लेखकनिशांत_खाडेयांनी रविवार, 01/05/2016 16:14 या दिवशी प्रकाशित केले.
आज नेहमी प्रमाणे कोरा (Quora) वर फिरत असताना एक इंटरेस्टिंग प्रश्न सापडला. तोच इथे चोप्यपस्ते करतोय.
"लग्न,कुटुंब यांच्या लफड्यात पडण्यापेक्षा आयुष्यभर अविवाहित राहणे जास्त व्यवहार्य व चांगले आहे काय? अविवाहित आयुष्य जास्त आनंदी आहे काय?"
काही दुवे:
अहो ते प्राण्यांचे basic instinct नैसर्गिक इच्छाशक्ती आहे आणि ती मारण्याचा खटाटोप काहीप्राणी करतात.उदा० कुणा एकाची भ्रमणगाथात दिले आहे.पेन्गविन पक्षी जोडीदारच मिळाला नाही तर पिले पळवतात, मावशांना पिन्हे फुटतात,काकालोक भाच्यापुतण्यांचे कौतुक करण्यात रमतात सर्कसला नेतात.
संसारींना सन्याशांची गरज नसते तर सन्याशांना संसाय्रांची गरज असते.रानात बसून मिळवलेले ज्ञान वाटणार कुणाला घंटा?
# बाकी *** भाव विचारत गिह्राइक येतंय तोपर्यंतच भाव करून विकून टाकावेत अन्यथा ***** ( ग्राम्य म्हण )
संसारींना सन्याशांची गरज नसते तर सन्याशांना संसाय्रांची गरज असते.रानात बसून मिळवलेले ज्ञान वाटणार कुणाला घंटा?
बरोबर! पण संसारात राहूनही काही घंटा फरक पडत नाही हे कळायला झाडाखालीच बसायला लागतं.
भाव विचारत गिह्राइक येतंय तोपर्यंतच भाव करून विकून टाकावेत अन्यथा...
संपूर्ण सहमत.
हा हा, काय चर्चा झाली! हा धागा पाहिला नव्हता.
बिपाशा बासूनं एवढ्यात लग्न केलं म्हणे!
मला वाटलं की त्या जॉनशी जमलं नाही म्हणून ही काही आता संसारात पडायची नाही पण पडलीच!
विठा, एरवी मुलेबाळे असणे वगैरे ठीक आहे पण हवीत की नकोत हा चॉईस असतो. म्हणजे असायलाच हवा. कित्येकजण नवरा, बायको म्हणून राहतात व लाईफ पार्टनर म्हणून त्या व्यक्तिकडे पाहतात. आपापल्या व्यावसायिक आयुष्यात बिझी असलेले लोक्स जेम्व्हा मूल नको असण्याचा निर्णय घेतात तेंव्हा मूल असणे ही जबाबदारी आहे हे त्यांना कळले असण्याची शक्यता जास्त आहे. अगदी साठी पासष्ठीपर्यंत यथेच्छ व्यवसाय करतात. आणि संसार मुलाबाळांनी भरलेला असो की फक्त लाईफ पार्टनरसचा, कितीही आवडीचा व्य्वसाय असो किंवा नावडीचा, एका मर्यादेनंतर कंटाळा येणे कोणाला चुकलेय? हां, खूपच आवडीचा व्यवसाय असेल तर मनुष्य जास्त वर्षे आनंदाने करेल एवढेच. तसेही साठी जवळ आली की मुलेबाळे आपापल्या संसारात रमल्यावर म्हातारा म्हातारीला एकटेपणा असतोच. एकाच घरात सगळे रहात असले तरी म्हातारपणचा एकटेपणा सगळ्यांना असतो. त्यातल्यात्यात मुला नातवंडात मन रमवणारे जास्त लोक्स असतात. याचे कारण काय? संसार करून थकले भागलेले असतानाही म्हातारपणी वेळ कसा घालवावा हा प्रश्न असतो. आता त्यावर प्रत्येक जण आपल्या शारिरिक, मानसिक, आर्थिक ऐपतीनुसार उपाय करतो. पण तुम्ही जे म्हणाताय की असे मोकळेच राहणे यात कमिटमेंट नसते ते अजिबात पटत नाही. यशस्विरित्या असे रहायला जास्त कमिटमेंट लागत असावी कारण मुले, त्याच्यामुळे संसार वाढत जाणे हा मोठ्ठा प्रकारच आयुष्यात नसतो त्या जोडप्यांपुढे आदर्श, पाऊलवाट तयार होणे हे खूप कमी प्रमाणावर असणार.
बाकी प्राडाँचा प्रतिसाद वाचून मजा वाटली. पिराशी तर फारच सहमत. ;)
ब्याचलर म्हणजे नेमकं काय ?
अविवाहीत ?
की
ब्रह्मचारी ?
अविवाहीत / ब्रह्मचारी / अ-मूल विवाहीत .... या तीन भिन्न क्याट्यागरीज आहेत.
( शंकेस हसु नये. विंग्रजी कच्चे आहे. )
असे हवे.
नक्की प्रश्न कळत नाहीं, प्रश्नात सुस्पष्टता नाहीं.
देवर्षि /देवॠषी/भक्त/साधू-संत हे देखील "ब्रह्मचारी" असतात.
अवांतर - बाळाचे बाप ब्रह्मचारी, मर्फी आठवला
स्पिन्स्टरचा भावार्थ थोडा वेगळा आहे.पंचवीसतिशीच्च्या आतल्या मुलास आपण ब्याचलर म्हणू तसे मुलीला अनमॅरिड ठीक आहे .spinster मधून थोडा लग्नाचे वय उलटून गेलेली घोडी { पण जमल्यास लग्न करू अशी }माफ करा.
लग्न न करण्याचं पक्कच केलं असेल तर conformed bachelor
छान वाटलं!! पण स्वतःच्या मुलं/लींनी लग्न करायचं नाही असं ठरवलं तर त्यांनाही त्यांचे पालक बिनलग्नाचा/ची घोडा/डी म्हणत असतील का हा एक आपला प्रश्न येऊन गेला, की आपला तो बाब्या या न्यायाने चालवून घेत असावेत?
नेहमीचेच गोलंदाज, नेहमीचेच फलंदाज. पाच दिवस असेच जाणार. नेहमीप्रमाणेच लाथाळी होणार.
जेफ बोयकोटचे आणखीन एक द्विशतक होणार. सामना अनिर्णित अवस्थेत संपणार.
इथे कितीही गमज्या मारल्या तरी धागाकर्ते एक दिवस निमूटपणे बोहल्यावर चढणार.
लग्न करावं की नाही आणि केलं तर मुल होऊ द्यावं की नाही असा चर्चाविषय आहे.
विषयाचं भान ठेवलंत तर प्रतिसाद समजतील.
तरीही उत्तर देतो.
बहुसंख्य स्त्रियांना मुल असावे असे वाटते हे खरेच आहे.....वगैरे
मी फक्त नैसर्गिक शब्द वापरला आहे. ध्येयवादी जीवनाला आधी ध्येय हवं, त्या केसमधे मग लग्न सुद्धा अडचण ठरेल. इथे ध्येयाचा मुद्दाच नाही. सदस्य पर्यायांचा विचार करतायंत.
....किशोरी आमोणकर, लता मंगेशकर (बॉलीवुड मध्ये तर कितीतरी नावं असतील..) हय बायकांना स्वतः विषयी अभिमान नाही असं तुम्हाला वाटतं का? कुण्या पुरुषाने येऊन ह्यांचे जीवन धन्य करणे आवश्यक आहे असं वाटतं का? ह्या व्यक्ति ह्या सगळ्याच्या पलीकडे गेलेल्या आहेत असं वाटत नाही का?
आपण त्या कॅटॅगरीत आहोत का असा जरा विचार कराल का ? मला लोकांच्या विचारसरणीचं कायम नवल वाटतं, एकदम एक्स्ट्रीम उदाहरणं घ्यायची आणि मग मी दुसर्याच्या विचाराचा आदर करत नाही अशी हूल उठवायची. पुलं निपुत्रिक होते पण आपण तितके व्यासंगी आहोत का ? आपल्याला तितकं स्वच्छंद जगता येईल का असा विचार केलात तर मुद्दा कळेल.
लग्ना बाबतीतही तुम्ही अशीच होलसेल मध्ये विधाने केली आहेत. माझ्या ओळखीत एक शिक्षक जोडपे आहे. आता त्यांना रिटायर होऊनही १०-१५ वर्ष झाली...... वगैरे
मुल नसल्यावर सामोपचारानं घेणं हा मोठेपणाचा भाग झाला (कारण फॉल्ट नक्की कुणाचांय, का दोघांचायं हे मुद्दे प्रकर्षानं येतातच) पण त्यामुळे मूल नसल्यानं जवळीक निर्माण झाली हा फार मजेशीर तर्क आहे.
मुल नसल्याच्या दु:खात जोडपी फार जवळ येतात. कोणत्याही आनंदापेक्षा कोणतेही दु:ख, संघर्ष आपल्याला जास्त जवळ आणतो.
चुकीचा निष्कर्श आहे. प्रेम असेल तरच दु:ख जवळ आणतं पण त्या केसमधे बाकीचे फॅक्टर्स आपसूक गौण होतात. इथे प्रेम हा विषय नाही. लग्न करावं की नाही आणि केलं तर मुल होऊ द्यावं की नाही असा विषय आहे.
संसार टिकतात ते नवरा बायको मधल्या प्रेमाने. ....वगैरे
यात वाद कुठे आहे ? तुम्ही चर्चेचा विषय लक्षात घ्या म्हणजे आवेश कमी होईल.
आपण त्या कॅटॅगरीत आहोत का असा जरा विचार कराल का ? मला लोकांच्या विचारसरणीचं कायम नवल वाटतं, एकदम एक्स्ट्रीम उदाहरणं घ्यायची आणि मग मी दुसर्याच्या विचाराचा आदर करत नाही अशी हूल उठवायची. पुलं निपुत्रिक होते पण आपण तितके व्यासंगी आहोत का ? आपल्याला तितकं स्वच्छंद जगता येईल का असा विचार केलात तर मुद्दा कळेल.
मान्य की माझा व्यासंग पुलंच्या एक शंतांश देखील नाही. पण म्हणून निपुत्रिक राहण्याचा निर्णय घेण्याचा मला अधिकार नाही असा त्याचा अर्थ होतो काय ?
आपल्याला तितकं स्वच्छंद जगता येईल का
तितक ? कुणाशी तुलना कशाला हवी ? मला पाहिजे तितकं स्वच्छंदी मी जगेन.. नव्हे जगत आहेच.
तितक ? कुणाशी तुलना कशाला हवी ? मला पाहिजे तितकं स्वच्छंदी मी जगेन.. नव्हे जगत आहेच
हे आवडलं.. मी लता मंगेशकर नसेन म्हणुन मी कुणी कमी दर्जाची व्यक्ति आहे. किंवा माझ्या भाव-भावना वेगळ्या आहेत असे नाही. सामान्य आयुष्य असलेले लोकही लग्न न करण्याचा अथवा मुल न होऊ देण्याचा निर्णय घेऊ शकतातच.
मी तुम्हाला हो किंवा नाही मध्ये उत्तरं देता येतील असे काही प्रश्न वर विचारले आहेत. आपण ह्यावेळेस अशी चर्चा करुन पाहुयात का? तुम्ही मला अज्ञानी म्हणणार मग मी तुम्हाला हेकेखोर.. त्यातुन निष्पन्न काय होते?
तुमच्या मते मी अत्यंत टोकाची उदाहरणे घेत आहे. पण तुम्ही सुद्धा तुमच्या बघण्यात नाही म्हणुन एखाद्याचे उदाहरण सरळ उडवुन लावत आहात. बहुतांश स्त्रियांना अमुक एक गोष्ट वाटणे आणि "सर्व" स्त्रियांना अमुक एक वाटणे ह्यात फरक आहे. मुल न होऊ देताही परिपुर्ण आयुष्य जगणार्या स्त्रियांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. तुम्ही बराच पारंपारिक विचार करत आहात.
असो.. एकमेकांचे वाभाडे न काढता काही बोलणे शक्य असेल तर मी चर्चेस जरुर तयार आहे. शिवाय माझी मते चर्चेने बदलु शकतील अशी असतात. त्यामुळे तुमचे माहित नाही, मला विचारांना खाद्य मिळेल म्हणुन मी ह्या फंदात पडत आहे. अन्यथा आपली चर्चा नंतर कुणीकडे जाते हे जगजाहीर आहे.
जर आपल्याशी चर्चा करायची आहे
माझ्या १०० वर्षांच्या आयुष्यात मी समुद्र पहिला नाही
पुण्यात समुद्र नाही ना, म्हणून
तुम्ही परवा काहीतरी तद्दन खोटे आणि बिनबुडाचे वर्णन करत होता, समुद्र असतो म्हणे, तो असा असतो इ इ
जर मी एवढ्या मोठ्या आणि अत्यंत व्यासंगी आयुष्यात समुद्र पाहिला नाही। तर समुद्र कसा काय अस्तित्वात असेल ?
तुमच्या लक्षात मुदा येत नाही आणि तुम्ही आस्तित्वात नसलेल्या गोष्टीवर निरर्थक आत्मरंजन करत राहता
कस बै होणार तुमचं
मला लोकांच्या विचारसरणीचं कायम नवल वाटतं, एकदम एक्स्ट्रीम उदाहरणं घ्यायची
मला वाटतंय ही उदाहरणं एक्स्ट्रीम असण्यापेक्षा प्रसिद्ध आहेत म्हणुन नमूद केली आहेत
बाकी 'माझा एक मित्र' , 'माझी एक बहीण' अशी उदाहरणं ही आलेलीच आहेत. पण ती इतरांना माहित नसतात आणि त्यामुळे काय म्हणायचे आहे ते नीट सगळ्यांपर्यंत पोहोचत नाहित.
पण सामन्य आयुष्यात लता देखील एक स्त्रीच आहे.
मान्य की माझा व्यासंग पुलंच्या एक शंतांश देखील नाही. पण म्हणून निपुत्रिक राहण्याचा निर्णय घेण्याचा मला अधिकार नाही असा त्याचा अर्थ होतो काय ?सामान्य आयुष्य असलेले लोकही लग्न न करण्याचा अथवा मुल न होऊ देण्याचा निर्णय घेऊ शकतातच.
निपुत्रिक राहाण्याचा निर्णय तर तुम्ही घेतला आहेच. पण मुलाची कटकट होईल इतकं सामान्य आयुष्य व्यस्त नसतं असा अर्थ आहे.
तुलना कशाला हवी ? मला पाहिजे तितकं स्वच्छंदी मी जगेन.. नव्हे जगत आहेच.
आम्ही मुलगा असून सुद्धा स्वच्छंदी जगतो. काय प्रॉब्लम आहे ?
निपुत्रिक राहाण्याचा निर्णय तर तुम्ही घेतला आहेच. पण मुलाची कटकट होईल इतकं सामान्य आयुष्य व्यस्त नसतं असा अर्थ आहे.
नसू देत की व्यस्त, उरलेल्या वेळात झोपा काढेन मी नाहीतर मिपावर पडीक राहीन.. काय प्रॉब्लेम आहे ? आणि व्यस्त असण्याबद्दल मी कुठे काय म्हणालो ? नसतो मी फार व्यस्त , मग ? म्हणून मुल जन्माला घालावं ? मला संगोपनाची आवड/इच्छा नाहीये तरी ??
व्यस्त असण्याबद्दलच म्हंटल तर लताजींनी वर्षाला शंभर एक गाणी कमी गायली असती तरी त्यांच्या आजच्या पोजिशनला धक्का नसताच पोहोचला. रतन टाटांनी एक दोन प्लांट कमी उभारले असते तरी भारतीय अर्थव्यवस्थेला फार हानी पोहोचली असती असं नाहीचेय.
त्यामुळे व्यस्त असल्याने त्यांनी लग्न केलं नाही असंच म्हणणार का ?
आम्ही मुलगा असून सुद्धा स्वच्छंदी जगतो. काय प्रॉब्लम आहे ?
काहिच नाही. इथे मी 'चाईल्डफ्री व्हा रे बाबांनो' अशी जाहिरात करतोय असं वाटलं की काय ?
तसे तुमचे मुद्दे आवडतात. पण मुळ मुद्दे सोडून भलतेच मुद्दे पकडून धाग्याला ज्वलंत ठेवण्यात तुम्हा तिघांचा खारीचा सिंहाचा वाटा असतो. बर वर आपला रान्ग नम्बर लागलाय हे तिघेही मान्य करता , पण फ़ोन काही कोणी खाली ठेवताच नाय... :)
भलतेच नाही.. अनुषंगिक मुद्दे म्हणतात त्यांना..! मला विषयालाच धरुन शेवटपर्यंत चर्चा झालेला मिपाचा एखादा मेगाबायटी धागा दाखवा बरं... आपण तरी गप्पा मारताना एकाच मुद्द्याला धरुन बोलतो का? चर्चा, गप्पा, वाद, भांडणं ही उलगडत जातात.. एका विषयाला धरुन बोलणे आणि निष्कर्षाला येणे हा हेतु नसतोच. खुमखुमी जिरवणे आणि कुकरच्या शिट्ट्या काढणे हेच खरे कारण!
खरं सांगायचं झालं तर माझ्याकडे सध्या खुप जास्त वेळ आणि कंपनीचे अमर्याद इंटरनेट आहे. तेव्हा वेळ घालवायला मला काही तरी टाईमपास नको का? असे असताना फोन खाली का च ठेवायचा म्हणते मी??!! ;)
ओ....मी पण मी पण,
तसाही संक्षी आयडीचा आणि माझा वादविवाद पुर्वी एकदोनदा रंगला होता.
आता नव्या रुपात ....म्हणजे त्यांचे नवे रुप...माझा जुनाच आयडी शाबूत आहे :)
विठा हा मूर्ख प्राणी इथे पण नको ते पचकत आहे .
वंध्यत्व हे फक्त स्त्रीला असते का ?
वंध्य पुरुषाबद्दल काही म्हणत नाही.
-->अपत्यजन्म ही स्त्रीची अत्यंत नैसर्गिक इच्छा आहे. पुरुषाला बाप व्ह्यायला आवडत नाही का ?
आपल्याला मूल असावा ही पुरुषाला नैसर्गिक इच्छा नसते का ?
-->मूल नसलेल्या कपलमध्ये बाँड तयार होत नाही म्हणे !
नसलेली अक्कल बघा ! याला काडीची माहिती नसते ! अनुभव तर मुळीच नसतो तरी जिथे स्त्रिया , सहजीवन आला की अकलेचे तारे तोडलेच . आणि कोणत्याही माहितीचा विदा नसतो , नुसताच हवेत गोळीबार.
तुमची भाषा कठोर वाटतेय पण तुमच्या मुद्द्यांशी सहमत.
@विठा..ज्याला जे जसं वाटतय त्याला ते तसं करुद्या जोपर्यंत इतरांना त्रास होत नाही. उगाच स्व:ताचे विचार दुसर्यांवर का लादायचे. वेगळे विचार दिसले आपल्यापेक्षा तर लगेच चालू.
ज्याला जे जसं वाटतय त्याला ते तसं करुद्या जोपर्यंत इतरांना त्रास होत नाही. उगाच स्व:ताचे विचार दुसर्यांवर का लादायचे. वेगळे विचार दिसले आपल्यापेक्षा तर लगेच चालू.
ज्यांचे विचार ठाम असतात ते धागा काढून विचारणा करत नाहीत. ते आपला अनुभव सांगतात. जर धाग्यावर चर्चाच झाली नाही तर मग इथे काथ्याकूट हा पर्यायच बाद करावा लागेल. शिवाय प्रत्येक जण आपल्या अकलेनंच निर्णय घेतो तस्मात, विचार लादतो म्हणणं निव्वळ बालीशपणा आहे.
त्यांना वाचायला दिसत नाही हे ठीक पण लिहायचं तरी कळतं का ?
वंध्यत्व हे फक्त स्त्रीला असते का ? वंध्य पुरुषाबद्दल काही म्हणत नाही.
काय पण समज आहे विषयाची, व्वा! . इथे वंध्यत्वाची चर्चा चालू आहे का ?
आपल्याला मूल असावा ही पुरुषाला नैसर्गिक इच्छा नसते का ?
इथे एका सदस्याच्या विनापत्य राहाण्याच्या निर्णयाबद्दल चर्चा चालू आहे. पण असले घोडे छाप प्रतिसाद द्यायला वाचायला लागतंय कशाला ?
मूल नसलेल्या कपलमध्ये बाँड तयार होत नाही म्हणे !
तुमचा विवाह झाला आहे का ? इथे आता कुणी विचारत नाही इतकं लक्षात घेऊन पुढचा प्रतिसाद द्या.
चर्चेचा विषय तर हा आहे.
"लग्न,कुटुंब यांच्या लफड्यात पडण्यापेक्षा आयुष्यभर अविवाहित राहणे जास्त व्यवहार्य व चांगले आहे काय? अविवाहित आयुष्य जास्त आनंदी आहे काय?"
मला वाटतं मकलेंनी त्यांचे विचार मांडले. त्यातील एक वाक्य पकडून त्यावर का चर्चा/कीस पाडताय. त्यांना जसं जगायचं तसं जगू द्या.
आणि मग इथे लावली आम्ही दहा हजाराची लड, ये धतड ततड, धतड ततड, धतड ततड, धतड ततड, धड.
खाडेसाहेबांना शतकोत्तर धाग्याच्या शुभेच्छा. कॉन्ट्रॅडिक्शनला इम्पॉसिबल म्हटलंय. खोडून दाखवा आणि पंचशतकी धागा मिळवा.
एखादा बोहल्यावर चढून उभा आहे, हातात वरमाला आहेत, डोकीस मुंडावळ्या आहेत, चेहर्यावर संभ्रम आहे, थकून जाऊन तो डाव्या बाजूने मान वळवून त्या निरोपाची वाट बघत आहे. तो निरोप आला की वरमाला घालायची की नाही हे ठरणार आहे. तो वाट बघतोय तळमळत. तो निरोप आला नाही म्हणून विचारतोय - अजून ठरलं का नाही?????
चुकीचं चित्र उभं राहिलं आहे.
माझा प्रश्न आसमंताला कवेत घेणारा आहे. आपली सर्टिफाईड आकलन क्षमता कमी असल्याने आपणास प्रश्न समजणं अशक्य आहे. तस्मात राहूच द्या....
जमलंय का?
नै जमलं. 'आकलन क्षमता कमी असल्याने' असं काही विठाजगतात नसतं. बायनरी असतं. थेट असते किंवा नसतेच. त्यामुळे वाक्य बदलून:
आपल्याला आकलन क्षमताच नसल्याने आपणास प्रश्न समजणे शक्यच नाही तस्मात अज्ञानाच्या अंधारात चाचपडणे चाललंय.
प्रतिक्रिया
अहो ते प्राण्यांचे basic
रानात बसून मिळवलेले ज्ञान
In reply to अहो ते प्राण्यांचे basic by कंजूस
कंजूसभाई क्या जबरदस्त ठोका है!
In reply to अहो ते प्राण्यांचे basic by कंजूस
...
In reply to कंजूसभाई क्या जबरदस्त ठोका है! by विवेक ठाकूर
काय दंगा घालतेत बे लोक?
हा हा, काय चर्चा झाली! हा
रेवतीजी, प्रतिसाद आवडला
In reply to हा हा, काय चर्चा झाली! हा by रेवती
..
मुद्देसुद
In reply to .. by mugdhagode
ब्याचलर म्हणजे अविवाहित
In reply to .. by mugdhagode
भिन्नलिंगीची जबाबदारी नसणे -
मला वाटलं ब्याचलरेट म्हणतात
In reply to भिन्नलिंगीची जबाबदारी नसणे - by कंजूस
त्या स्फिन्स्टर असतेत.
In reply to भिन्नलिंगीची जबाबदारी नसणे - by कंजूस
स्पिन्स्टर*
In reply to त्या स्फिन्स्टर असतेत. by सूड
स्पिन्स्टरचा भावार्थ थोडा
फरक वाचून
In reply to स्पिन्स्टरचा भावार्थ थोडा by कंजूस
घरात एक घोडी आहे,आमच्या नंतर
In reply to फरक वाचून by सूड
नेहमीचेच गोलंदाज, नेहमीचेच
चुकीचा दृष्टीकोन !
In reply to नेहमीचेच गोलंदाज, नेहमीचेच by अप्पा जोगळेकर
ऑ ? मी असं कुठे लिहिलंय
In reply to चुकीचा दृष्टीकोन ! by विवेक ठाकूर
मग `सामना अनिर्णित अवस्थेत संपणार '
In reply to ऑ ? मी असं कुठे लिहिलंय by अप्पा जोगळेकर
पिराबाई,
काहीही...
In reply to पिराबाई, by विवेक ठाकूर
तितक ? कुणाशी तुलना कशाला हवी
In reply to काहीही... by मराठी कथालेखक
मी तुम्हाला हो किंवा नाही
In reply to पिराबाई, by विवेक ठाकूर
पिरताई
In reply to मी तुम्हाला हो किंवा नाही by पिलीयन रायडर
मला लोकांच्या विचारसरणीचं
In reply to पिराबाई, by विवेक ठाकूर
पिरा आणि मकले
In reply to मला लोकांच्या विचारसरणीचं by मराठी कथालेखक
तुम्ही इतक्या गोष्टी बोलला
In reply to पिरा आणि मकले by विवेक ठाकूर
इंपॉसिबल!
In reply to तुम्ही इतक्या गोष्टी बोलला by निशांत_खाडे
या वाक्यातला 'सर्वतोपरी' हा
In reply to इंपॉसिबल! by विवेक ठाकूर
काहीही काय ?
In reply to या वाक्यातला 'सर्वतोपरी' हा by मितान
निपुत्रिक राहाण्याचा निर्णय
In reply to पिरा आणि मकले by विवेक ठाकूर
हा विडीओ बघा
खिक्क...अता धागा व्यवस्थित
गम्मत पाहा हावडा ब्रिजवरून,
In reply to खिक्क...अता धागा व्यवस्थित by टवाळ कार्टा
खुप जमता है रंग...
जित्याची खोड हो..
In reply to खुप जमता है रंग... by ब़जरबट्टू
ए गपे...तुला मी म्हणालो का कि
In reply to जित्याची खोड हो.. by पिलीयन रायडर
तुझा काय ठरला?
In reply to ए गपे...तुला मी म्हणालो का कि by टवाळ कार्टा
लिविन
In reply to तुझा काय ठरला? by कपिलमुनी
काड्या सारतंय नुसतं.. =))
In reply to ए गपे...तुला मी म्हणालो का कि by टवाळ कार्टा
मी एकटाच??? ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊऊउ
In reply to काड्या सारतंय नुसतं.. =)) by पिलीयन रायडर
बजरबट्टू आयडीला टक्या मेल्या?
In reply to जित्याची खोड हो.. by पिलीयन रायडर
पहिलं वाक्य बजरबट्टुला..
In reply to बजरबट्टू आयडीला टक्या मेल्या? by विजय पुरोहित
नाही...
In reply to जित्याची खोड हो.. by पिलीयन रायडर
खारीचासिंहाचा वाटा असतो. बर वर आपला रान्ग नम्बर लागलाय हे तिघेही मान्य करता , पण फ़ोन काही कोणी खाली ठेवताच नाय... :)भलतेच नाही.. अनुषंगिक मुद्दे
In reply to नाही... by ब़जरबट्टू
खिक्क.... वनडे खेळायची आहे का
In reply to भलतेच नाही.. अनुषंगिक मुद्दे by पिलीयन रायडर
ओ....मी पण मी पण,
In reply to खुप जमता है रंग... by ब़जरबट्टू
विठा
हो खरं.. पुरुषांच्या
In reply to विठा by तात्या
तुमची भाषा कठोर वाटतेय पण
In reply to विठा by तात्या
@ शलभ,
In reply to तुमची भाषा कठोर वाटतेय पण by शलभ
हे तात्या कोण उपटसुंभ ?
In reply to विठा by तात्या
इथे एका सदस्याच्या विनापत्य
In reply to हे तात्या कोण उपटसुंभ ? by विवेक ठाकूर
तुम्हाला मकलेंचे प्रतिसाद दिसले नाहीत ?
In reply to इथे एका सदस्याच्या विनापत्य by शलभ
चर्चेचा विषय तर हा आहे.
In reply to तुम्हाला मकलेंचे प्रतिसाद दिसले नाहीत ? by विवेक ठाकूर
आणि मग इथे लावली आम्ही दहा
शुभेच्छा मला नाही विवेक ठाकूर
In reply to आणि मग इथे लावली आम्ही दहा by तर्राट जोकर
शुभेच्छा मला नाही विवेक ठाकूर
In reply to शुभेच्छा मला नाही विवेक ठाकूर by निशांत_खाडे
आम्ही अगोदर लावलेले दिवे अजून
In reply to शुभेच्छा मला नाही विवेक ठाकूर by सस्नेह
चौदावा प्रतिसाद
In reply to आणि मग इथे लावली आम्ही दहा by तर्राट जोकर
अजून ठरलं का नाही????? ;)
चित्रच उभं राहिलं बगा.
In reply to अजून ठरलं का नाही????? ;) by वैभव जाधव
ठरलं नाही तर वरमाला घेऊन,
In reply to चित्रच उभं राहिलं बगा. by तर्राट जोकर
चुकीचं चित्र उभं राहिलं आहे.
In reply to चित्रच उभं राहिलं बगा. by तर्राट जोकर
नै जमलं. 'आकलन क्षमता कमी
In reply to चुकीचं चित्र उभं राहिलं आहे. by वैभव जाधव
मुळात प्रश्नाकडे लक्ष देऊ शकत
In reply to नै जमलं. 'आकलन क्षमता कमी by तर्राट जोकर
आलं आलं, पुरेसं लैनवर आलं,
In reply to मुळात प्रश्नाकडे लक्ष देऊ शकत by वैभव जाधव
गे - लेस्बियन लोकांच्या