Skip to main content

लाईफलोंग ब्याचलर

लेखक निशांत_खाडे यांनी रविवार, 01/05/2016 16:14 या दिवशी प्रकाशित केले.
आज नेहमी प्रमाणे कोरा (Quora) वर फिरत असताना एक इंटरेस्टिंग प्रश्न सापडला. तोच इथे चोप्यपस्ते करतोय. "लग्न,कुटुंब यांच्या लफड्यात पडण्यापेक्षा आयुष्यभर अविवाहित राहणे जास्त व्यवहार्य व चांगले आहे काय? अविवाहित आयुष्य जास्त आनंदी आहे काय?" काही दुवे:

वाचने 31818
प्रतिक्रिया 255

प्रतिक्रिया

लग्न करून लोक सुखी होतात की नाही याची कल्पना नाही आम्ही मात्र लग्न करण्याचा प्रयत्न करून दु:खी झालो हे खरे. माझा अनुभव असा की अनेक वर्षे घराबाहेर एकटं राहिल्याने त्या कोषात राहायची सवय होते.मग दुसरी बंधनं नकोशी वाटू लागतात. ब्यॅचलरपणात ऐच्छिक की मारून मुटकून बॅचलर ह्या प्रमुख कॅटेगरी आहेत. त्यांचा स्वतंत्र विचार व्हावा.

In reply to by प्रचेतस

यशस्वी अजून पूर्ण झाले नाहीयेत कसाही करून आस्तिक नास्तिक, देव आणा यात गावडे काका उतरले चिखलात हे आपल आखाड्यात कि धागा भरून पावेल

In reply to by शाम भागवत

माझं नाव आलंच आहे तर मी हा दोनशेवा प्रतिसाद देतो आणि मजा पाहायला पुन्हा एकदा झाडावर जाऊन बसतो.

In reply to by प्रचेतस

आम्हाला चांदोबामधल्या "विक्रम आणि वेताळ" या सदरात येणार्‍या गोष्टींमधील विक्रम माहिती आहे. :)

In reply to by सतिश गावडे

तर तोच दुसरा चंद्रगुप्त. ह्याने वाकाटकांची मदत घेउन माळव्याच्या रूद्रसिंह क्षत्रपाला पराभूत केले व पश्चिम किनाऱ्यावर असणाऱ्या क्षत्रपांची सम्पूर्ण राजवट संपवली. इंडोग्रीक राजाने स्थापन केलेले संवत ह्याच्याच नावे ओळखले जाते ते म्हणजे विक्रम संवत.

In reply to by प्रचेतस

या धाग्यावर धागालेखकाला "लग्न करावे का?" आणि "मुल जन्माला घालावे का?" या प्रश्नांची जी उत्तरे मिळतील (जर मिळालीच तर) त्यांचा तुम्हीही विचार करा. नाही तर तुमचं लेकरु बाबा "विक्रम आणि वेताळ"ची गोष्ट सांगा म्हणून तुमच्याकडे हट्ट करायचं आणि तुम्ही त्याला दुसर्‍या चंद्रगुप्ताचा इतिहास ऐकवायचेत. अगदी कुठल्याशा लेण्यातील शिलालेखातील उल्लेखासहीत. =))

In reply to by सतिश गावडे

खी खी खी. ह्यावरून सिंहासन बत्तिशी मधली सातवी पुतळी कुरंगनयना भोज परमाराला जी गोष्ट सांगते त्यात हेमाद्रीच्या दानखंडाचा उल्लेख आलेला आहे ह्यावरून ही निदान ही गोष्ट तरी १३ व्या शतकानंतर लिहिली गेली आबे हे स्पष्ट होते.

In reply to by स्पा

कसाही करून आस्तिक नास्तिक, देव आणा यात
मी स्वतः नास्तिक आहेच आणि माझ्या मते (अजून विदा जमविलेला नाही) स्वतःहून विनापत्य जीवनशैली (चाईल्डफ्री लाईफस्टाईल) जगणारे वा त्याकडे ओढा असणारे सगळेजण नास्तिकच असावेत (म्हणजे सगळ्या नास्तिकांचा या जीवनशैलीकडे ओढा असेल असे मात्र नाही) ज्यांच्या पाहण्यात अशी काही चाईल्डफ्री जोडपी आहेत त्यांनी यावर प्रकाश पाडावा ही विनंती.

लग्न करायला हरकत नाही, पण मुलं जन्माला घालू नयेत या मताचा मी आहे.ज्याला " जाणिव " आहे त्याला दुखः ओघाने येतात.आयुष्य म्हणजे दुख्खाचा उकीरडा आहे,या उकीरड्यात आप्ल्या आई बापाने आपल्याला जन्माला घालून ढकलले आहे ,आपण आणखी कुणाला तरी जन्माला घालून या उकीरड्यात ढकलू नये. स्वतःला मुल होऊ न देता सुंदर आयुष्य जगलेले अनेक जोडपी आहेत, मुल होणं म्हणजे आपले आयुश्य पुर्णत्वाला जाणं या समजुतीत बाहेर येणे गरजेचे आहे.प्रत्येक स्त्रीला मातृत्वाची ओढ असती हा तर मोठाच गैरसमज आहे.

In reply to by चंद्रनील मुल्हेरकर

सर्वानी असे केले की शंभर वर्षात पृथ्वी निर्मनुष्य होइल. मग मिसळपावावर कोण येइल ? दु:खे आहेत म्हणुन जन्मच घेउ नका हे म्हणजे लाइट बिल येते म्हणुन विजेचे कनेक्शनच घेउ नका असे म्हटल्यासारखे आहे.

In reply to by mugdhagode

गौतम बुद्ध म्हणतात त्यानुसार जीव जन्माला येतो तिथपासूनच दुखः सुरु होते,माणुस रडतच येतो आणि रडतच जातो.त्यामुळे लग्न करा ,मस्त लैंगिक आयुष्य जगा ,पण पोरं जन्माला घालून या प्रचंड अनिश्चीत,दुखःमय, जगाच्या डोहात त्यांना ढकलू नका.बाकी ज्याची त्याची मर्जी.

चला मंडळी,(अ)विवेकवाणीतून 'शोचनीय प्रतिसाद', 'अज्ञानी', 'बालिशपणा', 'घोडेछाप प्रतिसाद' असे पवित्र शब्द सांडले आहेत. आज मला एवढे विटॅमिइन 'मी' पुरे ! टाटा.

मूळ धाग्याचा मूळ प्रश्न काय होता आणि लोक काय गंजिफा खेळतायत राव. लग्न,कुटुंब यांच्या लफड्यात पडण्यापेक्षा आयुष्यभर अविवाहित राहणे जास्त व्यवहार्य व चांगले आहे काय? अविवाहित आयुष्य जास्त आनंदी आहे काय? लग्न, कुटूंब विरुद्ध अविवाहित असा चॉइस करायचाय. आता ह्या प्रश्नाचं उत्तर कोण देऊ शकेल? १. लग्न झालेला कसा देउ शकतो, त्याचे तर लग्न झालेले आयुष्यभर अविवाहितचा अनुभव-अभ्यास नाही. ओके? २. आयुष्यभर अविवाहित असलेला कसा देणार, लग्न झाल्याचा अनुभव नाही. ओके? प्रश्नच नल आणि वॉइड होतोय. आणि पबलिक करतंय भजन. लगे रहो. =)) त्याच मुलं, नैसर्गिक उर्मी, देहरचना इत्यादी बिनमहत्त्वाचे विषय घुसडून भलतंच चाललंय. एखाद्याने विचारले की पैसे म्युचुअल फंडमधे टाकू का आयुश्यभर एफडीत ठेवू तसा आणि तितकाच महत्त्वाचा प्रश्न आहे. उत्तर फक्त चॉईसशी रिलेटेड आहे. मन-बीन सगळ्या बाता. मनाचे काय, पोरं किंकाळ्या मारत असली की हिमालयात जाऊन राहावंसं वाटतं, बाललीला बघितल्या की धन्य झाल्यासारखं वाटतं. ये सब वाटणे पे डिपेंड करता है. मनाचं सगळं चंचल कारभार. आता धरतीवर तर आता आभाळात. तस्मात् ----- जो जे वांछिल तो ते लाहो. अरे मग लाठ्याकाठ्या कशा व्हायच्या, लोक आप आपले घरचे मसाले, मिर्च्या, खोबरं घेऊन खलबत्ते कुटत बसलेत.

In reply to by तर्राट जोकर

प्रश्नच नल आणि वॉइड होतोय.
असं कसं ? दोघे आपापला अनुभव लिहितील आणि मग धागाकर्ता त्यातून जे घ्यायचे ते घेईल. पण खरच धागाकर्त्याला व्यक्तिशः तळ्यात की मळ्यात असा प्रश्न पडलाय आणि इथले प्रतिसाद वाचूनच ते निर्णय घेणार आहेत असं तर तुम्ही समजत नाहीत ना ? एक शतकी धागा काढण्याकरिता प्रयत्न केला आणि तो जाम यशस्वी ठरला इतकंच.
त्याच मुलं, नैसर्गिक उर्मी, देहरचना इत्यादी बिनमहत्त्वाचे विषय घुसडून भलतंच चाललंय.
त्यामुळेच तर धागा व्यवस्थित पेटलाय :)

In reply to by मराठी कथालेखक

तुम्ही माझा प्रतिसाद सिरियसली घेतलाय? अहो दंग्याचाच उद्देश होता खाडेसरांचा. पण प्रश्नाचे उत्तर देता येणार नाही हे स्पष्ट आहे. कारण प्रश्न तुलनेचा विचारला आहे, अनुभवाचा नाही. आयुष्यभर अविवाहित राहिलेला लग्नाच्या तुलनेत उत्तर कसं देणार? आणि लग्न झालेला आयुष्यभर अविवाहित राहणारा नाही त्यामुळे तुलनेत उत्तर कसं देणार? प्रश्नात गडबड आहे असं वाटतं.

In reply to by तर्राट जोकर

हे बरोबर नाही म्हणजे पुरुष "स्त्रीरोग" तज्ञ होऊच शकत नाही असे म्हणण्यासारखे आहे. आणि त्यांनी मुलाला जन्म दिला नाही म्हणजे बाळंत कळा काय आहेत ते स्त्रीरोग तज्ञाला समजणारच नाहीत असे म्हणण्यासारखे आहे.

In reply to by सुबोध खरे

ह्या अर्थाने तर मग विठांचे स्त्रीदेहाबद्दलचे सर्व प्रतिसाद वॅलिड ठरतील. हाउ'ज दॅट? आयुष्यभर वेज खाणारा आणि आयुष्यभर नॉनवेज खाणारा एकापेक्षा दुसरं कसं चांगलं ह्याबद्दल मत देण्यास लाय्क आहे का? अनुभवाच्या तुलनेचा प्रश्न आहे डॉक्टरसाहेब. अभ्यासाचा-चिकित्सेचा नाही.

कसही असो, मला 'हाउस ऑफ कार्डस' मधली जोडी आठवली :) त्यांनी निर्णय घेतलेला असतो की करीअर साठी मूल न होऊ देण्याचा. एका टप्प्यावर 'ती'ला मुलाची ओढ वाटू लागते.

In reply to by मराठी कथालेखक

गरजच नाई. ब्रायन लारा बॅटिंग करायचा तेव्हा नॉन स्ट्रायकर पण प्रेक्षकात जमा व्हायचा. इथे तर लारा, तेंडुलकर, धोनी, वॉर्नर सगळेच खेळतायत!

250 व्या अपत्य प्राप्ती नंतर या धाग्याच्या अस्तित्वाचे प्रयोजन संपेल. तस्मात, नंतर चर्चाच करण्याचे कारण राहणार नाही. ओळखा :- धाग्याचे लिंग नेमके कोणते आहे? साडे दोन गुण

मलाही एक धागा काढायचाय, एकोळी पुरुष बनण्याच्या लफड्यात पडण्यापेक्षा आयुष्यभर स्त्री राहणे जास्त व्यवहार्य व चांगले आहे काय? पुरुषाचे आयुष्य जास्त आनंदी आहे काय?

डुआयडी-जन्म ही मिपाब्यानांची अत्यंत नैसर्गिक इच्छा आहे. कारण मिपाब्यान देहाची घडणच संमंनं डु-आयडी जन्मासाठी केली आहे. तस्मात, डु-आयडी जन्माविना मिपाब्यानाला अपूर्णत्व जाणवत राहातं हा डु-आयडी-वंध्यत्वाच्या समस्येचा सामना करणार्‍यांचा अनुभव आहे. थोडक्यात, डुआयडी-फ्री सर्वज्ञ हा फार काळ टिकणारा पर्याय असू शकत नाही. सर-चरणी समर्पित

In reply to by पिशी अबोली

हा सर्वज्ञ नेमका बॅन कसा झाला ? कोणता होता तो धाग, तो प्रतिसाद ज्यामुळे तो बॅन झाला ?