लेखनविषयः पंचा, बनियन आणि रास्बेरी पाय विकत घ्यायचे आहेत सल्ला द्या.
कित्येक लोकांना हे विडंबन वाटेल पण हे विडंबन नसुन वस्तुस्थिती आहे हे कृपया लक्षात घेऊन मौल्यवान मार्गदर्शन करावे.
एप्रिल संपला. एप्रिलच्या अगदी पहिल्या दिवशी नाही पण शेवटच्या आठवड्या अॅप्रायजल आणि गोल सेटिंग नामक शिनेमा दाखवुन कंपनीनी एप्रिल फुल (खरं तर ** बनवलयं, पण संपादकिय धोरणं, असांसदिय शब्दांचा वापर वगैरे कारणाने धागा उडु नये म्हणुन सोयीसाठी आपण मुर्ख असा द्वयाक्षरी शब्द चांदण्यांमधे टाकु) केलं. गोल सेटिंगमधे आत्ताच्या जबाबदार्या गुणिले ३० आणि अॅप्रायजलचा आकडा ०.०००००००१२००००१२००००२३१२% अॅप्रायजलचा आकडा ऐकुन श्रावणमाशी हर्शमाणषी हिरकळ दाटे चोहिकडे ह्या अजरामर गाण्यावर एचार कमुणिकेशन्स कम पेरोल पेशालिस्ट नामक चिंधीचोर व्यक्तीच्या केबिन नामक तुरुंगामधे नाचायची इच्छा झालेली. ह्या इसमास लाज, लज्जा, शरम इत्यादी गोष्टी अजिबात म्हणजे अजिबात नसल्याने ते कष्ट आवरले. मात्र जाता जाता थँक्यु सर, अता पुढच्या पगारापासुन नवे बनियन विकत घेउ शकिन म्हणुन शाब्दिक थोबाड फोडुन बाहेर पडलो.
आता फार अवांतर करत नाही. तर अतिभव्य प-गार वाढ झाल्याने यंदा बन्यन, पंचे, लेंग्याच्या नाड्या आणि रास्बेरी पाय घ्यायचा विचार आहे. माझ्या अपेक्षा वगैरे मी सांगतोचं पण मिपाकरांनी आपला काही मिलियन तासांचा अनुभव इथे सांगुन एक नमुना निवडायला मदत करावी अशी विनंती.
तर आता हे प्रश्ण पंचापासुन सोडवायला सुरुवात करु (प्रश्ण सोडवायचा आहे पंचा नव्हे). पंचा रंगीबेरंगी पाहिजे आणि त्यातला मुख्य रंग लाल हवा. शक्यतो गोळ्या-गोळ्यांचं डिझाईन असणारा पंचा/ टॉवेल वगैरे मिळाला तर उत्तम. टॉवेल/ पंचा जो काय असेल तो वर्साटाईल असावा अशी एक माफक अपेक्षा आहे. एकंदर उन्हाळी परिस्थिती लक्षात घेता "चला हवा येउ द्या" लुंगी म्हणुन वापरता यायला हवा. झालचं तर अम्हाला उंचं उंचं पर्वतांवर ट्रेकिंग करायची लैचं हौस असल्याने वं कित्येक वेळा ह्या उंच कड्यावरुन उडी मारुन पॅराग्लायडींग करत करत खाली उतरता आलं तर काय बहार येईल वगैरे विचार डोक्यामधे येतं असल्याने पॅराशुट किंवा अनफ्रेम ग्लायडर म्हणुन वापरता येणारा पंचा उत्तम. टर्किश टॉवेल नकोत. नाजुक असतात ते. बर्याचं मिपाकरांनी वैयक्तिक व्यनिंमधुन, कायप्पावरुन गेंड्याची कातडी वगैरे गौरवास्पद उद्गार काढलेले असल्याने गेंड्याची डेड स्किन निघुन जायचं जे काय मटेरिअल असेल ते मिळालं तर अतिउत्तम. काही मिपाकरांना अश्या मटेरिअलचे पंचे वापरायची सवय आहेचं त्यांनी आपलं मत नक्की सांगावं.
आता बनियनला हात घालु. बनियन म्हणजे बनियनचं हवा आहे. बंडी, उन्हाळी पातळ सदरे वगैरे नको आहेत. बनियनविषयीच्या अमच्या अपेक्षा फार म्हणजे फारचं माफक आहेत. बनियनचं कापड सफेदचं हवं. उगीचं हिरवे-पिवळे, पोपटी, सप्तरंगी रंगाचे वगैरे अजिबात नको. बनियन विकत घेताना जाळीदार नको. सदर बनियन अंगावर घालायचा असुन मासे पकडायला वापरायची इच्छा नाही. बनियन घालुन रस्त्यावर मारामार्या करताना किमान ४ आणि कमाल कितीही सुंदर्या येउन चिकटायला हव्या असा बनियन सुचवणार्याला अर्धा रुमाल (नाक नं शिंकरलेला, फक्तं हात आणि चेहेरा पुसण्यासाठी वापरलेला) बक्षिस देण्यात येईल. बनियन हाप शर्टाच्या बाहिमधुन बाहेर यायला नको वगैरे अपेक्षा पुर्ण झाल्यास कोळश्याहुन काळं.
आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रास्बेरी पाय नामक तळहात संगणक विकत घेणे आहेत. ह्याच्या कैक वर्जन्स असल्याने आणि लिनक्षीचा वापर करायची "अभिनव" अक्कल अमच्याकडे नसल्याने कंचा घ्यावा हा प्रश्ण आहे. शक्यतो टॉप स्पीड आणि र्याम १ जीबी वालं पाय ३ नामक इ-फळकुट विकत घ्यायचा विचार आहे. आधी एका मिपाकर मित्राकडुन निराधारको उधार बेसिस वर आणुन प्रोग्रामिंग शिकायला सुरुवात करायचा विचार आहे. तर सल्ला द्या ब्रे. GTIO/ COM port साठी काही ब्रेडबोर्ड्स, जंपरतारा, रिले वगैरेही सुचवावेत.
तर धागा उडायच्या आत सल्ले द्या ब्रे. कळावे.
आ.न.
कॅ.जॅ.स्पॅ.
प्रतिक्रिया
9 May 2016 - 8:18 pm | स्रुजा
ही साईट घे: https://www.raspberrypi.org/
बाकी रुमाल टाकुन जाते आहे.
9 May 2016 - 8:18 pm | सूड
शालगर मध्ये बघा, दणकट पायजमे देतात तर मुलायम बनियन नक्कीच असेल.
9 May 2016 - 8:43 pm | आदूबाळ
आणि चपळ रासबेरी पायसुद्धा.
9 May 2016 - 8:18 pm | सूड
शालगर मध्ये बघा, दणकट पायजमे देतात तर मुलायम बनियन नक्कीच असेल.
9 May 2016 - 8:29 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
दणकट मंजे णेमका किती दणकट असेल?
10 May 2016 - 2:25 pm | घाटी फ्लेमिंगो
दहाव्या मजल्यावरुन उडी मारा... बाकी सगळं फाटेल पण पायजमा नाय...!!
11 May 2016 - 9:01 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
पण पायजमा नकोचं आहे. पंचा सुचवा असा असेल तर. किंवा बन्यन. ;)!!
11 May 2016 - 11:22 am | घाटी फ्लेमिंगो
असूंदे एक पायजमा... हातखर्चाला...!!
11 May 2016 - 12:00 pm | प्रीत-मोहर
हातखर्चावरुन हातरुमाल आठवला तो बी असुंदेत
11 May 2016 - 1:31 pm | घाटी फ्लेमिंगो
हां... हातरुन पाउन पाय पसरावेत...!!
11 May 2016 - 1:38 pm | बोका-ए-आझम
धुंद रवींनी घेतलेली? श्रीखंडात शेझवान नूडल्स मिसळून हिरव्या पिवळ्या कापडावर मांजर ओकलेली? ;)
11 May 2016 - 2:29 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
ह्या ह्या ह्या. नको बॉ. एवढं नक्षीकाम डोळ्याला अंमळ सहन होत नाही. ;)!!!
9 May 2016 - 8:19 pm | राघवेंद्र
ऋन्मेऽऽष भौ इकडे कुठे ?
9 May 2016 - 8:20 pm | अत्रन्गि पाउस
मला वाटते इतक्या अतिभव्य, मत्सरजनक, उत्साहवर्धक आणि केवळ स्तुत्य अशा पगारवाढी नंतर प्रथम हात रुमाल विकत घ्यावेत .... किती दिवस तोंडाला 'पाने' पुसून घेणार ??
9 May 2016 - 8:22 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
हातरुमाल आहेत हो डझनाने. नारायणानं आख्खं बॉक्स आणुन आपटलेलं. =))
9 May 2016 - 8:36 pm | टवाळ कार्टा
तो शब्द अडिच अक्षरी आहे ...बाकी बनियान आणि लुंगीचे फोटोच दिले अस्ते इथे पण मग माझ्या आयडीला घोडे लावले जातील =))
9 May 2016 - 8:41 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
मुर्ख हा शब्दही अडिच अक्षरीचं आहे. =)) बाकी णो कमेंट्स.
9 May 2016 - 8:49 pm | अजया
बनियन विकत घेता येईल एवढी पगारवाढ. ऐश आहे मग.सायकलवरून बनियन विकणारा एक जण पुण्यनगरीत नुकताच दिसलाय.घरात काही फुटकी भांडी असतील तर देऊन बघ मिळतो का ते.आणि तो गिफ्ट पॅक करुन एच आर ला दे.
9 May 2016 - 9:09 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
तो पण चक्कं नवा घेता येईल. =))
बाकी सायकलवाला कोण हा प्रश्ण पडलेला आहे =)
10 May 2016 - 11:08 am | टवाळ कार्टा
पुण्यात सायकल चालवणारा एकच आहे का रे =))
9 May 2016 - 8:58 pm | सतिश गावडे
रासबेरी पायसाठी प्रतिसाद वाचत राहीन. मी आरडुइनो बोर्ड विकत घेतला होता मात्र दोन एलिडीचा "डिस्को लाईट"चा प्रोग्राम बनवल्यानंतर माझा उत्साह मावळला.
9 May 2016 - 9:08 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
व्यनि करतोय
10 May 2016 - 11:08 am | टवाळ कार्टा
मला पण पाठव रे
11 May 2016 - 6:32 pm | sagarpdy
मला पन, मला पन
9 May 2016 - 9:05 pm | जव्हेरगंज
मस्त खुसखुशीत लेखन !!!
9 May 2016 - 9:06 pm | राजेश घासकडवी
खुसखुशीत लेखन.
9 May 2016 - 9:07 pm | जेपी
धागा समजुन सांगितल्यास सत्कारात पंचा,बनियान आणी ते काय रासबेरी देईन..
9 May 2016 - 9:13 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
सल्ला दे रे. रच्याकने पत्ता इथे देउ का व्यनि करु?
9 May 2016 - 9:20 pm | जेपी
जल्ला मला धागा चारदा वाचुन पण कल्ला नाय..
आणी सल्ला देण्या ऐवढा हुशार असतो तर !.
ईंजिनीयर...बॅरिष्टर.किंवा गेला बाजार मिपाचा सासं किवा संमु झालो असतो...
9 May 2016 - 9:39 pm | सतिश गावडे
पंचा आणि बनियन तुम्हाला माहीती असेलच. रासबेरी पाय काय प्रकरण आहे हे समजून घेण्यासाठी हभप प्रगोमहाराज सातारकर यांच्याशी संपर्क करा.
10 May 2016 - 8:52 am | नाखु
सातारकरा महाराजांचा साक्षात्कार सर्वांना होवो ही सदिच्छा!!!
खालील ओळी चिमण आणि प्रतिसादींसाठी:
चिमण बनियन आजकाल नंतर आटतात जसे मिपावर गेल्या पंधरवाड्यातील धागे सैराटतात तसे, तेंव्हा आधी खात्री करून घे नंतर बळजुबरीने त्या बनियनच्या पोत्यात न मावणारा ऐवज कोंबण्यात काय हशील?
पंचाचा नेमका उपयोग काय करणार आहेस? म्हणजे लुंगी-कम पंचा का फक्त सचैल स्नानोत्तर अंगावरील जलबिंदु हळुवार् टिपण्यासाठी? संदर्भ इथे पहा.
पंचाचा उपयोग दोघांनाही
राहिला तिसरा नग त्या बद्दल आम्ही अडाणी आहोत सबब प्रगोने प्रगट होऊन ज्ञान पाणपोई उघडावी.(त्यांचे नाव सुचविल्याबद्दल गावडे मास्तरांनी त्यांना पकडून आणावे असा उपसल्ला देण्यात येत आहे).
प्रतिसादींनी शब्दछल करून अंग पुसण्याचे वस्त्राचा अपभ्रंष करून कप्तानाला अंगवस्त्र हवे आहे असा करू नये.
ता.क. म्हणजे ताजा कलम (लगेच ताक किंवा ताकाचे भांडे) असे समजून भांडु नये (फाटा तयार आहे)
संक्रुती रक्षक काकांनी धाग्यावरील चर्चेवर बारीक लक्ष्य ठेउन कुठलेही वस्त्र-प्रतिसाद तोकडे पडणार नाहीत याची काळजी घ्यावी (कॉफीची परतफेड करावी)
सर्वसमावेशक परोपकारी नाखु
9 May 2016 - 9:25 pm | चौथा कोनाडा
:-))) अफलातुन "पीळ"दार लेखन ! :-))
छाजेड होजियरी, पिंचिंवाडी मधे एक डझन नग (६ बनियन+६ पंचे) घेतल्यास रास्बेरी पाय फ्री अशी जाहिरात दै. संध्यानंद मध्ये वाचल्याचे स्मरते. मा.तं. गबरूंची तिथे गर्दी झाल्याचा फोटो पण होता त्या जाहिराती खाली.
(*माहिती तंत्रज्ञान)
9 May 2016 - 9:42 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
ह्या ह्या ह्या. =))
9 May 2016 - 10:05 pm | हेमन्त वाघे
३ च घ्या
http://www.amazon.in/Raspberry-Model-RASPBERRYPI-MODB-1GB--built-Bluetoo...३
अमाझोन वर ३२०० ला आहे
फायदे
ब्लूटूथ आणि वाय फाय आहे त्यामुळे २ USB पोर्ट वाचतील
मग ४ USB पोर्ट पुरावेत
काही जन याला २.५ AMP चा चार्गेर लागेल असे सांगतात..
9 May 2016 - 10:09 pm | उगा काहितरीच
सर्वप्रथम जोरदार पगारवाढीबद्दल दणकाऊन अभिनंदन .... आता मुख्य विषयाला सुरूवात करू. पहिला प्रश्न बनियन संदर्भातील आहेना! मुळात बनियन का घालतात लोक ? हाच मोठा प्रश्न आहे. काही अडत नाही बनियन नाही घातली तर. तुमचे एचआर वाले लोक टाय नाही वापरला, बूट नाही घातले तर मेल करतील पण बनियन नाही घातली म्हणून थोडीच मेल टाकून बेजार करणार आहेत ? त्यामुळे बनियन घालायचीच नाही. ओक्के ?
दुसरा प्रश्न पंचा कम टॉवेल , हं याला सहमती बिंदास वापरा कारण याचा उपयोग भरपूर प्रकारे होऊ शकते. पंचा, टॉवेल, हे तर तुम्हीच सांगितले याशिवाय उन्हाळ्यात पांघरायला मस्त पर्याय आहे. पोळ्या करताना हात भाजू नयेत म्हणून वापरता येईल. अॉफिस मधे टीशू पेपर संपले की काढायचा पंचा बाहेर हात पुसायला म्हणून लगेच टिशु आणून ठेवतील लोक. अॉफिसमधे टिफीन बॉक्सच्या ऐवजी पंचातच पोळ्या बांधून न्यायच्या मुद्दाम एचआर सोबत जेवायला बसायचं आणि एकदम स्टाईलने पंचातल्या पोळ्या बाहेर काढायच्या . पोळ्यात लोंचं लपवलेलं असेल तर लै भारीच. बसस्टँड, रेल्वेस्टेशन वर, हॉटेलात गेलात तर मस्त बोटं बुडवलेले पाणी आले तर पंचाने गाळून घ्यायचे. वडापाव खायचा असेल अन् तेल जरा जास्तच वाटत असेल तर वडा पंचात ठेवून पिळायचा अन् खायचा सगळं तेल पंचा शोषून घेतो. अहो श्री श्री पंचपंचेश्वर महामहोध्यायांनी (इथे मी स्वतःचे हात स्वतःच्या कानाला लावले असून जिभ दाताखाली चावली आहे . नोंद घ्यावी. ) लिहीलेला "अद्भुत पंचाचे पंचहजार उपयोग" हा संदर्भग्रंथ वाचावा. इथे तुमचा दुसरा प्रश्न काही अंशी सोडला .
आता राहिले रासबेरी पाय बद्दल . मला तरी नाही आवडलं हे. एक तर लिमीटेड फंक्शनॕलिटी. हार्ड ड्राईव्ह नाही. काय करणार घेऊन.याला प्रोग्राम करणे भलतं क्लिष्ट असावं. (मित्राचा प्रोजेक्ट बहुतेक बारगळणार यामुळेच) तुम्ही याचा नेमका काय उपयोग करणार हे कळालं तर त्यानुसार माहिती देता येईल.
असो आवरतं घेतो आता. पुनश्चः एकवार भरघोस पगारवाढ झाल्याबद्दल भरघोस अभिनंदन .
9 May 2016 - 10:45 pm | सस्नेह
=)) =)) =))
9 May 2016 - 11:46 pm | रातराणी
खी खी खी =))
10 May 2016 - 6:57 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
ख्या ख्या ख्या. सदर मट्रीयलनं गेंडा डेड स्किन निघेल का पण? चुकुन नं धुता वापरला गेला तर आग आग व्हायची =))
रच्याकने गेमाडपंथी माणसा पुढचा धागा कुठं आहे? =))
10 May 2016 - 12:03 pm | कवितानागेश
अवांतर: मिस्टर बीन आठवला. एकदा त्यांनी पायातले मोजे त्यात मिरी ठेऊन नंतर बुटांनी कुटायला वापरलेत. आणि एकदा झोपण्यासाठी शांतता हवी म्हणून कानात एक बाजू बोळा करून कोंबलीये. मग ते मोजे भूभूच्या कानासारखे दिसतात!
11 May 2016 - 1:41 pm | बोका-ए-आझम
धी गिरगांव पंचे डेपो (आमची कुठेही शाखा नाही आणि इथे जानवीजोडही मिळतील) मध्ये लावायचा आहे. लवकर पाठवा.
9 May 2016 - 10:38 pm | कंजूस
एक सोलर क्याप हवीच.डोका थंड राहातो.फ्लॅपमध्ये पंखा असतोय.सोलर प्यानेलवर फिरतो.
9 May 2016 - 10:47 pm | खटपट्या
कॅप्टन तुमास्नी बनेल म्हनायचंय का? आम्च्यात बनेल म्हनतात...
9 May 2016 - 10:49 pm | सूड
आमच्यात मानसं बनेल असतेत.
9 May 2016 - 10:55 pm | खटपट्या
ह्म्म, तेच बोलनार होतो. मिपावर सगळीच बनेल हायती..काय कळंना झालंय..
बाकी एक भोकाभोकाचा बनेल पन आसतोय. तो चालल का कप्तानास्नी. लय हवेशीर बगा...
9 May 2016 - 10:47 pm | एस
पराचा एक धागा आठवला.
9 May 2016 - 10:54 pm | मारवा
त्यामुळे माझ्या भावना किती दुखावल्या आहेत
ते सांगायला माझ्या कडे शब्द नाहीत.
10 May 2016 - 6:58 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
भावना का दुखावलीये म्हणे? ;)!!!
9 May 2016 - 10:54 pm | मारवा
त्यामुळे माझ्या भावना किती दुखावल्या आहेत
ते सांगायला माझ्या कडे शब्द नाहीत.
9 May 2016 - 10:56 pm | मम्बाजी सर्वज्ञ
रासबेरी पाय घेऊन करणार काय ते आधी ठरवा. म्हणजे हेतू काय? उत्तर सोप्पे आहे - जे लेटेस्ट मोडेल आहे ते घ्या. पण त्यातल्या काम्पोनंत्स चा उपयोग खरच करणार आहात का ते आधी ठरवा. 'मोटारसायकल कुठली घ्यावी' या प्रश्नासारखाच हा प्रश्न आहे. मला एलिमिनेटर आवडली म्हणून तुम्हालाही ती आवड्लीच पाहिजे असे नाही. जर एक दोन मित्रांच्या गाड्या चालवून बघितल्या तर अंदाज येतो आपली आवड कशात आहे ते...
हि साईट पहा - https://hackaday.io/
9 May 2016 - 11:00 pm | खटपट्या
बाकी आम्च्या बनेलवर आम्ची कारभारीन टपलेलीच आस्ती बगा. कदी येकदा म्या तो वापरायचा थांबतू आनी कदी येकदा ती तो पाय पुसायला वापरतेय...बाकी टीवी बनेलने चांगला पुसला जातो आसं तीच एक आपलं नीरीक्शान हाये..
9 May 2016 - 11:11 pm | सूड
तुमच्या ब्रॅन्डच्या बनेलने रास्बेरी पाय पुसता येतंय का?
9 May 2016 - 11:30 pm | खटपट्या
"रास्बेरी पाय" त्ये काय आसतंय ??
9 May 2016 - 11:35 pm | सतिश गावडे
रासवट पायांची त्वचा मुलायम व्हावी म्हणून त्यावर बेरी चोळतात. सुड्रावांना ते पाय पुसण्यासाठी बनेल हवे असावे असे वाटते.
9 May 2016 - 11:47 pm | खटपट्या
बनेल बरोबर बाकीच्या काप्डावर पन कारभारनीचा डोळा आस्तो. आता आवरतो.... :)
10 May 2016 - 6:05 am | कंजूस
त्यावर पाय पुसले पिळले की शेटला तुडवल्याचा फील येतो.
10 May 2016 - 11:33 am | सूड
श्लेष आहे का?
9 May 2016 - 11:50 pm | रातराणी
लोल धागा आणि प्रतिसाद!
बाकी टॉवेलचा उपयोग साँवरिया डान्स करायला होतो. वेरी imp .
9 May 2016 - 11:58 pm | रेवती
साँवरिया हे नाव बरोबर आहे. म्हणजे आता कपडे वेळेवर सावरा असं म्हणायचं असेल.
10 May 2016 - 12:00 am | रातराणी
खिक्क. साँवरिया का सावरता!? =))
10 May 2016 - 12:03 am | सतिश गावडे
साँवरिया हा मुळचा सावराया हा मराठी शब्द असावा काय?
10 May 2016 - 12:27 am | रातराणी
कॉलिंग मिपाचे प्रा.परखडकर =))
10 May 2016 - 9:41 am | नाखु
रा रा श्री श्री बॅटोबांशी संवाद झाला आणि त्यांनी दिलेल्या माहीतीनुसार...
फार पुर्वी एका घरात नवपरिणीत दांपत्यास (अर्थात मुंबईत) चाळीमध्ये पुरेसा एकांत मिळत नव्हता. सासु-सासरे,धाकला दीर्,धाकली नंणंद ई मुळे सतत घरात कूणी ना कुणी सतत असायचेच. अता नवविवाहितेला एक उपाय सुचला. तीने टेरेसवर पक्षी छतावर वाळत टाकलेले कपडे आणताना आप्लया नवरोबाला बोलवायचे ठरविले. त्या प्रमाणे नवरा अंघोळीला गेला आणि (नेहमीच्या जन्मजात धांदरटपणामुळे) आंघोळ झाल्यावर फक्त पंचाच आहे बाकी वस्त्रे ठेवली नाहीत बदलायला हे त्याला आंघोळ झाल्यावर्च उमगले , मग काय आधी शिरस्त्या प्रमाणे (उगा वाद विवाद नको म्हणून) आईला विचारून पाहिले. अश्या वेळीस कर्तबगार व धोरणी असल्याने सासूने ही बाब तू तुझ्या बायकोकडे जाऊन सोडव असा रास्त सल्ला दिला.
आपले महाशय तसेच पंच्यावर चाळीच्या छज्यात आले आणी त्यांच्या घरातील गुप्तहेरांनी वहीनी टेरेसवर वाळत टाकलेले कपडे आणायला गेली आहे असे सांगीतले. नवरोबाच तो खेकसायची संधी थोडीच सोडणार. त्याने जागेवरून्च तीच्या नावाहा घोषा लावला (आणि आईला आपण टीएम्सी नाही हे दाखवायचा प्रयत्न केला)
आप्ली कथानायिकाही हुषार तिने खुणेने वर ( टेरेसवर ) ये असे सांगीतले. पण ने.ज.धा. ला कळेत तर शप्पथ्,मग शेवटी ती लाडीकपणे म्हणाली "सांगते वरती या."
त्याचे अपभ्रंष होऊन सांगते वरती या. असे झाले.
बाकीचे उत्पत्ती दावे हे कप्लनाविलास आहेत असेही त्यांनी आवर्जून सांगीतले.
मिपाकरांच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो.
तत्पर नाखु
10 May 2016 - 12:21 am | वैभव जाधव
मिपाचा दुरुपयोग वाचून शरम वाटली.
एक पंचा दे रे डोळे पुसायला...
10 May 2016 - 1:06 am | बॅटमॅन
पगारवाढीबद्दल अभिनंदन कप्तानसाहेब. बाकी आमचीही पगारवाढ तुमच्यागतच अतिभव्य वगैरे. लोकं मारे मोदी आला मोदी आला म्हणून अच्चेदिन आलेच म्हणतायत पण भेंडी पगारवाढीत अजूनही बुरेदिनच आहेत. जोवर पगार धडपणी वाढत नै तोवर कै अच्चेदिन आले असे म्हणू शकत नै.
10 May 2016 - 6:08 am | कंजूस
पगारवाढीत कोणाला कमिशन जातंय ते शोधा.उगाच मोदी का दिसतोय ( मोदी का दिसताहेत ) पाण्यात?
10 May 2016 - 7:01 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
हे हे हे. नशिब % चं वापरलाय. मल्टिप्लायर म्हणुन वापरला असता तर शनिवारवाडा "चौपाटी" ला भेळेची गाडी टाकावी लागली असती. ;) ;)!!
10 May 2016 - 1:14 am | वैभव जाधव
पेट्रोल आणि डिझेल स्वस्त झाल्याने झालेली बचत ही एक प्रकारे पगारवाढ च आहे एवढं बोलून धाग्याला इंधन दिल्या गेल्या आहे. :-)
10 May 2016 - 6:15 am | मितान
पायबीय ठीक आहे पण पंचा परवडेल असं वाटत नाही. तेव्हा नात्यातल्या माताभगिनींना या डिजाईंची ओढणी किंवा साडी आहे का विचारा. साडी असेल तर 3 पंचे होतील. पुढल्या वर्षभराची सोया होईल.:P
10 May 2016 - 7:03 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
_/\_
नाहि ओ. किमान ४ वर्ष टिकला पाहिजे असा दणदणीत पाहिजे. तोपर्यंत जरा रिकरिंग करुन नव्याची सोय करता येईल.
(वराहअवतारी पेरोल पेश्शालिस्ट ला हा लेख दाखवायला हवा) =))
10 May 2016 - 8:58 am | नाखु
तुला प्छा पंचा हवा आहे असे स्पाष्ट साम्ग लोक तोंड लपवायचा स्कार्फ देणार नाहीत. आणि हो ओढणीचे लोढणे अजिबात स्वीकारू नकोस असे नाही असे नाही.
पुन्हा खुलासेदार नाखु
10 May 2016 - 8:59 am | अजया
लेंग्याच्या नाडीची सोय झाली का?
बनेल,पंचा वगैरे मिळालेलं दिस्तंय. जुने बनेल फाडुन ते कंपनीत फावल्या वेळात वातीसारखे वळून तू नाडी बनवू शकतो.याचे दोन फायदे होतील.तुला नाडीशास्त्र कळेल आणि साईड बिझनेसमुळे उत्त्पन्नात भरघोस वाढ होईल.
बघ ट्राय करुन.
10 May 2016 - 9:04 am | नाखु
नाड्या आवळण्यार्या माणसाला नाड्या बनवण्याचे काम देऊन तुम्ही मुलभूत कौशल्याचा आणि अंगभूत गुणांचा उपयोग करून घेत नाहेत याचा मला आज मिपाकर म्हणून निशेढ करावा वाटातो.
सजग नाखु
10 May 2016 - 9:48 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
सिक्सर पे सिक्सर क्या बात क्या बात.
रच्याकने नंतर त्या नाडीची समईची वात करता येते. वातीच्या राखेचा दंतमंजन म्हणुन उपयोग करता येतो. लघुउद्योग बरेचं करता येतात=;)!!!
10 May 2016 - 9:14 am | अजया
स्वयंरोजगाराला कमी लेखणाऱ्या तुमचाच निषेढ.स्वतःच्या हाताने बनवलेली नाडी आवळणे म्हणजे निव्वळ भाग्ययोग.
10 May 2016 - 9:23 am | नाखु
त्याने आ(गळा) आवळावा असा सल्ला देत असाल तर निशेढ मागे घेण्यात येत आहे.
यशस्वी माघार नाखु
10 May 2016 - 9:48 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
फाशीच्या कैद्याला स्वतःच्या फाशीचा दोर स्वतःच बनवावा लागतो म्हणे. तसं वाटलं २ मिनिटं.
10 May 2016 - 10:55 am | सतिश पाटील
माझेही बनियान एका महिन्यात लगेच पिवळे पडतात. त्यामुळे यापुढे पिवळ्या रंगाचेच बनियान घेण्याचा विचार चालू आहे.
आणि चड्डीला देखील एका महिन्यातच मागच्या बाजूला तोफगोळे पडल्यासारखे भोके पडतात.आणि ते सुइधगा घेऊन शीवताही येत नाहीत.
रूपा पासून माय्क्रोम्यान आणि जॉकी स्पोर्ट्स पासून रस्त्यावर मिळणाऱ्या ३० रुपयाला २, सगळे प्रकार वापरून पहिले.
नुसत्या चड्ड्या वरच पगाराचा मोठा भाग खर्च होतोय. आता डिसेंबर महिन्यात गावाला याल्लामाची जत्रा आहे, तेव्हा त्या जत्रेत मिळणाऱ्या आडव्या रंगीबेरंगी पट्ट्यांच्या चड्ड्या घेण्याचा विचार आहे.
तोपर्यत काय करावे, कृपया जाणकारांनी प्रकाश टाकावा.
10 May 2016 - 11:01 am | अभ्या..
बनेलसाठी जिलबी आणि चड्डी साठी कडधान्ये यांचे प्रमाण कमी करा.
11 May 2016 - 12:42 am | बॅटमॅन
खास बुव्याला शोभेलसा खौट प्रतिसाद, भेंडी कसेकाय दुर्लक्ष झाले हिकडे लोकांचे काय माहिती. =))
(चना मसाला फॅन) बॅटमॅन.
10 May 2016 - 11:08 am | टवाळ कार्टा
तुम्चे कौशल्य वादातीत आहे
10 May 2016 - 11:21 am | सूड
अरेरे, काय हे दुर्दैव!!
10 May 2016 - 2:15 pm | सूड
भोकं पडलेल्या बनेल एकाला एक जोडून लंगोट शिवून घेत चला. बघा किती चालतंय, आमच्या वेवस्थित टिकत असलेने काय अन्भव नाही.
10 May 2016 - 2:22 pm | अभ्या..
कसं बे सूडक्या?
बनेल जोडून लंगोट शिवायची आय्डीया काय व्हिज्युअलाइझ होइना. :(
अर्थात आमचे व्यवस्थित चालत असलेने सांगितले नाहीस तरी चालेल म्हणा पण......
10 May 2016 - 2:47 pm | सूड
खांद्यावरचे बंध कापून टाकायचे (ते नाडीला वापरता येतील.) मग उरलेल्या कापडात आपापल्या कल्पनाशक्ती प्रमाणे कलाकारी दाखवावी. ;)
10 May 2016 - 2:44 pm | यमगर्निकर
विम बार एवजी कपड्यांच्या साबनाने कपडे धुवुन बघा,
10 May 2016 - 11:12 am | पैसा
घसघशीत पगारवाढीबद्दल हाबिणंडण! तुला नै तरी वाचवलेल्या पगारामुळे तुझ्या कुंपणीला अच्छे दिन येनार नक्की. तेवढी समाजसेवा केल्याबद्दल धन्य वाटून घे.
लक्ष्मी रोडवर पंचे, नाड्या आणि बनेन होलसेल खरेदी झाली की एक घालूनच हापिसात जा. एवढ्या पगारात हाच ड्रेस परवडतो म्हणून सांग आणि यच्च आर पासून सी ईओ पर्यंत सगळ्या हापिसराना हाच युनिफॉर्म कंपल्सरी करावा. पाहिजे तर आपण सप्लाय ऑर्डर घेतो म्हणून ऑफर दे.
रास्पबेरी पाय बद्दल व्हॉट्स अॅपवर बोलणे झालेच आहे. माझ्याकडे लुबुंटु ओएस वाला बानाना पाइ आहे. त्याचे स्पेसिफिकेशन्स रास्पबेरी पाइ पेक्षा चांगले आहेत. मात्र रास्पबेरीची नवी मॉडेल्स बघायला हरकत नाही. हा पाय जर तू ल्यापटोपाबदली वापरणार असशील तर आता असलेला ल्यापटोप मला दान केलास तरी चालेल. तुला सत्पात्री दान केल्याचे पुण्य लाभेल.
https://www.crazypi.com/ ही एक साईट आहे. तिथून किंवा अमेझॉन, स्नॅपडील, अलीएक्सप्रेस कुठूनही तुला आवश्यक तो पाय मिळू शकेल.
10 May 2016 - 11:22 am | सतिश गावडे
रासबेरी पाय अमेरीकन पाय आहे का?
10 May 2016 - 12:47 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
ते लैचं येगळं प्रकर्ण आहे सगाशेठ!!
11 May 2016 - 1:47 pm | पिलीयन रायडर
येवढय उड्या मारताय, नक्की तुम्हाला चांगली पगारवाढ मिळाली असणार. चिल्लरमध्ये पगार वाढलेले लोक थुतरीत मारल्यासारखे गप बसुन राहतात..धागे काढत नाईत कै.. आम्ही बघा, पगार हा शब्द तरी काढलाय का मागच्या ५ वर्षात ;)
11 May 2016 - 1:57 pm | टवाळ कार्टा
खिक्क...बाडिस
11 May 2016 - 2:33 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
अरारा....वेठबिगारी कायद्याने गुन्हा आहे हे तुमच्या हापिसला कळवा ब्रे. =))
रच्याकने तुम्हाला मिळत असलेल्या पगारात तुम्ही समाधानी आहात म्हणजे किमान १६ आकडी पगार येत असावा किंवा तुम्ही अल्पसंतुष्ट, वर्कोहोलिक आणि कुंपणीप्रेमी असणार. ;)!!!
11 May 2016 - 2:53 pm | पिलीयन रायडर
आम्ही कामच करत नाही.. आहे तोच पगार कंपनी धर्मार्थ म्हणुन वाटते असे वाटते अनेकदा!! पण येस.. आम्ही अल्पसंतुष्ट आणि (धर्मादाय) कुंपणीप्रेमी आहोत.. मिपाहोलिक आहोत.. त्यासाठी पगार वाटायचं ठरवलं तर १६ आकडी पगार मिळु शकेल. अनेकदा डोक्यात ह्याला असा प्रतिसाद देऊ, त्याची खव उचकुन पाहु.. खफ पाहिला नाही बर्याच दिवसात.. असलेच विचार असतात!!
11 May 2016 - 4:36 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
कोणती हो कंपनी. कॅड-कॅम साठी असेल तर णक्की सांगा. म्हणजे घरी आराम करुन दमुन हापिसात चार तास झोपायला येउ शकु =))
11 May 2016 - 4:43 pm | पिलीयन रायडर
सध्या जरा डबघाईला आलीये कुंपनी. आहेत त्यांनाच काढायलेत. मीच रामराम ठोकालाय. पुन्हा दारं उघडली तर कळवते. कॅडला लई स्कोप हाय.
11 May 2016 - 5:36 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
अरारा....नक्की सांगा.
13 May 2016 - 4:35 pm | दुर्गविहारी
कप्तानसाहेब, जरा उशिरा प्रतिक्रिया देतोय. या अनुभवाचा काही उपयोग होतो का ते पहा ?
माझी लुंगी खरेदी
13 May 2016 - 7:36 pm | मुक्त विहारि
असो...
शतकासाठी शुभेच्छा...
14 May 2016 - 12:13 pm | सिरुसेरि
रासबेरिसाठी मॅप्रो हा चांगला ब्रँड आहे .
14 May 2016 - 4:50 pm | संजय पाटिल
शंभर करा रे कुनी तरी..
14 May 2016 - 4:56 pm | टवाळ कार्टा
१००
14 May 2016 - 8:28 pm | पैसा
शंभरीनिमित्त चिमणरावाचा सत्कार एक दणकट पंचा, जाळीचा पिवळ्या रंगाचा बनियन आणि स्ट्रॉबेरी क्रीम देऊन करण्यात येत आहे. रास्पबेरी पाय देत नाही कारण पाय त्यानेच बेक केला पाहिजे.