Skip to main content

आपल्या मालोजीचे कचकून अभिनंदन

लेखक प्रचेतस यांनी शनिवार, 30/04/2016 09:29 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळी वर्तमानपत्र वाचायला उघडलं तर पहिल्याच पानावर आपल्या मालोजीची बातमी. शिवाजी महाराजांची दोन अस्सल चित्रे नेदरलॅण्ड्स आणि क्रोएशिया येथील संग्राहकांकडून मालोजीने मिळवून महाराष्ट्रात आणली. तुझा अभिमान वाटतो मित्रा. अधिक माहिती येथे पहा. a
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 23177
प्रतिक्रिया 104

प्रतिक्रिया

अभिनंदन मालोजीराव आणि समस्त शिवप्रेमींकडुन धन्यवाद सविस्तर लेखाची वाट बघतोय.

अभिनंदन मलोजीरव.. लैच भारी कामगिरी केलीत..

बातमी वाचली होती पण हे आपले मिपाकर मालोजीराव आहेत हे माहित नव्हते, अभिनंदन. खूप छान काम केलात. शिवप्रेमी, जगप्रवासी

मालोजीरावांचं अभिनंदन आणि आभार.

जिद्द, चिकाटी, निस्सीम भक्ती, प्रखर निष्ठा, प्रबळ आशावाद, काटेकोर नियोजन व स्वराज्याच्या प्रेरणात्मक व्यक्तिमत्वासाठी सैल सोडलेली थैली या जगात खरोखर तोड नाहीं हे तुम्हाी दाखवून दिलेत मालोजीराव, धन्यवाद कृतकृत्य केल्याबद्दल.

मालोजीरावांचे अभिनंदन नुकतीच आयबीन लोकमतने दखल घेतली आहे १.३२ मि. ची क्लिप आहे उद्या डकवतो.

खरी शिवजयंती साजरी झाली तेव्हा ही बातमी चेपुवर वाचून..आणि इथला धागा पाहून.. डॉ. खरे यांच्या मताशी प्रचंड सहमतः नुसते शिवाजी महाराजांच्या नावाने "गहिवर" काढणारे आज वर खूप पाहीले आणि पाहत आहोत. (याबद्दल लिहावेसे वाटत नव्हते पण राहवले नाही) पण प्रत्यक्ष कृती करणारे फार कमी त्यात एक मालोजीराव आहेत. त्यांना साष्टांग दंडवत.

आज सकाळी ८ वाजता झी २४ तास वर मी मालोजीरावांची मुलाखत पाहिली. खरंच सांगते, मिपा सदस्य असल्याचा एवढा अभिमान वाटला की बास. आपल्या घरातल्याच कुणीतरी हे भारी काम केलंय असंच वाटत होतं. प्रचंड अभिमान वाटला. ताबडतोब घरातल्यांसमोर जेवढा जमेल तेवढा भाव खाउन घेतलाच मी... :) मालोजीराव रॉक्स

लग्गेच? हे अजून भारी रे वल्ली... सॉरी, प्रचेतस

मालोजीरावांचे मनःपूर्वक अभिनंदन. एक दिवस ही बातमी बघितली होती पण हेच ते मालोजीराव हे महिती नव्हते. पुनःश्च मनःपूर्वक अभिनंदन.

मनःपूर्वक अभिनंदन अन आमच्या पुर्ण यूनिट तर्फे तुम्हाला सल्यूट करतो मालोजीराव ! अनमोल ठेवा परत आणलात

मालोजीराव जगदाळे महाराष्ट्राच्या दैवताची मुळ रूपातली चित्रे केवळ तुमच्या हातूनच महाराष्ट्राला मिळायची होती तर! तुमच्यातली ती जिद्द आणि कष्ट केवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांच्या तोडीचेच वाटले. देव करो आणि तुमच्या हातून अशीच अभिमानास्पद कामगिरी घडत राहो अशी इच्छा आणि अभिनंदन करते.