✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

सैराट

स
समीर_happy go lucky यांनी
Mon, 05/09/2016 - 17:58  ·  लेख
लेख
मराठी चित्रपटांना लोकाश्रय मिळत नाही यासम सूर आपण बरेचदा बघतो आणि तो खराही असल्याचे तिकीट काढताना बरेचदा अनुभवतो पण बरेच काळानंतर किंबहुना काही वर्षानंतर एक असा मराठी सिनेमा आलेला आहे जो रिलीज होण्याच्या ९ दिवसानंतरही त्याचे तिकीट मिळत नाहीये. अक्षरश: प्रचंड लोकाश्रय सर्व वयोगटातून मिळालेला एक मराठी सिनेमा. बजरंगी भाईजान नंतर कोणत्याही सिनेमाचे तिकीट मिळण्यासाठी इतकी ईर्ष्या पहिल्यांदा अनुभवली लेख लिहिणार्याने आणि मराठीसाठी तर पहिल्यांदाच. त्यामुळे बाकी सगळे जाऊ द्या पण लेखक-दिग्दर्शक-निर्माते नागराज मंजूळेन्चे त्यासाठी विशेष अभिनंदन. नागराज मंजुळेनचा सिनेमा म्हणजे थोडाफार "आर्ट फिल्म" संकल्पनेकडे असलेली कहाणी अशी सर्वसाधारण रसिकांची मानसिकता त्यांनी बनवून ठेवलेली आहे. पिस्तुल्या अन fandry हे त्यांचे आजवरचे दोनच चित्रपट पण या संकल्पनेकडे वळणारे.पण प्रेम या संकल्पनेला घेऊन शेवट सोडून इतर कुठेही फारसा आर्ट फिल्मकडे न वळणारा एक चित्रपट आपण बनवू अशी कल्पना त्यांना तरी असेल का? देव जाणे!! पण बनवला खरा. आर्ची अन परश्या हि एक टीनेजर जोडी. त्यांचे घडलेले प्रेम अन झालेला दु:खांत अशी कहाणी सैराट मध्ये आहे. सोशल साईट्सवर मी या कहाणीचा जातीशी वगेरे संबंध असून त्याच्याशी संबंधित खूप इंटरेस्टिंग चर्चा बघितल्या. पण चित्रपट प्रत्यक्ष बघितल्यावर समजल कि सैराट मध्ये कोणताही प्रत्यक्ष उल्लेख नाही. जो आहे तो इतका अप्रत्यक्ष आहे कि तुम्ही जोडूही शकता किंवा दुर्लक्षितहि करू शकता. पूर्णपणे बघणार्याच्या मानसिकतेवर अवलंबून. पण एक लहानसा स्कोप मात्र मंजुळेन्नी सोडलेला आहे. पण माझ्या मते तसा कोणताही प्रत्यक्ष आक्षेपार्ह उल्लेख नाही. आणखी एक महत्वाचं, आजपर्यंत मी बघितलेली कोणत्याही सिनेमाची एक सगळ्यात वेगवान कथा-पटकथा म्हणजे सैराट. पटकथेचा वेगळा साचा हाताळताना पकड सुटून भंगलेली कहाणी याचे संदर्भ पैश्याला पसाभर उपलब्ध आहेत. पण यशराज फिल्म्स किंवा धर्मा प्रोडक्शन्स यांना टक्कर देणारी जबरदस्त कथा-पटकथा अन ती हि मराठीत हे एक दुर्मिळ कॉम्बिनेशन निर्माण करण्यात नागराज मंजुळे अपेक्षेबाहेर यशस्वी झालेत हे नक्की. कथेचा वेग इतका जोरदार कि फक्त मध्यंतरापर्यंतच्या सैराट इतक्या कथेवर दोन किंवा तीन मराठी सिनेमे आणि चक्क एक हिंदी सिनेमा निघू शकला असता. तरीही मध्यंतरा नंतरची कथेची महत्वाची बाजू आपण विचारात घेतलेली नाही हे येथे उल्लेखनीय. या प्रचंड वेगाच्या धबधब्याला सावरताना, कोठेही एक मराठी प्रेक्षक जो मुळात बारीक चिरफाड करत कोणताही सिनेमा बघतो, आपला इंटरेस्ट गमावणार नाही हि काळजी घेणे म्हणजे एक प्रचंड मोठे दिव्य. पण नागराज मंजुळे ते करून दाखवतात. या साठी त्यांचे खरोखर विशेष अभिनंदन नागराज मंजुळे हेच कथा-पटकथा लेखक-दिग्दर्शक अन झी Talkies बरोबर निर्मातेपण. थोडक्यात एक ऑल-इन-वन package. आज सिनेमा चालतोय म्हणून ठीकाय पण जर नीट बनला नसता तर त्यांचे जीणे हराम होईल इतकी टीका त्यावर झाली असती. सध्या उत्कृष्ट सिमेमावरच होत असलेली चर्चा अन त्या चर्चेतील सूर बघता असा अंदाज लावायला हरकत नसावी. याची त्यांना कल्पना नसेल असे मला वाटत नाही पण तरीही त्यांनी हि कलाकृती उभारली आणि मुख्य म्हणजे यशस्वीपणे पेलून दाखवली.त्यांचा मुळचा पिंड आर्ट फिल्मकडे वळणारा त्यामुळे त्यांनी स्वभावाप्रमाणे दु:खांत ठेवला. आपल्या सगळे गुडी गुडी बघण्याची सवय त्यामुळे तो दु:खांत खुपतो पण तोच कदाचित माउथ-टू-माउथ पब्लिसिटी साली प्रेरक असेल का?? भलेही या प्रश्नाचे उत्तर वेगवेगळे येईल पण तरीही या दु:खांता मुळे निगेटिव्ह पब्लिसिटी मात्र होत नाहीये आजघडीला हे तिकीटबारीने दाखवून दिलेले आहे. रिंकू राजगुरू (अर्चना पाटील-आर्ची) आणि आकाश ठोसर (प्रशांत काळे-परश्या) या दोघांची हि प्रेमकहाणी. त्यातही रिंकू राजगुरू हिची अभिनय क्षमता हि उत्कृष्ट कि काय हे कदाचित दिग्दर्शकाने आधी ओळखल्यामुळे असेल पण हि पूर्ण वेगवान पटकथा तिच्या भूमिके भोवती फिरते. नागराज मंजुळे यांचे या मुळच्या कास्टिंग साठीही विशेष अभिनंदन कारण मुख्य दोन्ही व्यक्तिरेखांचे कास्टिंग त्यांनी अत्यंत उत्कृष्टपणे घडवून आणलेले आहे. कास्टिंग डायरेक्टर वेगळा असणे हि चैन एका मराठी सिनेमाला परवडत नसावी असा माझा अंदाज आहे पण मुख्य दिग्दर्शक म्हणून या बेमालूम कास्टिंगचे श्रेय निर्विवादपणे नागराज मंजुळेन्चेच. बाकीहि भूमिका आहेत, पर्श्याचा गोतावळा आर्चीचा गोतावळा, पण इतकी वेगवान पटकथा 8५% सीन्समध्ये आर्चिसभोवताल फिरते आणि तिला मिळालेला "विशेष दखल अभिनयासाठी" हा राष्ट्रीय पुरस्कार योग्य असल्याचे आर्ची सिद्ध करून दाखवते. अजय-अतुल या शब्दश: "महान" संगीतकार जोडगोळीचे संगीत हे सैराटचे मुख्य यश. तीन किंवा चारच मुख्य गाणे पण ज्या ताकदीने त्या गाण्यांचा चित्रपटातील वापर आहे तो प्रेक्षकांना बांधून ठेवतो अन गुंतवून ठेवतो. हि बाब मराठीत दुर्मिळ आणि म्हणूनच अनुभवण्यासारखी. त्यातही याच जोडीचे background music म्हणजेच पार्श्वसंगीत. पण तेथेही त्यांची महान संगीत क्षमता ते प्रेक्षकांना जाणवून देतात. बाकी जाऊ देऊ पण परश्या-आर्चीची जी पहिली भेट होते तेथे आपला आजवरचा चित्रपटांचा अनुभव आपल्याला एखादं गाणं असेल असा अंदाज लावू देतो पण गाणे नाही आणि पार्श्वसंगीतासाठीचे जे कडवे आहे ते फिट्ट बसते\शोभते प्रसंगाला. अजय-अतुल हेच दोघे या सगळ्या गाण्यांचे लेखक. सगळ्या गाण्यांसाठी कौतुक पण "झिंगाट" साठी विशेष कौतुक. झिंगाट गाण्याचं कथेतील जे स्थान आहे ते महत्वाचे आहे कारण या गाण्यानंतर आर्ची-परश्याच्या प्रेमकहाणीला वेगळे वळण लागते किंवा ओहोटी लागते असे म्हणू पण हे गाणे जर जमले नसते तर काही खरं नव्हतं. पण हि शक्यता तर दूरच इतके जबरदस्त गाणे कि कदाचित मराठी चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट दहा गाण्यात भविष्यात मोजले जाईल हि शक्यता निर्माण करून जाते हे गाणे. चांगले चित्रपट मराठीत बनतच नाही, अशोक सराफ-लक्ष्मीकांत बेर्डे यांचा पगडा असलेला विनोदी काळ सोडून चित्रपट निर्माते बाहेरच पडत नाही वगेरे वगेरे असंख्य कारणे मी वेगवेळ्या चर्च्यानमध्ये बघितलेली आहेत. "कट्यार काळजात घुसली", " नटसम्राट" आणि आता "सैराट" नंतर या चर्च्याना एक पॉजीटिव्ह वळण लागेल अशी अशा बाळगतो आणि माझ्यातर्फे सैराटला पूर्ण पाच पैकी पाच (५ * ) स्टार देतो. बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा. -समीर
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
चित्रपट
लेखनप्रकार (Writing Type)
समीक्षा

प्रतिक्रिया द्या
5570 वाचन

💬 प्रतिसाद (19)

प्रतिक्रिया

आपण आलात. आनंद झाला. धन्यवाद!

वैभव जाधव
Mon, 05/09/2016 - 18:03 नवीन
आपण आलात. आनंद झाला. धन्यवाद!
  • Log in or register to post comments

साबण लावून हीरीवर आलेला

अभ्या..
Mon, 05/09/2016 - 18:05 नवीन
साबण लावून हीरीवर आलेला प्रदीप आठवला. ;)
  • Log in or register to post comments

अगदी अगदी.... पर्फेक्ट. =))

तर्राट जोकर
Mon, 05/09/2016 - 18:15 नवीन
अगदी अगदी.... पर्फेक्ट. =)) (विषय: सैराट | धागा क्रमांक: ०८ | प्रतिसाद क्रमांकः ४२०)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

त्यासोबत

जव्हेरगंज
Mon, 05/09/2016 - 18:16 नवीन
"अय रत्त्याळ्या, हु भाईर" हा डायलॉग पण आठवला ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

સૈરાટ

लालगरूड
Mon, 05/09/2016 - 18:17 नवीन
સૈરાટ
  • Log in or register to post comments

सैराट प्रेमींनो, तुमच्या

अप्पा जोगळेकर
Mon, 05/09/2016 - 18:25 नवीन
सैराट प्रेमींनो, तुमच्या आवडीची कदर आहे. पण आता बास करा प्लीज. संपादक मंडळाने 'सैराट' सिनेमासाठी वेगळा विभाग करून द्यावा.
  • Log in or register to post comments

मिपा व्यवस्थापनाकडे मागणी !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 05/09/2016 - 18:40 नवीन
आत्ताच नीलकांत / प्रशांतला सैराट चित्रपट परीक्षण असा विभाग करता येईल का, विचारलं आहे. अभ्याकडून आर्ची अन परशाचं मुख्यपृष्ठ बनवून लिंक वर क्लिक केलं की तिथे सर्व परीक्षणं वाचायला मिळावीत असे सुचवले आहे. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

गुड आयडिया. पुढाकार

तर्राट जोकर
Mon, 05/09/2016 - 18:41 नवीन
गुड आयडिया. पुढाकार घेतल्याबद्दल प्रा.डॉ.चे आभार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ओके.

प्रचेतस
Mon, 05/09/2016 - 18:43 नवीन
ओके.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्राडॉ. सर मिपाचे नागराज हैत.

अभ्या..
Mon, 05/09/2016 - 18:45 नवीन
प्राडॉ. सर मिपाचे नागराज हैत. दिलदार जिगरयार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ये हुई ना बात !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 05/09/2016 - 18:28 नवीन
चित्रपट मतं आवडली. छान लिहीलंय. मराठी चित्रपट धड़ नसतात असे म्हनणा-याना सैराटची अमाप प्रसिद्धी पाहता काही प्रेक्षकांना प्रचंड त्रास होत असेल हे नक्की. अजुन एक परीक्षण आलं म्हणजे मिपावर दहा परीक्षनं होतील आणि त्या पेक्षाही अधिक झाली तरी मिपाकर वाचक आणि मिपा सैराट मित्र मंडळाच्या वतीने प्रतिसाद देण्यात येतील. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

अर्रर्र. नववा धागा आहे काय?

तर्राट जोकर
Mon, 05/09/2016 - 18:32 नवीन
अर्रर्र. नववा धागा आहे काय? मोजता पन येत नै है राव. (विषय: सैराट | धागा क्रमांक: ०९ | प्रतिसाद क्रमांकः ४२१)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माउथ-टू-माउथ पब्लिसिटी

सायकलस्वार
Mon, 05/09/2016 - 18:34 नवीन
माउथ-टू-माउथ पब्लिसिटी शब्दप्रयोग खूप आवडला. याआधी माउथ पब्लिसिटी माहिती होतं ;) पोरा-पोरींनी पिक्चर बघून खूप पब्लीसिटी केली असणार!
  • Log in or register to post comments

...अर्थात पब्लिसिटी

तर्राट जोकर
Mon, 05/09/2016 - 18:37 नवीन
...अर्थात पब्लिसिटी करणारांच्या घरात बापासाठी हात धुवायला वाश बेसिन आणी त्याच्यावरच हात धुवायची सवय असलेली बरी ... नैतर जीव सैराट व्हायचा. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सायकलस्वार

आता मीपण एक धागा काढणार

एस
Mon, 05/09/2016 - 18:39 नवीन
आता मीपण एक धागा काढणार सैराटवर... =))
  • Log in or register to post comments

आवरा....नायतर आता मी पण एक

सूड
Mon, 05/09/2016 - 19:12 नवीन
आवरा....नायतर आता मी पण एक धागा काढेन. =))
  • Log in or register to post comments

काड की, तुला कोनी नाय म्हनलंय

खटपट्या
Mon, 05/09/2016 - 23:27 नवीन
काड की, तुला कोनी नाय म्हनलंय व्हय...:) ह.घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

त्याला चावलंव नुकॉ नायतं खरंच

सतिश गावडे
Mon, 05/09/2016 - 23:29 नवीन
त्याला चावलंव नुकॉ नायतं खरंच काडील तो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

सगळ्यांचे धन्यवाद

समीर_happy go lucky
Mon, 05/09/2016 - 23:17 नवीन
सगळ्यांचे धन्यवाद
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा