लेखनविषयः पंचा, बनियन आणि रास्बेरी पाय विकत घ्यायचे आहेत सल्ला द्या.
कित्येक लोकांना हे विडंबन वाटेल पण हे विडंबन नसुन वस्तुस्थिती आहे हे कृपया लक्षात घेऊन मौल्यवान मार्गदर्शन करावे.
एप्रिल संपला. एप्रिलच्या अगदी पहिल्या दिवशी नाही पण शेवटच्या आठवड्या अॅप्रायजल आणि गोल सेटिंग नामक शिनेमा दाखवुन कंपनीनी एप्रिल फुल (खरं तर ** बनवलयं, पण संपादकिय धोरणं, असांसदिय शब्दांचा वापर वगैरे कारणाने धागा उडु नये म्हणुन सोयीसाठी आपण मुर्ख असा द्वयाक्षरी शब्द चांदण्यांमधे टाकु) केलं. गोल सेटिंगमधे आत्ताच्या जबाबदार्या गुणिले ३० आणि अॅप्रायजलचा आकडा ०.०००००००१२००००१२००००२३१२% अॅप्रायजलचा आकडा ऐकुन श्रावणमाशी हर्शमाणषी हिरकळ दाटे चोहिकडे ह्या अजरामर गाण्यावर एचार कमुणिकेशन्स कम पेरोल पेशालिस्ट नामक चिंधीचोर व्यक्तीच्या केबिन नामक तुरुंगामधे नाचायची इच्छा झालेली. ह्या इसमास लाज, लज्जा, शरम इत्यादी गोष्टी अजिबात म्हणजे अजिबात नसल्याने ते कष्ट आवरले. मात्र जाता जाता थँक्यु सर, अता पुढच्या पगारापासुन नवे बनियन विकत घेउ शकिन म्हणुन शाब्दिक थोबाड फोडुन बाहेर पडलो.
आता फार अवांतर करत नाही. तर अतिभव्य प-गार वाढ झाल्याने यंदा बन्यन, पंचे, लेंग्याच्या नाड्या आणि रास्बेरी पाय घ्यायचा विचार आहे. माझ्या अपेक्षा वगैरे मी सांगतोचं पण मिपाकरांनी आपला काही मिलियन तासांचा अनुभव इथे सांगुन एक नमुना निवडायला मदत करावी अशी विनंती.
तर आता हे प्रश्ण पंचापासुन सोडवायला सुरुवात करु (प्रश्ण सोडवायचा आहे पंचा नव्हे). पंचा रंगीबेरंगी पाहिजे आणि त्यातला मुख्य रंग लाल हवा. शक्यतो गोळ्या-गोळ्यांचं डिझाईन असणारा पंचा/ टॉवेल वगैरे मिळाला तर उत्तम. टॉवेल/ पंचा जो काय असेल तो वर्साटाईल असावा अशी एक माफक अपेक्षा आहे. एकंदर उन्हाळी परिस्थिती लक्षात घेता "चला हवा येउ द्या" लुंगी म्हणुन वापरता यायला हवा. झालचं तर अम्हाला उंचं उंचं पर्वतांवर ट्रेकिंग करायची लैचं हौस असल्याने वं कित्येक वेळा ह्या उंच कड्यावरुन उडी मारुन पॅराग्लायडींग करत करत खाली उतरता आलं तर काय बहार येईल वगैरे विचार डोक्यामधे येतं असल्याने पॅराशुट किंवा अनफ्रेम ग्लायडर म्हणुन वापरता येणारा पंचा उत्तम. टर्किश टॉवेल नकोत. नाजुक असतात ते. बर्याचं मिपाकरांनी वैयक्तिक व्यनिंमधुन, कायप्पावरुन गेंड्याची कातडी वगैरे गौरवास्पद उद्गार काढलेले असल्याने गेंड्याची डेड स्किन निघुन जायचं जे काय मटेरिअल असेल ते मिळालं तर अतिउत्तम. काही मिपाकरांना अश्या मटेरिअलचे पंचे वापरायची सवय आहेचं त्यांनी आपलं मत नक्की सांगावं.
आता बनियनला हात घालु. बनियन म्हणजे बनियनचं हवा आहे. बंडी, उन्हाळी पातळ सदरे वगैरे नको आहेत. बनियनविषयीच्या अमच्या अपेक्षा फार म्हणजे फारचं माफक आहेत. बनियनचं कापड सफेदचं हवं. उगीचं हिरवे-पिवळे, पोपटी, सप्तरंगी रंगाचे वगैरे अजिबात नको. बनियन विकत घेताना जाळीदार नको. सदर बनियन अंगावर घालायचा असुन मासे पकडायला वापरायची इच्छा नाही. बनियन घालुन रस्त्यावर मारामार्या करताना किमान ४ आणि कमाल कितीही सुंदर्या येउन चिकटायला हव्या असा बनियन सुचवणार्याला अर्धा रुमाल (नाक नं शिंकरलेला, फक्तं हात आणि चेहेरा पुसण्यासाठी वापरलेला) बक्षिस देण्यात येईल. बनियन हाप शर्टाच्या बाहिमधुन बाहेर यायला नको वगैरे अपेक्षा पुर्ण झाल्यास कोळश्याहुन काळं.
आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रास्बेरी पाय नामक तळहात संगणक विकत घेणे आहेत. ह्याच्या कैक वर्जन्स असल्याने आणि लिनक्षीचा वापर करायची "अभिनव" अक्कल अमच्याकडे नसल्याने कंचा घ्यावा हा प्रश्ण आहे. शक्यतो टॉप स्पीड आणि र्याम १ जीबी वालं पाय ३ नामक इ-फळकुट विकत घ्यायचा विचार आहे. आधी एका मिपाकर मित्राकडुन निराधारको उधार बेसिस वर आणुन प्रोग्रामिंग शिकायला सुरुवात करायचा विचार आहे. तर सल्ला द्या ब्रे. GTIO/ COM port साठी काही ब्रेडबोर्ड्स, जंपरतारा, रिले वगैरेही सुचवावेत.
तर धागा उडायच्या आत सल्ले द्या ब्रे. कळावे.
आ.न.
कॅ.जॅ.स्पॅ.
वाचने
17162
प्रतिक्रिया
101
मिसळपाव
प्रतिक्रिया
ही साईट घे: https://www
शालगर मध्ये बघा, दणकट पायजमे
आणि चपळ रासबेरी पायसुद्धा.
In reply to शालगर मध्ये बघा, दणकट पायजमे by सूड
शालगर मध्ये बघा, दणकट पायजमे
दणकट मंजे णेमका किती दणकट
In reply to शालगर मध्ये बघा, दणकट पायजमे by सूड
एकदम
In reply to दणकट मंजे णेमका किती दणकट by कॅप्टन जॅक स्पॅरो
पण पायजमा नकोचं आहे. पंचा
In reply to एकदम by घाटी फ्लेमिंगो
असूंदे
In reply to पण पायजमा नकोचं आहे. पंचा by कॅप्टन जॅक स्पॅरो
हातखर्चावरुन हातरुमाल आठवला
In reply to असूंदे by घाटी फ्लेमिंगो
हां
In reply to हातखर्चावरुन हातरुमाल आठवला by प्रीत-मोहर
लुंगी नकोय का?
In reply to पण पायजमा नकोचं आहे. पंचा by कॅप्टन जॅक स्पॅरो
ह्या ह्या ह्या. नको बॉ. एवढं
In reply to लुंगी नकोय का? by बोका-ए-आझम
ऋन्मेऽऽष भौ इकडे कुठे ?
रुमाल
हातरुमाल आहेत हो डझनाने.
In reply to रुमाल by अत्रन्गि पाउस
तो शब्द अडिच अक्षरी आहे ..
मुर्ख हा शब्दही अडिच अक्षरीचं
In reply to तो शब्द अडिच अक्षरी आहे .. by टवाळ कार्टा
बनियन विकत घेता येईल एवढी
बनियन विकत घेता येईल एवढी
In reply to बनियन विकत घेता येईल एवढी by अजया
पुण्यात सायकल चालवणारा एकच
In reply to बनियन विकत घेता येईल एवढी by कॅप्टन जॅक स्पॅरो
रासबेरी पायसाठी प्रतिसाद वाचत
व्यनि करतोय
In reply to रासबेरी पायसाठी प्रतिसाद वाचत by सतिश गावडे
मला पण पाठव रे
In reply to व्यनि करतोय by कॅप्टन जॅक स्पॅरो
मला पन, मला पन
In reply to मला पण पाठव रे by टवाळ कार्टा
अवकाळी पण,
खुसखुशीत लेखन.
धागा समजुन सांगितल्यास
सल्ला दे रे. रच्याकने पत्ता
In reply to धागा समजुन सांगितल्यास by जेपी
जल्ला मला धागा चारदा वाचुन पण
In reply to सल्ला दे रे. रच्याकने पत्ता by कॅप्टन जॅक स्पॅरो
पंचा आणि बनियन तुम्हाला
In reply to जल्ला मला धागा चारदा वाचुन पण by जेपी
त्यो
In reply to पंचा आणि बनियन तुम्हाला by सतिश गावडे
:-))) अफलातुन "पीळ"दार लेखन !
ह्या ह्या ह्या. =))
In reply to :-))) अफलातुन "पीळ"दार लेखन ! by चौथा कोनाडा
रास्बेरी पाय
सर्वप्रथम जोरदार
=)) =)) =))
In reply to सर्वप्रथम जोरदार by उगा काहितरीच
खी खी खी =))
In reply to सर्वप्रथम जोरदार by उगा काहितरीच
ख्या ख्या ख्या. सदर मट्रीयलनं
In reply to सर्वप्रथम जोरदार by उगा काहितरीच
पंचाचे उपयोग भारी!
In reply to सर्वप्रथम जोरदार by उगा काहितरीच
तुमच्या पायांचा फोटो
In reply to सर्वप्रथम जोरदार by उगा काहितरीच
एक सोलर क्याप हवीच.डोका थंड
कॅप्टन तुमास्नी बनेल
आमच्यात मानसं बनेल असतेत.
In reply to कॅप्टन तुमास्नी बनेल by खटपट्या
ह्म्म, तेच बोलनार होतो.
In reply to आमच्यात मानसं बनेल असतेत. by सूड
पराचा एक धागा आठवला.
जाळीदार गंजीफ्रॉक विषयी जी निष्ठुर विधाने तुम्ही केली आहेत
भावना का दुखावलीये म्हणे? ;)!
In reply to जाळीदार गंजीफ्रॉक विषयी जी निष्ठुर विधाने तुम्ही केली आहेत by मारवा
जाळीदार गंजीफ्रॉक विषयी जी निष्ठुर विधाने तुम्ही केली आहेत
रासबेरी पाय घेऊन करणार काय ते
बाकी आम्च्या बनेलवर आम्ची
आनी कदी येकदा ती तो पाय
In reply to बाकी आम्च्या बनेलवर आम्ची by खटपट्या
"रास्बेरी पाय" त्ये काय आसतंय
In reply to आनी कदी येकदा ती तो पाय by सूड
रासवट पायांची त्वचा मुलायम
In reply to "रास्बेरी पाय" त्ये काय आसतंय by खटपट्या
बनेल बरोबर बाकीच्या काप्डावर
In reply to रासवट पायांची त्वचा मुलायम by सतिश गावडे
त्यावर पाय पुसले पिळले की
In reply to बनेल बरोबर बाकीच्या काप्डावर by खटपट्या
श्लेष आहे का?
In reply to त्यावर पाय पुसले पिळले की by कंजूस
लोल धागा आणि प्रतिसाद!
साँवरिया हे नाव बरोबर आहे.
In reply to लोल धागा आणि प्रतिसाद! by रातराणी
खिक्क. साँवरिया का सावरता!? =
In reply to साँवरिया हे नाव बरोबर आहे. by रेवती
साँवरिया हा मुळचा सावराया हा
In reply to साँवरिया हे नाव बरोबर आहे. by रेवती
कॉलिंग मिपाचे प्रा.परखडकर =))
In reply to साँवरिया हा मुळचा सावराया हा by सतिश गावडे
अत्ताच
In reply to कॉलिंग मिपाचे प्रा.परखडकर =)) by रातराणी
मिपाचा दुरुपयोग वाचून शरम
पगारवाढीबद्दल अभिनंदन
पगारवाढीत कोणाला कमिशन जातंय
In reply to पगारवाढीबद्दल अभिनंदन by बॅटमॅन
हे हे हे. नशिब % चं वापरलाय.
In reply to पगारवाढीबद्दल अभिनंदन by बॅटमॅन
पेट्रोल आणि डिझेल स्वस्त
पायबीय ठीक आहे पण पंचा परवडेल
_/\_
In reply to पायबीय ठीक आहे पण पंचा परवडेल by मितान
चिमण
In reply to _/\_ by कॅप्टन जॅक स्पॅरो