Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by प्रसाद गोडबोले on Wed, 05/11/2016 - 16:40
प्रस्तावना : गावडे सरांनी ह्या इथे rbp केलेल्या विनंती वजा आज्ञेचा मान राखुन रासबेरी पाय ह्या भन्नाट गोष्टीची माहीती देण्यास हा एक अत्यंत छोटेखानी धागा काढत आहे ! __________________________________________________________

रासबेरी पाय Raspberry Pi

कल्पना करा की तुम्ही तुमचा कॉम्प्युटर खिषात घेवुन फिरु शकलात तर काय मजा येईल ! तसेही लॅपटॉप आपण पाठीवर घेवुन फिरतोच पण समजा आपल्या स्मार्टफोन प्रमाणे तुम्ही खिषात घेवुन फिरुशकलात तर काय मजा येईल नै ! ह्म्म .... नाहीना कल्पना करता येत .... "त्यात काय विशेष ? "असा प्रश्न पडतोय ना ? असु दे . बर्‍याच जणांचे असेच होते. फक्त जे अट्टल 'कोड'गे ( कॉम्प्युटर कोड सोबत 'खेळत खेळत' रात्र रात्र 'जागवणारे') आहेत तेच ही कल्पना व्यवस्थित रंगवु शकतील ! तर .... रासबेरी पाय हा तुमच्या खिषात मावु शकेल इतक्या छोट्या आकाराचा क्रेडीटकार्ड साईझ सिंगल बोर्ड कॉम्पुटर आहे ! 'रासबेरी तद्दन बकवास लागते , रादर मलबेरीच्या पुढे सगळ्याच बेरी भिकार लागतात' असे आमचे वैयक्तिक मत आहे पण ते असो , तात्विक मतभेद असले तरी दीर्घद्वेषीपणा न ठेवता , चांगल्या गुणांची कदर करायची सवय असल्याने असल्याने रासबेरी पाय च्या प्रेमात पडलो आहोत. ही पहा रासबेरी पाय ची मुख्य साईट : https://www.raspberrypi.org/ हा रासबेरी पाय चा लोगो 1 हा रासबेरी पाय ३ चा फोटु 1 आता ह्याचे कॉन्फिगरेशन ऐका : १)ऑपरेटींग सिस्टीम : रासबीयन (डेबीयन ह्या लिनिक्स च्या कर्नल सारखीच खास ह्या रासबेरी साठी बनवलेली१) २)प्रोसेसर : ब्रॅडकॉम २८३५ ३) सीपीयु: 1200 MHz quad-core ARM Cortex-A53 ४) रॅम : 1 ग्ब ५) स्टोरेज ( हार्ड डिक ) : मायक्रो एस डी कार्ड ( नक्की माहीत नाही पण बहुतेक ८ ते १६ ग्ब पर्यंत वापरता येते ) ६) कनेक्टीव्हिटी : इन्बिल्ट ब्लुटूठ , इन्बिल्ट वायफाय , इथर नेट , एच डी एम आय आऊट पुट ! ७) इतर वैशिष्ठे : तब्बल चार यु एस बी पोर्ट ! ऑडियो विडीयो ऑटपुट जॅक , स्टॅट्स एलीडी , कॅमेरा जोडायला जॅक ८) पावर : मायक्रो यु एस बी पिन ( आपल्या मोबाईल चार्ज करायला वापरतो ती ) आपल्या मोबाईल ला लागते तेवढी पावर १.५ म्ह्झ पुरते !! ९) सर्वात महत्वाचे म्हणजे तब्बल ४० जनरल परपज इन्पुट आउटपुट पिन्स ( मेल) ! ह्यांना सतराशे साठ प्रकारचे सेन्सर बसवु शकतो आपण ! ( सर्वांची नावे लिहित बसत नाही हा पहा अ‍ॅमेझॉन वर सापडलेल फोटू ) a अहो पण ह्याचे करायचे काय ? तर काँपुटर वर जे जे करता येते ते ते सारे करता येते ह्याच्यावर !! तरीही कल्पना यावी म्हणुन युटुब वर मिळालेल्या ह्या काही खतरनाक कलाकृत्या : १) मायक्रॉफ्ट : आर्टीफिशीयल इन्टेलीजन्स फॉर ऑल थोडक्यात गरीबांचा जार्विस ! https://www.youtube.com/embed/WsOVvrTItZM २) पाय टॉप https://www.youtube.com/embed/jb6hVe1fRzI ३)पा फोन https://www.youtube.com/embed/8eaiNsFhtI8 ४) ऑटोमेटेड ड्रायव्हिंग https://www.youtube.com/embed/BBwEF6WBUQs ५) अजुन काही प्रोजेक्ट https://www.youtube.com/embed/9YhTOUu06EY हुश्श . आता एक महत्वाची गोष्ट

" ह्याची किंमत काय ? "

फक्त ३५ डॉलरा ! २५०० रुपये बस्स !!

आता कल्पना करा की ह्या इतक्या स्वस्तातल्या कॉम्पुटर वापरुन आपण काय काय करु शकतो ते , होम ऑटोमेशन , रोबोटिक्स , सेक्र्युरीटी मॉनिटरींग , ह्यॅकिंग डिव्हाईसेस , एडुकेशन डिव्हाईसेस अन अजुन काय काय !! आता अजुन एक धक्का देवु का ? हा पहा रासबेरी पाय झीरो : किम्मत फक्त ५ डॉलरा : ३५० रुपये !! 0 हे सारे झाले टेक्निकल पण सर्वात महत्वाचा प्रश्न अजुन राहातो की , लेमॅन लोकांना सर्वसामान्य ह्याचा काय उपेग ? तर ह्यावर जरा गांभीर्याने विचार करु : आपल्या देशात तब्बल १००- ११० कोटी लोकं रहातात , त्यातल्या किती लोकांपर्यंत आज कॉम्पुटर पोहचला आहे ? सोडा , कॉम्पुटर दुरची बात किती गावात व्यवस्थित वीज पोहचली आहे ? किती शाळात मुलांना रीतसर कॉम्प्युटर चे प्रशिक्षण मिळते ? माझ्या अंदाजे २५ ते ५० कोटी पेक्षा जास्त नसावेत , उद्या , भविष्यकाळ कठोर आहे , कॉम्पुटर येत नसेल तर तुम्ही असिक्षित आहात ! कॉम्पुटर व टेक्नॉलोजी चा जर ह्या देशात प्रसार झाला नाही तर गिनि कॉईफिशंट किती वाढेल , सोप्प्या शब्दात , गरीब श्रीमंत , शिक्षित अशिक्षित ही दरी किती वाढेल ? फेसबुक वगैरे सोशल मीडीया अन स्मार्टफोन्स आल्यापासुन ह्या सारा सोशियोएकॉनोमिक बदलांची नांदी आपण पहातोच आहोत , भविष्यासाठी संगणक साक्षरता ही गोरगरीबांपरयंत पोहचवणे अनिवार्य आहे . कल्पना करा की हा ३५० रुपायाचा रासबेरी पाय वापरुन , अन १००० रुपायात बॅटरी अन डिस्प्ले ची सोय करुन फक्त २०००- २५०० मध्ये आपण एक फुल्ल फ्लेजड संगणक तयार करु शकतो जो संपुरण प्रोग्रामिङ साठी वापरता येईल तसेच वीजेच्या उपलब्धतेवर जास्त अवलंबुन नसेल ! किती लोकांपर्यंत पोहचवता येईल संगणक !! समाजसेवेसोबत समाजसेवा अन शिवाय बिजीनेस चा बिजीनेस ही होईल !! हे मनावर घेवुन कोणीतरी करणे गरजेचे आहे. .

आम्हीच केले असते हो , पण आधी म्हणल्याप्रमाणे शाहु फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात कर्वे आगरकर सावरकरांच्या समाजकार्याला शष्प किंमत उरली नाहीये हे कटु सत्य आहे म्हणुन आपण आपले दुसर्‍यास ठेच मागचा शहाणा ह्या नियमाने शहाणे होवुन कोणत्याही प्रकारच्या समाजसेवेपासुन दुरच राहिलेले बरे !

जर संगणक साक्षरता गोरगरीबांपर्यंत नाही पोहचली तर आज जे आम्ही हिंजेवाडीत पहात आहोत की एकीकडे ब्लुरीज चे टॉवर चे टॉवर वाढत चालले आहेत , एक एक दोन दोन करोड रुपायाची घरे आहेत अन दुसरी कडे गेटवरचा वॉचमन ला ३० हजार पण पगार नाय ! पलीकडे झोपड्यात रहाणार्‍यांचा विषयच नको ! ही परीस्थिती सार्वत्रिक दिसेल जे की खुप गंभीर आहे. ह्म्म असोच्च ! आमचे आपले स्वत:चे पॅरानॉईड निरर्थक स्वात्मचिंतन ! सोडा ! तर ही होती रासबेरी पाय ह्या एका भन्नाट गोष्टीची थोडक्यात ओळख !बाकी लोकांनी ह्या माहीतीत जरुर भर घालावी . बाकी लेख संप्वताना हा आम्हाला भावलेला एक क्युटी क्युटी रासबेरी पाय प्रोजेक्ट : टॉकिंग चॅटर पाय फोन q ______________________________________________________ अवांतर : हा रासबेरी पाय अन हॉस्पिटल मध्ये वापरतात ती मेडीकल डिव्हाईसेस चे सेन्सर बनवुन आपण जर पुर्ण ह्युमन लाईफ स्टॅटिस्टिक्स बीपी , शुगर लेव्हल , बॉडी टेम्परेचर, ब्रेन फक्श्न, स्लीप पॅटर्न्स्, ड्रीम पॅटर्न्स , युरीन, स्टूल स्टॅटिस्टिक्स , हार्मोन्स स्टॅटिस्तिक्स वगैरे वगैरे जर रीयल टाईममध्ये ऑनलाईन आणु शकलो तर काय मजा येईल राव ! पुढे मागे असे काही करावे असा आमचा विचार आहे :)
  • Log in or register to post comments
  • 20315 views

प्रतिक्रिया

Submitted by प्रचेतस on Wed, 05/11/2016 - 16:48

Permalink

अरे व्वाह...!!!!

अरे व्वाह...!!!! भारीच प्रकरण दिसतंय हे.
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Wed, 05/11/2016 - 16:52

Permalink

भारी आहे!

भारी आहे! आणि हो, हिंजेवाडी नाही, हिंजवडी.
  • Log in or register to post comments

Submitted by नाखु on गुरुवार, 05/12/2016 - 11:57

In reply to भारी आहे! by यशोधरा

Permalink

संपुर्ण

प्रतिसादाला सहम्ती.. चुकीच्या उच्चाराबद्दल सम्क्ष भेटीत प्रगोला लृलॄ केले जाईल. अता मूळ अवांतर चांगली माहीती आम्हा आडाण्यांना जरा काही शिकावे म्हटले तर

नुराकुस्ती

धागे मध्ये येतात.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on Wed, 05/11/2016 - 16:53

Permalink

१) मायक्रॉफ्ट : आर्टीफिशीयल इन्टेलीजन्स फॉर ऑल थोडक्यात गरीबांचा

चुकुन माय्क्रॉफ्ट ची लिन्क चुकीची दिली गेली आहे : ही पहा करेक्ट लिन्क १) मायक्रॉफ्ट : आर्टीफिशीयल इन्टेलीजन्स फॉर ऑल थोडक्यात गरीबांचा जार्विस ! https://www.youtube.com/watch?v=g1G0yEKuED8
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Wed, 05/11/2016 - 16:55

Permalink

जबरा...कंची भाषा वापरता येते

जबरा...कंची भाषा वापरता येते याला शिकवायला
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on गुरुवार, 05/12/2016 - 15:40

In reply to जबरा...कंची भाषा वापरता येते by टवाळ कार्टा

Permalink

एकदम भारी रे

एकदम भारी रे
  • Log in or register to post comments

Submitted by मम्बाजी सर्वज्ञ on Wed, 05/11/2016 - 16:59

Permalink

पायथन / सी

पायथन / सी
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Wed, 05/11/2016 - 17:25

In reply to पायथन / सी by मम्बाजी सर्वज्ञ

Permalink

सी चालते??? भाअरी

सी चालते??? भाअरी
  • Log in or register to post comments

Submitted by मम्बाजी सर्वज्ञ on Wed, 05/11/2016 - 18:19

In reply to सी चालते??? भाअरी by टवाळ कार्टा

Permalink

लिनक्स आहे. सी चालली नाही तर

लिनक्स आहे. सी चालली नाही तर कसे होणार?
  • Log in or register to post comments

Submitted by अस्वस्थामा on Wed, 05/11/2016 - 21:53

In reply to लिनक्स आहे. सी चालली नाही तर by मम्बाजी सर्वज्ञ

Permalink

अर्थात.. आणि जावा देखील टाकू

अर्थात.. आणि जावा देखील टाकू शकतो (विथ लिट्ल एफोर्ट्स). पण पायथन बेस्ट असं मत आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by ज्ञानोबाचे पैजार on Wed, 05/11/2016 - 17:07

Permalink

मस्त..

इंटरेस्टिंग माहिती या बद्दल अजुन माहिती वाचायला नक्की आवडेल पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

Submitted by प्रीत-मोहर on Wed, 05/11/2016 - 17:25

Permalink

ओळख आवडली!!!

ओळख आवडली!!!
  • Log in or register to post comments

Submitted by विअर्ड विक्स on Wed, 05/11/2016 - 17:40

Permalink

@ अवांतर

@ अवांतर - अति अवांतर - आपण वर्णन केलेला biosensor james bond मुव्हीत पाहिल्याचे स्मरते . बाकी लेख आवडला . @ अति अति अवांतर - पुढील बुद्धीबळ स्पर्धेतील आपल्याशी सामन्याच्या प्रतीक्षेत
  • Log in or register to post comments

Submitted by कैलासवासी सोन्याबापु on Wed, 05/11/2016 - 17:43

Permalink

लैच जबरी! आवडले एक नंबर हे

लैच जबरी! आवडले एक नंबर हे प्रकरण
  • Log in or register to post comments

Submitted by सतिश गावडे on Wed, 05/11/2016 - 17:54

Permalink

प्रगो, मस्त ओळख करुन दिली आहे

प्रगो, मस्त ओळख करुन दिली आहे या छोटेखानी संगणकाची.
  • Log in or register to post comments

Submitted by सुखी on Wed, 05/11/2016 - 17:54

Permalink

:) सध्या या वरच काम चालुये

:) सध्या या वरच काम चालुये माझ. फार शेअर नाही करता येणार. पण अचाट probabilities आहेत याचा वापर केल्यास... programming खुप सोप आहे. ज्या लोक्स ना 8086 / म्युपी 8051 च programming माहितिये त्यान्च्या साठी एकदम बाए हात का खेल!!
  • Log in or register to post comments

Submitted by जव्हेरगंज on Wed, 05/11/2016 - 18:14

Permalink

भन्नाट आहे की राव हे !

भन्नाट आहे की राव हे !
  • Log in or register to post comments

Submitted by एस on Wed, 05/11/2016 - 18:18

Permalink

हे आणि कॅमेरा वापरून

हे आणि कॅमेरा वापरून छायाचित्रणात कायकाय करता येईल याचा विचार करून रोमांचित झालो! :-) विजेचा लखलखाट टिपणे, वादळाचे दृश्य टिपणे, वन्यजीवांचे कॅमेराट्रॅप चित्रण, इ. इ. भारी! फक्त ती संगणकाची भाषा शिकायला पाहिजे.
  • Log in or register to post comments

Submitted by sagarpdy on Wed, 05/11/2016 - 18:22

Permalink

मागच्याच आठवड्यात पहिलावहिला

मागच्याच आठवड्यात पहिलावहिला पाय आणलाय, सध्या बंडल प्रयोग चालू आहेत. पाय कट्टा करावा नवख्या कोड्ग्याना मदत म्हणून हि विनंती.
  • Log in or register to post comments

Submitted by स्वच्छंदी_मनोज on Wed, 05/11/2016 - 18:27

Permalink

प्रगो साहेब..भारीच

गेल्या वर्षी ह्या भन्नाट कल्पनेची ओळख झाली आणी एका नव्या विश्वाला भेटल्यागत झाले. ह्या कल्पनेत कंप्युटींग फंडा बदलण्याचे सामर्थ्य आहे. बहुधा ७-८ वर्षांपुर्वी एका कल्पनेतुन सुचलेल्या ह्या कंसेप्टने सध्या जगाला खुळावल्यागत झाले आहे आणी ह्या मुर्ती लहान पण किर्ती महान अश्या गोष्टीने काय काय करता येऊ शकते ते दरदीशी नवीन समोर येते आहे. (सध्या मी ह्या पाय ने घरची जुनी हार्डड्राईव्ह नॅस मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न चालू आहे तसे झाल्यास अत्यंत स्वस्तात नॅस बॉक्स घरी वापरेन :) )
  • Log in or register to post comments

Submitted by कॅप्टन जॅक स्पॅरो on Wed, 05/11/2016 - 19:35

In reply to प्रगो साहेब..भारीच by स्वच्छंदी_मनोज

Permalink

मिपाकर gogglya ल व्यनि करा.

मिपाकर gogglya ल व्यनि करा. त्याने बनवला आहे नॅस
  • Log in or register to post comments

Submitted by स्वच्छंदी_मनोज on Wed, 05/11/2016 - 20:16

In reply to मिपाकर gogglya ल व्यनि करा. by कॅप्टन जॅक स्पॅरो

Permalink

नक्कीच

नक्कीच. धन्यवाद. रच्याकने. हा धागा तंत्रजगत मध्ये जास्त सुटेबल होता. तिथे हलवायला हवा..
  • Log in or register to post comments

Submitted by सस्नेह on गुरुवार, 05/12/2016 - 15:39

In reply to नक्कीच by स्वच्छंदी_मनोज

Permalink

.

हलवला आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by स्वच्छंदी_मनोज on गुरुवार, 05/12/2016 - 16:09

In reply to . by सस्नेह

Permalink

आभारी!

धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Submitted by उगा काहितरीच on Wed, 05/11/2016 - 18:30

Permalink

अत्यंत उपयोगी धागा. धन्यवाद !

अत्यंत उपयोगी धागा. धन्यवाद !
  • Log in or register to post comments

Submitted by सांरा on Wed, 05/11/2016 - 18:38

Permalink

लय भारी !!!

रास्प्बेर्र्य पी वर मराठीत पहिलाच लेख बघतोय.
कल्पना करा की हा ३५० रुपायाचा रासबेरी पाय वापरुन , अन १००० रुपायात बॅटरी अन डिस्प्ले ची सोय करुन फक्त २०००- २५०० मध्ये आपण एक फुल्ल फ्लेजड संगणक तयार करु शकतो जो संपुरण प्रोग्रामिङ साठी वापरता येईल तसेच वीजेच्या उपलब्धतेवर जास्त अवलंबुन नसेल ! किती लोकांपर्यंत पोहचवता येईल संगणक !! समाजसेवेसोबत समाजसेवा अन शिवाय बिजीनेस चा बिजीनेस ही होईल !! हे मनावर घेवुन कोणीतरी करणे गरजेचे आहे. .
कल्पना मस्त आहे.
अवांतर : हा रासबेरी पाय अन हॉस्पिटल मध्ये वापरतात ती मेडीकल डिव्हाईसेस चे सेन्सर बनवुन आपण जर पुर्ण ह्युमन लाईफ स्टॅटिस्टिक्स बीपी , शुगर लेव्हल , बॉडी टेम्परेचर, ब्रेन फक्श्न, स्लीप पॅटर्न्स्, ड्रीम पॅटर्न्स , युरीन, स्टूल स्टॅटिस्टिक्स , हार्मोन्स स्टॅटिस्तिक्स वगैरे वगैरे जर रीयल टाईममध्ये ऑनलाईन आणु शकलो तर काय मजा येईल राव ! पुढे मागे असे काही करावे असा आमचा विचार आहे :)
जर हि साधने lithium battary वापरून शरीरात टाकता आली आणि त्यांना zigbee ने सर्व wirelessly जोडले तर काय बहार !!!! एक दोन वर्षे २४*७ शरीराचे मापन करता येईल.
  • Log in or register to post comments

Submitted by बोका-ए-आझम on Wed, 05/11/2016 - 18:50

Permalink

धन्यवाद प्रगो.

हा जादूचा दिवा कुठे मिळू शकतो? आणि याबद्दल मिडियामध्ये काहीच वाचल्याचं आठवत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by बोका-ए-आझम on Wed, 05/11/2016 - 18:50

Permalink

धन्यवाद प्रगो.

हा जादूचा दिवा कुठे मिळू शकतो? आणि याबद्दल मिडियामध्ये काहीच वाचल्याचं आठवत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by स्वच्छंदी_मनोज on Wed, 05/11/2016 - 18:55

In reply to धन्यवाद प्रगो. by बोका-ए-आझम

Permalink

अ‍ॅमॅझॉन

अ‍ॅमॅझॉनवर आहे. आपल्याला हवे ते मॉडेल निवडावे (पाय २, पाय २), त्यातले पर्याय निवडावे (बी, बी+) आणी घेवून टाकावे.
  • Log in or register to post comments

Submitted by अस्वस्थामा on Wed, 05/11/2016 - 21:58

In reply to अ‍ॅमॅझॉन by स्वच्छंदी_मनोज

Permalink

ते आहेच तरी त्यांच्या या

ते आहेच तरी त्यांच्या या साईटवर जाऊन जरा चक्कर टाकून यावी. काय पाहिजे काय नाही हे ठरवायला चांगलेय (तिथूनच विकत पण घेऊ शकतो. :) ).
  • Log in or register to post comments

Submitted by आदूबाळ on Wed, 05/11/2016 - 19:52

Permalink

मला जरा गावठी भाषेत कोणी

मला जरा गावठी भाषेत कोणी समजावून सांगेल काय? नॅनो कशी गरीबाची कार होती, आणि कमी पैशात सग्गळं सग्गळं करत होती तसा हा गरीबाचा (कमी पैशात सग्गळं सग्गळं करणारा) कॉम्प्युटर आहे का? म्हणजे तुलना कायम श्रीमंतांच्या कॉम्प्युटरशी होणार का? "...वहीं सफेदी, वहीं झाग...कम दामों में मिले, तो ये क्यों नहीं? मान गये ... आप की पारखी नजर, और निरमा सुपर..." हे व्हॅल्यू प्रपोझिशन आहे का रा० पा० चं?
  • Log in or register to post comments

Submitted by कॅप्टन जॅक स्पॅरो on Wed, 05/11/2016 - 20:00

In reply to मला जरा गावठी भाषेत कोणी by आदूबाळ

Permalink

नाही.

नाही.
"...वहीं सफेदी, वहीं झाग...कम दामों में मिले, तो ये क्यों नहीं? मान गये ... आप की पारखी नजर, और निरमा सुपर..." हे व्हॅल्यू प्रपोझिशन आहे का रा० पा० चं?
नाही. ऑब्व्हियसली फुल स्केल डेस्कटॉप संगणकाशी ह्याची तुलना करुन चालणार नाही. पण संगणक शिकणं, ऑटोमेशन चे प्रोग्राम्स वगैरे लिहायला ह्याची शक्ती पुरेशी आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by आदूबाळ on Wed, 05/11/2016 - 21:59

In reply to नाही. by कॅप्टन जॅक स्पॅरो

Permalink

हम्म. म्हणजे जिथे** संगणकाचा

हम्म. म्हणजे जिथे** संगणकाचा शिरकाव जास्त किमतीमुळे अजून होऊ शकलेला नाही, तिथे रा० पा० उपयोगी आहे. **जिथे म्हणजे फक्त भौगोलिक विस्तार अपेक्षित नाही. फंक्शनल विस्तारही अपेक्षित आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Wed, 05/11/2016 - 21:46

Permalink

धन्यवाद माहितीबद्दल.

धन्यवाद माहितीबद्दल.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Wed, 05/11/2016 - 22:04

Permalink

एक नंबर गिर्जाकाका. गरिबांचा

एक नंबर गिर्जाकाका. गरिबांचा जार्व्हिस लयच आवडले बघा प्रकर्ण. नक्की काहीतरी करून पाहण्यात येईल.
  • Log in or register to post comments

Submitted by सांरा on गुरुवार, 05/12/2016 - 02:03

Permalink

मस्त :)

आम्हीच केले असते हो , पण आधी म्हणल्याप्रमाणे शाहु फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात कर्वे आगरकर सावरकरांच्या समाजकार्याला शष्प किंमत उरली नाहीये हे कटु सत्य आहे म्हणुन आपण आपले दुसर्‍यास ठेच मागचा शहाणा ह्या नियमाने शहाणे होवुन कोणत्याही प्रकारच्या समाजसेवेपासुन दुरच राहिलेले बरे !
  • Log in or register to post comments

Submitted by सांरा on गुरुवार, 05/12/2016 - 02:07

In reply to मस्त :) by सांरा

Permalink

हे पांढर्यात का लिहिले हो...

कदाचित स्वगत असू शकते.
  • Log in or register to post comments

Submitted by खटपट्या on गुरुवार, 05/12/2016 - 02:50

Permalink

मस्तच है की. रासबेरी ओएस कशी

मस्तच है की. रासबेरी ओएस कशी आहे? युजर फ्रेंडली आहे का ?
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदयात्री on गुरुवार, 05/12/2016 - 03:05

Permalink

उत्तम लेख

लेख अतिशय आवडला. वर चर्चा केलेले ओटोमेशनचे प्रकल्प सोडुन इतरही बरेच इनोवेटिव प्रकल्प रासबेरी पाय वापरून केले जात आहेत. तुमचे स्वत:चे मायक्रो सर्वर (वर्कर) बनवणे, रासबेरी पाय टिवीला जोडुन मिडिया सेंटर बनवणे वैगेरे वैगेरे काही सहज करण्यासारखे उपयोग. कैक डझन पाय एकत्र जोडुन खूप शक्तिमान असे डाटा मायनिंग करणारे संगणक बनवने हा पेरलल कंप्युटिंग मधला एक उपयोग. युटामधली पिकोक्लस्टर ही कंपनी असे सर्वर्स विकते. इथे रासबेरी पायच्या प्रकल्पामागचे शिल्पकार कोण आहेत आणि त्यांची त्यामागची प्रेरणा काय होती याबाबत माहिती आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on गुरुवार, 05/12/2016 - 07:07

Permalink

मस्त माहिती...

धन्यवाद...
  • Log in or register to post comments

Submitted by बोका on गुरुवार, 05/12/2016 - 10:10

Permalink

कोडी

रासबेरी पाय चा एक सोपा उपयोग म्हणजे साध्या एलसीडी टिव्ही ला स्मार्ट बनवणे. जर तुमच्याकडे एचडीएमआय पोर्ट सहित टिव्ही असेल, तर ... रासबेरी पाय वर 'कोडी' लोड करा. रासबेरी पाय टिव्ही ला जोडा (एचडीएमआय पोर्ट). वाय फाय किंवा इथरनेट केबल जोडा. मोबाईल वरुन रिमोट कंट्रोल करा ! (कोडी अऍप) Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by स्वच्छंदी_मनोज on गुरुवार, 05/12/2016 - 12:10

In reply to कोडी by बोका

Permalink

प्लेक्स

कोडी (पुर्वाश्रमीचे XBMC) इन्स्टाल करता येईलच पण कोडी पेक्षा प्लेक्स उत्तम पर्याय आहे. आता ऑफीशीयल सपोर्ट मीळाल्यापासून प्लेक्स हा कोडी पेक्षा उत्तम पर्याय आहे पाय साठी. पण मला स्वतःला स्मार्ट टीव्हीसाठी क्रोमकास्ट किंवा तत्सम मिडीया स्ट्रीमींग डिव्हाईस जास्त उपयुक्त वाटतात.
  • Log in or register to post comments

Submitted by हितु on गुरुवार, 05/12/2016 - 13:57

Permalink

Raspberry PI

गेले १ वर्ष झाले RnD करतोय पाय वर, भारतात याची किंमत ३००० च्या जवळपास आहे. या छोट्या चकुल्याचे फार फायदे आहेत माझ्या कडच्या पाय चे काही फोटो attach केली आहेत. आमची कंपनी raspberry वर काम करण्यासाठी developer शोधात आहे, कोणाला काम करायचे असेल तर मला contact kara . Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by विजय गणेश खर्डे on गुरुवार, 05/12/2016 - 15:27

In reply to Raspberry PI by हितु

Permalink

क्रुपया तुमचा email id द्या

क्रुपया तुमचा email id द्या
  • Log in or register to post comments

Submitted by हितु on गुरुवार, 05/12/2016 - 18:56

In reply to क्रुपया तुमचा email id द्या by विजय गणेश खर्डे

Permalink

पाठवला आहे

पाठवला आहे
  • Log in or register to post comments

Submitted by कॅप्टन जॅक स्पॅरो on Fri, 05/13/2016 - 07:09

In reply to पाठवला आहे by हितु

Permalink

मलाही द्या.

मलाही द्या.
  • Log in or register to post comments

Submitted by हितु on Sat, 05/14/2016 - 01:05

In reply to मलाही द्या. by कॅप्टन जॅक स्पॅरो

Permalink

maza email id

01101000 01101001 01110100 01110101 00101110 01110110 01100101 01000000 01100111 01101101 01100001 01101001 01101100 00101110 01100011 01101111 01101101
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Sat, 05/14/2016 - 03:56

In reply to maza email id by हितु

Permalink

01101111 01101011

01101111 01101011
  • Log in or register to post comments

Submitted by सतिश गावडे on Sat, 05/14/2016 - 11:36

In reply to 01101111 01101011 by चतुरंग

Permalink

01010111 01101000 01100001

01010111 01101000 01100001 01110100 01110100 01101000 01100101 01100110 01110101 01101110
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Sat, 05/14/2016 - 11:38

In reply to 01010111 01101000 01100001 by सतिश गावडे

Permalink

00101110 00110010 00111110

00101110 00110010 00111110 00100000 00101000 00010101 01001011 00101111 00100000 00110000 00111110 00110101 00100000 00111001 01000111 00101110 00100000 00000111 00000010 00011111 01001101
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com