Skip to main content

सैराटच्या निमित्ताने....

लेखक मुक्त विहारि यांनी रविवार, 08/05/2016 21:55 या दिवशी प्रकाशित केले.
मी सिनेमा बघीतला नाही आणि कदाचित बघणारही नाही.त्यामुळे, "सैराट" न बघताही प्रेमी युगलाची जात एक नसतांना पण संसार सुखी होवू शकतो का? ह्या विषयीचे मी पाहिलेल्या घटना लिहित आहे. १. मुलगा गुजर आणि मुलगी को.ब्रा.मुलगा डिप्लोमा तर मुलगी एम.एस.सी. दोघांचे प्रेम जमल्यावर, मुलाला दम मिळाला.मुलाने आणि मुलीने पळून जावून लग्न गेले. आज दोघेही सुखाने नांदत आहेत. २. मुलगा तामिळ आणि मुलगी कोब्रा.मुलाच्या घरच्यांचा विरोध असून पण दोघांनी लग्न केले आणि दोघेही संसारात सुखी आहेत. ३. मुलगा कोब्रा आणि मुलगी ९६ कुळी मराठा.मुलीच्या घरच्यांचा विरोध असून पण दोघांनी लग्न केले आणि सुखाने संसार करत आहेत. ४. मुलगी देब्रा आणि मुलगा ९६ कुळी मराठा. मुलीच्या घरच्यांचा विरोध असून पण दोघांनी लग्न केले आणि सुखाने संसार करत आहेत. ५. मुलगी कोब्रा आणि मुलगा धनगर.दोघांच्या माता-पित्यांनी त्यांचे लग्न लावून द्यायचे ठरवले आहे. ६. मुलगा कोब्रा आणि मुलगी ९६ कुळी मराठा.मुलीच्या घरच्यांचा विरोध असून पण दोघांनी लग्न केले आणि सुखाने संसार करत आहेत. वरील सर्व उदाहरणे महाराष्ट्रातील आणि त्यातील एक तर सोलापूर जिल्ह्यातलेच आहे. ================================== आमच्या अनुभवांत सगळ्या सुखी आणि समाधानी प्रेम-कथा असल्याने, "सैराट" सारखी नकारात्मक कला रिचवणे शक्य होणार नाही.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 22947
प्रतिक्रिया 102

प्रतिक्रिया

In reply to by मुक्त विहारि

लग्न होऊन पण सुखी? कैच्या कै... असं म्हणायचंय त्यांना! आता आमचंच घ्या. लग्नापूर्वी लिपस्टिक, नेलपेंट विकायचो ते चालायचं बायकोला. आता???? कसलं आलंय सुख!

In reply to by मुक्त विहारि

मला वाटतं त्यांनी गंमतीने म्हटले असावे. 'सुखी संसार' एक काल्पनिक सत्य ह्या अर्थाने. =))

In reply to by मुक्त विहारि

सॉरी मुवि. तुमचा गैरसमज झाला. खाली काही लोकांनी बरोबर ओळखले आहे. ५ जोडप्यांमधले २ जास्तीत जास्त ३ ( फार झाले ) सुखी संसार वगैरे करत असतील. ५ पैकी सगळी ५ जोडपी सुखी म्हणजे कै च्या कै असे म्हणायचे होते.

सैराट पाह्यला, लोकांनी एवढा का डोक्यावर घेतलाय ते कळलं नाही. बर्‍याच जणांचा पहिला-वहिला सिनेमा असून केलेला सहज अभिनय आणि शोकांतिका, एवढं वगळता त्या सिनेमात काहीच वेगळं वाटलं नाही. जात-पात सोडा!! निव्वळ प्रेम आहे म्हणून ज्याचं अजून काहीच स्थिरस्थावर नाही; अशा व्यक्तीसोबत माझ्या घरातली एखादी मुलगी; घरातलीच (स्वत:च्या कमाईची नसलेली) नोटांची गड्डी घेऊन पळून गेली तर मला तरी आवडणार नाही.

In reply to by सूड

पिराताईंचा प्रतिसाद नै वाचला? निव्वळ प्रेम आहे म्हणून अजून काहीच स्थिरस्थावर नसलेल्या व्यक्तीसोबत मुलीला "पळून जायची" वेळ का यावी? मुलीला आपल्या प्रेमाची कबूली घरी देऊन समर्थन वा मार्गदर्शन मिळणारच नाही असे वातावरण असेल तर कुणाचं चुकतं?

In reply to by तर्राट जोकर

तुमच्या घरात असं घडलं तर तुम्ही काय कराल? मुलगा तुमच्या ओळखीतला आहे, त्याचं काय्येक कमाईचं साधन नाहीये हे तुम्हाला माहीत आहे. अशा वेळी घरातली मुलगी त्याच्या प्रेमात पडली. तुम्ही काय कराल?

In reply to by सूड

=)) =)) ऐसा हुआ हैं साईं.. म्हणून म्हटलं सॅम्पल्गृप म्होटा हाय. प्रकरणं ह्याण्डल करता आली पायजेल. दुर्दैवाने आपल्या समाजात टोलरन्स फार कमी. थोडा टोलरन्स दाखवून नीट हाताळली तर 'आपल्याला' हवं तेच मिळवता येतं. 'जवळच्यांचा विश्वास आणि आधार' भुछत्री प्रेमापेक्षा केव्हाही मोठा असतो हे विसरलं नाही तर बरं असतं. आपण आपल्या लोकांवर प्रेम करतो, हक्क बजावत नाही इतकं संबंधितांना कळलं तर आपण म्हटल्यावर विहिरीत जीव द्यायला पण तयार होतात. सरतेशेवटी 'प्रेम' जिंकतं दादा, इतर काहीही नाही.

In reply to by सूड

थोडा टोलरन्स दाखवून नीट हाताळली>> एवढ्यावरुन नै समजलं तर अशक्य आहे. किती का सांगोत, पाल्हाळच असेल.

In reply to by सूड

चला, तुमच्यासाठी सांगुनच टाकतो. किस्सा घरातलाच आहे. मुलगी पंधरा वर्षांची. कुठल्याशा धार्मिक टूरवर आईवडीलांसोबत गेली, तिकडे गृपमधे एक कुटूंब होते सोबत. त्यांचा १८-१९ वर्षांचा मुलगा. भिक्षुकी शिकत होता. चार-पाच दिवसांच्या सहवासात जमलं दोघांचं. जात-पात-उपजात सगळं यथायोग्य. नकारास कोणतेही कारण नाही. घरचे श्रीमंत वैगरे. शिवाय दोन्ही घरं एकमेकांना चांगली ओळखणारी. मुलीचा हट्ट, आईवडीलांना कसे सामोरे जावे कळत नव्हते. लग्नाची जणू बोलणी झालीत असा माहोल. म्हणे मुलगी सज्ञान होईस्तोवर थांबणार. मुलाच्या घरचे लगोलग मुलीला सून संबोधायला लागले. मला वाटते ह्यापेक्षा उत्तम परिस्थिती कोणत्याच प्रेमप्रकरणात उद्भवत नसेल. तरी शेवटी आई-वडील माझ्या मताची वाट पाहत होते. मी मुलाची माहिती काढली. मला त्याचे विचार आवडले नाहीत. एकूण त्याच्या घरातली विचारसरणी, त्याच्यावरचे संस्कार काय असतील ह्याचा अंदाज आला. मग मी माझ्या 'चाली' खेळलो. प्रकरणास अनुमोदन दिले आणि एकदा मुलाला मुलीच्या समक्ष भेटायचे ठरवले. दरम्यान एखाद महिना गेला असेल. स्वप्नांचे इमले आकाशापर्यंत पोचले होते. आम्ही एका हॉटेलात भेटलो. मुलाला विचारले, "प्रेम करतोस का हिच्यावर?". म्हणाला, "खूप" त्याला विचारले, "काय रे, समजा दोन-तीन वर्षांनी ही सज्ञान झाली व तिला हे स्थळ तितकेसे अनुरुप वाटले नाहीतर तुझे काय म्हणणे आहे?" त्यावर त्याच्याकडे उत्तर नव्हते. ह्या शक्यतेचा त्याने विचार केला नव्हता. मी म्हटलं, "अरे आज ही तुझ्यावर जीव लावते असे सांगते, अल्लड वय आहे. लग्न होईस्तोवर तुम्ही भेटणार नाहीत असे ठरले आहे. समजा उद्या सज्ञान झाल्यावर तिला कॉलेजात वैगरे कोणी दुसरा मुलगा भेटला, तिला आवडला, त्याच्याबद्दल विचार करावासा वाटला तर तुझी काय भूमिका असेल?" ह्या प्रश्नांवर त्याचे जे उत्तर होते ते पुरुषप्रधान संस्कारांतून येणारे टिपिकल विचार होते, स्त्रीला तिचे स्वतःचे मत नाकारुन पुरुष म्हणेल तसे त्याच चाकोरीत, आज्ञेत जगायचे, "त्याने आता तिच्यावर रुमाल टाकला आहे" अशा अर्थाचे काहीसे विचार होते. त्याचे ते सर्व महान विचार ऐकून मुलीला जे समजायचे ते समजले. तीने 'मी विचार करुन निर्णय कळवते' असे सांगितले. दोन चार दिवसातच मुलाकडे नकार कळवला गेला. ते प्रकरण थांबले. नंतर त्या मुलाने मुलीला बरेच समजवण्याचा प्रयत्न केला पण उपयोग झाला नाही. जवळच्या मुलींबद्दल अशा अनेक घटना हाताळल्या आहेत. मी विना-अनुभव अजिबात बोलत नाही.

In reply to by तर्राट जोकर

हेच मला म्हणायचंय, वर जे काही डोळे झाकून जे काही म्हणेल ते स्वीकारायचं किंवा खालच्या जातीतला होता म्हणूनच नाही म्हटलं असं जे काही चाल्लंय ते मला पटलं नाही.

In reply to by तर्राट जोकर

माफ करा पण 'तुमच्या वडिलांना लश्करच्या भाकरी भाजायची, लग्ने जुळवायची सवय होती असे काहीसे तुम्हीच लिहिले होते ना ?' आणि आता तुमचेही तेच ?

In reply to by अप्पा जोगळेकर

घरातली मुलगी >> हे वाचले नाही का अप्पासाहेब? घरातली कामे लष्कराच्या भाकर्‍या नसतात. माझ्या थेट जवळच्या नात्यांमधे किमान तीस-पस्तीस मुली आहेत, वेगवेगळ्या वयाच्या.

In reply to by तर्राट जोकर

जौंदे साहेब. फार वैयक्तिक होते आहे. मला इतरांच्या खाजगी आयुष्यात रस नाही. तुम्ही जाहीरपणे लिहिलेली दोन मते विरोधाभासी वाटली इतकेच.

In reply to by अप्पा जोगळेकर

वैयक्तिक काही नाही त्यात. जगरहाटी आहे. वडीलांची पद्धत वेगळी होती. वडीलांचा आमच्या जातीतला जनसंपर्क अफाट होता आणि आहे. माझा अजिबात नाही. मला तर आमच्याच घाराण्याचे सेम आडनाव असणार्‍या सर्व वंशजांचे कुठं काय चाललंय माहित नाही. मी आपला थेट काका, मामा, मावश्यांपुरता व त्यांच्या पिलावळींपुरता मर्यादित. =))

In reply to by सूड

थोडी अ‍ॅडिशनल माहिती: आज ती मुलगी २४ वर्षांची आहे, एका चांगल्या घरातल्या चांगल्या नोकरीवाल्या मुलासोबत (दुसर्‍या जातीच्या) प्रकरण सुरु आहे. दोन्ही घरी सांगून रितसर लग्न करण्यासाठी दोन्ही घरच्यांची मनधरणी चालू आहे. तिचा पळून वैगरे जाण्याचा कोणताच विचार नाही. कारण घरातून भक्कम पाठिंबा आणि आधार मिळेल ह्यावर तिचा आजही विश्वास आहे.

In reply to by सूड

साहेब, पालक चोरीविरुद्ध पोलिस कंप्लेंट करणे, घरातून हाकलून देणे (सज्ञान मुलांना पालक कायद्याने घराबाहेर काढू शकतात), इस्टेटीतून बेदखल करणे इत्यादी पर्याय अवलंबु शकतात. तो त्यांचा अधिकार सुद्धा आहेच. बहुतकरुन सर्वांचा आक्षेप अमानुष पणा, क्रूर मारहाण, आयुष्यातून उठवू शकतील अशा खोट्या पोलिस तक्रारी, मसल पोवारचा वापर करून कुटुंबियांना त्रास देणे आणि जबरदस्तीचा विरोध याला आहे (किंवा असावा) . बाकी कोलेजात असताना पेमाबिमात पडल्यावर घरी आरत्या ओवाळल्या जातील अशी पोरांची देखील अपेक्षा असते काय ? बहुधा नसावी.

काही का असेना आम्ही सगळ्यांनी (शंतनू सकट) नोकरी बघून लग्नं केली. थोडं खोटं बोलणं वगैरे ठीक आहे पण उगाच पैजा लावून प्रेम आणि लग्न करायला ते म्हणजे काय हे आहे काय????

वर धागाकर्त्याने दिलेल्या उदाहरणांत (आणि इतरत्रही) बहुतेक वेळा (पाचात चारवेळा? दहात सातआठ वेळा?), विरोध हा मुलीच्या घरच्यांकडून होतो. विरोधाची कारणे 'आंतरजातीय' विवाह आहे यापेक्षा इतर जास्त असतात. उदा. मुलाच्या घरचं 'लो' आर्थिक/सामाजिक स्टेटस. प्रेमविवाहाची काही काल्पनिक उदाहरणं बघू १) मुलगा व मुलगी दोन्ही समजातीय (मराठा/देब्रा/कोब्रा/कुणबी/दलित कोणीही) : मुलाचा आर्थिक स्तर कमी/मुलीचा जास्त. परिणामः मुलीकडच्यांचा अतीतीव्र विरोध. मुलाकडच्यांचा विरोध नाही.(क्वचित मुलाकडच्याकडून विरोध झाला तर कारण असे असू शकते: मोठ्याची मुलगी डोक्यावर बसेल) २) आंतरजातीयः मुलगी उच्चजातीय व श्रीमंत/मुलगा निम्नजातीय व गरीबः उदा क्र १ पेक्षा 'n' पटींनी मोठा विरोध. लग्न होण्याची व घरच्यांनी ते टि़कू देण्याची शक्यता जवळजवळ शून्य. ३) आंतरजातीयः मुलगा उच्चजातीय व श्रीमंत/मुलगी निम्नजातीय व गरीबः मुलीकडच्यांकडून शुन्य/थोडाफार विरोध. मुलाकडच्यांकडून कडाडून विरोध.(मुलाला बहिणी असतील तर लग्न होण्याची व घरच्यांनी ते टि़कू देण्याची शक्यता जवळजवळ शून्य) ४) आंतरजातीयः आर्थिक स्तर जवळपास सारखा: गरीब/श्रीमंत घरातून थोडाफार विरोध. मध्यमवर्गीय घरांतून तीव्र विरोध.(मुलगा-मुलगी दोन्ही बाजूंनी) प्रत्यक्ष पाहण्यातील उदाहरणे: १) मुलगी-मराठा, मुलगा-माळी(ओबिसी): दोन्ही मध्यमवर्गीय; मुलाच्या घरच्यांनी स्वीकारलं, मुलीकडच्यांनी लग्नाला विरोध केला, मुलीला २ आठवडे घरात डांबून ठेवलं, मुलगी परीक्षेसाठी कॉलेजला जाऊ लागली, शेवटच्या पेपरनंतर घरी आलीच नाही. सतरा वर्षे झाली. सुखात संसार सुरू आहे. मुलीकडच्यांनी सुरुवातिल संबंध तोडले, मुलगी आम्हाला मेली असे जाहीर केले, नंतर मुलगी व आई चोरून भेटू लागल्या. आता सगळं आलबेल २) मुलगी-मराठा, मुलगा-(गुन्हेगारी शिक्का बसलेल्या) भ.वि. जातीतला (वडील बँकेत प्युन होते, पण त्यामुळे शिक्षणाची किंमत होती व मुलगा डिप्लोमा करून 'भारत फोर्ज' मध्ये सुपरवायजर होता). इतर वरीलप्रमाणेच सर्व. ३) मुलगा व मुलगी दोन्ही मराठा, दोन्ही कुटुंबे हडपसरची 'गुंठामंत्री'/बागायतदार क्याटेगरीतली. मुलाच्या घरच्यांचा शून्य विरोध. मुलीच्या घरच्यांचा अतीतीव्र विरोध. काही प्रतिष्ठित व्यक्तींच्या मध्यस्थीने लग्न सुरळीत पाडले. आता सगळं आलबेल. ४) मुलगा व मुलगी दोन्ही मराठा, मुलाचे आईवडील दोघे शिक्षक -विरोध नाही. मुलीचे वडील येस्बीआयमध्ये शाखाव्यवस्थापक- आईचा अतीतीव्र विरोध . मुलगा-मुलगी दोघेही आयटीत व कमावते. दोघांनी ठरवले की घरी समजावत राहायचे, पण पळून जाऊन/गुपचुप लग्न नाही करायचे. दोन वर्षांनी घरचे 'पटले'. आता सगळं आलबेल. ५) मुलगी: महादेव कोळी, मुलगा: मराठा, मुलीच्या घरच्यांचा अतीतीव्र विरोध, मुलाकडून आल-इज-वेल. (मुलीच्या आईने गुडनाईट पिऊन आत्महत्येचा प्रयत्नही केला होता.). काही प्रतिष्ठित व्यक्तींच्या मध्यस्थीने लग्न सुरळीत पाडले. आता सगळं आलबेल. ६) मुलगा व मुलगी दोन्ही मराठा. मुलीचे वडील खाजगी कंपनीत अकाउंटंट होते. आता गुंठामंत्री. मुलाचे वडील नाशिक जिल्ह्यातील एका मोठ्या गावी वकील. मुलगा व मुलगी दोघे आयटीत नोकरीला. मुलाच्या घरून विरोध नाही. मुलीच्या घरच्यांचा विरोध. (कारण घरातील इतर मुलींची-म्हणजे भावांच्या मुलींची लग्ने परिसरातील गुंठामंत्र्यांच्या घरी झालेली.) मुलगा-मुलगी ठाम व शांत राहिले. घरूनही काही आततायीपणा नाही. एक-दीड वर्ष सर्वांतर्फे वेट & वॉच. आता मुलीचे वडील लग्नाला तयार झालेत. कन्क्लुज्यनः अपवाद वगळता, प्रेमविवाहाला मुलीच्या घरून विरोध असतो. जात, वगैरे फक्त निमित्त!

चित्रपट सुंदर बनवलाय, मला तर पहील्या भागापेक्षा दुसऱ्या भाग जास्त आवडला. पहीला भाग बराचसा मनिरत्नमची आठवण करुन देतो. सुंदर गाणी, त्याचे जबरदस्त शूटींग, उसाची आणि केळाची शेत गेली कित्येक वर्षात मराठी सिनेमात आलीच नव्हती. दुसरा भाग जबरदस्त. हेैद्राबादचे नाव दिल्याने आम्हाला अधिक जवळचे. मी तर बंजारा हिल्स, की असेंब्ली की एनटीआर गार्डन हाच विचार करीत होतो. पळून जाउन लग्न करण्याचा विचार करनाऱ्यांनी तर दुसरा भाग बघायलाच हवा (शेवटली दोन मिनिट सोडूून). आयुष्य वाटत तितक गोड नसते. आता राहीला शेवट, अजिबात आवडला नाही. सिनेमॅटीक दृष्टीकोनातून हा शेवट कदाचित भारतीय सिनेमाच्या दहा पैकी एक शेवट म्हणून असेल पण एक विचार म्हणून मात्र हा पराभूत मनोवृत्तीचे प्रतिक आहे. हे वास्तव असले तर तितकेच वास्तव वाटले असते जर परशाने सगळ्यांना कुटुन काढले असता हे जितके वास्तव वाटले असते तितकेच. लाखातली एक केस वगेरे. प्रत्यक्षात दोन वेगळी आयुष्य दोन वेगळ्या ठिकाणी तशीच चालली असती. शेवटी काही रेषा समांतर सुद्धा असतात त्यांनी भेटायलाच हवे असे नाही. माफ न करताही दोन आयुष्ये चालली असती ते जास्त वास्तवादी असते. माणसाला देवाने फार मोठी देणगी दिली विस्मृती, माणूस कदाचित माफ करनार नाही पण विसरायला शिकतो. कदाचित प्रचंड प्रभावी शेवट करण्याच्या नादात माणसाच्या या सहज प्रवृत्तीचा नागराजला विसर पडला असेच वाटले.

In reply to by NiluMP

एकदम खरी गोष्ट..... म्हणूनच तर आम्ही जॉनी डेप (निक ऑफ टाइम),जॅक निकल्सन (बॅटमॅन), टॉम हँक्स (फॉरेस्ट गम्प), डेंझेल वॉशिंग्टन (फ्लाईट) आणि जेसन स्टॅथॅम (द बँक जॉब) ह्यांची तारीफ करतो. असो, जमल्यास, डेंझेल वॉशिंग्टन अभिनित "फ्लाईट" जरूर बघा.अर्थात मुलांच्या बरोबर बघू नका.

100

धागा शंभरीबद्दल मुवीशेठ यांचा एक सुई दोरा,एक मी सैरा तर तू वैरा या (गुरुजींच्या ताज्या कवीतां-चारोळ्यांचा हस्तलिखीत-मागील बाजूस घरच्या वाण-सामानाची यादी आहे तेव्हा वाचून परत देणे ) आणि दोन असोले नारळ आणि निवडायला दुर्वा देऊन करण्यात येत आहे. मिपा संचालित जे पी मित्रपरिवार

आणि ते आता सुखाने संसार करत आहेत ... संसार वेलीवर, एक फुल देखील उमलले आहे