लेखकनिशांत_खाडेयांनी रविवार, 01/05/2016 16:14 या दिवशी प्रकाशित केले.
आज नेहमी प्रमाणे कोरा (Quora) वर फिरत असताना एक इंटरेस्टिंग प्रश्न सापडला. तोच इथे चोप्यपस्ते करतोय.
"लग्न,कुटुंब यांच्या लफड्यात पडण्यापेक्षा आयुष्यभर अविवाहित राहणे जास्त व्यवहार्य व चांगले आहे काय? अविवाहित आयुष्य जास्त आनंदी आहे काय?"
काही दुवे:
>>>>>>"लग्न,कुटुंब यांच्या लफड्यात पडण्यापेक्षा आयुष्यभर अविवाहित राहणे जास्त व्यवहार्य व चांगले आहे काय?
होय.
>>>>>अविवाहित आयुष्य जास्त आनंदी आहे काय?"
नाही.
दुव्यापेक्षा व्यक्तिपरत्वे अनुभव महत्वाचे. लग्न झालेलं नसतं तेव्हा कधी होईल कधी होईल असं होतं आणि एकदा सर्व हौस झाली की मग पोरं, त्या शाळा, बायको प्रेम, भांडण, गैरसमज, नात्यातील ओढ़ातान, वाढतं कुटुंब, जवाबदारी यात माणूस (निष्ठुर होऊन) रमुन जातो आणि नंतर मग अधुन् मधून किंवा नियमितही जिच्याबरोबर लग्न झालं नाही ती जर असती तर आत्तापेक्षा तिने माझा अधिक सुन्दर संसार केला असता का ? असे काही बाही विचार येत असतात, त्या विचारांना धूड़कावून संसार करायचा असतो, असे म्हणतात बाकी काही नाही. :)
-दिलीप बिरुटे
ही सरसकट प्रत्येकाला लावता येणार नाहीत. प्रत्येकाने आपापल्या temperament प्रमाणे जे योग्य वाटेल ते करावे अाणि शक्यतो हा निर्णय स्वतःच घ्यावा.समाजाला लुडबूड करु देऊ नये.
बिरुटे +++
माझे मत
१) माया आहे याचे उत्तम उदाहरण.
२) लग्न न केल्यास एका तरुणपणानंतर सर्वजण टाळतात,केल्यास न पटल्यास एकजणच टाळेल.
३) करा आणि मोडा.
४) भांडायचेच आहे तर 'हक्काच्या' बायकोशी /नवय्राशी भांडा हक्काने.
५) कोणी सांगावे आपल्याबाबतीत चांगलेही होईल.
quora अकाउंट दुसय्रा दिवशी उघडलं तर " you are blocked from posting -----use real name----"मेसिज दिसला.युजरनेम नाही चालत.मग दुसरं उघडलं वेगळा इमेल टाकून ते चालू आहे.मज्जाच.
किंवा घेणं झेपणार नाही असं वाटतं ते बॅचलरहूडचा जोमात प्रचार करतात.
सहजीवन हा जीवनातला फार आनंदाचा आणि जवळजवळ अपरिहार्य भाग आहे. मुल, त्याचं संगोपन, त्याचाबरोबर पुन्हा उपभोगायला मिळणारं बालपण, मग उत्तररंग आणि शेवटी आप्तांच्या सहवासात देह सोडणं (याचा अनुभव नाही, अनुमान आहे) या गोष्टींपासून एकटं राहाणारा वंचित राहातो.
लग्न करायचं किंवा नाही हा ज्याचा त्याचा निर्णय असला तरी, एकदा करायचं म्हटलं की ते योग्य वयात केलं तरच मजा आहे. करु का नको, याचा अनुभव काय, तो काय म्हणतो असा विचार करण्यापेक्षा आपल्याला आणि तिलाही मजा येईल अशी अर्धांगिनी निवडण हे कौशल्याचं काम आहे. सहजीवनाशिवाय आयुष्य फार बेरंग आणि बोअर होईल.
डिबी म्हणतात तसं .....
अधुन् मधून किंवा नियमितही जिच्याबरोबर लग्न झालं नाही ती जर असती तर आत्तापेक्षा तिने माझा अधिक सुन्दर संसार केला असता का ? असे काही बाही विचार येत असतात, त्या विचारांना धूड़कावून संसार करायचा असतो, असे म्हणतात बाकी काही नाही
मला कधीही वाटलं नाही कारण आहे ते उपभोगायची आणि कायम वर्तमानात राहायची कला साधली आहे. तस्मात, इट इज अ ग्रेट थींग टू बी मॅरीड अँड हॅव अ कंपॅनियन.
थोर किंवा मोठं आणि सामान्य असा भेद नाही. लग्न अमिताभचं असो की आपलं, मूळ फॅक्टर्स तेच राहातात. ज्याला पत्नीबरोबर जगायची मजा कळली तो घरच्याघरी सुखी होतो. खरंतर दोघंही सुखी होतात. आणि एक मस्त कुटुंब तयार होतं, जिथे मुलाचं योग्य संगोपन होऊन सर्वांना मनाजोगतं जगता येतं.
लग्नच न झालेले , संसार न करताच समाधिस्त झालेले , मांडवातून पळालेले , सन्यास घेउन पुन्हा संसारात आलेले , बायको सोडुन वनवासात गेलेले , बायको घेऊन वनवासी फिरलेले , साखरपुडा झालेली बायको सोडुन स्वयंसेवक झालेले , खोटा संसार करणार्आ संतिणी , पोरं नवरा टाकुन उधळलेल्या अप्सरा व नदीमैय्या .......
एकंदर असल्या लोकांचे या देशातील लोकाना भयाण आकर्षण आहे.
जौ दे !
( सकाळी सकाळी मोघले आजम , जोधा अकबर , ताजमहलची मुसलमानी व्हिडिओ गाणी बघितली की असले अभद्र हिंदु विचार दिवसभर येत नाहीत. )
सकाळी सकाळी मोघले आजम , जोधा अकबर , ताजमहलची मुसलमानी व्हिडिओ गाणी बघितली की असले अभद्र हिंदु विचार दिवसभर येत नाहीत
मुग्धा तैंनी जनानखान्याचे लैच आकर्षण जणू.
अनेक बायकांशी संसार करुन , त्यांच्या पोटी १६ वर्षात १५ प्पोरे जन्माला घालून त्यांना मारुन मग त्यांच्या कबरी मिरवणार्या लोकांबद्दल जि व्हाळा असेल तुम्हाला नै?
आपले दोन्ही दुवे आणि लेख नीट वाचले
यानंतर माझा अभिप्राय असा आहे.
मला लग्न न करता एकटा राहायला आवडलं असतं का ?-- नाही
लग्न करून मी सुखी झालो का? हो नक्कीच
परत निवड करण्याचा हक्क( choice) मिळाला तर मी एकटा राहेन पसंत करेन का? -- नाही
सद्य ( लग्न झालेलं आणि मुलं असताना) परिस्थितीत मी सुखात आहे का?-- होय
हा माझा वैयक्तिक अभिप्राय आहे.
ज्याला आयुष्यभर ब्रम्हचारी राहायचं आहे त्याने राहावे.
बस संपला विषय.
लग्न न करता रानात जाउन बसला. झोपडे बांधले,उंदरांच्या त्रासामुळे मांजर पाळली, तिच्या दुधासाठी गाय पाळली,गायीसाठी शेत,शेतासाठी विहिर खणली आणि शेवटी हे सर्व कोण सांभाळेल याची चिंता करत करत मेला.
!
!
!
!
!
मग संसारानेच काय घोडे मारले होते?
थोडे विषयाच्या जवळपासचे अवांतर :
लग्न करुनही कधीच मुलांना जन्म न देणे म्हणजे मुद्दाममहून तसा निर्णय घेणे , तसेच कोणत्याही प्रकारे पालक न बनणे (म्हणजे दत्तक वगैरेही नाही) ही देखील एक जीवनशैली होवू लागली आहे.
या जीवनशैलीला चाईल्डफ्री कपल, डिंक कपल (DINK - Double Income No KIds बहूधा अशी जीवनशैली स्वीकरणार्या जोडप्यात दोघेही नौकरी/व्यवसाय करणारे असतात म्हणून) ई नावे आहेत.
समविचारी व्यक्ती भेटणे हे ह्या जीवनशैलीचे मोठे आव्हान आहे आणि भेटल्यावरही आयुष्यभर त्या विचारांवर दोघांनी ठाम राहणे अत्यंत महत्वाचे. दोघांचे विचार बदलले तर फारशी अडचण नाही, पण एकाचे विचार बदलले मात्र दुसरा ठाम राहिल्यास संघर्ष होवू शकतो. बाकी सामाजिक आणि कौटुंबिक दबाव यांना तोंड द्यावे लागू शकते.
टीप : या विषयावर धागा काढावा का असा विचार मी करत होतो, पण इथे किती मिपाकर या विषयाबद्दल बोलण्यास उत्सुक आहे ते माहित नाही त्यामुळे विवाहबद्दलच्या या धाग्यात उपधागा काढला आहे.
प्रजनन हाच लग्नाचा मूळ हेतू असतो. अन्यथा बायको नवर्याची किंवा नवर्याने बायकोची कटकट का झेलावी हा प्रश्नच आहे. बाकी ज्याला त्याला आचार स्वातंत्र्य असतेच म्हणा.
अन्यथा बायको नवर्याची किंवा नवर्याने बायकोची कटकट का झेलावी हा प्रश्नच आहे.
माफक कटकट झेलता येतेच...पण फार कटकट होत असेल तर (मुलबाळ नसलेले) थोडे अधिक सहजपणे विभक्तही होवू शकतात.
मुलबाळ असले तर जोडीदाराची + मुलांची कटकट झेलावी लागतेच, झालेच तर मुलांची कटकट तरी का झेलावी हाही प्रश्न आहेच :)
पण अर्धवट उडी मारली तर धड हे पण नाही आणि ते पण नाही असं होणार. एकदा लग्न म्हटलं की संसार सर्वतोपरी आलाच. चाईल्डफ्री कपलमधे बाँडच तयार होत नाही. दोघंही केवळ खडाखडी करत राहातात. आणि त्यामागे खरं तर हाच विचार असतो :
फार कटकट होत असेल तर (मुलबाळ नसलेले) थोडे अधिक सहजपणे विभक्तही होवू शकतात.
लग्न करणं म्हणजे घटस्फोटाची रिस्क आलीच पण सुरुवातीपासून मॅचच्या बाहेर पडायचा मार्ग दोघांनी मोकळा ठेवला तर पारस्पारिक विश्वास निर्माण होत नाही. देअर इज नो कमीटमंट. मुल आणि प्रेम हेच तर लग्नसंबंधातले सेतू आहेत. नाही तरी लग्न ही निव्वळ पारस्पारिक मान्यताच आहे. माणसानं ती स्वतःच्या सोयी आणि जीवन सुखकर होण्यासाठी निर्माण केलेली व्यवस्था आहे. त्या पलिकडे लग्नाला काही अर्थ नाही. पण एकदा ती व्यवस्था स्वीकारायची म्हटली की एकतर पूर्णपणे मान्य करायची किंवा मग त्यात पडायचंच नाही. तिथे तिसरा पर्याय नाही.
विचारामागचा हेतू कळणं अवघड नाही. अर्थात, तुम्हीच म्हटलंय :
फार कटकट होत असेल तर (मुलबाळ नसलेले) थोडे अधिक सहजपणे विभक्तही होवू शकतात
यावरनंही ते स्पष्ट होतं. शिवाय अपत्यजन्म ही स्त्रीची अत्यंत नैसर्गिक इच्छा आहे. कारण स्त्री देहाची घडणच निसर्गानं अपत्य जन्मासाठी केली आहे. तस्मात, अपत्य जन्माविना स्त्रीला अपूर्णत्व जाणवत राहातं हा वंध्यत्वाच्या समस्येचा सामना करणार्यांचा अनुभव आहे. थोडक्यात, चाईल्डफ्री कपल हा फार काळ टिकणारा पर्याय असू शकत नाही.
शिवाय अपत्यजन्म ही स्त्रीची अत्यंत नैसर्गिक इच्छा आहे. कारण स्त्री देहाची घडणच निसर्गानं अपत्य जन्मासाठी केली आहे. तस्मात, अपत्य जन्माविना स्त्रीला अपूर्णत्व जाणवत राहातं हा वंध्यत्वाच्या समस्येचा सामना करणार्यांचा अनुभव आहे. थोडक्यात, चाईल्डफ्री कपल हा फार काळ टिकणारा पर्याय असू शकत नाही.
वंध्यत्वाच्या समस्येचा सामना करणार्यांचा अनुभव आणि जाणून बुजून मूल नं होऊ देणार्यांचा अनुभव सारखाच कसा असेल.
अशी कैक जोडपी बघितली आहेत ज्यांनी मूल नं होऊ देण्याचा निर्णय घेतला आहे. एक जोडपं तर २० एक वर्ष सुखाने नांदत आहे. दीर्घकाळ टिकणारा पर्याय कसा नाही?
बाकी एरवी इतरांनी वाचलेले काही सांगितले की अनुभव घेतल्यामुळे आपल्याला वाट्टेल ते बोलण्याचा अधिकार आहे अशा तोर्यात बोलणार्याने स्वतःच्या सोयीप्रमाणे पुस्तके वाचून केलेला अभ्यास अनुभवापेक्षा सरस असल्याचे वाचून मौज वाटली.
वंध्यत्वाच्या समस्येचा सामना करणार्यांचा अनुभव आणि जाणून बुजून मूल नं होऊ देणार्यांचा अनुभव सारखाच कसा असेल.
अपत्यजन्म ही स्त्रीची नैसर्गिक इच्छा आहे कारण स्त्री देहाच्या निर्मितीमागे निसर्गाचा तो मूळ उद्देश आहे. तुम्ही ठरवा किंवा न ठरवा त्यानं काही फरक पडत नाही. स्रीची नैसर्गिक इच्छा कायम एकच राहाते. वंध्यत्वाचा सामना करणारं दांपत्य हे एक उदाहरण आहे.
अशी कैक जोडपी बघितली आहेत ज्यांनी मूल नं होऊ देण्याचा निर्णय घेतला आहे. एक जोडपं तर २० एक वर्ष सुखाने नांदत आहे. दीर्घकाळ टिकणारा पर्याय कसा नाही?
माझ्या पाहाण्यात असं एकही जोडपं नाही. शिवाय अपत्य नसेल तर दोघात बाँड तयार होत नाही या उघड वस्तुस्थितीची तुम्हाला कल्पनाच दिसत नाही. अपत्यामुळे संसार टिकतात आणि घटस्फोटही सहजी होत नाहीत. असा निर्णय घेणार्या सदस्याचाही प्रतिसाद तेच सांगतो.
बाकी एरवी इतरांनी वाचलेले काही सांगितले ..... वगैरे
प्रतिसाद नीट वाचत जा म्हणजे असे शोचनीय प्रसंग वारंवार येणार नाहीत.
मी ठरवणारा कोण? आता मग मी इतकी जोडपी बघितली त्यातल्या स्त्रीयांच्या इच्छा काय अनैसर्गिक म्हणायच्या का?
तुमच्या पाहण्यात जोडपं नाही म्हणून मग तुम्ही म्हणताय तसा बाँड तयार होत नाही म्हणायचे? बरं मला प्रतिसाद नीट न वाचता वगैरे लिहीणार्या तुम्ही माझ्या वरील प्रतिसादात लिहीलेले २० वर्ष सुखाने संसार करणार्या दांपत्याचे उदाहरण दिलेले वाचलेले दिसत नाही. तुम्ही म्हणताय तशी वस्तुस्थितीच आहे. अपत्यामुळे संसार टिकतात असे काही नाहीये. घटस्फोटही सहजी होत नाहीत हे अंशतः बरोबर. कारण मग न्यायालयात मुलांचा ताबा आणि पोटगी वगैरे जास्ती गुंतागुंतीचे होते.
प्रतिसाद नीट काय वाचायचा. तुम्हीच सांगितले ना मानसशास्त्राचा अभ्यास वगैरे? तो पुस्तकं नं वाचता कसा केला?
अपत्यजन्म ही स्त्रीची नैसर्गिक इच्छा आहे पण एखाद्या स्त्रीने 'चायील्ड फ्री' राहण्याचा निश्चय केला असेल तर या नैसर्गिक इच्छेतून ओवरकम होता येत(च) नाही का?
अवांतर: समलिंगी स्त्रियांना अशी इच्छा होत नसेल काय?
एखाद्या स्त्रीने 'चायील्ड फ्री' राहण्याचा निश्चय केला असेल तर या नैसर्गिक इच्छेतून ओवरकम होता येत(च) नाही का?
निसर्गाचं सर्कल पूर्ण होत नाही त्यामुळे अशा स्त्रीला अपूर्णत्वाचं फिलींग राहातं. सामान्यतः असा निर्णय कुणी घेत नाही, तस्मात अपत्य असणार्या स्त्रीयांना अपत्यजन्म म्हणजे काही ग्रेट वाटत नाही. म्हणून वंध्यत्व असलेल्या स्त्रीचं उदाहरण दिलंय. शिवाय मूल हा दांपत्याला जवळ आणणारा फार मोठा घटक असतो.
उदा. भूक नैसर्गिक आहे, उपासाचा निश्चय करावा लागतो. असा निश्चय निसर्गापुढे किती काळ टिकाव धरतो ? अपत्य जन्म ही तर फार गुंतागुंतीची आणि सटल घटना आहे. वरकरणी मुलांची कटकट नको म्हणून असा निर्णय घेतला आणि स्त्रीचं वय उलटून गेलं तर मग फेरविचार अशक्य होतो. तस्मात एकदाच काय ते ठरवावं, आयदर फुल पॅकेज विथ ऑल प्रोज अँड कॉर्न्स ऑर नो पॅकेज अॅट ऑल.
लेस्बियन्स अपवादात्मक उदाहरण आहेत. त्यांना पुरुषाबद्दल अनाकर्षण असल्यानं देहरचना आणि मानसिकताच भिन्न असते. अपत्याबद्दल त्यांच्या मनात विचारही येत नसावा. पण शेवटी एक्सेप्शन प्रूव्ज द रुल.
अपत्यजन्म ही स्त्रीची अत्यंत नैसर्गिक इच्छा आहे. कारण स्त्री देहाची घडणच निसर्गानं अपत्य जन्मासाठी केली आहे. तस्मात, अपत्य जन्माविना स्त्रीला अपूर्णत्व जाणवत राहातं >>>>>
हे एक थोर मिथ आहे.
माझ्याबरोबर एम डी झालेली आमची मैत्रीण हिला मुल नकोच होते. हा तिचा निर्णय पक्का होता. यामुळे अर्थात तिचा घटस्फोट झाला पण आजही आपल्याला मुल असायला हवे होते असे तिला वाटत नाही. ती एका प्रथितयश अशा केंद्र सरकारच्या रुग्णालयात रेडियोलॉजिची प्राध्यापक आहे आणि आजही मानसिक दृष्ट्या कुठेही असमतोल नाही.
आमच्या शेजारची मुलगी केवळ आईवडिलांच्या इच्छेला मान देऊन स्थळे पाहत असे पण तिला लग्नच करायचे नव्हते. ती स्वतः सुंदर असल्याने बर्याच स्थळांकडून होकारही आला होता. शेवटी आईवडिलांनी कंटाळून तिला स्पष्टपणे विचारले तेंव्हा तिने धीर करून लग्नच करायचे नाही असे सांगितले. आजही ती एका केंद्र सरकारी आस्थापनात अतिशय उच्च हुद्द्यावर काम करीत आहे आणि अतिशय शांत आणि उल्हासपूर्ण व्यक्तिमत्व असलेली हसतमुख स्त्री म्हणून आम्ही तिला कित्येक वर्षे पाहत आलो आहे.
अशी अनेक उदाहरणे आहेत. तेंव्हा "अपत्य जन्माविना स्त्रीला अपूर्णत्व जाणवत राहातं" हे १०० टक्के सत्य नाही असे वाटते.
अपत्यजन्म ही स्त्रीची अत्यंत नैसर्गिक इच्छा आहे. कारण स्त्री देहाची घडणच निसर्गानं अपत्य जन्मासाठी केली आहे. तस्मात, अपत्य जन्माविना स्त्रीला अपूर्णत्व जाणवत राहातं >>>>>हे एक थोर मिथ आहे.
मग वंध्य स्त्रीचं दु:खं काय असतं? आणि निसर्गाच्या स्त्री देहनिर्मितीचं तुमच्या मते प्रयोजन काय ?
वंध्य स्त्री म्हणजे समस्त स्त्री प्रजात असते का?
मुलं नसलेल्या बायका वंध्यच असतात का?
वंध्य बायका फक्त दु:खीच असतात का?
मुल असलेल्या बायका फक्त सुखीच असतात का?
वंध्य स्त्रीयांची दु:खं तुम्ही कशी अभ्यासली?
मूल नको वाटत असतानाही पिअर प्रेशर मुळे मुले होऊ दिलेल्या स्त्रीया कृतकृत्य जीवन जगत असतात असे असते का ?
मातृत्व आणि वात्सल्य वगेरेंना विनाकारण इतका फालतू थोरपणा दिला गेलेला आहे की या भावना नसणे किंवा कमी असणे = थोर महापातक किंवा वि़कृतीच !!!!
अर्थात उपरोक्त महोदयांचा मानसशास्त्राचा (सुद्धा) प्रगाढ (नेहमीप्रमाणेच) अभ्यास (यांचा तो अभ्यास आपलं ते..... जौ दे) असल्यामुळे वरील सर्व प्रश्नांची (इतरांना मूर्खात काढणारी) उत्तरे निश्चितच मिळतील हं पिरा ;)
१) निसर्गाच्या स्त्री देहनिर्मितीचा उद्देश काय ?
२) वंध्यत्व इतकं नॉर्मल असतं तर त्यावर संशोधनाची गरज काय ? (खरं तर हा प्रश्न सुबोधजींना विचारा म्हणजे तुम्हाला योग्य उत्तर मिळेल.)
त्यातच बरंच लचांड आहे..
- व्यंधत्व असल्याने व मुल होण्याची इच्छा असल्याने आणि सामाजिक दबावाने कुढणारी स्त्री..
- व्यंधत्व असूनही ;नो बीग डील' मानणारी स्त्री..
- स्वतःला मुल नकोय, पण घरच्यांच्या दबावामुळे मुल होण्याचा त्रास सहन करणारी स्त्री..
- स्वतःला मुल नकोय, म्हणून नवर्याच्या आणि घरच्यांच्या दबावाला पुरुन उरणारी स्त्री..
- बाय चॉईस 'मुल नकोय' हे पटवून देणारी व त्याप्रमाणे वैवाहिक सहजीवन आनंदात जगणारी स्त्री..
- लग्न न करता, मुल हवंय, म्हणून आवडत्या पुरुषाकडून पुत्र/पुत्रीप्राप्ती करुन घेणारी स्त्री..
- लग्नाच्या लफड्यात न पडता आवडत्या पुरुष/पुरुषांचा सहभोग उपभोगणारी स्त्री..
- - लग्नाच्या लफड्यात न पडता आवडत्या स्त्री/पुरुषांचा सहभोग उपभोगणारी स्त्री..
लय कॅटॅगर्या आहेत.. पण 'सर्वां शहाणे करुन सोडावे' म्हणतांना आपल्या ज्ञाना/समजुतीबाहेरही लोक असतात आणि ते आनंदात जगतात, हेच मान्य नसेल तर..
@ वि ठा
निसर्गाच्या स्त्री देहनिर्मितीचं तुमच्या मते प्रयोजन काय ?>>>>
निसर्गात अनेक वृक्षवेली असतात. काहींना सुंदर फळे येतात, फुले येतात काहींना येत नाहीत. या फळं फुलं न येणार्या झाडांच्या निर्मितीमागेही निसर्गाचे निश्चितच काही प्रयोजन असणार. ती काही अपघाताने झालेली निर्मिती नाही.
स्त्री देह वंश वाढवण्यासाठी असतो हे कबूल. पण ती प्रेरणा नैसर्गिक आदिम वगेरे असते हे चूक आहे. फळे व फुले न येणार्या झाडाला जितका आणि जेवढा आनंदी जगण्याचा अधिकार आहे तितकाच वंध्य किंवा अपत्यविहीन किंवा बाय चॉइस मूल होऊ न देणार्या स्त्रीयांना ( आणि पुरुषांनाही) आहे. सर्व स्त्रीयांमध्ये ती प्रेरणा असतेच वगेरे ठामपणे सांगून तुम्ही नकळत अशा गटाला दोष आणि गिल्ट देताय.
वंध्य स्त्रीचे दु:ख काय असते ?
कोणत्याही व्यक्तीचे कोणत्याही बाबतीत वंचित असण्यामुळे असणार्या दु:खासारखेच हे ही दु:ख असते. त्या दु:खाची तीव्रता वा वेदनेची धार व्यक्तिपरत्वे बदलते एवढंच. एखाद्या व्यक्तीच्या जवळची व्यक्ती गेल्याने झालेल्या दु:खाची धार व मूल हवे असून होत नसलेल्या व्यक्तीच्या ( स्त्री आणि पुरूष ) दु:खाची धार, विश्वासू पार्टनरने विश्वासघात केल्याने झालेल्या दु:खाची धार, मौल्यवान वस्तू हरवल्याने झालेल्या दु:खाची धार सारखीच तीव्र किंवा कमी तीव्र असू शकते. कारणे वेगवेगळी आहेत.
मुद्दा बहुतांश स्त्रीयांना माता व्हावे वाटते याला विरोध करण्याचा नाही. ते मान्यच आहे. पण सरसकटीकरण ( जे तुम्ही मुलामुळेच कमिटमेंट वगेरे मुद्द्यतही केले आहे ) ते मत मान्य नाही.
अजून एक विरोधाभास - लग्न अमिथाभ बच्चनचे असो की सामान्याचे, बेसिक गोष्टी समान असे तुम्हीच म्हणताय आणि खाली पि रा आणि कथालेखकाला महान व्यक्तींच्या तुलनेत स्वतःला मोजायला सांगताय. गंमत आहे.
>सर्व स्त्रीयांमध्ये ती प्रेरणा असतेच वगेरे ठामपणे सांगून तुम्ही नकळत अशा गटाला दोष आणि गिल्ट देताय.
गिल्ट देत नाही, ती वास्तविकता आहे. शिवाय वंध्यत्वाचं प्रमाण जननाक्षमतेपेक्षा कमी आहे याचा अर्थ निसर्गाचं प्रयोजन उघड आहे. वंध्यत्व असणार्यांनी आनंदात जगू नये असा त्याचा अर्थ नाही.
>कोणत्याही व्यक्तीचे कोणत्याही बाबतीत वंचित असण्यामुळे असणार्या दु:खासारखेच हे ही दु:ख असते.
चर्चेचा विषय निपुत्रिकता इतकाच आहे.
>मुद्दा बहुतांश स्त्रीयांना माता व्हावे वाटते याला विरोध करण्याचा नाही. ते मान्यच आहे. पण सरसकटीकरण ( जे तुम्ही मुलामुळेच कमिटमेंट वगेरे मुद्द्यतही केले आहे ) ते मत मान्य नाही.
म्हणजे मूळ मुद्दा तुम्हाला मान्य आहे. राहीला विषय कमिटमंटचा. तो मुद्दा `विभक्त व्हायला सोपं जातं' या अनुशंगानं आलायं.
गिल्ट देत नाही, ती वास्तविकता आहे. >>> म्हणजे मूल होऊ न देणे हा गुन्हा आहे ?
चर्चेचा विषय निपुत्रिकता इतकाच आहे. >>>> मी ही निपुत्रिकांच्या दु:खाबाबत ते विधान केलंय. 'निपुत्रिकांचे दु:ख' स्पेशल क्याटेगिरीतले नसते हे सांगितलंय.
म्हणजे मूळ मुद्दा तुम्हाला मान्य आहे.>>> हो. पण त्या मूळ मुद्द्याच्या आधारे तुम्ही उपस्थित केलेले उपमुद्दे मान्य नाहीत.
प्रतिक्रिया
दुवे
शादीके लड्डु खाये तो पछताये ।
माझी उत्तरं
हाहाहा!
In reply to माझी उत्तरं by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
1+
In reply to माझी उत्तरं by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तो फिर
या प्रश्नांची उत्तरं
बिरुटे +++
(Quora) वेबसाइट फक्त
अंड्रोइड, आयओएस आणि
In reply to (Quora) वेबसाइट फक्त by कंजूस
मस्त चालतेय मोबाइलवर quora
In reply to अंड्रोइड, आयओएस आणि by निशांत_खाडे
होय फक्त इंग्रजी..
In reply to मस्त चालतेय मोबाइलवर quora by कंजूस
quora अकाउंट दुसय्रा दिवशी
In reply to होय फक्त इंग्रजी.. by निशांत_खाडे
फोनच्या wap native browserवरच
In reply to quora अकाउंट दुसय्रा दिवशी by कंजूस
लारा लप्पा जगजितसिंग-
विवेक ठाकुरांच्या प्रतिक्षेत
ज्यांना सहजीवनाची मजा घेता येत नाही
In reply to विवेक ठाकुरांच्या प्रतिक्षेत by स्पा
थँक्स विठा
In reply to ज्यांना सहजीवनाची मजा घेता येत नाही by विवेक ठाकूर
मला वाटतं हवीहवीशी पत्नी फक्त एकदाच शोधावी लागते
In reply to थँक्स विठा by स्पा
अरे ते सहजीवन वगैरे
In reply to थँक्स विठा by स्पा
आप्पा,
In reply to अरे ते सहजीवन वगैरे by अप्पा जोगळेकर
दुसय्राच्या फुंकरीने आपल्या
..
विचार हा विचार असतो
In reply to .. by mugdhagode
असं म्हणता?
In reply to .. by mugdhagode
ही
In reply to .. by mugdhagode
सकाळी सकाळी मोघले आजम , जोधा
In reply to .. by mugdhagode
"लग्नच न झालेले , .......
आपले दोन्ही दुवे आणि लेख नीट
काही जीव असे आहेत
स्वभावदोष?
In reply to काही जीव असे आहेत by सुबोध खरे
पैलवान साहेब
In reply to स्वभावदोष? by गामा पैलवान
खरे
In reply to पैलवान साहेब by सुबोध खरे
त्यांचा प्रतिसाद पण
In reply to पैलवान साहेब by सुबोध खरे
तेच तर मी म्हणतोय!
In reply to पैलवान साहेब by सुबोध खरे
संम असे आयडी का चालवून घेत
In reply to काही जीव असे आहेत by सुबोध खरे
ट्यार्पी मिळतो हो. नायतर
In reply to संम असे आयडी का चालवून घेत by मराठी कथालेखक
तुमची मर्जी. अविवाहित राहणे
त्यांना फक्त लफडं नकोय पण बाकी सगळं हवयं !
In reply to तुमची मर्जी. अविवाहित राहणे by अप्पा जोगळेकर
=))
In reply to तुमची मर्जी. अविवाहित राहणे by अप्पा जोगळेकर
बैलाचा ड्वॉळा!!
In reply to तुमची मर्जी. अविवाहित राहणे by अप्पा जोगळेकर
=))
In reply to तुमची मर्जी. अविवाहित राहणे by अप्पा जोगळेकर
हम्म!!
क्याबाहै
In reply to हम्म!! by राजेंद्र मेहेंदळे
चाईल्डफ्रीबद्दल काही
हायला.. हे भारीच..
In reply to चाईल्डफ्रीबद्दल काही by मराठी कथालेखक
प्रजनन हाच लग्नाचा मूळ हेतू
In reply to चाईल्डफ्रीबद्दल काही by मराठी कथालेखक
अन्यथा बायको नवर्याची किंवा
In reply to प्रजनन हाच लग्नाचा मूळ हेतू by अप्पा जोगळेकर
एकतर फुल उडी मारा किंवा मारु नका
In reply to अन्यथा बायको नवर्याची किंवा by मराठी कथालेखक
चाईल्डफ्री कपलमधे बाँडच तयार
In reply to एकतर फुल उडी मारा किंवा मारु नका by विवेक ठाकूर
अनुभव नाही पण मानशास्त्राचा जो आभ्यास आहे त्यावरनं
In reply to चाईल्डफ्री कपलमधे बाँडच तयार by मराठी कथालेखक
कैच्या कै
In reply to अनुभव नाही पण मानशास्त्राचा जो आभ्यास आहे त्यावरनं by विवेक ठाकूर
प्रतिसाद नीट न वाचता काहीही लिहीण्याची सवय सोडाल तर बरं!
In reply to कैच्या कै by लंबूटांग
अर्रेच्या!
In reply to प्रतिसाद नीट न वाचता काहीही लिहीण्याची सवय सोडाल तर बरं! by विवेक ठाकूर
अपत्यजन्म ही स्त्रीची
In reply to प्रतिसाद नीट न वाचता काहीही लिहीण्याची सवय सोडाल तर बरं! by विवेक ठाकूर
निसर्गाविरुद्ध जाणं सतत लावून धरावं लागतं
In reply to अपत्यजन्म ही स्त्रीची by निशांत_खाडे
अपत्यजन्म ही स्त्रीची अत्यंत
In reply to अपत्यजन्म ही स्त्रीची by निशांत_खाडे
माझ्याबरोबर एम डी झालेली आमची
In reply to अपत्यजन्म ही स्त्रीची अत्यंत by मितान
मन चंगा तो कठौती में गंगा.
In reply to माझ्याबरोबर एम डी झालेली आमची by सुबोध खरे
@ मितान,
In reply to अपत्यजन्म ही स्त्रीची अत्यंत by मितान
वंध्य स्त्री म्हणजे समस्त
In reply to @ मितान, by विवेक ठाकूर
वंध्य स्त्रीयांची दु:खं
In reply to वंध्य स्त्री म्हणजे समस्त by पिलीयन रायडर
मूळात दोनच गोष्टींचं उत्तर द्या
In reply to वंध्य स्त्रीयांची दु:खं by मितान
वंध्यत्व आणि "बाय चॉईस" मुल न
In reply to मूळात दोनच गोष्टींचं उत्तर द्या by विवेक ठाकूर
बरोबर..
In reply to वंध्यत्व आणि "बाय चॉईस" मुल न by पिलीयन रायडर
@ वि ठा
In reply to मूळात दोनच गोष्टींचं उत्तर द्या by विवेक ठाकूर
मितान,
In reply to @ वि ठा by मितान
गिल्ट देत नाही, ती वास्तविकता
In reply to मितान, by विवेक ठाकूर
१) निसर्गाच्या स्त्री
In reply to मूळात दोनच गोष्टींचं उत्तर द्या by विवेक ठाकूर
पण
In reply to मूळात दोनच गोष्टींचं उत्तर द्या by विवेक ठाकूर