✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

पोश्टरबॉइज -२

अ
अभ्या.. यांनी
Mon, 05/02/2016 - 00:47  ·  लेख
लेख
जेवणंखाणं उरकून २ तास झाले. प्रेस बंद करायची वेळ आली तरी नेत्यांचा पत्ता नाही. कार्यकर्त्यांचे फोनवर फोन चालू होते. कंटाळून आता उरलेल्या कामाला उद्या या असे सांगून पीसी बंद केला आणि निघालो. दरवाजातच स्कॉर्पिओला अडलो. पांढर्‍या लिननच्या ताग्यात गुंडाळलेले आणि सोन्याने मढलेले एक वजनदार प्रकरण बॅकसीटवरुन उतरत होते. पांढर्‍याच लेदरच्या चपला आणि हातातले राडो. जडावलेले डोळे आणी इंग्लिश प्लस सेंटचा उग्र वास. गप्प गाडी परत लावली आणि येऊन पीसी चालू केला. झालेल्या कामाचा आढावा सरलोकांनी नेहमीच्या सफाइने दिला. "हे बग, नाळ मुंजाळे येयाचं जल्दी. नाईटला पोस्टर पायजे. आता निग" इतका हुकूम मिळाला की परत आवरुन निघेपर्यंत नेते आणि कार्यकर्त्यांची नाईट कुठे याची सुश्राव्य चर्चा ऐकायला मिळाली. ......................................... सकाळी सकाळी प्रेसमध्ये माझ्या आधी कार्यकर्ते हजर. आज जरा संख्या वाढलेली. माझ्या मागून तिन्ही बाजूने तिन्ही भाषांमधून सूचनांचा भडीमार चालू झाला. पोस्टरवरच्या फोटोत साहेबांना त्यांची स्कॉर्पिओ दिसायला हवी होती. साहेबांच्या पोराचे म्हणजे व्हिलनचे फोटोत कपडे आणि शरीर फारच सुरकुतलेले दिसत होते. हिरॉइनच्या अंगावरचे कपडे त्या पोजला शोभत नव्हते (हे साहेबांचे स्पेशल मत) हिरोचा पोलिस ड्रेस ओघळलेला आणि बहुरुप्याची कळा दाखवणारा होता. व्हिलनचे सोबती नुसते हातात बंदुका घेतल्याची अ‍ॅक्शन करुन उभे होते. कॉमेडिअनचे फोटो त्यातल्या त्यात सरस होते. शेवटी मदतीला येणार इंटरनेटच हो. विष्णुवर्धनच्या कुठल्याश्या पिक्चरमधली डॅशिंगपणे चालत येणारी कानडी इन्स्पेक्टरची पोज हिरोच्या तोंडाला बसवण्यात आली. राहुल देवची पिळदार बॉडी व्हिलनने उधार घेतली. वजनी डान्सर मुमैतखानच्या अदावर थिरकली. हिरोईनचे कपडे मात्र स्वतः साहेबानी दिलेल्या फोटोनुसार सुधारण्यात आले. लेआउटात उरलेल्या बाजूला मिळतील तसे इतर कलाकार कोंबण्यात आले. पोस्टरच्या दोन्ही बाजूला हिरो आणि व्हिलन पेटलेल्या जाळाच्या पार्श्वभूमीवर चालत येत होते. रोहित शेट्टीने उडवलेल्या गाड्याच्या पार्श्वभूमीवर स्कॉर्पिओ आपली ४७४७ नंबर दिमाखात दाखवत होती. डिस्को लाईटसच्या प्रकाशात डान्सर चमकत होती. इतक्या सगळ्या गोंधळात नाटकाचे नाव कुठेय अन त्यातला संसार कुठेय हा प्रश्न मात्र विचारायचा राहिलाच. पोस्टर आता ८० टक्के पूर्ण भरत आलेले. खालची बाजू सौजन्याची. अर्थात देणगीदारांची. देणगीच्या आ़कड्यानुसार क्रम लावित १०-१२ महांतेश, ७-८ श्रीशैल आणि बरेचसे गौडा लावले गेले. अगदी खालच्या पट्टीत नाटकाची वेळ, स्थळ आणि प्रेसलाईन टाकली आणि प्रुफ रिडिंगला देईपर्यंत संध्याकाळ झाली. इतक्या सहवासात बराचश्या कार्यकर्त्यांना फोटोशॉपचे चमत्कार पाहून माझ्या मोठेपणाची खात्री पटलेली. नाटकाला अवश्य या, साहेब सगळी सोय करतील असा आग्रह वारंवार झाला. डिझाइन प्रिंटिंगला गेले आणि मी ह्या कानडी व्यापातून जरा मोकळा झालो. ..................................... दोन आठ्वड्यानी हा विषय डोक्यातून पूर्ण विसरलेला. मालकानेच आठवण करुन दिली. "अरे ते नाटकाला तुला बोलावलेय बघ. रात्री असतंय. मज्जा असती फुल्ल. इथले काम संपवून जाउन या उद्या" शेतात रस्ता की रस्त्यात शेत असा ५० कीमी प्रवास करीत आम्ही चौघे रात्री १० च्या सुमाराला गावात पोहोचलो. गावची यात्रा असल्याने झगमगाट सगळीकडेच दिसत होता. साहेबांच्या लॉजवर खाण्यापिण्यांची जय्यत तयारी होती. जावयाचा होणार नाही इतका पाहुणचार सोसून नाटकाच्या ठिकाणी पोहोचलो. अगणित स्पीकर कन्नड भाषेतली गाणी बोंबलत होते. आम्हीच केलेले पोस्टर गावभर लावलेले दिसत होते. नाटकाच्या ठिकाणी खास पाहुण्यांच्या सोफ्यावर जागा मिळून समोरचा गोंधळ पाहत बसलो. रंगमंचाचे पूजन, दिवाबत्ती, आशिर्वादी आचार्य आणि नेत्यांचे सत्कार वगैरे आटोपून प्रत्यक्ष नाटक सुरु व्हायला तास गेला. गरीब घरातला हिरो, त्याचे आईबाप आणि इतर गावकरी यांच्या संवादातून काहीही कळत नव्हते. अभिनय वगैरे तर सोडा पाण्यात पावडर कालवून रंगवलेले भयाण चेहरे आणि ओरडून म्हणलेले संवाद हेच नाटक होते. जरासे प्रेक्षक बोअर झाले की कॉमेडिअन येउन काहीतरी विदूषकी चाळे करुन जात होता. तेवढ्याने प्रेक्षकांचे समाधान झाले नाही की डान्सर येऊन हिंदी गाण्यावर ठुमके मारुन बेफाट नाचून जात होती. हिंदी, कन्नड पिक्चरच्या संवादांची उजळणी वारंवार होत होती. एकाचे संवाद चालू असता बाकीचे कलाकारांची गप्प मान खाली घालून उभे राहण्याची पध्दत तर अप्रतिम अशीच होती. स्वतःचे लग्न असल्यासारखे नटलेल्या व्हिलनने डान्सरशी केलेल्या माफक अंगचटीला तुफान शिट्ट्या पडत होत्या. कधीतरी मध्येच रंगमंचावर दोन बुलेट, एक घोडा आणि स्कॉरपिओ पण चक्कर मारुन गेली. आता अजून काय दाखवणारेत ह्या अपेक्षेत असताना क्लायमॅक्स आला. सगळ्या पात्रांच्या उपस्थितीत हिरोने अगदी जंटलमेनपणे व्हिलनला बेड्या चढवल्या. व्हिलनसाहेब बेड्या आणि हिरोला घेउन थाटात एक्झिट करते झाले आणि नाटकाचा धी एंड झालेला आम्हाला समजला. ..................................... पहाटे कधी घरी अलो आणि झोप लागली हे कळाले पण नाही. रात्रभर कानात अगम्य खडखड होत होती. सकाळी जाग आली ती आमच्या मालकाच्या फोनने. "आवडले का रे नाटक. पोस्टरचे भारी झालेले आपले काम. ते बघून अजून एक पार्टी आलीय पोस्टर छापायला. ये पटकन" "आलोच" म्हणत आवरायला सुरुवात केली. ..................................... (समाप्त)

Book traversal links for पोश्टरबॉइज -२

  • ‹ पोश्टरबॉईज
  • Up
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
नाट्य
लेखनप्रकार (Writing Type)
अनुभव

प्रतिक्रिया द्या
15786 वाचन

💬 प्रतिसाद (46)

प्रतिक्रिया

अरे वा!!

जव्हेरगंज
Mon, 05/02/2016 - 00:48 नवीन
अरे वा!! आज पहिल्या प्रतिसादाचा मानकरी मी आहे तर!! गुड गुड आता वाचतो !!
  • Log in or register to post comments

च्यायला फुल फॉर्मात !

जव्हेरगंज
Mon, 05/02/2016 - 00:55 नवीन
च्यायला फुल फॉर्मात ! ते पोस्टर बघायची उत्सुकता लागून राहिली राव !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज

+१

तुषार काळभोर
Mon, 05/02/2016 - 11:53 नवीन
ते पोस्टर बघायची उत्सुकता लागून राहिली राव !! डेमीमध्ये एव्ह्ढं सगळं कसं बसवलं ते पाहाय्चंय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज

झक्कास भाव

मी-सौरभ
Mon, 05/02/2016 - 00:54 नवीन
  • Log in or register to post comments

झक्कास भाव

मी-सौरभ
Mon, 05/02/2016 - 00:54 नवीन
एकदमच छान लिहून सोडलं की वो
  • Log in or register to post comments

छान!!!

हकु
Mon, 05/02/2016 - 00:56 नवीन
छान!!!
  • Log in or register to post comments

बेंण्चवर... तुफान लका.

तर्राट जोकर
Mon, 05/02/2016 - 00:57 नवीन
बेंण्चवर... तुफान लका. हे काय एवड्यात संपवलंस. भांग पाडता पाडता हेअरफॉल झाला काय?
  • Log in or register to post comments

सैराटने झालय डोस्कं.

अभ्या..
Mon, 05/02/2016 - 01:00 नवीन
सैराटने झालय डोस्कं. विस्कटलेल्या डोस्क्याचा थोडे दिवस भांग नाही पडणार. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

चालतंय. कलाकाराचं मन है,

तर्राट जोकर
Mon, 05/02/2016 - 01:01 नवीन
चालतंय. कलाकाराचं मन है, सैराट न झालं तर म्येलं समजावं.... :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

पहिला भाग लय भारी होता अभ्याभौ!

बोका-ए-आझम
Mon, 05/02/2016 - 01:05 नवीन
हा भाग म्हणजे एकदमच उरकल्यासारखा वाटला.
  • Log in or register to post comments

चांगलं झालंय पण नुसती देखणी

वैभव जाधव
Mon, 05/02/2016 - 03:04 नवीन
चांगलं झालंय पण नुसती देखणी बॉडी आलिया गा. आत्मा हरिवलाय. शो मस्ट गो ऑन असं आमाला सांगताय ना आरटिष-ट? मन जागं असलं की लै घोळ हुत्यात. चालायचं पण. लिहित राहावा.
  • Log in or register to post comments

वा मस्त !! पोस्टर बघता आलं

खटपट्या
Mon, 05/02/2016 - 05:57 नवीन
वा मस्त !! पोस्टर बघता आलं असतं तर लय मजा आली असती...
  • Log in or register to post comments

पहिल्या भागाची मजा नाही. घाईत

सतिश गावडे
Mon, 05/02/2016 - 06:39 नवीन
पहिल्या भागाची मजा नाही. घाईत उरकल्यासारखे वाटत आहे.
  • Log in or register to post comments

नाही तर काय?

नाखु
Mon, 05/02/2016 - 08:08 नवीन
उगा पाट्या टाकून बोळावणी केलीय. हा तो अभ्या नाय. बॅट्या-वप्या कुणी अभ्याचा आय्डी हॅक केलाय का बघा जरा. लढतर फेम नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

चांगलंय दादा. पहिल्या

असंका
Mon, 05/02/2016 - 07:02 नवीन
चांगलंय दादा. पहिल्या भागापेक्षा वेगळा इफेक्ट आलाय. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

हा..हा..

चांदणे संदीप
Mon, 05/02/2016 - 07:28 नवीन
अभ्यादादा, तुमची सुक्क्याला दादा, आणि पैलवानाला हिंदकेसरी म्हणायची श्टाईल लैच्च आवडते आपल्याला! तीच इथे मोकळ्या हाताने भरभरून आलेली आहे. असंच एक नाटक आम्ही मराठीत केलं होत तर त्येच कुणा कळ्ळे इल्ले म्हणून आता मल्टीलिंग्वल करावं म्हण्तो म्हणजे सगळाच दोष आपल्यावर यायला नको! =)) मगं, कन्नड डॉयलॉक लिहून देणार ना? Sandy
  • Log in or register to post comments

कहर ...

चौकटराजा
Mon, 05/02/2016 - 09:16 नवीन
मला फोटू शाप बर्‍यापैकी माहित असल्याने जमवाजमवीची मजा लूटू शकलो. बाकी ती ले आउटमधे होणारी आर्टिस्टची पंचाईत ही दाद देण्या सारखीय ! पांढर्या लिननच्या ताग्यात गुंडाळलेली मगरूरी .... जणू आताच काही घेउन आलेल्ला .. वर्ण्॑न मस्त. आर्र्र्र कानाला आयफोन र्‍हायला की !
  • Log in or register to post comments

लै भारी.

प्रचेतस
Mon, 05/02/2016 - 09:37 नवीन
लै भारी.
  • Log in or register to post comments

असली माणसे झेलणे हे एक दिव्य असते....

ज्ञानोबाचे पैजार
Mon, 05/02/2016 - 09:38 नवीन
मजा आली दोन्ही भाग वाचताना. पोष्टर प्रतेक्ष बघायची गरज नाही इतके सुरेख आणि डिटेल वर्णन केले आहे त्याचे. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

भारीच आहे!

एस
Mon, 05/02/2016 - 10:01 नवीन
भारीच आहे!
  • Log in or register to post comments

धम्माल लिहिलेय.

शाम भागवत
Mon, 05/02/2016 - 10:23 नवीन
.
  • Log in or register to post comments

इथे पोस्टर टाकशील तर मजा येईल

विवेक ठाकूर
Mon, 05/02/2016 - 11:25 नवीन
छाने स्टोरी.
  • Log in or register to post comments

सुपर्बच.!

अत्रुप्त आत्मा
Mon, 05/02/2016 - 11:31 नवीन
सुपर्बच.!
  • Log in or register to post comments

छान!!

संजय पाटिल
Mon, 05/02/2016 - 11:41 नवीन
छान!! पण एव्हड्यात स्माप्त? अजुन पायजे व्हती राव...
  • Log in or register to post comments

+१

अत्रुप्त आत्मा
Mon, 05/02/2016 - 12:42 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय पाटिल

जे ब्बात मजा आली.

स्पा
Mon, 05/02/2016 - 11:44 नवीन
जे ब्बात मजा आली. थोडा हात आखडता घेतलास
  • Log in or register to post comments

कव्हर ड्राईव्हला सुरुवात

आदूबाळ
Mon, 05/02/2016 - 11:50 नवीन
कव्हर ड्राईव्हला सुरुवात करताना व्हीव्हीएस आणि संपवताना द्रविड असं काहीसं झालंय.
  • Log in or register to post comments

:)

नाव आडनाव
Mon, 05/02/2016 - 11:55 नवीन
:)
  • Log in or register to post comments

नै जम्या

टवाळ कार्टा
Mon, 05/02/2016 - 11:56 नवीन
नै जम्या
  • Log in or register to post comments

लै भारी

बाबा योगिराज
Mon, 05/02/2016 - 11:58 नवीन
लै भारी
  • Log in or register to post comments

पोश्टर

तात्या
Mon, 05/02/2016 - 12:58 नवीन
अभ्या.. , व्यावसायिक कराराचा , गोपनियतेचा भंग होणार नसेल तर ते पोश्टर इथे चिकटवता येईल का?
  • Log in or register to post comments

अहो तात्या हे काम करताना

अभ्या..
Mon, 05/02/2016 - 13:15 नवीन
अहो तात्या हे काम करताना डिझाइनर म्हणून नोकरीला होतो. आता नाही राह्यली ती नोकरी आणि ते पोस्टरपण. एखाद्या गाववाल्याकडूनच मिळवावे लागल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तात्या

गुगल करा की साहेब.. मिळून

मोदक
Mon, 05/02/2016 - 16:52 नवीन
गुगल करा की साहेब.. मिळून जाईल एखादे पोष्टर. :) लेख नेहमीप्रमाणे झकास..!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

+१

अत्रुप्त आत्मा
Mon, 05/02/2016 - 13:10 नवीन
+१
  • Log in or register to post comments

एकदम भारी

जगप्रवासी
Mon, 05/02/2016 - 16:00 नवीन
वाचून त्या पोस्टर बद्दल खूप उत्सुकता लागून राहिली आहे, शक्य असेल तर पोस्टरच अडकवा ना राव...
  • Log in or register to post comments

भारी !

सस्नेह
Mon, 05/02/2016 - 16:04 नवीन
पोस्टर जितके रंगतदार झाले तितके नाटक काही नाही झाले, तर !
  • Log in or register to post comments

थोडं बैजवार चाललं असतं.

सूड
Mon, 05/02/2016 - 18:39 नवीन
थोडं बैजवार चाललं असतं.
  • Log in or register to post comments

अभ्याभौ... छान आहे पण जरा

विजय पुरोहित
Mon, 05/02/2016 - 19:49 नवीन
अभ्याभौ... छान आहे पण जरा खुलासेवार पेश्शल अभ्याच्या पंचेससहित पाहिजे होतं.
  • Log in or register to post comments

वाटलेच होते

सुरवंट
Mon, 05/02/2016 - 22:40 नवीन
टमराळं
  • Log in or register to post comments

हा हा हा

एक एकटा एकटाच
Tue, 05/03/2016 - 06:23 नवीन
हा हा हा
  • Log in or register to post comments

छान लिहिले आहे...

मुक्त विहारि
Tue, 05/03/2016 - 08:53 नवीन
आवडले.
  • Log in or register to post comments

लंबर २

हेमंत लाटकर
Tue, 05/03/2016 - 16:38 नवीन
लंबर २
  • Log in or register to post comments

लै भारी ! हा भाग पण मस्तच !

चौथा कोनाडा
Tue, 05/03/2016 - 17:21 नवीन
लै भारी ! हा भाग पण मस्तच !
....व्हिलनचे सोबती नुसते हातात बंदुका घेतल्याची अ‍ॅक्शन करुन उभे होते. कॉमेडिअनचे फोटो त्यातल्या त्यात सरस होते.
देणगीच्या आ़कड्यानुसार क्रम लावित १०-१२ महांतेश, ७-८ श्रीशैल आणि बरेचसे गौडा लावले गेले.
पोस्टरचे भारी झालेले आपले काम. ते बघून अजून एक पार्टी आलीय पोस्टर छापायला. ये पटकन"
हे अन इतर काही ! मज्जा आली वाचायला ! पुढील पोस्टरच्या प्रतिक्षेत !
  • Log in or register to post comments

शेतात रस्ता की रस्त्यात शेत....

सरल मान
Tue, 05/03/2016 - 17:41 नवीन
फुटलो राव....
  • Log in or register to post comments

सगा, सुड, नाखु, स्पा, स्पा

वपाडाव
Tue, 05/03/2016 - 17:43 नवीन
सगा, सुड, नाखु, स्पा, स्पा सर्वांशी शमत... खुलला नाही...
  • Log in or register to post comments

अभ्या भाग आवडला बे. खुलला- नै

बॅटमॅन
Wed, 05/04/2016 - 01:12 नवीन
अभ्या भाग आवडला बे. खुलला- नै खुलला इ. बद्दल म्हणायचे तर मला तरी आवडला.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा