झकास! आवडले!
व्यंगचित्रावरून आठवले. प्रसिद्ध व्यंगचित्रकार "बापू घावरे" आमच्या ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य होते. ते मराठी विषय शिकवत. अतिशय रसाळ-प्रेमळ बोलणे आणि थोर व्यक्तीमत्व! 'सकाळ' मध्य त्यांचे व्यंगचित्र यायचे.
Sandy
काय सांगतोस सॅन्डीबाबा? बापू घावरे तुला उपप्राचार्य होते? हायला.
त्यांची चित्रे मार्मिक मध्येपण यायची. मला वाटायचे बापू घावरे नामक लेंगा आन तीनबटनाचा न्हेरु घातलेला कोल्हापुरी वाजिवणारा फाकडा इसम असावा. भारीच रे. मस्त मस्त. जमले तर गाठ घालून द्या की द्येवा.
बाकी वाघमारेसाहेब. चित्रे आवडतायत हं. टेक्स्ट खाली टायपून अॅड केले तरी चालेल. शुभेच्छा तुम्हास.
कॉलेजात केलेला नालायकपणा काय सांगू? ;)
तेव्हा करताना काय वाटलं नव्हतं पण सांगताना अब्रूची थोडी ठेवावी वाटते! ;) आणि आता काय तोंड(हात, पाय, पोट, पाठ) घेऊन त्यांच्यासमोर उभा राहू??
जोक्स अपार्ट, आत्ताच कॉलेजातली गैबुद्दीन गाबडी लावलेत कामाला. त्यांचा सध्याचा पत्ता मिळाला की कळवतो, मग पाहूया कसे, केव्हा भेटता येईल ते. :)
वाघमारेसाहेब, इथ आमच्याच गफ्फा सुरू झाल्या त्याबद्दल दिलगीरी व्यक्त करतो. तुमचं चालू ठेवा, मस्त काढताय चित्रे! न जाणो पुढं कधीतरी इथ मिपावरच रोज तुमच्या व्यंगचित्रांसाठी एक कॉलम केला जाईल!
Sandy
मस्त ! खिडकितून दिसणारे रेल्वे स्टेस्शन, टी व्ही ची वायर, टेबलावरील कागद..... व्वा...
मिपावर एक चौकट जरुर ठेवावी. अजून एक करता ये़ईल ते म्हणजे सभासदांच्या कल्पनेवर जर व्यंगचित्रे काढलीत तर त्यांचाही चांगला सहभाग होईल....
सर्व प्रतिसादकांचे आभार!
मी काही प्रशिक्षित चित्रकार नाही की मला व्यंगचित्र (किंवा कसल्याही प्रकारचं चित्र) काढण्याचा काही अनुभव आहे.त्यामुळे माझ्या बर्याच मर्यादा आहेत. ही माझी पहिलीच चित्रे आहे.ती अनेकांना आवडली याचा आनंद झाला.काहींनी फोटोशॉप वा तत्सम सॉफ्टवेअर मध्ये चित्रे फाईन ट्यून करण्याचा सल्ला दिला आहे.पण मी तो सध्या लांबणीवर टाकला आहे.कारण मी नवीन आहे आणि 'साला, तू पहिले मशिन पूस,मशिन पूस' या फिलॉसॉफिवर माझा विश्वास आहे.असो.
आता नियमितपणे चित्रे टाकण्याचा मानस आहे.बघूया कितपत जमतंय ते.आपल्या शुभेच्छांमुळे ते सहज शक्य होईल असे वाटते.
प्रतिक्रिया
मस्त
झकास!
काय सांगतोस सॅन्डीबाबा? बापू
दादानु...
न जाणो पुढं कधीतरी इथ मिपावरच
छान व्यंगचित्र..आवडले
भन्नाट. ओवरहेडेक ही कोटीही
हाहाहा! भन्नाट!
मस्त
हे पण व्यंगचित्र आवडले....
आवडले.
छानच
मस्त ! खिडकितून दिसणारे
भारीये! कला आहे तुमच्या हातात
हेही भारीच !!
सही ! झक्कास !
जिकले न गड्या! एक नंबर काम
आभार!