Skip to main content

पंचा, बनियन आणि रास्बेरी पाय विकत घ्यायचे आहेत सल्ला द्या.

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी सोमवार, 09/05/2016 20:13 या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषयः पंचा, बनियन आणि रास्बेरी पाय विकत घ्यायचे आहेत सल्ला द्या. कित्येक लोकांना हे विडंबन वाटेल पण हे विडंबन नसुन वस्तुस्थिती आहे हे कृपया लक्षात घेऊन मौल्यवान मार्गदर्शन करावे. एप्रिल संपला. एप्रिलच्या अगदी पहिल्या दिवशी नाही पण शेवटच्या आठवड्या अ‍ॅप्रायजल आणि गोल सेटिंग नामक शिनेमा दाखवुन कंपनीनी एप्रिल फुल (खरं तर ** बनवलयं, पण संपादकिय धोरणं, असांसदिय शब्दांचा वापर वगैरे कारणाने धागा उडु नये म्हणुन सोयीसाठी आपण मुर्ख असा द्वयाक्षरी शब्द चांदण्यांमधे टाकु) केलं. गोल सेटिंगमधे आत्ताच्या जबाबदार्‍या गुणिले ३० आणि अ‍ॅप्रायजलचा आकडा ०.०००००००१२००००१२००००२३१२% अ‍ॅप्रायजलचा आकडा ऐकुन श्रावणमाशी हर्शमाणषी हिरकळ दाटे चोहिकडे ह्या अजरामर गाण्यावर एचार कमुणिकेशन्स कम पेरोल पेशालिस्ट नामक चिंधीचोर व्यक्तीच्या केबिन नामक तुरुंगामधे नाचायची इच्छा झालेली. ह्या इसमास लाज, लज्जा, शरम इत्यादी गोष्टी अजिबात म्हणजे अजिबात नसल्याने ते कष्ट आवरले. मात्र जाता जाता थँक्यु सर, अता पुढच्या पगारापासुन नवे बनियन विकत घेउ शकिन म्हणुन शाब्दिक थोबाड फोडुन बाहेर पडलो. आता फार अवांतर करत नाही. तर अतिभव्य प-गार वाढ झाल्याने यंदा बन्यन, पंचे, लेंग्याच्या नाड्या आणि रास्बेरी पाय घ्यायचा विचार आहे. माझ्या अपेक्षा वगैरे मी सांगतोचं पण मिपाकरांनी आपला काही मिलियन तासांचा अनुभव इथे सांगुन एक नमुना निवडायला मदत करावी अशी विनंती. तर आता हे प्रश्ण पंचापासुन सोडवायला सुरुवात करु (प्रश्ण सोडवायचा आहे पंचा नव्हे). पंचा रंगीबेरंगी पाहिजे आणि त्यातला मुख्य रंग लाल हवा. शक्यतो गोळ्या-गोळ्यांचं डिझाईन असणारा पंचा/ टॉवेल वगैरे मिळाला तर उत्तम. टॉवेल/ पंचा जो काय असेल तो वर्साटाईल असावा अशी एक माफक अपेक्षा आहे. एकंदर उन्हाळी परिस्थिती लक्षात घेता "चला हवा येउ द्या" लुंगी म्हणुन वापरता यायला हवा. झालचं तर अम्हाला उंचं उंचं पर्वतांवर ट्रेकिंग करायची लैचं हौस असल्याने वं कित्येक वेळा ह्या उंच कड्यावरुन उडी मारुन पॅराग्लायडींग करत करत खाली उतरता आलं तर काय बहार येईल वगैरे विचार डोक्यामधे येतं असल्याने पॅराशुट किंवा अनफ्रेम ग्लायडर म्हणुन वापरता येणारा पंचा उत्तम. टर्किश टॉवेल नकोत. नाजुक असतात ते. बर्‍याचं मिपाकरांनी वैयक्तिक व्यनिंमधुन, कायप्पावरुन गेंड्याची कातडी वगैरे गौरवास्पद उद्गार काढलेले असल्याने गेंड्याची डेड स्किन निघुन जायचं जे काय मटेरिअल असेल ते मिळालं तर अतिउत्तम. काही मिपाकरांना अश्या मटेरिअलचे पंचे वापरायची सवय आहेचं त्यांनी आपलं मत नक्की सांगावं. आता बनियनला हात घालु. बनियन म्हणजे बनियनचं हवा आहे. बंडी, उन्हाळी पातळ सदरे वगैरे नको आहेत. बनियनविषयीच्या अमच्या अपेक्षा फार म्हणजे फारचं माफक आहेत. बनियनचं कापड सफेदचं हवं. उगीचं हिरवे-पिवळे, पोपटी, सप्तरंगी रंगाचे वगैरे अजिबात नको. बनियन विकत घेताना जाळीदार नको. सदर बनियन अंगावर घालायचा असुन मासे पकडायला वापरायची इच्छा नाही. बनियन घालुन रस्त्यावर मारामार्‍या करताना किमान ४ आणि कमाल कितीही सुंदर्‍या येउन चिकटायला हव्या असा बनियन सुचवणार्‍याला अर्धा रुमाल (नाक नं शिंकरलेला, फक्तं हात आणि चेहेरा पुसण्यासाठी वापरलेला) बक्षिस देण्यात येईल. बनियन हाप शर्टाच्या बाहिमधुन बाहेर यायला नको वगैरे अपेक्षा पुर्ण झाल्यास कोळश्याहुन काळं. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रास्बेरी पाय नामक तळहात संगणक विकत घेणे आहेत. ह्याच्या कैक वर्जन्स असल्याने आणि लिनक्षीचा वापर करायची "अभिनव" अक्कल अमच्याकडे नसल्याने कंचा घ्यावा हा प्रश्ण आहे. शक्यतो टॉप स्पीड आणि र्‍याम १ जीबी वालं पाय ३ नामक इ-फळकुट विकत घ्यायचा विचार आहे. आधी एका मिपाकर मित्राकडुन निराधारको उधार बेसिस वर आणुन प्रोग्रामिंग शिकायला सुरुवात करायचा विचार आहे. तर सल्ला द्या ब्रे. GTIO/ COM port साठी काही ब्रेडबोर्ड्स, जंपरतारा, रिले वगैरेही सुचवावेत. तर धागा उडायच्या आत सल्ले द्या ब्रे. कळावे. आ.न. कॅ.जॅ.स्पॅ.

वाचने 17162
प्रतिक्रिया 101

प्रतिक्रिया

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

धुंद रवींनी घेतलेली? श्रीखंडात शेझवान नूडल्स मिसळून हिरव्या पिवळ्या कापडावर मांजर ओकलेली? ;)

मला वाटते इतक्या अतिभव्य, मत्सरजनक, उत्साहवर्धक आणि केवळ स्तुत्य अशा पगारवाढी नंतर प्रथम हात रुमाल विकत घ्यावेत .... किती दिवस तोंडाला 'पाने' पुसून घेणार ??

तो शब्द अडिच अक्षरी आहे ...बाकी बनियान आणि लुंगीचे फोटोच दिले अस्ते इथे पण मग माझ्या आयडीला घोडे लावले जातील =))

बनियन विकत घेता येईल एवढी पगारवाढ. ऐश आहे मग.सायकलवरून बनियन विकणारा एक जण पुण्यनगरीत नुकताच दिसलाय.घरात काही फुटकी भांडी असतील तर देऊन बघ मिळतो का ते.आणि तो गिफ्ट पॅक करुन एच आर ला दे.

In reply to by अजया

बनियन विकत घेता येईल एवढी पगारवाढ.
तो पण चक्कं नवा घेता येईल. =)) बाकी सायकलवाला कोण हा प्रश्ण पडलेला आहे =)

रासबेरी पायसाठी प्रतिसाद वाचत राहीन. मी आरडुइनो बोर्ड विकत घेतला होता मात्र दोन एलिडीचा "डिस्को लाईट"चा प्रोग्राम बनवल्यानंतर माझा उत्साह मावळला.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

जल्ला मला धागा चारदा वाचुन पण कल्ला नाय.. आणी सल्ला देण्या ऐवढा हुशार असतो तर !. ईंजिनीयर...बॅरिष्टर.किंवा गेला बाजार मिपाचा सासं किवा संमु झालो असतो...

In reply to by जेपी

पंचा आणि बनियन तुम्हाला माहीती असेलच. रासबेरी पाय काय प्रकरण आहे हे समजून घेण्यासाठी हभप प्रगोमहाराज सातारकर यांच्याशी संपर्क करा.

In reply to by सतिश गावडे

सातारकरा महाराजांचा साक्षात्कार सर्वांना होवो ही सदिच्छा!!! खालील ओळी चिमण आणि प्रतिसादींसाठी: चिमण बनियन आजकाल नंतर आटतात जसे मिपावर गेल्या पंधरवाड्यातील धागे सैराटतात तसे, तेंव्हा आधी खात्री करून घे नंतर बळजुबरीने त्या बनियनच्या पोत्यात न मावणारा ऐवज कोंबण्यात काय हशील? पंचाचा नेमका उपयोग काय करणार आहेस? म्हणजे लुंगी-कम पंचा का फक्त सचैल स्नानोत्तर अंगावरील जलबिंदु हळुवार् टिपण्यासाठी? संदर्भ इथे पहा. पंचाचा उपयोग दोघांनाही राहिला तिसरा नग त्या बद्दल आम्ही अडाणी आहोत सबब प्रगोने प्रगट होऊन ज्ञान पाणपोई उघडावी.(त्यांचे नाव सुचविल्याबद्दल गावडे मास्तरांनी त्यांना पकडून आणावे असा उपसल्ला देण्यात येत आहे). प्रतिसादींनी शब्दछल करून अंग पुसण्याचे वस्त्राचा अपभ्रंष करून कप्तानाला अंगवस्त्र हवे आहे असा करू नये. ता.क. म्हणजे ताजा कलम (लगेच ताक किंवा ताकाचे भांडे) असे समजून भांडु नये (फाटा तयार आहे) संक्रुती रक्षक काकांनी धाग्यावरील चर्चेवर बारीक लक्ष्य ठेउन कुठलेही वस्त्र-प्रतिसाद तोकडे पडणार नाहीत याची काळजी घ्यावी (कॉफीची परतफेड करावी) सर्वसमावेशक परोपकारी नाखु

:-))) अफलातुन "पीळ"दार लेखन ! :-)) छाजेड होजियरी, पिंचिंवाडी मधे एक डझन नग (६ बनियन+६ पंचे) घेतल्यास रास्बेरी पाय फ्री अशी जाहिरात दै. संध्यानंद मध्ये वाचल्याचे स्मरते. मा.तं. गबरूंची तिथे गर्दी झाल्याचा फोटो पण होता त्या जाहिराती खाली. (*माहिती तंत्रज्ञान)

३ च घ्या http://www.amazon.in/Raspberry-Model-RASPBERRYPI-MODB-1GB--built-Blueto…+३ अमाझोन वर ३२०० ला आहे फायदे ब्लूटूथ आणि वाय फाय आहे त्यामुळे २ USB पोर्ट वाचतील मग ४ USB पोर्ट पुरावेत काही जन याला २.५ AMP चा चार्गेर लागेल असे सांगतात..

सर्वप्रथम जोरदार पगारवाढीबद्दल दणकाऊन अभिनंदन .... आता मुख्य विषयाला सुरूवात करू. पहिला प्रश्न बनियन संदर्भातील आहेना! मुळात बनियन का घालतात लोक ? हाच मोठा प्रश्न आहे. काही अडत नाही बनियन नाही घातली तर. तुमचे एचआर वाले लोक टाय नाही वापरला, बूट नाही घातले तर मेल करतील पण बनियन नाही घातली म्हणून थोडीच मेल टाकून बेजार करणार आहेत ? त्यामुळे बनियन घालायचीच नाही. ओक्के ? दुसरा प्रश्न पंचा कम टॉवेल , हं याला सहमती बिंदास वापरा कारण याचा उपयोग भरपूर प्रकारे होऊ शकते. पंचा, टॉवेल, हे तर तुम्हीच सांगितले याशिवाय उन्हाळ्यात पांघरायला मस्त पर्याय आहे. पोळ्या करताना हात भाजू नयेत म्हणून वापरता येईल. अॉफिस मधे टीशू पेपर संपले की काढायचा पंचा बाहेर हात पुसायला म्हणून लगेच टिशु आणून ठेवतील लोक. अॉफिसमधे टिफीन बॉक्सच्या ऐवजी पंचातच पोळ्या बांधून न्यायच्या मुद्दाम एचआर सोबत जेवायला बसायचं आणि एकदम स्टाईलने पंचातल्या पोळ्या बाहेर काढायच्या . पोळ्यात लोंचं लपवलेलं असेल तर लै भारीच. बसस्टँड, रेल्वेस्टेशन वर, हॉटेलात गेलात तर मस्त बोटं बुडवलेले पाणी आले तर पंचाने गाळून घ्यायचे. वडापाव खायचा असेल अन् तेल जरा जास्तच वाटत असेल तर वडा पंचात ठेवून पिळायचा अन् खायचा सगळं तेल पंचा शोषून घेतो. अहो श्री श्री पंचपंचेश्वर महामहोध्यायांनी (इथे मी स्वतःचे हात स्वतःच्या कानाला लावले असून जिभ दाताखाली चावली आहे . नोंद घ्यावी. ) लिहीलेला "अद्भुत पंचाचे पंचहजार उपयोग" हा संदर्भग्रंथ वाचावा. इथे तुमचा दुसरा प्रश्न काही अंशी सोडला . आता राहिले रासबेरी पाय बद्दल . मला तरी नाही आवडलं हे. एक तर लिमीटेड फंक्शनॕलिटी. हार्ड ड्राईव्ह नाही. काय करणार घेऊन.याला प्रोग्राम करणे भलतं क्लिष्ट असावं. (मित्राचा प्रोजेक्ट बहुतेक बारगळणार यामुळेच) तुम्ही याचा नेमका काय उपयोग करणार हे कळालं तर त्यानुसार माहिती देता येईल. असो आवरतं घेतो आता. पुनश्चः एकवार भरघोस पगारवाढ झाल्याबद्दल भरघोस अभिनंदन .

In reply to by उगा काहितरीच

ख्या ख्या ख्या. सदर मट्रीयलनं गेंडा डेड स्किन निघेल का पण? चुकुन नं धुता वापरला गेला तर आग आग व्हायची =)) रच्याकने गेमाडपंथी माणसा पुढचा धागा कुठं आहे? =))

In reply to by उगा काहितरीच

अवांतर: मिस्टर बीन आठवला. एकदा त्यांनी पायातले मोजे त्यात मिरी ठेऊन नंतर बुटांनी कुटायला वापरलेत. आणि एकदा झोपण्यासाठी शांतता हवी म्हणून कानात एक बाजू बोळा करून कोंबलीये. मग ते मोजे भूभूच्या कानासारखे दिसतात!

In reply to by उगा काहितरीच

धी गिरगांव पंचे डेपो (आमची कुठेही शाखा नाही आणि इथे जानवीजोडही मिळतील) मध्ये लावायचा आहे. लवकर पाठवा.

In reply to by सूड

ह्म्म, तेच बोलनार होतो. मिपावर सगळीच बनेल हायती..काय कळंना झालंय.. बाकी एक भोकाभोकाचा बनेल पन आसतोय. तो चालल का कप्तानास्नी. लय हवेशीर बगा...

रासबेरी पाय घेऊन करणार काय ते आधी ठरवा. म्हणजे हेतू काय? उत्तर सोप्पे आहे - जे लेटेस्ट मोडेल आहे ते घ्या. पण त्यातल्या काम्पोनंत्स चा उपयोग खरच करणार आहात का ते आधी ठरवा. 'मोटारसायकल कुठली घ्यावी' या प्रश्नासारखाच हा प्रश्न आहे. मला एलिमिनेटर आवडली म्हणून तुम्हालाही ती आवड्लीच पाहिजे असे नाही. जर एक दोन मित्रांच्या गाड्या चालवून बघितल्या तर अंदाज येतो आपली आवड कशात आहे ते... हि साईट पहा - https://hackaday.io/

बाकी आम्च्या बनेलवर आम्ची कारभारीन टपलेलीच आस्ती बगा. कदी येकदा म्या तो वापरायचा थांबतू आनी कदी येकदा ती तो पाय पुसायला वापरतेय...बाकी टीवी बनेलने चांगला पुसला जातो आसं तीच एक आपलं नीरीक्शान हाये..

In reply to by खटपट्या

आनी कदी येकदा ती तो पाय पुसायला वापरतेय
तुमच्या ब्रॅन्डच्या बनेलने रास्बेरी पाय पुसता येतंय का?

In reply to by खटपट्या

रासवट पायांची त्वचा मुलायम व्हावी म्हणून त्यावर बेरी चोळतात. सुड्रावांना ते पाय पुसण्यासाठी बनेल हवे असावे असे वाटते.

In reply to by रातराणी

रा रा श्री श्री बॅटोबांशी संवाद झाला आणि त्यांनी दिलेल्या माहीतीनुसार... फार पुर्वी एका घरात नवपरिणीत दांपत्यास (अर्थात मुंबईत) चाळीमध्ये पुरेसा एकांत मिळत नव्हता. सासु-सासरे,धाकला दीर्,धाकली नंणंद ई मुळे सतत घरात कूणी ना कुणी सतत असायचेच. अता नवविवाहितेला एक उपाय सुचला. तीने टेरेसवर पक्षी छतावर वाळत टाकलेले कपडे आणताना आप्लया नवरोबाला बोलवायचे ठरविले. त्या प्रमाणे नवरा अंघोळीला गेला आणि (नेहमीच्या जन्मजात धांदरटपणामुळे) आंघोळ झाल्यावर फक्त पंचाच आहे बाकी वस्त्रे ठेवली नाहीत बदलायला हे त्याला आंघोळ झाल्यावर्च उमगले , मग काय आधी शिरस्त्या प्रमाणे (उगा वाद विवाद नको म्हणून) आईला विचारून पाहिले. अश्या वेळीस कर्तबगार व धोरणी असल्याने सासूने ही बाब तू तुझ्या बायकोकडे जाऊन सोडव असा रास्त सल्ला दिला. आपले महाशय तसेच पंच्यावर चाळीच्या छज्यात आले आणी त्यांच्या घरातील गुप्तहेरांनी वहीनी टेरेसवर वाळत टाकलेले कपडे आणायला गेली आहे असे सांगीतले. नवरोबाच तो खेकसायची संधी थोडीच सोडणार. त्याने जागेवरून्च तीच्या नावाहा घोषा लावला (आणि आईला आपण टीएम्सी नाही हे दाखवायचा प्रयत्न केला) आप्ली कथानायिकाही हुषार तिने खुणेने वर ( टेरेसवर ) ये असे सांगीतले. पण ने.ज.धा. ला कळेत तर शप्पथ्,मग शेवटी ती लाडीकपणे म्हणाली "सांगते वरती या." त्याचे अपभ्रंष होऊन सांगते वरती या. असे झाले. बाकीचे उत्पत्ती दावे हे कप्लनाविलास आहेत असेही त्यांनी आवर्जून सांगीतले. मिपाकरांच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो. तत्पर नाखु

पगारवाढीबद्दल अभिनंदन कप्तानसाहेब. बाकी आमचीही पगारवाढ तुमच्यागतच अतिभव्य वगैरे. लोकं मारे मोदी आला मोदी आला म्हणून अच्चेदिन आलेच म्हणतायत पण भेंडी पगारवाढीत अजूनही बुरेदिनच आहेत. जोवर पगार धडपणी वाढत नै तोवर कै अच्चेदिन आले असे म्हणू शकत नै.

In reply to by बॅटमॅन

हे हे हे. नशिब % चं वापरलाय. मल्टिप्लायर म्हणुन वापरला असता तर शनिवारवाडा "चौपाटी" ला भेळेची गाडी टाकावी लागली असती. ;) ;)!!

पेट्रोल आणि डिझेल स्वस्त झाल्याने झालेली बचत ही एक प्रकारे पगारवाढ च आहे एवढं बोलून धाग्याला इंधन दिल्या गेल्या आहे. :-)

पायबीय ठीक आहे पण पंचा परवडेल असं वाटत नाही. तेव्हा नात्यातल्या माताभगिनींना या डिजाईंची ओढणी किंवा साडी आहे का विचारा. साडी असेल तर 3 पंचे होतील. पुढल्या वर्षभराची सोया होईल.:P

In reply to by मितान

_/\_ नाहि ओ. किमान ४ वर्ष टिकला पाहिजे असा दणदणीत पाहिजे. तोपर्यंत जरा रिकरिंग करुन नव्याची सोय करता येईल. (वराहअवतारी पेरोल पेश्शालिस्ट ला हा लेख दाखवायला हवा) =))

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

तुला प्छा पंचा हवा आहे असे स्पाष्ट साम्ग लोक तोंड लपवायचा स्कार्फ देणार नाहीत. आणि हो ओढणीचे लोढणे अजिबात स्वीकारू नकोस असे नाही असे नाही. पुन्हा खुलासेदार नाखु