Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by मुक्त विहारि on Sun, 05/08/2016 - 21:55
लेखनविषय (Tags)
चित्रपट
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार
मी सिनेमा बघीतला नाही आणि कदाचित बघणारही नाही.त्यामुळे, "सैराट" न बघताही प्रेमी युगलाची जात एक नसतांना पण संसार सुखी होवू शकतो का? ह्या विषयीचे मी पाहिलेल्या घटना लिहित आहे. १. मुलगा गुजर आणि मुलगी को.ब्रा.मुलगा डिप्लोमा तर मुलगी एम.एस.सी. दोघांचे प्रेम जमल्यावर, मुलाला दम मिळाला.मुलाने आणि मुलीने पळून जावून लग्न गेले. आज दोघेही सुखाने नांदत आहेत. २. मुलगा तामिळ आणि मुलगी कोब्रा.मुलाच्या घरच्यांचा विरोध असून पण दोघांनी लग्न केले आणि दोघेही संसारात सुखी आहेत. ३. मुलगा कोब्रा आणि मुलगी ९६ कुळी मराठा.मुलीच्या घरच्यांचा विरोध असून पण दोघांनी लग्न केले आणि सुखाने संसार करत आहेत. ४. मुलगी देब्रा आणि मुलगा ९६ कुळी मराठा. मुलीच्या घरच्यांचा विरोध असून पण दोघांनी लग्न केले आणि सुखाने संसार करत आहेत. ५. मुलगी कोब्रा आणि मुलगा धनगर.दोघांच्या माता-पित्यांनी त्यांचे लग्न लावून द्यायचे ठरवले आहे. ६. मुलगा कोब्रा आणि मुलगी ९६ कुळी मराठा.मुलीच्या घरच्यांचा विरोध असून पण दोघांनी लग्न केले आणि सुखाने संसार करत आहेत. वरील सर्व उदाहरणे महाराष्ट्रातील आणि त्यातील एक तर सोलापूर जिल्ह्यातलेच आहे. ================================== आमच्या अनुभवांत सगळ्या सुखी आणि समाधानी प्रेम-कथा असल्याने, "सैराट" सारखी नकारात्मक कला रिचवणे शक्य होणार नाही.
  • Log in or register to post comments
  • 22888 views

प्रतिक्रिया

Submitted by चांदणे संदीप on Mon, 05/09/2016 - 10:14

Permalink

मुवी

माफ करा....पण मिपावर आधीच सैराटने वातावरण ढवळून निघालेले असताना तुमच्या या लेखाचे प्रयोजन समजले नाही. तुम्ही स्वत:ला कट्टर मिपाकर म्हणवता आणी या इथे आपल्या लाडक्या मिपावरच गोंधळ वाढवायला हातभार लावता हा दुर्दैवी विरोधाभास आहे! लहान तोंडी मोठा घास घेतल्याबद्दल क्षमस्व!
आमच्या अनुभवांत सगळ्या सुखी आणि समाधानी प्रेम-कथा असल्याने, "सैराट" सारखी नकारात्मक कला रिचवणे शक्य होणार नाही.
ह्या अशा वाक्यांची तर तुमच्यासारख्या जाणत्या माणसाकडून अपेक्षा'च' नव्हती. अनेक सुख-दुखांचे पावसाळे झिरपवलेल्या जीर्ण खोडाला विचारलं तर त्याच्याकडून कुठल्याच प्रकारच्या पक्षपातीपणाचा विचार/अनुभव ऐकायला मिळणार नाही. वर पुन्हा दर श्रावणाला त्याच्याच तळाला नवी पालवी फ़ुटल्याचेहि दिसेल. माझा हा प्रतिसाद सैराटच्या बाजूने लिहिलेला नाहीये तर सैराटवरून चाललेल्या गदारोळात आपली एक वीट भिरकावण्याच्या प्रयत्नाच्या विरोधात लिहिलेला आहे. बरेचदा वाटत सोडून द्याव, दुर्लक्ष करून पुढे चालावं. खर पाहता अगदी परवाच पैजारबुवांशी अशा वेळी काय करावे याविषयी चर्चा होऊन त्यांना मी वचन दिलेले की इथून पुढे मी दुर्लक्ष करीत जाईन अशा धाग्यांना. अरे पण दुर्लक्ष कुणाला करावे... बिनडोक आयडिंना... सतत एकाच विषयाभोवती गिधाडघिरट्या घालणार्यांना...का तुमच्या सारख्या समंजस, नेहमी मदतीस तत्पर आणि खेळीमेळीच वातावरण तयार करू पाहणार्या व्यक्तींना?? मिपावरच्या सततच्या निरर्थक काथ्याकूटान्ना आणि जिथे-तिथे नसत्या मुद्द्यांना जात्यात घालून दळणाला लावणार्या प्रवृत्तींना वैतागून मिपावर माझे थोडेच दिवस राहिलेत हे मी इथे जाहीर करतो! जय महाराष्ट्र! Sandy
  • Log in or register to post comments

Submitted by वैभव जाधव on Mon, 05/09/2016 - 10:24

In reply to मुवी by चांदणे संदीप

Permalink

क्या अण्णा, आपके टीव्ही पे

क्या अण्णा, आपके टीव्ही पे सिरीयल लगते जो आपको पसंद नै तो टी व्ही फोडते? आप घर से निकल जाते? या आप चॅनेल बदल लेते?
  • Log in or register to post comments

Submitted by खालीमुंडी पाताळधुंडी on Mon, 05/09/2016 - 10:30

In reply to क्या अण्णा, आपके टीव्ही पे by वैभव जाधव

Permalink

-

आयडी बदल लेते=(( Chill yaaro
  • Log in or register to post comments

Submitted by वैभव जाधव on Mon, 05/09/2016 - 10:35

In reply to - by खालीमुंडी पाताळधुंडी

Permalink

अच्चं जालं तल... ;)

अच्चं जालं तल... ;)
  • Log in or register to post comments

Submitted by चांदणे संदीप on Mon, 05/09/2016 - 10:35

In reply to क्या अण्णा, आपके टीव्ही पे by वैभव जाधव

Permalink

आता पहिल्यासारखी ओढ नाही राहिली मिपाची!

कदाचित मी नवीन असताना ह्या सर्व गोष्टींवर माझे लक्ष जात नसेल. पण जसजसा अधिकाधिक मिपाशी परिचित होत चाललोय आता या गोष्टींकडे दुर्लक्ष करून माझ्या कविता, चित्रे नाही टाकू वाटत. तसेही कुणाच्या असण्या वा नसण्याने या जगात कुणाला काय फरक पडतो. कारवां चलता है, चलता जायेगा वक्त की रेत पे किसके निशां रहे है! Sandy
  • Log in or register to post comments

Submitted by नाखु on Mon, 05/09/2016 - 10:40

In reply to आता पहिल्यासारखी ओढ नाही राहिली मिपाची! by चांदणे संदीप

Permalink

या

एका वाक्यासाठी तरी भेट रे
अरे पण दुर्लक्ष कुणाला करावे... बिनडोक आयडिंना... सतत एकाच विषयाभोवती गिधाडघिरट्या घालणार्यांना...
मस्तानी लागू साक्षीस वल्ली असावेत (आजकाल मिपावर वल्ली(ना) साक्षीस असतेत)
  • Log in or register to post comments

Submitted by जव्हेरगंज on Mon, 05/09/2016 - 19:57

In reply to आता पहिल्यासारखी ओढ नाही राहिली मिपाची! by चांदणे संदीप

Permalink

आता पहिल्यासारखी ओढ नाही

आता पहिल्यासारखी ओढ नाही राहिली मिपाची!
+१ सुहागरात तर झाली, आता संसार कराय नको वाटतंय मलाही ;)
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Mon, 05/09/2016 - 11:01

In reply to मुवी by चांदणे संदीप

Permalink

@ चांदणे संदीप....

प्रत्येक व्यक्ती ही भिन्न असते आणि त्या व्यक्तीची एखादी कलाकृती बघीतल्यावर,ऐकल्यावर्,वाचल्यावर किंवा स्पर्श केल्यावरची प्रतिक्रिया भिन्न असते. "मोनालिसा" तीच असली तरी, कुणाला ती कलाकृती फार उत्तम वाटते तर कुणाला ती अजिबात आवडत नाही. पुर्वी मी चित्रपटाचे परिक्षण न वाचता पण सिनेमे बघत होतो. तिसरी आंख,महान,लोहा,मर्द असे अनेक सिनेमे बघीतल्यानंतर एक जाणवले, की आपले घामाचे पैसे अशा ठिकाणी वाया जायला नकोत.म्हणून मी शक्यतो भारतीय सिनेमे टॉकीज मध्ये बघायला जात नाही.५-६ वर्षातून एकदा बायकोच्या हट्टाखातर मात्र जावे लागते. माझ्या दोन्ही मुलांनी "सैराट" बघीतला.एकाला आवडला तर एकाला अजिबात आवडला नाही.दोघेही कॉलेज-कुमार आहेत. थोडक्यात एकाच घरात आणि एकाच संस्कृतीत वाढलेल्या आणि साधारणपणे एकाच वयाच्या २ मुलांच्या कलेच्या आस्वाद घेण्याच्या दृष्टीत पण फरक असतोच.मग तो "मिपा"वर पण असणारच. मला नकारात्मक सिनेमे आवडत नाहीत ही माझी भूमिका.मग तो प्यासा असू दे किंवा कागज़ के फूल किंवा नशांत अथवा अंकूर. माझ्या आसपासच्या घरांत परजातीत लग्ने झाली तरी पण प्रेमी युगलांची कुणी हत्या केली नाही...ह्याचा अर्थ ते इतरत्र होत नसेलच, असे माझे म्हणणे नाही.... मी नकारात्मक कलाकृतींशी रीलेट होवू शकत नाही, हा माझा प्रॉब्लेम आहे. एक विनंती.... "मिपावरच्या सततच्या निरर्थक काथ्याकूटान्ना आणि जिथे-तिथे नसत्या मुद्द्यांना जात्यात घालून दळणाला लावणार्या प्रवृत्तींना वैतागून मिपावर माझे थोडेच दिवस राहिलेत हे मी इथे जाहीर करतो!" हे मात्र अजिबात करू नका.
  • Log in or register to post comments

Submitted by तुषार काळभोर on Mon, 05/09/2016 - 12:46

In reply to मुवी by चांदणे संदीप

Permalink

जय महाराष्ट्र!

मिपावरच्या सततच्या निरर्थक काथ्याकूटान्ना आणि जिथे-तिथे नसत्या मुद्द्यांना जात्यात घालून दळणाला लावणार्या प्रवृत्तींना वैतागून मिपावर माझे थोडेच दिवस राहिलेत हे मी इथे जाहीर करतो! >>> याला माझ्याकडून समर्थन. (म्हणजे तुम्ही सोडून जाण्याला समर्थन नाही. मी सुद्धा हाच विचार करतोय.) माझ्या जाण्याने कुणाला **** फरक पडत नाही, हे माहिती असून वैतागून निघून जाण्याच्या विचारात असलेला, पैलवान
  • Log in or register to post comments

Submitted by नाव आडनाव on Mon, 05/09/2016 - 13:46

In reply to मुवी by चांदणे संदीप

Permalink

+१

+१ खरंच वैतागलो ह्या जातीच्या चर्चांना. काहिंना सरळसरळ जातीवादी लिहायचंय, तर काहिंच्या प्रतिसादातला अंडरकरंट कायम समजणाराच असतो. आणि ह्या चर्चांतून नक्की काय मिळतं हा ही कायम प्रश्न पडतो. बरेच प्रतिसाद "'आम्ही' किती चांगले,चान चान. 'ते'च वाईट आहेत." ह्याच टाईपचे. ह्यातले 'ते' कधी दुसर्‍या धर्माचे, दुसर्‍या जातीचे, खेड्यातले, आपण करतो ते काम सोडून दुसरं काही काम करणारे... दोन तीनदा वाटलंय - बंद करावं इथे यायचं. आणि मी बंद करून कोणाचा काहीही नुकसान होणार नाही हे चांगलं माहितीय. खरंतर ते होऊच नये. फक्त मला वाटणार्‍या प्रॉब्लेम वर काय उत्तर आहे, हे शोधायचा प्रयत्न केला तर "इथे येणं बंद करायचं" हा एक उपाय सापडतो. पण ते सदस्य आणि त्यांचं लेखन / कविता / प्रतिसाद आठवतात ज्यांच्यामुळे मी बरंच काही शिकलोय. माहित नाही काय करायचं. पण बर्‍याचदा मला मी "बाहेरचा" वाटत राहतो. जातीच्या चर्चांपासून कायम लांब ठेवून बघितलं - म्हणजे अश्या धाग्यांवर प्रतिसाद न देऊन. ज्याने मिसळपावची बदनामी होइल अश्या निगेटिव प्रतिक्रिया दिल्या नाहीत. पण ह्या चर्चा थांबत नाहीत. कितीतरी वेळा तर काहीच संबंध नसतांनाही जात आपोआप येते :(
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Mon, 05/09/2016 - 13:54

In reply to +१ by नाव आडनाव

Permalink

याला ट्यार्पी ऐसे नाव ;)

याला ट्यार्पी ऐसे नाव ;)
  • Log in or register to post comments

Submitted by खालीमुंडी पाताळधुंडी on Mon, 05/09/2016 - 10:27

Permalink

अच्छा, अच्च जालं तल!!!

अच्छा, अच्च जालं तल!!!
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Mon, 05/09/2016 - 11:00

Permalink

मुविकाका सैराट संपला, आम्ही

मुविकाका सैराट संपला, आम्ही लागलो पण कामाला. तुमचा नकारात्मक शेवटावरचा नकारात्मक धागा काय पटला नाहि बघा. (मुविकाका यायच्याआत मी पळालेलो हाय)
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Mon, 05/09/2016 - 11:04

In reply to मुविकाका सैराट संपला, आम्ही by अभ्या..

Permalink

नकारात्मक शेवटावरचा नकारात्मक धागा काय पटला नाही.....

हाताची ५ बोटे सारखी नसतात, मग तुमचे आमचे प्रत्येक गोष्टीत पटले पाहिजे असे थोडीच आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by जेपी on Mon, 05/09/2016 - 11:15

In reply to नकारात्मक शेवटावरचा नकारात्मक धागा काय पटला नाही..... by मुक्त विहारि

Permalink

हाताची पाच बोट एकत्र आली तर..

हाताची पाच बोट एकत्र आली तर... जाऊद्या मराठी पासुन काय एक होत नै... जय हिंद..जय महाराष्ट्र...जय मिल्की वे...
  • Log in or register to post comments

Submitted by सतिश गावडे on Mon, 05/09/2016 - 11:22

In reply to हाताची पाच बोट एकत्र आली तर.. by जेपी

Permalink

जय भारत, जय पृथ्वी आणि जय

जय भारत, जय पृथ्वी आणि जय सौरमाला राहीले.
  • Log in or register to post comments

Submitted by अर्धवटराव on Mon, 05/09/2016 - 11:54

In reply to जय भारत, जय पृथ्वी आणि जय by सतिश गावडे

Permalink

=))

ते ब्लॅकहोल का काय त्याची पण जै करुन टाका ना भौ :ड
  • Log in or register to post comments

Submitted by खालीमुंडी पाताळधुंडी on Mon, 05/09/2016 - 11:59

In reply to =)) by अर्धवटराव

Permalink

जय आकाशगंगा,जय ब्रह्मांड,जय

जय आकाशगंगा,जय ब्रह्मांड,जय ब्रह्मांडनायक!! गजानन महाराज कि जय!! शेवटी पृथ्वीवर यावच लागतं!
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद१९७१ on Mon, 05/09/2016 - 14:17

Permalink

लग्न एकाच जातीत असेल किंवा

लग्न एकाच जातीत असेल किंवा आंतरजातीय, मुवि काकांचा विदा खोटा आहे असे म्हणावेसे वाटते कारण ५ लग्ने झाली आणि पाच ही जोडपी संसारात सुखी आहेत. हे अशक्यकोटीतले आहे. कैच्या कै लिहीले आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Mon, 05/09/2016 - 17:27

In reply to लग्न एकाच जातीत असेल किंवा by प्रसाद१९७१

Permalink

ह्या आक्षेपाची अपेक्षा होतीच.....

तुम्ही जर महाड-मुंबई-नागपूर-पुणे-सोलापूर भागात असाल तर त्या जोडप्यांची आणि तुमची गाठ-भेट घालून देतो. अर्थात, माझा जायचा-यायचा आणि त्या कट्ट्याचा आणि त्या कट्ट्याला येणार्‍या इतर सर्व मिपाकरांचा पक्षी-तीर्थाचा संपूर्ण खर्च तुमचा.
  • Log in or register to post comments

Submitted by धनंजय माने on Mon, 05/09/2016 - 17:31

In reply to ह्या आक्षेपाची अपेक्षा होतीच..... by मुक्त विहारि

Permalink

लग्न होऊन पण सुखी?

लग्न होऊन पण सुखी? कैच्या कै... असं म्हणायचंय त्यांना! आता आमचंच घ्या. लग्नापूर्वी लिपस्टिक, नेलपेंट विकायचो ते चालायचं बायकोला. आता???? कसलं आलंय सुख!
  • Log in or register to post comments

Submitted by तर्राट जोकर on Mon, 05/09/2016 - 17:32

In reply to ह्या आक्षेपाची अपेक्षा होतीच..... by मुक्त विहारि

Permalink

मला वाटतं त्यांनी गंमतीने

मला वाटतं त्यांनी गंमतीने म्हटले असावे. 'सुखी संसार' एक काल्पनिक सत्य ह्या अर्थाने. =))
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Mon, 05/09/2016 - 17:38

In reply to मला वाटतं त्यांनी गंमतीने by तर्राट जोकर

Permalink

'सुखी संसार' एक काल्पनिक सत्य ह्या अर्थाने.....

मग ठीक आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद१९७१ on Mon, 05/09/2016 - 19:10

In reply to ह्या आक्षेपाची अपेक्षा होतीच..... by मुक्त विहारि

Permalink

सॉरी मुवि. तुमचा गैरसमज झाला.

सॉरी मुवि. तुमचा गैरसमज झाला. खाली काही लोकांनी बरोबर ओळखले आहे. ५ जोडप्यांमधले २ जास्तीत जास्त ३ ( फार झाले ) सुखी संसार वगैरे करत असतील. ५ पैकी सगळी ५ जोडपी सुखी म्हणजे कै च्या कै असे म्हणायचे होते.
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Mon, 05/09/2016 - 14:43

Permalink

सैराट पाह्यला, लोकांनी एवढा

सैराट पाह्यला, लोकांनी एवढा का डोक्यावर घेतलाय ते कळलं नाही. बर्‍याच जणांचा पहिला-वहिला सिनेमा असून केलेला सहज अभिनय आणि शोकांतिका, एवढं वगळता त्या सिनेमात काहीच वेगळं वाटलं नाही. जात-पात सोडा!! निव्वळ प्रेम आहे म्हणून ज्याचं अजून काहीच स्थिरस्थावर नाही; अशा व्यक्तीसोबत माझ्या घरातली एखादी मुलगी; घरातलीच (स्वत:च्या कमाईची नसलेली) नोटांची गड्डी घेऊन पळून गेली तर मला तरी आवडणार नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by तर्राट जोकर on Mon, 05/09/2016 - 14:57

In reply to सैराट पाह्यला, लोकांनी एवढा by सूड

Permalink

पिराताईंचा प्रतिसाद नै वाचला?

पिराताईंचा प्रतिसाद नै वाचला? निव्वळ प्रेम आहे म्हणून अजून काहीच स्थिरस्थावर नसलेल्या व्यक्तीसोबत मुलीला "पळून जायची" वेळ का यावी? मुलीला आपल्या प्रेमाची कबूली घरी देऊन समर्थन वा मार्गदर्शन मिळणारच नाही असे वातावरण असेल तर कुणाचं चुकतं?
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Mon, 05/09/2016 - 15:03

In reply to पिराताईंचा प्रतिसाद नै वाचला? by तर्राट जोकर

Permalink

तुमच्या घरात असं घडलं तर

तुमच्या घरात असं घडलं तर तुम्ही काय कराल? मुलगा तुमच्या ओळखीतला आहे, त्याचं काय्येक कमाईचं साधन नाहीये हे तुम्हाला माहीत आहे. अशा वेळी घरातली मुलगी त्याच्या प्रेमात पडली. तुम्ही काय कराल?
  • Log in or register to post comments

Submitted by तर्राट जोकर on Mon, 05/09/2016 - 15:13

In reply to तुमच्या घरात असं घडलं तर by सूड

Permalink

=)) =)) ऐसा हुआ हैं साईं..

=)) =)) ऐसा हुआ हैं साईं.. म्हणून म्हटलं सॅम्पल्गृप म्होटा हाय. प्रकरणं ह्याण्डल करता आली पायजेल. दुर्दैवाने आपल्या समाजात टोलरन्स फार कमी. थोडा टोलरन्स दाखवून नीट हाताळली तर 'आपल्याला' हवं तेच मिळवता येतं. 'जवळच्यांचा विश्वास आणि आधार' भुछत्री प्रेमापेक्षा केव्हाही मोठा असतो हे विसरलं नाही तर बरं असतं. आपण आपल्या लोकांवर प्रेम करतो, हक्क बजावत नाही इतकं संबंधितांना कळलं तर आपण म्हटल्यावर विहिरीत जीव द्यायला पण तयार होतात. सरतेशेवटी 'प्रेम' जिंकतं दादा, इतर काहीही नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Mon, 05/09/2016 - 15:20

In reply to =)) =)) ऐसा हुआ हैं साईं.. by तर्राट जोकर

Permalink

पाल्हाळ नकोय, झालं असेल तर

पाल्हाळ नकोय, झालं असेल तर काय केलंत ते सांगा.
  • Log in or register to post comments

Submitted by तर्राट जोकर on Mon, 05/09/2016 - 15:24

In reply to पाल्हाळ नकोय, झालं असेल तर by सूड

Permalink

थोडा टोलरन्स दाखवून नीट

थोडा टोलरन्स दाखवून नीट हाताळली>> एवढ्यावरुन नै समजलं तर अशक्य आहे. किती का सांगोत, पाल्हाळच असेल.
  • Log in or register to post comments

Submitted by तर्राट जोकर on Mon, 05/09/2016 - 15:54

In reply to पाल्हाळ नकोय, झालं असेल तर by सूड

Permalink

चला, तुमच्यासाठी सांगुनच

चला, तुमच्यासाठी सांगुनच टाकतो. किस्सा घरातलाच आहे. मुलगी पंधरा वर्षांची. कुठल्याशा धार्मिक टूरवर आईवडीलांसोबत गेली, तिकडे गृपमधे एक कुटूंब होते सोबत. त्यांचा १८-१९ वर्षांचा मुलगा. भिक्षुकी शिकत होता. चार-पाच दिवसांच्या सहवासात जमलं दोघांचं. जात-पात-उपजात सगळं यथायोग्य. नकारास कोणतेही कारण नाही. घरचे श्रीमंत वैगरे. शिवाय दोन्ही घरं एकमेकांना चांगली ओळखणारी. मुलीचा हट्ट, आईवडीलांना कसे सामोरे जावे कळत नव्हते. लग्नाची जणू बोलणी झालीत असा माहोल. म्हणे मुलगी सज्ञान होईस्तोवर थांबणार. मुलाच्या घरचे लगोलग मुलीला सून संबोधायला लागले. मला वाटते ह्यापेक्षा उत्तम परिस्थिती कोणत्याच प्रेमप्रकरणात उद्भवत नसेल. तरी शेवटी आई-वडील माझ्या मताची वाट पाहत होते. मी मुलाची माहिती काढली. मला त्याचे विचार आवडले नाहीत. एकूण त्याच्या घरातली विचारसरणी, त्याच्यावरचे संस्कार काय असतील ह्याचा अंदाज आला. मग मी माझ्या 'चाली' खेळलो. प्रकरणास अनुमोदन दिले आणि एकदा मुलाला मुलीच्या समक्ष भेटायचे ठरवले. दरम्यान एखाद महिना गेला असेल. स्वप्नांचे इमले आकाशापर्यंत पोचले होते. आम्ही एका हॉटेलात भेटलो. मुलाला विचारले, "प्रेम करतोस का हिच्यावर?". म्हणाला, "खूप" त्याला विचारले, "काय रे, समजा दोन-तीन वर्षांनी ही सज्ञान झाली व तिला हे स्थळ तितकेसे अनुरुप वाटले नाहीतर तुझे काय म्हणणे आहे?" त्यावर त्याच्याकडे उत्तर नव्हते. ह्या शक्यतेचा त्याने विचार केला नव्हता. मी म्हटलं, "अरे आज ही तुझ्यावर जीव लावते असे सांगते, अल्लड वय आहे. लग्न होईस्तोवर तुम्ही भेटणार नाहीत असे ठरले आहे. समजा उद्या सज्ञान झाल्यावर तिला कॉलेजात वैगरे कोणी दुसरा मुलगा भेटला, तिला आवडला, त्याच्याबद्दल विचार करावासा वाटला तर तुझी काय भूमिका असेल?" ह्या प्रश्नांवर त्याचे जे उत्तर होते ते पुरुषप्रधान संस्कारांतून येणारे टिपिकल विचार होते, स्त्रीला तिचे स्वतःचे मत नाकारुन पुरुष म्हणेल तसे त्याच चाकोरीत, आज्ञेत जगायचे, "त्याने आता तिच्यावर रुमाल टाकला आहे" अशा अर्थाचे काहीसे विचार होते. त्याचे ते सर्व महान विचार ऐकून मुलीला जे समजायचे ते समजले. तीने 'मी विचार करुन निर्णय कळवते' असे सांगितले. दोन चार दिवसातच मुलाकडे नकार कळवला गेला. ते प्रकरण थांबले. नंतर त्या मुलाने मुलीला बरेच समजवण्याचा प्रयत्न केला पण उपयोग झाला नाही. जवळच्या मुलींबद्दल अशा अनेक घटना हाताळल्या आहेत. मी विना-अनुभव अजिबात बोलत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Mon, 05/09/2016 - 16:03

In reply to चला, तुमच्यासाठी सांगुनच by तर्राट जोकर

Permalink

हेच मला म्हणायचंय, वर जे काही

हेच मला म्हणायचंय, वर जे काही डोळे झाकून जे काही म्हणेल ते स्वीकारायचं किंवा खालच्या जातीतला होता म्हणूनच नाही म्हटलं असं जे काही चाल्लंय ते मला पटलं नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by तर्राट जोकर on Mon, 05/09/2016 - 16:18

In reply to हेच मला म्हणायचंय, वर जे काही by सूड

Permalink

ओके. आय होप माय स्टॅन्ड इज

ओके. आय होप माय स्टॅन्ड इज क्लिअर अ‍ॅट्लिस्ट.
  • Log in or register to post comments

Submitted by अप्पा जोगळेकर on Mon, 05/09/2016 - 16:51

In reply to चला, तुमच्यासाठी सांगुनच by तर्राट जोकर

Permalink

माफ करा पण 'तुमच्या वडिलांना

माफ करा पण 'तुमच्या वडिलांना लश्करच्या भाकरी भाजायची, लग्ने जुळवायची सवय होती असे काहीसे तुम्हीच लिहिले होते ना ?' आणि आता तुमचेही तेच ?
  • Log in or register to post comments

Submitted by तर्राट जोकर on Mon, 05/09/2016 - 17:04

In reply to माफ करा पण 'तुमच्या वडिलांना by अप्पा जोगळेकर

Permalink

घरातली मुलगी >> हे वाचले नाही

घरातली मुलगी >> हे वाचले नाही का अप्पासाहेब? घरातली कामे लष्कराच्या भाकर्‍या नसतात. माझ्या थेट जवळच्या नात्यांमधे किमान तीस-पस्तीस मुली आहेत, वेगवेगळ्या वयाच्या.
  • Log in or register to post comments

Submitted by अप्पा जोगळेकर on Mon, 05/09/2016 - 17:10

In reply to घरातली मुलगी >> हे वाचले नाही by तर्राट जोकर

Permalink

जौंदे साहेब. फार वैयक्तिक

जौंदे साहेब. फार वैयक्तिक होते आहे. मला इतरांच्या खाजगी आयुष्यात रस नाही. तुम्ही जाहीरपणे लिहिलेली दोन मते विरोधाभासी वाटली इतकेच.
  • Log in or register to post comments

Submitted by तर्राट जोकर on Mon, 05/09/2016 - 17:20

In reply to जौंदे साहेब. फार वैयक्तिक by अप्पा जोगळेकर

Permalink

वैयक्तिक काही नाही त्यात.

वैयक्तिक काही नाही त्यात. जगरहाटी आहे. वडीलांची पद्धत वेगळी होती. वडीलांचा आमच्या जातीतला जनसंपर्क अफाट होता आणि आहे. माझा अजिबात नाही. मला तर आमच्याच घाराण्याचे सेम आडनाव असणार्‍या सर्व वंशजांचे कुठं काय चाललंय माहित नाही. मी आपला थेट काका, मामा, मावश्यांपुरता व त्यांच्या पिलावळींपुरता मर्यादित. =))
  • Log in or register to post comments

Submitted by तर्राट जोकर on Mon, 05/09/2016 - 15:58

In reply to पाल्हाळ नकोय, झालं असेल तर by सूड

Permalink

थोडी अ‍ॅडिशनल माहिती: आज ती

थोडी अ‍ॅडिशनल माहिती: आज ती मुलगी २४ वर्षांची आहे, एका चांगल्या घरातल्या चांगल्या नोकरीवाल्या मुलासोबत (दुसर्‍या जातीच्या) प्रकरण सुरु आहे. दोन्ही घरी सांगून रितसर लग्न करण्यासाठी दोन्ही घरच्यांची मनधरणी चालू आहे. तिचा पळून वैगरे जाण्याचा कोणताच विचार नाही. कारण घरातून भक्कम पाठिंबा आणि आधार मिळेल ह्यावर तिचा आजही विश्वास आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by अप्पा जोगळेकर on Mon, 05/09/2016 - 15:21

In reply to सैराट पाह्यला, लोकांनी एवढा by सूड

Permalink

साहेब,

साहेब, पालक चोरीविरुद्ध पोलिस कंप्लेंट करणे, घरातून हाकलून देणे (सज्ञान मुलांना पालक कायद्याने घराबाहेर काढू शकतात), इस्टेटीतून बेदखल करणे इत्यादी पर्याय अवलंबु शकतात. तो त्यांचा अधिकार सुद्धा आहेच. बहुतकरुन सर्वांचा आक्षेप अमानुष पणा, क्रूर मारहाण, आयुष्यातून उठवू शकतील अशा खोट्या पोलिस तक्रारी, मसल पोवारचा वापर करून कुटुंबियांना त्रास देणे आणि जबरदस्तीचा विरोध याला आहे (किंवा असावा) . बाकी कोलेजात असताना पेमाबिमात पडल्यावर घरी आरत्या ओवाळल्या जातील अशी पोरांची देखील अपेक्षा असते काय ? बहुधा नसावी.
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Mon, 05/09/2016 - 14:43

Permalink

(स्वत:च्या कमाईची असलेली

(स्वत:च्या कमाईची असलेली/नसलेली)*
  • Log in or register to post comments

Submitted by धनंजय माने on Mon, 05/09/2016 - 17:19

Permalink

काही का असेना आम्ही सगळ्यांनी

काही का असेना आम्ही सगळ्यांनी (शंतनू सकट) नोकरी बघून लग्नं केली. थोडं खोटं बोलणं वगैरे ठीक आहे पण उगाच पैजा लावून प्रेम आणि लग्न करायला ते म्हणजे काय हे आहे काय????
  • Log in or register to post comments

Submitted by खालीमुंडी पाताळधुंडी on Mon, 05/09/2016 - 19:11

In reply to काही का असेना आम्ही सगळ्यांनी by धनंजय माने

Permalink

;-)

मिस्टर धनंजय माने माझे सत्तर रूपये कधी देताय?
  • Log in or register to post comments

Submitted by नया है वह on Tue, 05/10/2016 - 12:12

In reply to ;-) by खालीमुंडी पाताळधुंडी

Permalink

सत्तर रूपये वारले!

;)
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on Mon, 05/09/2016 - 17:21

Permalink

आॅच् श्ग्ग जाल्ल तल

आॅच् श्ग्ग जाल्ल तल
  • Log in or register to post comments

Submitted by तुषार काळभोर on Mon, 05/09/2016 - 17:21

Permalink

मुलीकडच्यांचा विरोध..

वर धागाकर्त्याने दिलेल्या उदाहरणांत (आणि इतरत्रही) बहुतेक वेळा (पाचात चारवेळा? दहात सातआठ वेळा?), विरोध हा मुलीच्या घरच्यांकडून होतो. विरोधाची कारणे 'आंतरजातीय' विवाह आहे यापेक्षा इतर जास्त असतात. उदा. मुलाच्या घरचं 'लो' आर्थिक/सामाजिक स्टेटस. प्रेमविवाहाची काही काल्पनिक उदाहरणं बघू १) मुलगा व मुलगी दोन्ही समजातीय (मराठा/देब्रा/कोब्रा/कुणबी/दलित कोणीही) : मुलाचा आर्थिक स्तर कमी/मुलीचा जास्त. परिणामः मुलीकडच्यांचा अतीतीव्र विरोध. मुलाकडच्यांचा विरोध नाही.(क्वचित मुलाकडच्याकडून विरोध झाला तर कारण असे असू शकते: मोठ्याची मुलगी डोक्यावर बसेल) २) आंतरजातीयः मुलगी उच्चजातीय व श्रीमंत/मुलगा निम्नजातीय व गरीबः उदा क्र १ पेक्षा 'n' पटींनी मोठा विरोध. लग्न होण्याची व घरच्यांनी ते टि़कू देण्याची शक्यता जवळजवळ शून्य. ३) आंतरजातीयः मुलगा उच्चजातीय व श्रीमंत/मुलगी निम्नजातीय व गरीबः मुलीकडच्यांकडून शुन्य/थोडाफार विरोध. मुलाकडच्यांकडून कडाडून विरोध.(मुलाला बहिणी असतील तर लग्न होण्याची व घरच्यांनी ते टि़कू देण्याची शक्यता जवळजवळ शून्य) ४) आंतरजातीयः आर्थिक स्तर जवळपास सारखा: गरीब/श्रीमंत घरातून थोडाफार विरोध. मध्यमवर्गीय घरांतून तीव्र विरोध.(मुलगा-मुलगी दोन्ही बाजूंनी) प्रत्यक्ष पाहण्यातील उदाहरणे: १) मुलगी-मराठा, मुलगा-माळी(ओबिसी): दोन्ही मध्यमवर्गीय; मुलाच्या घरच्यांनी स्वीकारलं, मुलीकडच्यांनी लग्नाला विरोध केला, मुलीला २ आठवडे घरात डांबून ठेवलं, मुलगी परीक्षेसाठी कॉलेजला जाऊ लागली, शेवटच्या पेपरनंतर घरी आलीच नाही. सतरा वर्षे झाली. सुखात संसार सुरू आहे. मुलीकडच्यांनी सुरुवातिल संबंध तोडले, मुलगी आम्हाला मेली असे जाहीर केले, नंतर मुलगी व आई चोरून भेटू लागल्या. आता सगळं आलबेल २) मुलगी-मराठा, मुलगा-(गुन्हेगारी शिक्का बसलेल्या) भ.वि. जातीतला (वडील बँकेत प्युन होते, पण त्यामुळे शिक्षणाची किंमत होती व मुलगा डिप्लोमा करून 'भारत फोर्ज' मध्ये सुपरवायजर होता). इतर वरीलप्रमाणेच सर्व. ३) मुलगा व मुलगी दोन्ही मराठा, दोन्ही कुटुंबे हडपसरची 'गुंठामंत्री'/बागायतदार क्याटेगरीतली. मुलाच्या घरच्यांचा शून्य विरोध. मुलीच्या घरच्यांचा अतीतीव्र विरोध. काही प्रतिष्ठित व्यक्तींच्या मध्यस्थीने लग्न सुरळीत पाडले. आता सगळं आलबेल. ४) मुलगा व मुलगी दोन्ही मराठा, मुलाचे आईवडील दोघे शिक्षक -विरोध नाही. मुलीचे वडील येस्बीआयमध्ये शाखाव्यवस्थापक- आईचा अतीतीव्र विरोध . मुलगा-मुलगी दोघेही आयटीत व कमावते. दोघांनी ठरवले की घरी समजावत राहायचे, पण पळून जाऊन/गुपचुप लग्न नाही करायचे. दोन वर्षांनी घरचे 'पटले'. आता सगळं आलबेल. ५) मुलगी: महादेव कोळी, मुलगा: मराठा, मुलीच्या घरच्यांचा अतीतीव्र विरोध, मुलाकडून आल-इज-वेल. (मुलीच्या आईने गुडनाईट पिऊन आत्महत्येचा प्रयत्नही केला होता.). काही प्रतिष्ठित व्यक्तींच्या मध्यस्थीने लग्न सुरळीत पाडले. आता सगळं आलबेल. ६) मुलगा व मुलगी दोन्ही मराठा. मुलीचे वडील खाजगी कंपनीत अकाउंटंट होते. आता गुंठामंत्री. मुलाचे वडील नाशिक जिल्ह्यातील एका मोठ्या गावी वकील. मुलगा व मुलगी दोघे आयटीत नोकरीला. मुलाच्या घरून विरोध नाही. मुलीच्या घरच्यांचा विरोध. (कारण घरातील इतर मुलींची-म्हणजे भावांच्या मुलींची लग्ने परिसरातील गुंठामंत्र्यांच्या घरी झालेली.) मुलगा-मुलगी ठाम व शांत राहिले. घरूनही काही आततायीपणा नाही. एक-दीड वर्ष सर्वांतर्फे वेट & वॉच. आता मुलीचे वडील लग्नाला तयार झालेत. कन्क्लुज्यनः अपवाद वगळता, प्रेमविवाहाला मुलीच्या घरून विरोध असतोच. जात, वगैरे फक्त निमित्त!
  • Log in or register to post comments
Profile picture for user उडन खटोला

Submitted by उडन खटोला on Mon, 05/09/2016 - 17:27

Permalink

रिक्षा

http://www.misalpav.com/node/34641 ह्ये बी बगा वाइच टायम काडुन म्हन्तोय मी
  • Log in or register to post comments

Submitted by मित्रहो on Mon, 05/09/2016 - 19:52

Permalink

सैराट बघितला

चित्रपट सुंदर बनवलाय, मला तर पहील्या भागापेक्षा दुसऱ्या भाग जास्त आवडला. पहीला भाग बराचसा मनिरत्नमची आठवण करुन देतो. सुंदर गाणी, त्याचे जबरदस्त शूटींग, उसाची आणि केळाची शेत गेली कित्येक वर्षात मराठी सिनेमात आलीच नव्हती. दुसरा भाग जबरदस्त. हेैद्राबादचे नाव दिल्याने आम्हाला अधिक जवळचे. मी तर बंजारा हिल्स, की असेंब्ली की एनटीआर गार्डन हाच विचार करीत होतो. पळून जाउन लग्न करण्याचा विचार करनाऱ्यांनी तर दुसरा भाग बघायलाच हवा (शेवटली दोन मिनिट सोडूून). आयुष्य वाटत तितक गोड नसते. आता राहीला शेवट, अजिबात आवडला नाही. सिनेमॅटीक दृष्टीकोनातून हा शेवट कदाचित भारतीय सिनेमाच्या दहा पैकी एक शेवट म्हणून असेल पण एक विचार म्हणून मात्र हा पराभूत मनोवृत्तीचे प्रतिक आहे. हे वास्तव असले तर तितकेच वास्तव वाटले असते जर परशाने सगळ्यांना कुटुन काढले असता हे जितके वास्तव वाटले असते तितकेच. लाखातली एक केस वगेरे. प्रत्यक्षात दोन वेगळी आयुष्य दोन वेगळ्या ठिकाणी तशीच चालली असती. शेवटी काही रेषा समांतर सुद्धा असतात त्यांनी भेटायलाच हवे असे नाही. माफ न करताही दोन आयुष्ये चालली असती ते जास्त वास्तवादी असते. माणसाला देवाने फार मोठी देणगी दिली विस्मृती, माणूस कदाचित माफ करनार नाही पण विसरायला शिकतो. कदाचित प्रचंड प्रभावी शेवट करण्याच्या नादात माणसाच्या या सहज प्रवृत्तीचा नागराजला विसर पडला असेच वाटले.
  • Log in or register to post comments

Submitted by NiluMP on Mon, 05/09/2016 - 23:21

Permalink

एक कलाकारच दुसर्या कलाकाराची

एक कलाकारच दुसर्या कलाकाराची तारीफ करु शकतो. नाही का?
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Tue, 05/10/2016 - 07:10

In reply to एक कलाकारच दुसर्या कलाकाराची by NiluMP

Permalink

एक कलाकारच दुसर्या कलाकाराची तारीफ करु शकतो.

एकदम खरी गोष्ट..... म्हणूनच तर आम्ही जॉनी डेप (निक ऑफ टाइम),जॅक निकल्सन (बॅटमॅन), टॉम हँक्स (फॉरेस्ट गम्प), डेंझेल वॉशिंग्टन (फ्लाईट) आणि जेसन स्टॅथॅम (द बँक जॉब) ह्यांची तारीफ करतो. असो, जमल्यास, डेंझेल वॉशिंग्टन अभिनित "फ्लाईट" जरूर बघा.अर्थात मुलांच्या बरोबर बघू नका.
  • Log in or register to post comments

Submitted by जेपी on Tue, 05/10/2016 - 12:24

Permalink

100

100
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com