वाढत चालले आहेत , एक एक दोन दोन करोड रुपायाची घरे आहेत अन दुसरी कडे गेटवरचा वॉचमन ला ३० हजार पण पगार नाय ! पलीकडे झोपड्यात रहाणार्‍यांचा विषयच नको ! ही परीस्थिती सार्वत्रिक दिसेल जे की खुप गंभीर आहे. ह्म्म असोच्च ! आमचे आपले स्वत:चे पॅरानॉईड निरर्थक स्वात्मचिंतन ! सोडा ! तर ही होती रासबेरी पाय ह्या एका भन्नाट गोष्टीची थोडक्यात ओळख !बाकी लोकांनी ह्या माहीतीत जरुर भर घालावी . बाकी लेख संप्वताना हा आम्हाला भावलेला एक क्युटी क्युटी रासबेरी पाय प्रोजेक्ट : टॉकिंग चॅटर पाय फोन q ______________________________________________________ अवांतर : हा रासबेरी पाय अन हॉस्पिटल मध्ये वापरतात ती मेडीकल डिव्हाईसेस चे सेन्सर बनवुन आपण जर पुर्ण ह्युमन लाईफ स्टॅटिस्टिक्स बीपी , शुगर लेव्हल , बॉडी टेम्परेचर, ब्रेन फक्श्न, स्लीप पॅटर्न्स्, ड्रीम पॅटर्न्स , युरीन, स्टूल स्टॅटिस्टिक्स , हार्मोन्स स्टॅटिस्तिक्स वगैरे वगैरे जर रीयल टाईममध्ये ऑनलाईन आणु शकलो तर काय मजा येईल राव ! पुढे मागे असे काही करावे असा आमचा विचार आहे :)
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
20315 वाचन

💬 प्रतिसाद (65)

प्रतिक्रिया

00001101 00001010 01110011

यशोधरा
Sat, 05/14/2016 - 15:06 नवीन
00001101 00001010 01110011 01100001 01100111 01100001 01101100 01111001 01100001 01100001 01101110 01100001 01100001 00100000 01110011 01100001 01101101 01100001 01101010 01100101 01101100 00100000 01100001 01110011 01101000 01100001 01100001 00100000 01100010 01101000 01100001 01100001 01110011 01101000 01100101 01110100 00100000 01100010 01101111 01101100 01100001 01100001 00100000 01101011 01100101 01100101 00100000 01110010 01100101 00100001 00100001 00100000 00111010 00101001 00001101 00001010 01101101 01100001 01101010 01101010 01100001 01100001 00100000 01100001 01100001 01101000 01100101 00100000 01110000 01100001 01101110 00100000 01101000 01100101 01100101 00100001 00100000 00111101 00101001 00101001
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

तुमचा व्यनि द्या

विजय गणेश खर्डे
गुरुवार, 05/12/2016 - 15:27 नवीन
क्रुपया तुमचा email id द्या
  • Log in or register to post comments

बाब्बौ !

सस्नेह
गुरुवार, 05/12/2016 - 15:40 नवीन
पायचा महिमा ऐकून तोंडात बोट घातले गेल्या आहे !
  • Log in or register to post comments

लईच भन्नाट आहे हे लेकरू !

डॉ सुहास म्हात्रे
Sat, 05/14/2016 - 07:23 नवीन
लईच भन्नाट आहे हे लेकरू ! मस्तं माहितीपुर्ण लेख !
  • Log in or register to post comments

छान लेख.

चतुरंग
Sat, 05/14/2016 - 23:07 नवीन
रास्पबेरी पाय अतिशय चांगल्या दर्जाचे किट आहे. परंतु व्यवस्थित उपयोग करुन घेण्यासाठी फक्त सॉफ्ट्वेअर माहीत असून उपयोगाचे नाही थोडे तरी हार्डवेअरशी खेळता आले पाहिजे. जीपीआयओ (जनरल पर्पज इन्पुट-औटपुट) चा वापर कसा करायचा? बाहेरचे हार्डवेअर कसे जोडायचे? उदा. स्टेपर मोटर ड्रायवर, ऑडिओ अँप्लिफायर, कॅमेरा तसेच इतर सेंसर्स उदा. टेंपरेचर, प्रेशर, इन्फ्ररेड, मॉईश्चर इ. हे नीट समजून घेणे आवश्यक आहे अन्यथा या शक्तिशाली किटचा म्हणावा तसा वापर होत नाही. https://www.raspberrypi.org/blog/official-raspberry-pi-projects-book/ हे पायचे ऑफीशिअल प्रोजेक्ट्स बुक सुद्धा आता बाजारात आले आहे. त्याचा वापर करुन बरेच काही शिकता येईल. -रंगा
  • Log in or register to post comments

मी अजून थोडासा कन्फ्युझड आहे.

आनन्दा
Sun, 05/15/2016 - 15:35 नवीन
मी अजून थोडासा कन्फ्युझड आहे.. दोन प्रश्न आहे. १. हे पारंपारिक आय ओ टी पेक्षा कसे वेगळे आहे? २. रास्प्बेरी पाय आणि अँड्रॉईड फोन यांमध्ये हार्डवेअर आणि सोफ्टवेअर मध्ये नेमका काय फरक पडतो. कृ. हे अँड्रॉईद आहे आणि ते लिनक्स आहे असे फरक सांगू नयेत.
  • Log in or register to post comments

१ - पाय हे

चतुरंग
Sun, 05/15/2016 - 20:28 नवीन
आय ओ टी नाही. तो मुळात एक काँप्यूटर मदरबोर्ड आहे. कीबोर्ड आणी एक डिस्प्ले जोडला की झाले. आकाराने अतिशय छोटा आणि सुटसुटीत असल्यामुळे त्याचे इतरही अनेक उपयोग जनतेने प्रयोग करुन पुढे आणले. ओपनससोर्स सॉफ्टवेअरमुळे त्यात झपाट्याने प्रगती झाली. आय ओ टी मध्ये आंतरजालीय कनेक्टिविटी देणे, वायर्ड किंवा वायरलेस, आणि ते उपकरण किंवा डिवाईस दूरस्थ नियंत्रणाखाली आणणे हा मूळ उद्देश असतो. २ - रास्पबेरी पाय वि अँड्रॉईड फोन - तुम्ही फक्त फीचर्सची तुलना करत असाल तर हल्लीचे स्मार्टफोन्स हे पायच्या तुलनेत कित्येक पटीने सरस आहेत. परंतु फोनचे हार्डवेअर एका मर्यादेबाहेर यूजर अ‍ॅक्सेसिबल नसते. त्याचं डिझाईन हे कमितकमी जागेत जास्तितजास्त फीचर्स कोंबणे हा असतो. त्यावरचा संगणक किंवा २-३ संगणक हे एका चिपमध्ये एंबेड केलेले असल्यामुळे जीपीआयो पिन्स बाहेरुन कंट्रोल करता येत नाहीत. यूएसबी पोर्टद्वारे जोडता येणारी काही मर्यादित हार्डवेअर सोडली तर वापर मुख्यतः त्याच्या ऑपरेटिंग सिस्टिम आणि त्याखाली नियंत्रित असलेले हार्डवेअर इतकाच राहतो. तुलना करायची झाली तर स्मार्टफोन हा एखाद्या हायएन्ड बीएमडब्ल्यू सारखा आहे. फीचर्स भरपूर आहेत परंतु ते गाडीचा एंबॅडेड भाग आहेत त्यात वापरकर्त्याची कल्पनाशक्ती मर्यादित परिघात वापरता येते कारण त्याचा उद्देशच तो नाहीये. आणि पाय हा गाडीची फक्त चासीस दिलेली आहे तुमच्या कल्पनाशक्तीप्रमाणे तुम्ही नॅनो बनवा नाहीतर बीएमडब्ल्यू. तुमच्या गरजेप्रमाणे सोयी करु शकता. आणि हे अतिशय स्वस्तात उपलब्ध करुन दिले आहे. कोणता स्मार्टफोन तुम्हाला $३५ ला मिळेल? -रंगा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा

ओ़के आता कळले. धन्यवाद.

आनन्दा
Sun, 05/15/2016 - 23:28 नवीन
ओ़के आता कळले. धन्यवाद. काय झालेय हल्ली बरेच लोक आम्ही हे करतो आणि ते करतो, आणि आमची टेक्नोलॉगी कशी रिव्होलुशनरी आहे म्हणून सांगत असतात. त्यांना आयोटी पेक्षा तुम्ही वेगळे काय करता म्हणले की चूप. म्हणून म्हणले की हे नेमके काय आहे. याला देखील आयोटी वॅल्यी दिसते, पण हे केवळ आयोटी म्हणून बघता येणार नाही. याला कदाचित मायक्रोकंप्युटर म्हणता येईल असे दिसते. बाकी अँड्रोईड शी संबंधित प्रश्न अश्यासाठी विचारला होता की स्मार्टफोन देखील अशी हार्डवेअर आणि त्यांचे इंटरफेसेस उपलब्ध करून देतात, पण अर्थातच एपीआय म्हणून, त्यापेक्षा हे कसे वेगळे आहे ते कळावे म्हणून. त्याचे देखील उत्तर मिळाले, धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

मस्त प्रतिसाद..आवडला

शलभ
Mon, 05/16/2016 - 00:29 नवीन
मस्त प्रतिसाद..आवडला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

हे रासबेरी जर बोअर वेल च्या

जेपी
Sun, 05/15/2016 - 21:08 नवीन
हे रासबेरी जर बोअर वेल च्या स्टार्टर ला जोडल..काही कंमाड कोड टायपल्या तर आपोआप सांगल्या टायमाला बोअर चालु बंद करेल काय ?!
  • Log in or register to post comments

करेल की पण त्यासाठी एवढा मोठा राक्षस कशाला?

चतुरंग
Sun, 05/15/2016 - 21:30 नवीन
सेलफोनवरुन चालणारे कितीतरी मोटर स्टार्टर्स मिळतात. नुसते गुगलून बघितलेल्त तरी बरेच सापडतील. उदा. Realtech Systems Mobile starter www.realtech.in.mp4
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

http://www.nanoganesh.com/ इथे अजुन

gogglya
Fri, 05/20/2016 - 15:43 नवीन
माहीती मिळेल. अनेक पारितोषिके मिळालेले उपकरण आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

@JP

हितु
Wed, 05/18/2016 - 15:30 नवीन
RPi la sensors connect karun, sensors chya input varun, motor chalu kiva band karu sakata, he ekdam sope ani eka diwasache kaam aahe
  • Log in or register to post comments

@JP

हितु
Wed, 05/18/2016 - 15:33 नवीन
sarvat sopa upay, dilelya time la chalu ani dilelya time la band. fakt Rs 750. http://www.ebay.in/itm/131706906122
  • Log in or register to post comments

छान लेख!

रुपी
Wed, 08/31/2016 - 01:54 नवीन
छान लेख!
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा