Skip to main content

लाईफलोंग ब्याचलर

लेखक निशांत_खाडे यांनी रविवार, 01/05/2016 16:14 या दिवशी प्रकाशित केले.
आज नेहमी प्रमाणे कोरा (Quora) वर फिरत असताना एक इंटरेस्टिंग प्रश्न सापडला. तोच इथे चोप्यपस्ते करतोय. "लग्न,कुटुंब यांच्या लफड्यात पडण्यापेक्षा आयुष्यभर अविवाहित राहणे जास्त व्यवहार्य व चांगले आहे काय? अविवाहित आयुष्य जास्त आनंदी आहे काय?" काही दुवे:

वाचने 31818
प्रतिक्रिया 255

प्रतिक्रिया

In reply to by सस्नेह

ते क्लिअर आहे स्नेहातै ! वर्तमानात जगणे, सहजीवनाचा आनंद घेणे, पूर्णत्वाचा साक्षात्कार होणे व इतरांना हा प्रकाशाचा मार्ग दाखवणे वगैरे =))

In reply to by विवेक ठाकूर

निसर्गाच्या स्त्री देहनिर्मितीचा उद्देश काय ?
निसर्गाने येवून कानात सांगितले का उद्देश काय आहे ते ? की निसर्गाचे कुठले proposal document हाती लागले तुमच्या ? बाकी माणूस निसर्गाच्या उद्देशाचा विचार करत बसणार की स्वतःच्या उद्देशांचा विचार करणार ?

In reply to by मराठी कथालेखक

जर एका स्त्रीनं अपत्याला जन्म दिला नसता तर तुम्ही वरचा प्रतिसाद देऊ शकला असता का ?

In reply to by विवेक ठाकूर

खरंय तुमचं!! एका स्त्रीने एका अपत्याला जन्म दिला म्हणून तर ह्या धाग्याचे २१२ प्रतिसाद झालेत.

In reply to by विवेक ठाकूर

काय बालिश प्रश्न आहे... मी असं म्हंटलेलच नाही की जगातील प्रत्येक स्त्रीला आई होण्याची इच्छा नसते. माझ्या आईला आणि माझ्या वडीलांनाही अपत्यप्राप्तीची इच्छा होती म्हणून मी जन्माला आलो हे उघडंच आहे. पण म्हणून मलाही तशी इच्छा असावी किंवा जगातल्या प्रत्येक स्त्रीला वा पुरुषाला अशी इच्छा असायलाच हवी असा हट्ट धरण्यात काय अर्थ आहे.

In reply to by मराठी कथालेखक

ओ, ते सदैव शांत व समग्र असणार्‍या तुकारामाचे भक्त आहेत. तीक्ष्ण उत्तरे देतात, तुम्हीच पुढे बरे होत नाही हा तुमचा प्रॉब्लेम आहे.

In reply to by मराठी कथालेखक

निसर्गाच्या स्त्री देहनिर्मितीचा उद्देश काय ? निसर्गाने येवून कानात सांगितले का उद्देश काय आहे ते ? की निसर्गाचे कुठले proposal document हाती लागले तुमच्या ? याला मी उत्तर दिलंय. पुढे तुम्ही म्हटलंय बाकी माणूस निसर्गाच्या उद्देशाचा विचार करत बसणार की स्वतःच्या उद्देशांचा विचार करणार ? तुमचा उद्देश काय ते तुम्ही ठरवा. मी निसर्गाच्या स्त्रीदेह निर्मितीचा उद्देश सांगितला.

In reply to by विवेक ठाकूर

निसर्ग पण तुम्हाला आधी विचारात घेतो बहुतेक. बरंय.स्त्री पण फक्त तुम्हाला कळली,स्त्रीच्या सर्व ऊर्मी तुम्हालाच कळतात.निसर्ग तुमच्या आज्ञेबाहेर नाही. आप महापुरूष हो _/\_

In reply to by विवेक ठाकूर

हो ना. तसंच काहि अपत्यांना त्यांच्या आयांनी जन्म दिलाच नसता तर बरे असेही वाटते.

In reply to by विवेक ठाकूर

पुन्हा तेच विठा? तुमच्या पहाण्यात नाही म्हणुन अस्तित्वात नाही? मला १००% खात्री आहे की इथल्या कुणीही काहीही सांगितलं तरी तुम्ही तुमची मतं तपासुन सुद्धा बघण्याची तयारी दाखवणार नाहीत. पण तरीही एक स्त्री म्हणुन तुमच्या विधानांना किमान विरोध तरी नोंदवणं आवश्यक वाटतं. बहुसंख्य स्त्रियांना मुल असावे असे वाटते हे खरेच आहे. पण त्यात त्यांच्या शाररिक जडणघडणीसोबतच त्यांच्या मानसिक जडणघडणीचाही पुष्कळ वाटा असतो. ज्या स्त्रिया ह्या एखाद्या ध्येयाने प्रेरित असतात, ज्यांना लग्न/नवरा/मुलं हीच आयुष्याची इतिकर्तव्यता वाटत नाही त्यांना अपुर्ण वगैरेही काही वाटत नाही. मागे एकदा तुम्ही हाच मुद्दा मांडत होतात की स्त्रीला आपल्या देहाविषयी अभिमान वाटायला ऑगॅझम आवश्यक असतो. आता म्हणताय की पुर्णत्व वाटायला मुल आवश्यक असते. लग्न टिकायला सुद्धा मुल आवश्यक असते. एकंदरित स्त्री देहाचे सार्थक व्हायला लग्न, उत्तम शरीरसंबंध, मग त्यातुन मुल हे सर्व आवश्यक असतेच, अन्यथा तिला एकंदरित स्त्री म्हणुन अपुर्णच वाटेल. असं असतं तर जगात अनेक स्त्रिया वरील पैकी एकही गोष्ट नसताना यशस्वी झाल्या नसत्या. उदा:- किशोरी आमोणकर, लता मंगेशकर (बॉलीवुड मध्ये तर कितीतरी नावं असतील..) हय बायकांना स्वतः विषयी अभिमान नाही असं तुम्हाला वाटतं का? कुण्या पुरुषाने येऊन ह्यांचे जीवन धन्य करणे आवश्यक आहे असं वाटतं का? ह्या व्यक्ति ह्या सगळ्याच्या पलीकडे गेलेल्या आहेत असं वाटत नाही का? एरवी बरेच पुढारलेले विचार असणारा तुमच्यासारखा शिकलेला, व्यासंग असलेला, विचारी माणुस, स्त्री देहाच्या बाबतीत अशी विधाने कशी करतो ह्याचे मला राहुन राहुन आश्चर्य वाटते. लग्ना बाबतीतही तुम्ही अशीच होलसेल मध्ये विधाने केली आहेत. माझ्या ओळखीत एक शिक्षक जोडपे आहे. आता त्यांना रिटायर होऊनही १०-१५ वर्ष झाली असतील. त्यांना मुलबाळ झाले नाही. ह्याची खंत असेलही त्यांना. पण म्हणुन दोघांच्या वागण्या-बोलण्यात कधीही काही जाणवत नाही. इतकं परिपुर्ण आयुष्य जगते हे जोडपे. अगदी समरसुन.. तयंच्या मुल नसल्याने कोणताही दुरावा आला नाही, उलट एकमेकांविषयी जास्तच हळवेपणा आला. एकमेकांना खुपच जपण्याची वृत्ती आली. माझ्याही एका बहिणीला मुल नव्हते. तिला मुलाची ओढ होती. लग्नाची १० वर्ष अशीच गेली. पण आमच्या ताइ भावोजींनी एकमेकांना लावलेला जीव पहायला हवा तुम्ही. पुढे त्यांनी मुल दत्तक घेतले. पण १० वर्षात ते एकमेकांच्या अतिशय जवळ आले. मला वाटतं की एकमेकांवर निस्सीम प्रेम असेल तर उलट मुल नसल्याच्या दु:खात जोडपी फार जवळ येतात. कोणत्याही आनंदापेक्षा कोणतेही दु:ख, संघर्ष आपल्याला जास्त जवळ आणतो. संसार टिकतात ते नवरा बायको मधल्या प्रेमाने. अतुट नात्याने. मुल हा बोनस आहे. घटस्फोट होतो तो हे नातंच नसतं म्हणुन. मुल असेल तर फक्त ते नातं ओढण्याचा खेळ चालु रहातो. त्याला संसार म्हणत नाहीत. मुअलंची फरफट नको म्हणुन घटस्फोट टाळला जातो अनेकदा.. खरंय हे.. पण म्हणुन नाते टिकवले जात नाही. ज्यांना त्यातही राम वाटत नाही ते वेगळे होतातच ना? एका घरात राहुनही, मुल बाळ असुनही आणि घटस्फोटापर्यंत गोष्टी गेलेल्या नसुनही लोक प्रचंड असमाधानी असु शकतात. तेव्हा लग्न, मुल ही काही आनंदाची गुरुकिल्ली नाही. त्याला नवरा बायकोत प्रेमच असावं लागतं. आणि प्रेम असेल तर मुल असो वा नसो, फरक पडत नाही.

In reply to by पिलीयन रायडर

पिराजी, प्रतिसाद आवडला. खासकरुन शेवटचा परिच्छेद मस्तच.
तेव्हा लग्न, मुल ही काही आनंदाची गुरुकिल्ली नाही. त्याला नवरा बायकोत प्रेमच असावं लागतं. आणि प्रेम असेल तर मुल असो वा नसो, फरक पडत नाही.
प्रचंड सहमत

In reply to by मराठी कथालेखक

पण आता दुसरी बाजू पाहा. प्रेम असेल तर मुलांची कटकट वाटत नाही आणि विभक्त होण्याची सोय म्हणून `चाइल्ड- फ्री मॅरेज' असा विचारसुद्धा मनाला शिवत नाही.

In reply to by विवेक ठाकूर

प्रेम नसेल पण बारा पोरं आहेत म्हणुन जोडपे सुखात आहे असे म्हणायचे का? ज्यांनी चाईल्ड फ्री मॅरेजचा निर्णय घेतला आहे त्यांच्यात प्रेम नसतेच का? चाईल्ड फ्री मॅरेजचा निर्णय हा फक्त "विभक्त होण्याची सोय" असतो का? एकमेकांवर प्रचंड प्रेम असले तरी मुल नकोच असणे हे कारण असण्याची शक्यताच नसते का? ज्यांना मुलं असतात ते कधी विभक्तच होत नाहीत का? ज्यांना मुलं आहेत त्यांच्यात प्रेमही आहे असे ठामपणे म्हणता येते का?

In reply to by पिलीयन रायडर

प्रेम नसेल पण बारा पोरं आहेत म्हणुन जोडपे सुखात आहे असे म्हणायचे का? प्रेम असेल तर मुल नसेल तरी चालेल हे आधीच लिहीलंय ते वाचलं नाही का ? ज्यांनी चाईल्ड फ्री मॅरेजचा निर्णय घेतला आहे त्यांच्यात प्रेम नसतेच का? मुल नसल्यास काय अडचणी येऊ शकतात असा विषय आहे. तुम्ही सारखं प्रेम-प्रेम काय लावून धरलंय ? चाईल्ड फ्री मॅरेजचा निर्णय हा फक्त "विभक्त होण्याची सोय" असतो का? एकमेकांवर प्रचंड प्रेम असले तरी मुल नकोच असणे हे कारण असण्याची शक्यताच नसते का? प्रेम असेल तर मुल का नको असा प्रश्न स्वतःलाच विचारून पाहा. ज्यांना मुलं असतात ते कधी विभक्तच होत नाहीत का? तुम्ही विनोदी आहात का ? मुलामुळे जिव्हाळा वाढतो आणि किरकोळ पारस्पारिक मतभेदांपेक्षा मुलाचं भवितव्य महत्त्वाचं आहे हे कळू शकतं. ज्यांना मुलं आहेत त्यांच्यात प्रेमही आहे असे ठामपणे म्हणता येते का? उलट आहे. ज्यांच्यात प्रेम आहे त्यांना मुल ही कटकट वाटत नाही.

In reply to by विवेक ठाकूर

हा आपला मुळ प्रतिसाद. यावरनंही ते स्पष्ट होतं. शिवाय अपत्यजन्म ही स्त्रीची अत्यंत नैसर्गिक इच्छा आहे. कारण स्त्री देहाची घडणच निसर्गानं अपत्य जन्मासाठी केली आहे. तस्मात, अपत्य जन्माविना स्त्रीला अपूर्णत्व जाणवत राहातं हा वंध्यत्वाच्या समस्येचा सामना करणार्‍यांचा अनुभव आहे. थोडक्यात, चाईल्डफ्री कपल हा फार काळ टिकणारा पर्याय असू शकत नाही. मी दोन मुद्द्यांवर तुमच्याशी बोलत आहे. १. स्त्री ला पुर्णत्व जाणवण्यासाठी अपत्याची गरज आहे की नाही (तुम्ही म्हणताय आहे.. मी म्हणतेय नाही) २. मुल असल्यानेच जोडपी एकमेकांसोबत आनंदी असतात. जे जोडपी मुल न होऊ देण्याचा निर्णय घेतात ते लग्न टिकण्याची शक्यता कमी असते (हे तुम्ही म्हणताय, जे अर्थातच मला मान्य नाही.) आता हा वरचा प्रतिसादः-
१. प्रेम नसेल पण बारा पोरं आहेत म्हणुन जोडपे सुखात आहे असे म्हणायचे का? प्रेम असेल तर मुल नसेल तरी चालेल हे आधीच लिहीलंय ते वाचलं नाही का ?
कुठे लिहीलेय नक्की? कारण वर तर म्हणताय की "चाईल्डफ्री कपल हा फार काळ टिकणारा पर्याय असू शकत नाही". ह्या केस मध्ये मुल नसेल पण प्रेम असु शकतेच की? मग का नाही टिकणार हे लग्न?
२. ज्यांनी चाईल्ड फ्री मॅरेजचा निर्णय घेतला आहे त्यांच्यात प्रेम नसतेच का? मुल नसल्यास काय अडचणी येऊ शकतात असा विषय आहे. तुम्ही सारखं प्रेम-प्रेम काय लावून धरलंय ?
मुल नसतानाच्या अडचणी? असा विषय आहे? नक्की? की "मुल हीच एक अडचण" असा विषय आहे? तुम्ही गणित मांडतात ते "मुल आवश्यक" ह्या मुद्द्यावर. मी म्हणतेय "प्रेम आवश्यक". मग मी तेच लावुन धरणार ना?
३.चाईल्ड फ्री मॅरेजचा निर्णय हा फक्त "विभक्त होण्याची सोय" असतो का? एकमेकांवर प्रचंड प्रेम असले तरी मुल नकोच असणे हे कारण असण्याची शक्यताच नसते का? प्रेम असेल तर मुल का नको असा प्रश्न स्वतःलाच विचारून पाहा.
प्रेम आहे म्हणुन मुलही हवेच ही कोणती नवीन अट? मुल नको असण्याची अनेक कारणे असु शकतात.
४. ज्यांना मुलं असतात ते कधी विभक्तच होत नाहीत का? तुम्ही विनोदी आहात का ? मुलामुळे जिव्हाळा वाढतो आणि किरकोळ पारस्पारिक मतभेदांपेक्षा मुलाचं भवितव्य महत्त्वाचं आहे हे कळू शकतं.
माझा प्रश्न तुम्ही नीट वाचलेला दिसत नाही. प्रश्नाचे उत्तर हो किंवा नाही मध्ये अपेक्षित होते. जे लोक विभक्त होतात त्यांना मुलं नसतातच का? अर्थातच असतात. म्हणजेच मुल असणे विभक्त होण्यास थोडासा अडथळा निर्माण करु शकत असले तरी थांबवु शकेलच असे नाही. आणि हो मी विनोदी आहे. तुम्ही आहात का?
५.ज्यांना मुलं आहेत त्यांच्यात प्रेमही आहे असे ठामपणे म्हणता येते का? उलट आहे. ज्यांच्यात प्रेम आहे त्यांना मुल ही कटकट वाटत नाही.
पुन्हा एकदा.. नीट वाचा. ज्यांच्यात प्रेम नाही पण मुलं आहेत अशांविषयी प्रश्न आहे तो. मुद्दा एकच मांडायचा आहे की मुल असुनही प्रेम निर्माणच झाले नाही अशा अनेक केसेस असतात. इथेही हेच अधोरेखित होते की "प्रेम आवश्यक". मुल नाही. म्हणजेच "चाईल्ड फ्री मॅरेज कॅन वर्क व्हेरी वेल".

In reply to by पिलीयन रायडर

१. स्त्री ला पुर्णत्व जाणवण्यासाठी अपत्याची गरज आहे की नाही हो आहे. कारण ते स्त्री देहनिर्मिती मागचं निसर्गाचं मूळ प्रयोजन आहे. आणि प्रत्येक सजीव हा निसर्गाचा अविभाज्य घटक आहे. तस्मात, निसर्गाविपरित जाऊन पूर्णत्व मिळणं असंभव. वरुन कुणी काहीही म्हणो. २. मुल असल्यानेच जोडपी एकमेकांसोबत आनंदी असतात. जे जोडपी मुल न होऊ देण्याचा निर्णय घेतात ते लग्न टिकण्याची शक्यता कमी असते विधानातला पहिला भाग तुम्ही जोडलायं. माझं म्हणणं इतकंच आहे की मुलामुळे जोडप्यात कमिटमंट येते. दुसर्‍या भागाविषयी माझं म्हणणं असं की मूल हा दांपत्यातला सेतू आहे. त्याच्याकडे कुणी कटकट म्हणून पाहात असेल तर तो त्याचा प्रश्न. पण एकदा मूल झालं की आपापसातले मतभेद दूर सारुन सुजाण दांपत्य विभक्तीच्या निर्णयापासून दूर राहाण्याची, आणि तदुनाशंगानं लग्न टिकून राहाण्याची शक्यता जास्त आहे. मूलच नसेल तर किरकोळ मुद्दे सुद्धा उग्ररुप धारण करतात आणि विभक्ती आपसूक होते.

In reply to by विवेक ठाकूर

आपले विचार समजले. माझ्याकडुन समरी :- १. स्त्री देह किंवा पुरुष देह ह्यांच्या निर्मितीचे कारण वगैरे ठामपणे मी सांगु शकत नाही. पण स्त्रीया अपत्याशिवायही पुर्णत्व अनभवु शकतात. एकंदरित आपल्या देहाचा अभिमान वाटायला किंवा पुर्णत्व वगैरे वाटायला कोणत्याही बाह्य गोष्टीची गरज नसते. (आठवा... पुर्णमदः पुर्णमिदं.... हो की नाही? सगळं काही ज्या अवस्थेत आहे.. पुर्णच आहे. तेव्हा मुल असो वा नसो.. स्त्रीला तसे वाटो वा न वाटो.. ती स्त्री पुर्णच आहे... हे ज्यांना उमगतं त्या स्त्रिया मुल न होऊ देण्याचा निर्णय घेऊनही आनंदात राहु शकतात. त्यांना कोणतेही वैष्यम्य अथवा अपुर्णत्व जाणवत नाही. हरि ओम!) २. मुल असणे हा सुद्धा केवळ एक मुद्दा आहे. लग्न / नाते टिकणे ह्याला केवळ त्या नात्यात प्रेम आवश्यक आहे. ते असेल तर किरकोळ मुद्दे किरकोळच रहातात. ते नसेल तर मुल असुनही किरकोळ मुद्द्यांमधुन दुरावा निर्माण होऊ शकतोच. मुलांसाठी सोबत रहाणे ही निव्वळ तडजोड असते. तस्मात एकत्र रहाणे हे "प्रेमावर" अवलंबुन आहे, मुल असण्यावर नाही. तस्मात समरी अशी की मला आपले विचार मान्य नाहीत. धन्यवाद! अवांतर :- पुरुष देहाविषयीचे आपले विचार ऐकायला आवडतील.

In reply to by पिलीयन रायडर

सगळं काही ज्या अवस्थेत आहे.. पुर्णच आहे. तेव्हा मुल असो वा नसो हे कळलेल्यांना `विचारणेचा धागा' काढायची आवश्यकताच नसते. पण धागा काढलायं म्हणजे पूर्णत्व समजलेलं नाही. इतपत तरी समजायला हरकत नाही. तस्मात एकत्र रहाणे हे "प्रेमावर" अवलंबुन आहे, मुल असण्यावर नाही. प्रेम असेल तर मुल असण्याची अडचण तर वाटत नाहीच. उलट अपत्यप्राप्तीचा आनंद होतो. हे बहुदा स्वानुभवानं कुणाच्याही लक्षात येईल. पण वादासाठी वाद घालून विषय भरकटवण्यात आपला हात कोण धरणार ? तस्मात समरी अशी की मला आपले विचार मान्य नाहीत. हे असं पाहिजे : तस्मात, भाषा कॉपी मारुन आकलन झालं असं समजणं फक्त अज्ञान दर्शवतं.

In reply to by विवेक ठाकूर

जे निर्णयावर ठाम आहेत त्यांना ; शिवाय ज्यांना पूर्णवाद समजला आहे त्यांना धागा काढायची गरज नसते हे मान्य. पण मग आपले मुद्दे सर्वांनी मान्य करेपर्यंत सांगत रहायची तळमळ का असते ब्रे ??? जर मुद्दे क्लिअर असतील आणि 'स्वत:ला' पटलेले असतील तर लोक किती का धागे काढेनात ! आपण आपलं त्यांना मंदस्मित देऊन आपल्याला समजलेला सत् चिद् आनंद लुटावा. हा व्यर्थ शब्दांचा गल्बला का ???

In reply to by मितान

अगं पण मितान, धाग्यात फक्त लग्न करावे की करु नये एवढाच मुद्दा आहे. मुल जन्माला घालण्याचा आणि पुर्णत्वाचा मुद्दा विठांनी इथे आणला आहे. असे असताना पुन्हा अजुन विठा धागाकर्त्यावर का घसरत आहेत. दुसर्‍या धाग्यात "सगळं काही पुर्ण आहे" असं म्हणायचं आणि इथे येऊन "मुल जन्माला घातल्याशिवाय स्त्रीला पुर्णत्व नाही" असंही म्हणायचं. म्हणजे वंध्यत्व असणार्‍या स्त्रिया, ज्यांना नवरा नसल्याने मुल होऊ शकत नाही अशा स्त्रिया, ज्यांना मुल नकोच आहे अशा स्त्रिया.. सर्व जणी अपुर्ण??

In reply to by विवेक ठाकूर

पुरे हं विठा... मी सभ्यपणे बोलतेय तर तुम्ही सुद्धा तसंच बोलावं अशी अपेक्षा ठेवायला हरकत नसावी नाही का? मी तुम्हाला खालील एका प्रतिसादात व्यवस्थित विचारलं होतं की एकमेकांची अक्कल न काढता चर्चा करायची का म्हणुन. शिवाय मी एकदाही वैयक्तिक प्रतिसाद दिलेला नाही. असे असताना आपण "चर्चा भरकटवते" किंवा "अज्ञानी आहे" "भाषेची कॉपी मारते" इ. वैयक्तिक प्रतिसाद का देत आहात ते कळत नाही. तुम्हाला नाही समजलं तर ठिके.. तसं सांगा.. पण म्हणुन दुसर्‍यावर आरोप करणे चुक आहे. बाकी तुम्ही "तस्मात" म्हणता का सारखं? कारण मी हा शब्द पु.लंच्या "असा मी असामी" मध्ये बेमट्याचे वडील वापरतात तशा अर्थाने इथे वापरते. तुमचा त्यावर कुठे कॉपीराईट रजिस्टर्ड असल्यास कळवावे. आणि एका शब्दाने भाषा कशी कॉपी होते हे ही सांगावे. अन्यथा हा आरोप मागे घ्यावा. जाता जाता..
सगळं काही ज्या अवस्थेत आहे.. पुर्णच आहे. तेव्हा मुल असो वा नसो हे कळलेल्यांना `विचारणेचा धागा' काढायची आवश्यकताच नसते. पण धागा काढलायं म्हणजे पूर्णत्व समजलेलं नाही. इतपत तरी समजायला हरकत नाही.
हे तुम्ही मला दिलेल्या आजवरच्या सर्व प्रतिसादांमधला सर्वात हुकलेला प्रतिवाद आहे. =)) मुद्दा काय.. तुम्ही बोलताय काय.. माय गॉड सो फन्नी!!!

In reply to by विवेक ठाकूर

प्रेम असेल तर मुल असण्याची अडचण तर वाटत नाहीच. उलट अपत्यप्राप्तीचा आनंद होतो. म्हणजे ज्यांना मुल अडचण वाटते त्यांचे एकमेकांवर प्रेम नसते असे म्हणायचे आहे का आपल्याला ? कृपया माझ्या सारख्या अति सामान्य व्यक्तीला समजेल असे आणि एका शब्दात उत्तर दिले तर फार बरे होईल. धन्यवाद.

In reply to by गणामास्तर

प्रेम असेल तर मुल असण्याची अडचण तर वाटत नाहीच. उलट अपत्यप्राप्तीचा आनंद होतो. इथे अनेक अपत्यप्राप्त विवाहित आहेत. सगळ्यांचा अनुभव काय आहे ? अपत्यप्राप्तीचं दु:ख झालेलं कुणी आहे का? म्हणजे ज्यांना मुल अडचण वाटते त्यांचे एकमेकांवर प्रेम नसते असे म्हणायचे आहे का आपल्याला ? मुल ही वैवाहिक जीवनाची आणि पारस्पारिक प्रेमाची सहज फलनिष्पत्ती आहे. मुल ही कटकट वाटणारं दांपत्य माझ्या तरी पाहाण्यात नाही.

In reply to by विवेक ठाकूर

दुसर्‍यांना वाटत नसेल, आणि तरीही त्यांच्यामते ते सुखी असतील तर त्या सुखाला तुमची काही हरकत आहे का? असल्यास त्या हरकतीचा त्यांना फरक पडत नसेल, तर त्यालाही तुमची हरकत आहे का? असो. माझा एक मित्र आहे. त्यानी व त्याच्या बायकोनी 'मुल नकोय' असं ठरवलंय.. ते त्यांचं आयुष्य सुखात जगताहेत. आम्हाला मुलगी आहे. बायकोची इच्छा आणि सहमती असल्यास पुढेपण बघू. आम्हीही सुखी आहोत (असं मला वाटतं.) मग ह्या दोन परीवारांत कमी-जास्त करायचं का? आणि कशाला?

In reply to by विवेक ठाकूर

प्रेम असेल तर मुल का नको असा प्रश्न स्वतःलाच विचारून पाहा.
बाकी या प्रश्नाने पुरती करमणूक झाली. धन्यवाद :)

In reply to by विवेक ठाकूर

ह्या सगळ्यावर संक्षींच्या एखाद्या धाग्याचा संदर्भ दिला असतात तर आणि बहार आली असती.

In reply to by सूड

इतके धागे आहेत की भर्जरी दैदिप्यमान वस्त्र तयार होईल. पण वस्त्र विणने इज जस्ट नॉट माय कप ऑफ टी यु नो :( याच धाग्यात सरांना दोन तीन प्रतिसादात 'ज्योक' सापडलेत !!

In reply to by मितान

सरांनाच सांगतोय संदर्भ द्यायला. संक्षिप्त सांगण्यात संक्षींचे धागे त्यांना फार उपयोगी होतात म्हणे. ;)

In reply to by विवेक ठाकूर

साहेब, प्रजनन ही सजीवांची नैसर्गिक प्रेरणा आहे असे म्हणायचे आहे का ?

In reply to by लंबूटांग

अशी कैक जोडपी बघितली आहेत ज्यांनी मूल नं होऊ देण्याचा निर्णय घेतला आहे. एक जोडपं तर २० एक वर्ष सुखाने नांदत आहे.
या जोडप्यांबद्दल अधिक काही शेअर करु शकाल का ? खास करुन २० वर्षे नांदणार्‍या जोडप्याबद्दल - त्यांनी हा निर्णय कसा घेतल ? सुरवातीपासूनच एकमत होते की एकाने दुसर्‍याचे मतपरिवर्तन घडवले ? काय अडचणी आल्यात ? घरच्यांना , समाजाला , विचारल्या जाणार्‍या प्रश्नांना कसे तोंड दिले ? काही ठिकाणी निपुत्रिक स्त्रियांना सन्मानाने वागवले जात नाहि , या स्त्रीला अशा काही प्रसंगांना सामोरे जावे लागले का ?

In reply to by मराठी कथालेखक

म्हणजे असे बोलताना तरी त्यांनी "We don't want kids" असे सांगितले. सर्व काही जवळचे मित्र मैत्रिणी नाहीयेत पण ज्यांना बर्‍यापैकी ओळखतो त्यांच्याबद्दल सांगतो. खाली कोणीतरी करिअरचे उदाहरण दिले आहे तर तो मुद्दा यापैकी कोणाचाच नव्हता. एकीने सांगितले की माझ्यात ते मदरली इन्स्टिंक्ट्सच नाहीयेत. तर कशाला मुलं होऊ देऊन वाढवू? मी तर सुखी होणारच नाही पण उगाच एक नवीन जीव जन्माला घालून त्याचे आयुष्यही मुलं नं आवडणार्‍या आईबरोबर जाईल. दुसरीचेही साधारण तसेच काहीसे. मुलं आवडतात पण काहीतास खेळायला वगैरे ठीक आहे. वाढवणे वगैरे शक्य नाही. माझ्या माहितीतली सर्व उदाहरणे अमेरिकेतली आहेत. इथे फारच कमी प्रमाणात इतरांच्या आयुष्यात लुडबुड केली जाते. त्यामुळे निपुत्रिक स्त्रियांना सन्मानाने वागवले जात नाही वगैरे प्रश्न आले नसावेत. एकीने सांगितले होते की घरचे अधून मधून विचारतात आणि अजून तरी त्यांना सांगितलेले नाहीये की आम्ही मूल होऊ देणारच नाहीये. माझ्या भावंडांना मुले आहेत त्यामुळे माझ्या आई वडलांना नातवंडांचे सुख मिळाले आहे, मिळते आहे. २० वर्षे नांदणारे जोडपे तसे वयाने फार मोठे नाहीये. लवकर लग्न केल्याने आत्ता चाळीशीत प्रवेश करतायत. त्यांना दोघांनाही जबाबदारी नको होती. आपल्याला पाहिजे तेव्हा पाहिजे ते करता यायला हवे आणि मुलांची आवडही इतकी नाही की स्वतःचे हवे. बाकी एक दोन अविवाहीत मैत्रिणींनी लहानपणी child abuse वगैरे पाहिल्यामुळे त्यांना मूल नको आहे वगैरे सांगितले होते पण तो अजूनच वेगळा विषय आहे.

In reply to by लंबूटांग

धन्यवाद.
एकीने सांगितले की माझ्यात ते मदरली इन्स्टिंक्ट्सच नाहीयेत. तर कशाला मुलं होऊ देऊन वाढवू? मी तर सुखी होणारच नाही पण उगाच एक नवीन जीव जन्माला घालून त्याचे आयुष्यही मुलं नं आवडणार्‍या आईबरोबर जाईल. दुसरीचेही साधारण तसेच काहीसे. मुलं आवडतात पण काहीतास खेळायला वगैरे ठीक आहे. वाढवणे वगैरे शक्य नाही.
त्यांना दोघांनाही जबाबदारी नको होती. आपल्याला पाहिजे तेव्हा पाहिजे ते करता यायला हवे आणि मुलांची आवडही इतकी नाही की स्वतःचे हवे.
म्हणजे अपुर्णत्व वगैरे काही नाही तर !!

In reply to by मराठी कथालेखक

ओ नाही हो.. तुम्हाला जेन्युईनली ह्या मुद्द्यात रस आहे म्हणुन सांगते.. अशा अनेक बायका असतात ज्यांना खरंच आई होण्यात रस नसतो. आणि त्यांना अजिबात अपुर्ण वाटत नाही. मज्जेत असतात त्या. बादवे, कुणी मला खरंच सांगेल का की पुरूषांना अशी वडील होण्याची ओढ असते का? पुरूष हा टिपीकली जबाबदारी झटकणारा रंगवला जातो. पण आजकाल बाप म्हणुन पोरांमध्ये अगदी रंगुन गेलेले पुरूष खुप दिसतात.

In reply to by पिलीयन रायडर

नक्कीच असते ! आजकल कितीतरी पुरुष आनंदाने मुलाचे लाड करतात. शी शू काढण्यापासून ते डायपर बदलण्यापर्यंत , रात्रीची जागरण अँजॉय करतात.

In reply to by पिलीयन रायडर

धन्यवाद पिरा... मला नाहीये, पण अनेक पुरुषांना वडील होण्याची ओढ असते. माझे अनेक मित्र पोरांमध्ये बराच वेळ व्यस्त असतात. पण तरी करिअर वा इतर काही कारणांमुळे मुलांपासून काही महिने वगैरे दूर रहावे लागले तर राहतातही. त्यामुळे आईची आणि वडिलांची मुलांशी असलेली बांधिलकी यात अजूनही फरक आहे असेच वाटते.

In reply to by विवेक ठाकूर

विचारामागचा हेतू कळणं अवघड नाही. अर्थात, तुम्हीच म्हटलंय : फार कटकट होत असेल तर (मुलबाळ नसलेले) थोडे अधिक सहजपणे विभक्तही होवू शकतात
मी जे म्हंटलं (फार कटकट होत असेल तर (मुलबाळ नसलेले) थोडे अधिक सहजपणे विभक्तही होवू शकतात) हा चाईल्डफ्रीचा हेतू आहे असा तुम्ही गैरसमज करुन घेतला आहे. तो चाईल्डफ्री वैवाहिक जीवनाचा हेतू नसून एक अतिरिक्त परिणाम /काही अंशी फायदा आहे. बाकी ज्यांना सहजी विभक्त होण्याचा प्रयाय खूला हवा आहे म्हणून मूल नकोय (जसा अर्थ तुम्ही काढताय त्याप्रमाणे) ते लग्न न करता लिव-इन रिलेशन, ओपन रिलेशन हे पर्याय सहज अवलंबू शकतात. लग्नाची त्यांना गरजच नाही. शिवाय
अपत्यजन्म ही स्त्रीची अत्यंत नैसर्गिक इच्छा आहे , तस्मात, अपत्य जन्माविना स्त्रीला अपूर्णत्व जाणवत राहातं
हे ९९.९९ % खरंही असेल पण १००% नाही. तुम्ही अमोल पालेकर यांनी रघुनाथ धोंडो कर्वे यांच्यावर बनविलेला ध्यासपर्व हा चरित्रपट पाहिला अहे का ? (पालेकरांवर तुमचा विश्वास असेल असे गृहीत धरतो, तसेहि कर्वेंच्या कुणा नातेवाईकाने चित्रपटाचा प्रतिवाद केल्याचे ऐकिवात नाही). यात असे अगदी स्पष्ट दाखवले आहे की रधोंच्या पत्नी मालती यांनाही अपत्य जन्माला घालण्याची मुळातूनच इच्छा नव्हती (म्हणजे रधोंनी भरीस घातलेय असे वगैरे नक्कीच नाही) बाकी चित्रपट उत्कृष्ट आहेच. युट्युबवर पाहू शकता.

In reply to by मराठी कथालेखक

दोनच कारणं आहेत : एक, मुलांची कटकट वाटणं किंवा दोन, विभक्त व्हायला सोपं जाणं. स्त्रीला अपूर्णत्व वाटणं नैसर्गिक आहे कारण निसर्गाचा हेतू स्वतःचं निरंतरत्व टिकवणं आहे, मग एखाद्याचा व्यक्तिगत हेतू भले यूएस प्रेसिडेंट व्हायचा असो. अर्थात, मुलं ही कटकट वाटावी का सहजीवनाचा आनंददायी भाग वाटावीत हा ज्याचा त्याचा दृष्टीकोन आहे. शिवाय मुलं शाळेत जायला लागल्यावर पालकांना बरीच मोकळीक मिळते. विभक्त व्हायला सोपं जाणं हा चाईल्ड-फ्री चा अनुशंगिक फायदा दिसला तरी मुलाशिवाय एकमेकात कमीटमंट निर्माण होत नाही हे नक्की. रघुनाथ धोंडो कर्वे टाईप तुमचा काही उदात्त प्लान असला तर एखादे वेळी संसारच कटकट होऊ शकेल. पण इट प्री सपोझेस अ ग्रेट प्लान. मग इतक्या उदात्त गोष्टीपुढे मुलांची कटकट किंवा विभक्तीची सोय असली तकलादू कारणं पुढे करावी लागत नाहीत.

In reply to by विवेक ठाकूर

वर एका प्रतिसादात तुम्ही म्हणता
माझ्या पाहाण्यात असं एकही जोडपं नाही.
आणि मग असंही म्हणता
मुलाशिवाय एकमेकात कमीटमंट निर्माण होत नाही हे नक्की.
अनुभव नसताना तुम्ही ठामपणे कसं म्हणू शकता ?
दोनच कारणं आहेत : एक, मुलांची कटकट वाटणं किंवा दोन, विभक्त व्हायला सोपं जाणं.
यापैकी "विभक्त व्हायला सोपं जाणं" हा चाईल्डफ्रीचा हेतू असत नाही (कुणी अपवाद असेलही) हे वर मी म्हंटलेही आहे तरी तो मुद्द तुम्ही रेटत आहात मुळात विभक्त होण्याबद्दलचा मुद्दा अप्पांना प्रतिसाद होता तो 'चाईल्डफ्री'चा विषय ज्या प्रतिसादातून चालू झाला त्यात तो मुद्दा अजिबात नव्हता, तरी तुम्ही त्या विभक्त होण्यालाच अजून धरुन बसला आहात. असो.
रघुनाथ धोंडो कर्वे टाईप तुमचा काही उदात्त प्लान असला तर एखादे वेळी संसारच कटकट होऊ शकेल.
मी रधोंचे उदाहरण याकरिता दिले की अशा प्रकारे मुल असण्याची आस नसलेल्या मुली/स्त्रिया होत्या आणि आहेत. मी फेसबुकवर 'childfree indians' या ग्रुपमध्ये आहे. हा ग्रुप एका स्त्रीने बनविलेला आहे, या ग्रुपवर अनेक मुली /स्त्रियाही आहेत. मालती कर्वेंचा स्वतःचा उदात्त प्लॅन नव्हता, तसेच ज्यावेळी रधोंशी त्यांचे याबाबत बोलणे झाले त्यावेळी रधोंचाही काही प्लॅन बनला नव्हता. माझा असा काही उदात्त वगैरे प्लॅन नाही. मी सर्वसामान्य नोकरदार आहे, कमवावे, खावे, प्यावे , आवडिच्या गोष्टींत (चित्रपट बघणे, संगीत ऐकणे , फिरणे, मित्रमंडळींच्या भेटी घेणे ई ) वेळ घालवणे , माझ्या आणि पत्नीच्या आवडीच्या गोष्टी विकत घेवू शकू इतकी संपत्ती निर्माण करण्याचा प्रयत्न करणे इतकाच माझा प्लॅन आहे. बाकी "मुलांची कटकट वाटणं" ...हे मी "मुलांची फार जास्त आवड नसणं" असं म्हणेन किंवा मुल मोठं करतानाच्या जबाबदार्‍यांची नीट जाण असल्याने व तितक्या जबाबदार्‍या पार पाडण्याची इच्छा नसल्याने मी असा निर्णय घेतला आहे.

In reply to by मराठी कथालेखक

माझा असा काही उदात्त वगैरे प्लॅन नाही. मी सर्वसामान्य नोकरदार आहे, कमवावे, खावे, प्यावे , आवडिच्या गोष्टींत (चित्रपट बघणे, संगीत ऐकणे , फिरणे, मित्रमंडळींच्या भेटी घेणे ई ) वेळ घालवणे , माझ्या आणि पत्नीच्या आवडीच्या गोष्टी विकत घेवू शकू इतकी संपत्ती निर्माण करण्याचा प्रयत्न करणे इतकाच माझा प्लॅन आहे. हे मुलं असतांना सुद्धा होत नाही का ? सर्वसामान्य लोक हेच तर करतांना दिसतात. तुम्ही उगीच कर्व्यांना मधे आणलत त्यामुळे ध्येयाचा प्रश्न उपस्थित झाला. बाकी "मुलांची कटकट वाटणं" ...हे मी "मुलांची फार जास्त आवड नसणं" असं म्हणेन किंवा मुल मोठं करतानाच्या जबाबदार्‍यांची नीट जाण असल्याने व तितक्या जबाबदार्‍या पार पाडण्याची इच्छा नसल्याने मी असा निर्णय घेतला आहे. मला त्याबद्दल इतकंच म्हणायचंय की एकदा वेळ निघून गेल्यावर अपत्यहीनतेवर दत्तक घेण्यापलिकडे पर्याय राहात नाही. एकतर ते काँप्लीकेटेड आहे आणि त्यातनं पुन्हा नव्या भानगडी निर्माण होण्याची शक्यता जास्त.

In reply to by मराठी कथालेखक

मुलेबाळे स्वनिर्मित असतात. बायको स्वनिर्मित नसते. जीवावरचा प्रसंग आलाच तर अपत्य वाचवण्यालाच आई-वडील प्राधान्य देतात, जोडीदाराला नव्हे. याचा अर्थ जोडीदार तुच्छ असा नव्हे. मुलांची कटकट वाटणारे फारच विरळ असतील. त्या तुलनेत जोडीदार कटकट आहे असे म्हणणारे ढीगाने सापडतील. कित्येकदा मुलांच्यामुळे लग्ने टिकून राहतात. आणि कित्येकदा घटस्फोट होताना अपत्य ताबा मिळवण्यासाठी भांडणे, कोर्ट कचेर्या होतात. लग्नसंस्थेची निर्मिती ही अपत्य संगोपनासाठी आहे. कारण अन्य कोणत्याही प्राण्याचे बालपण हे इतके लांबलेले नाही (elongated childhood). आणि हे माणसाच्या आश्चर्यकारक प्रगतीचे एक महत्वाचे कारण आहे.

आयुष्य घालवायला लग्न हा एक छान टाईमपास आहे. पण प्रेमापेक्षा मोठं किंवा उदात्त दुसरं काही काम सापडलं असेल वेळ घालवायला तर लग्नाची काही आवश्यकत नसावी. मला व्यक्तिशः लग्न न करणारे लोक आयुष्यात कंटाळत नाहीत का असं वाटतं. म्हणजे त्यांचे मैलाचे दगड कोणते असतात? आम्ही कसं घर घेणे, गाडी घेणे, पोरांच्या शाळा, मग लिस्ट मधुन एक एक ठिकाणी फिरायला जाऊन येणे, अधुन मधुन जंगी भांडणं काढणे इ इ कामात बिझी असतो. दिवस कसा जातो कळत नाही. बॅचलर लोक काय करतात?

In reply to by पिलीयन रायडर

आयुष्य घालवायला लग्न हा एक छान टाईमपास आहे.
दणकून सहमत ! लग्न या गोष्टीचा इतका महान उपयोग असताना लोक्स लग्न करायचे का टाळतात आश्चर्य आहे !!

In reply to by पिलीयन रायडर

घर घेणे,, गाडी घेणे ई बॅचलर्सच्या आयुष्यात पण असू शकते. मी तिशी ओलांडल्यावर लग्न केलं ; तोपर्यंत घर, गाडी यांसोबत पार्टटाईम 'डिग्री घेणं' हाही टाईमपास चालायचा :)

In reply to by मराठी कथालेखक

होय हो.. मी ज्यांना कधी ना कधी लग्न करायचेच आहे अश्यांबद्द्दल बोलत नाहीये. ज्यांना लग्नच करायचं नाही त्यांना विचारतेय. घर नि गाडी वगैरे होऊन जातं तीशी पस्तीशी पर्यंत.. मग पुढे काय? रोजच्या रोज काय नवा टाईमपास करतात हे लोक्स?

मी विक्रांतवर असतानाचा एक अनुभव सांगत आहे.( काही लोकांना लगेच याबद्दल बोटीवर असताना, मी, मी, याचा भास होईल पण त्याला नाईलाज आहे. त्यांनी पुढे नाही वाचले तरी चालेल ) माझे वय तेंव्हा २५ होते. आम्ही सारे (बॅचलर आणि लग्न झालेले) एक महिना समुद्रावर फिरून आलो कि कंटाळलेले असायचो बॅचलर लोकांना केंव्हा एकदा बोटीवरून बाहेर पडून माणसात( मुलींमध्ये) जाऊ असे होत असे. लग्न झालेल्याना केंव्हा एकदा घरी बायको/ मुलांना भेटू असे होत असे. आमच्या मध्ये दोन अधिकारी लग्न न झालेले जुने बॅचलर होते (३७ आणि ३८ वयाचे). त्यांचे वर्गमित्र जरी जहाजावर होते तरी त्यांना एक महिना यांच्या बरोबर वेळ काढल्यावर या बॅचलरना घरी नेण्याची इच्छा नसे. आम्हा तरुण अधिकार्यांना(२२-२६ वयोगटातील) त्यांना बरोबर नेण्याची इच्छा नसे कारण शिंगे मोडून वासरात जमा करण्याचा फायदा नसे. म्हणून मग हे दोघे संध्याकाळी मेस च्या बार मध्ये बसून दारू पीत बसत. म्हणजे समुद्रावर असतानाही संध्याकाळी दारूच पिणे आणि परत आल्यावरही तोच कार्यक्रम. त्यांचे आयुष्य फार नीरस आणि कंटाळवाणे भासत असे आणि त्यांच्याच एका वर्ग मित्राच्या भाषेत एक महिना यांच्या बरोबर काढल्यावर परत या "बैला" ना घरी नेउन कुठे खायला घालायचे? एक महिन्यानंतर नवरा आणि बाप घरी येतो आहे तर बायको आणि मुलांना कोणीही तिसरा माणूस नको असे. शेवटी एका विशिष्ट वयानंतर बॅचलर लोक एकटे पडत जातात आणि ज्यांना छंद नाही किंवा नोकरी धन्द्याव्यातिरिक्त दुसरे काही करण्याची आवड नसेल तर आयुष्य फार एकसुरी होते. सुरुवातीचा "स्वातंत्र्य" म्हणून मिळणारा मोकळेपणा नंतर पोकळी बनून खायला उठतो असे मी बर्याच बाबतीत पाहीले आहे.

In reply to by सुबोध खरे

मी तुमच्या मित्रांना पाहिलं नाही तरी साधारणपणे म्हणू शकतो की ह्या बॅचलर्सनी लग्न करुन संसार करण्याचा प्रयत्न केला असता तरी फार काही चांगला आनंददायी संसार झाला असता असं नाही. काही लोकांची स्वभावप्रकृती एकूणातच संसारास योग्य नसते. त्यांचा कल एकटेपणाकडे जास्त असतो. अशावेळी मारुन मुटकून संसार रेटण्यापेक्षा एकटे राहणे आणि शारिरिकगरजेप्रमाणे अधूनमधून (विकतच्या वा क्षणिक प्रेमातून मिळालेल्या) सुखाचा आनंद घेणे हे त्यांच्याकरिता ठीक असू शकते. सगळेच लोक एकाच प्रकृतीचे नसतात हे समजून घेणे महत्वाचे.

In reply to by मराठी कथालेखक

व्यक्तिगतः मी लग्न केले आहे, पण "चाईल्डफ्री"ची वेगळी वाट चोखाळली आहे, काहींना हे चुकीचे वाटेल माझे चाळिशी नंतरचे आयुष्य भकास, नीरस असेल असे भविष्य कुणी वर्तवेल. पण माझ्यासाठी तेच ठीक असेल.

In reply to by मराठी कथालेखक

प्रत्यक्षात तशी परिस्थिती नव्हती. दोन्ही अधिकार्यांना मी चांगला ओळखत होतो. एकाचा प्रेमभंग झाल्याने त्याने लग्न केले नव्हते आणी दुसर्याच्या घरच्या परिस्थिती मुळे त्याला करता आले नव्हते. अन्यथा दोघेही कुटुंब वत्सल म्हणत येतील असे सज्जन आणी सालस होते. त्यातील एकाचे( [पहिल्याचे) नंतर लग्न झाले आणी आता तो सुखात आहे. दुसर्याशी संपर्क तुटल्यामुळे काय झाले ते माहित नाही.

In reply to by सुबोध खरे

प्रेमभंग झाल्याने लग्न केलेल्यांचा विषय पुर्ण वेगळाच म्हणावा लागेल. त्यांनी त्या प्रेमभंगाच्या भावनेतून आणि निराशेतून बाहेर पडल्याशिवाय (आणि शक्यतो पुन्हा उत्कटतेने प्रेमात पडल्याशिवाय) लग्न करु नये असं मला वाटतं बाकी परिस्थितीपेक्षा 'by choice' म्हणजे बॅचलर लाईफ आवडतं किंवा लग्न आणि त्यातून येणार्‍या जबाबदार्‍या नकोशा वाटतात म्हणून लग्न न केलेल्यांच आयुष्य भकास असेल असं वाटत नाही.

In reply to by मराठी कथालेखक

परिस्थितीपेक्षा 'by choice' म्हणजे बॅचलर लाईफ आवडतं किंवा लग्न आणि त्यातून येणार्‍या जबाबदार्‍या नकोशा वाटतात म्हणून लग्न न केलेल्यांच आयुष्य भकास असेल असं वाटत नाही. >>> सहमत !

In reply to by सुबोध खरे

मी एक अपवादात्मक केस पाहिलेली आहे. माझ्या वडिलांचा एक मित्र जो ६७ वर्षांचा आहे आणि माझाही मित्र आहे. हा माणूस आयुष्यभर ब्रम्हचारी आहे. केवळ अविवाहित नव्हे, ब्रम्हचारी. हा माणूस काहीसा विक्षिप्त आहे, पण लग्न न झालेल्या माणसांमधे उतारवयात जो कडवटपणा येतो तो याच्यात लेशभरही नाही. सतत हसतमुख . त्याला ब्रम्हचारी राहण्याचा जराही पश्चात्ताप नाही. and this is by choice.

लग्न करावे कि नाही किंवा आपल्याला मुले असावीत का आणी असल्यास एक असावे कि दोन असावीत किंवा भरपूर असावीत हा "पूर्णपणे वैयक्तिक" प्रश्न आहे. त्यामुळे एकाच साच्यात प्रत्येकाला बसविणे शक्य नाही. माझा एक जवळचा मित्र १० पासून मी अविवाहित राहणार या विचारावर ठाम होता. "मी आत्मकेंद्रित आणी अतिशय स्वतंत्र माणूस आहे आहे आणी एका स्त्रीशी जुळवून घेणे मला जमणार नाही" असे तो तेंव्हापासून म्हणत असे. आजही पन्नाशी नंतरहि त्याच्या कडे पाहिले तर त्याचा निर्णय बरोबर होता असेच वाटते.पण त्याची विचारांची बैठक ठाम होती. सर्वांची विचारांची बैठक ठाम असतेच असे नाही. वर म्हटल्याप्रमाणे काही जणांना परिस्थितीमुळे लग्न करणे जमत नाही तर काही जण प्रेमभंगामुळे अशा नकारात्मक परिस्थितीत जातात. आजकाल जोडीदाराबद्दल "अवास्तव" अपेक्षा असल्याने रखडलेले कितीतरी बॅचलर तरुण आणी तरुणी दिसून येतात. आणी मग ते आम्हाला "लग्न"च करायचे नाही असे सांगत फिरताना दिसतात. हा निर्णय DENIAL ( नकारात्मक/ नाकबूल करणे) या मनोवृत्ती तून आलेला असतो. https://en.wikipedia.org/wiki/Denial उदा. मला पैसे मिळत नसले कि सर्व श्रीमंत लोक गैरमार्गानेच पैसे मिळवतात असे मी म्हणू लागलो तर ते "डीनायल" होईल. कारण जेंव्हा मला पैसे मिळू लागतात तेंव्हा सर्वच श्रीमंत काही गैरमार्गाने पैसे मिळवत नाहीत असे मखलाशी करावे लागते. असे असू नये एवढेच म्हणायचे आहे.

In reply to by सुबोध खरे

स्वतःची वैचारिक बैठक, मानसिक जडणघडण लक्षात घेवून योग्य तो निर्णय घेण महत्वाचे. योग्य दिशा सापडत नसेल, मनाचा गोंधळ होत असेल तर काही काळ वाट बघणे योग्य. उगाच घाईगडबडित लग्नाचा निर्णय घेवू नये तसेच अविवाहित राहण्याची भीष्मप्रतिज्ञाही करु नये.

लग्न योग्य व्यक्तीशी झाले तर ते सुखी सहजीवन होते नाहीतर फरपट. मॅचिंग जोडीदार मिळणे फार महत्वाचे आहे. बाकी तद्दन बॉलिवुडी मूवी मध्ये पाहील्याप्रमाणे अशा अविवाहीत्/विधुर तत्सम कॅरेक्टर्सच्या तोंडी एक वाक्य नेहेमी असते. दिन तो ऐसे वैसे गुजर जाता है पर रात खाने को उठती है! मुळात जर छंद/ध्येये उच्चप्रतीचे असतील व त्यात खरोखरच आनंद मिळत असेल तर अश्या लोकांना लग्न केल्याने काही फारसा फायदा तोटा होत नसावा. पण उगाच अश्या लोकांचा आदर्श घेऊन जर असा काही निर्णय घेतला आणि नंतर त्यातली स्वतःची गती/फोलपणा समजला तर मग वैफल्य येऊ शकते.ना घर का ना घाट का अशी अवस्था होऊ शकते.

In reply to by कानडाऊ योगेशु

मुळात जर छंद/ध्येये उच्चप्रतीचे असतील व त्यात खरोखरच आनंद मिळत असेल तर अश्या लोकांना लग्न केल्याने काही फारसा फायदा तोटा होत नसावा. >>>> अगदी बरोबर. असे अनेक लोक पाहण्यात आहेत.